संत तुकाराम व गौतम बुध्द ह्यांवरील पुस्तक खरेदीबद्दल सल्ला.

pramanik's picture
pramanik in जनातलं, मनातलं
2 Aug 2012 - 4:15 pm

साष्टांग नम्स्कार,,,,,,,,,,,,

मला तुकाराम महाराज लीखीत अभंग जसेच्या तसे,मुळ रुपात वाचायचे आहेत.कींवा एखाद्या लेखकाने अर्थ समजवुन सांगितलेले पण तरीही मुळ अभंग लिहलेले असलेले पुस्तक हवे आहे.

येथील पुस्तकप्रेमी जनता एखादे नाव सुचवेल का? मला नेहमीच सुचवलेल्या/प्रख्यात वस्तु आवड्तात कारण त्यामागे अनुभव असतो आणि पुस्तकांच्या खासकरुन धार्मिक पुस्तकांच्या बाबतीत ते खुप खरे आहे.

त्याचप्रमाणे मी गौतम बुध्द ह्यांच्या शिकवणी सांगणारे पुस्तक शोधत आहे.

Teachings of the Buddha
by Jack Kornfield

ह्यावर शिक्कामोर्तब करणार आहे.मराठीत एखादे गौतम बुध्दांवरचे चांगले पुस्तक आहे का?

आगाउ धन्यवाद.

धर्मसल्ला

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

2 Aug 2012 - 4:17 pm | परिकथेतील राजकुमार

महात्मा गौतम बुद्ध (लेखक साने गुरुजी)

pramanik's picture

2 Aug 2012 - 4:39 pm | pramanik

http://saneguruji.net/2011-02-04-05-17-25.html

आपण ह्या वरील पुस्तकाबद्दल बोलत आहात का?

मी काही पाने वाचली.फार छान आहे.त्यात साने गुरुजींचे मराठीतले लिखाण वाचायला मला फार आवडते.

तेव्हा आता मराठीतुनच वाचणार.

धन्यवाद.

विजुभाऊ's picture

2 Aug 2012 - 5:12 pm | विजुभाऊ

तुकाराम महाराज लीखीत अभंग जसेच्या तसे,मुळ रुपात वाचायचे आहेत
ते त्याच वेळेस इंद्रायणीत बुडाले होते म्हणे..........

प्रचेतस's picture

2 Aug 2012 - 5:22 pm | प्रचेतस

तुकारामांचे समग्र साहित्य येथे वाचावयास मिळावे.

शिवाय तुकारामगाथाही डाउनलोड करता येऊ शकेल.

http://www.tukaram.com/marathi/gatha/default.htm

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेले गौतम बुद्धाचे चरित्र, जातककथा, तसेच बौद्ध धर्माविषयी इतरही साहित्य या संकेतास्थळावर पाहावयास मिळेल.

http://www.dharmanandkosambi.com/

मन१'s picture

2 Aug 2012 - 6:25 pm | मन१

वल्लीला थॅंक्स. टंकनश्रम वाचवलेत. कोसंबींच्या लिखित साहित्याबद्दल ऐकलं होतं, हे जालावरचं म्हणजे भन्नाटच प्रकरण आहे.
तुकारामांबद्द्ल http://misalpav.com/user/10 ह्या व्यक्तीचे सापडातील तेवढे लेख वाचायला हरकत नाही. भन्नाट व्यक्तिमत्व आहे.
तुकाराम डॉट कॉम वर काही अनवट वाटाणारा मजकूर सापडला होता, त्यावर इथे http://www.misalpav.com/node/17305 धागाही काढला होता.

विलासराव's picture

2 Aug 2012 - 6:58 pm | विलासराव

http://www.globalpagoda.org/
http://www.vridhamma.org/
फोन करुन पहा.

चित्रगुप्त's picture

2 Aug 2012 - 9:11 pm | चित्रगुप्त

तुकारामः (भालचंद्र नेमाडे यांनी निवडलेले अभंग) निवडक तुकाराम हे पुस्तक.
बुद्धः ओशो यांच्या बुद्धावरील प्रवचनांचे संग्रह (पुस्तकाचे नाव विसरलो).

साने गुरुजींचे समग्र लिखाण म्हणून जे आहे, त्यातील साने गुरु़जींचे स्वतःचे जे लेखन आहे, (उदा. श्यामची आई, भारतीय संस्कृती इ.) ते उत्कृष्ट आहेच, परंतु त्यांनी इंग्रजीतून अनुवाद केलेले साहित्यही खूप आहे, त्यातील काही लिखाण हे त्या त्या मूळ लेखकाचे पूर्वग्रह, अमूक विचारसरणीबद्दल कडवा दुराभिमान इ. इ. ने झाकोळले गेले आहे, असे वाटते. बुद्धाबद्दल त्यांचे पुस्तकही कुणा इंग्रजी लेखनाचा अनुवाद आहेसे दिसते. 'क्ष' या गोष्टीबद्दल प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीच्या 'य' या गोष्टीपण त्याच दर्जाच्या असतीलच, असे नाही.

कलंत्री's picture

2 Aug 2012 - 10:08 pm | कलंत्री

एस्सो धम्मो सनंतनो असे ओशो लिखित पुस्तकाचे नाव आहे. ओशोची कोणतेही पुस्तके वाचा ( @ ६०० +) त्यात बुद्धाचा उल्लेख येतोच येतो.

त्यातही जमले तर विपश्यना या तंत्राचा प्रत्यक्ष लाभ घ्या.

तुकारामाच्या पुस्तकाचा आस्वाद घेण्यासाठी चांगली ४ / ५ रसाळ किर्तने ऐका.

चित्रगुप्त's picture

2 Aug 2012 - 10:13 pm | चित्रगुप्त

तुकारामांवर कीर्तने ऐकण्याची फार इच्छा आहे, जालावर आहेत का उपलब्ध ? प्रत्यक्ष ऐकणे नशीबी येइल असे वाटत नाही.

ईगतपुरीला जाउन अनुभव घ्या.

दीपक साळुंके's picture

3 Aug 2012 - 2:23 pm | दीपक साळुंके

१. धर्मानंद कोसंबी यांचे भगवान बुद्ध हे पुस्तक पीडीएफ स्वरुपात येथे -
पूर्वार्ध - http://www.scribd.com/doc/92876367/Dharmanand-Kosambi-Bhagwan-Buddha-Pur...
उत्तरार्ध - www.scribd.com/doc/92877743/Dharmanand-Kosambi-Bhagwan-Buddha-Uttarardh

२. राहूल सांकृत्यायन यांचे बुद्ध दर्शन हे पुस्तक (हिंदीमध्ये) - http://www.scribd.com/doc/101914994/Bauddha-Darshan-by-Rahul-Sankrutayan

३. बुद्ध धर्म के २५०० वर्ष - http://www.scribd.com/doc/101916182/Bouddha-Dharm-Ke-2500-Varsh

४. बुद्ध धर्म के विकास का इतिहास - http://www.scribd.com/doc/101917722/Bouddha-Dharm-Ke-Vikas-Ka-Itihas

वरिल सर्व पुस्तके Digital Library of India वरुन उतरवुन घेतली आहेत.

चित्रगुप्त's picture

3 Aug 2012 - 2:48 pm | चित्रगुप्त

तुकाराम आणि बुद्ध यांच्यासारख्यांवरील ग्रंथांचा अभ्यास एकादा माणूस जेंव्हा करू इच्छितो, तेंव्हा जर त्याला काही सल्ला द्यायचा असेल, तर त्या व्यक्तिविषयी थोडी माहिती असणे गरजेचे नसले, तरी उपयोगी ठरू शकते.

उदाहरणार्थ, ती व्यक्ती साठी-सत्तरीत आहे की विशी-तिशीत, याआधी कायकाय वाचन केले आहे, व्यवसाय व आवडीनिवडी, देव-धर्म इ. बद्दल मते, तुकाराम-बुद्ध वाचण्यामागे काय प्रयोजन आहे, म्हणजे काही संशोधनपर असे लिखाण करायचे आहे, की विरंगुळा, की स्वतःत काही बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने वाचायचे आहे ? मुळात तुकाराम-बुद्ध यांचीच निवड कश्यामुळे केली? वगैरे.

कादंबर्‍या, सिनेमा इ. बद्दलच्या सल्ल्यापेक्षा हा विषय प्रश्नकर्त्यासाठी गहन आणि महत्वाचा असणार, म्हणून असे वाटते.
कुणी सांगावे, कदाचित त्याच्या प्रयोजनाच्या दृष्टीने तुकाराम-बुद्ध यांचेपेक्षा अन्य प्रकारचे वाचन वा अनुभव जास्त उपयोगी ठरू शकतात...

नाना चेंगट's picture

3 Aug 2012 - 2:56 pm | नाना चेंगट

विद्रोही तुकाराम आणि सर्वोत्तम भुमिपुत्र गौतम बुद्ध (लेखक आहसाळूंखे) सोडून कुठलेही ;)

चित्रगुप्त's picture

3 Aug 2012 - 3:34 pm | चित्रगुप्त

@ नाना चेंगटः विद्रोही तुकाराम आणि सर्वोत्तम भुमिपुत्र गौतम बुद्ध (लेखक आहसाळूंखे) या पुस्तकांबद्दल थोडी माहिती द्याल का? ही वाचू नयेत, असे सांगता, म्हणून जास्त उत्सुकता.
जसे, माझा फक्त एक वर्षाचा नातू, त्याला जी गोष्ट घ्यायला आपण निषेध करतो, तीच त्याला हवीहवीशी वाटते.
निषेधात एक आकर्षण असते, म्हणून काही गोष्टी 'चोरून' करण्यातच एक थ्रिल वाटते.

नाना चेंगट's picture

3 Aug 2012 - 3:39 pm | नाना चेंगट

लेखकाला हवे तसे निष्कर्ष आणि त्यासाठी सोईस्कर मांडणी.

प्रतिसाद देणा-या प्रेत्येकाचे आभार.

मी सर्व लिंक्स व पुस्तके बघितली.

त्यातुन मी भालचन्द्र नेमाडे ह्यांचे 'तुकाराम' (ह्याचे लेखक पाटील आहेत्,ज्यांनी 'तुकाराम' ह्या ईग्लिश पुस्तकाचे भाषांतर केले आहे.) व साने गुरुजी ह्यांचे 'महात्मा गौतम बुध्द" हे पुस्तक घेतले.हे पुस्तक मिपाच्या सदस्य असलेल्या एका प्रकाशकाकडुन प्रकाशित झाले आहे असे कळते.

दोन्हीही पुस्तके छान आहेत.पण 'तुकाराम" पुस्तकात अभंगाचे अर्थ बिल्कुल दीलेले नाहीत.अभंगातला प्रत्येक शब्दन्शब्द वाचकाला समजतो असे ग्रुहीत धरले गेले आहे,ते आवडले नाही.

असो,सर्वांचे मनापासुन आभार.

चला धागा अनायासे वर आलाच आहे तर...

बुध्द धर्मावरील ...

१ ) मिलिंदप्रश्न ( सार वाचु नका !! एक जाड भरड पुस्तक आहे)

२ ) त्रिपिटीका

बास दुसर कोणी ही ( साक्षात धर्मानंद कोसंबी सुध्दा ! ) लिहीलेल काही ही वाचु नका असे मी म्हणेन :)

तुकाराम महाराज

१ ) A philosophy of tukaram : खुशवंतसिंग ( आता हे कोण विचारून आम्हाला लाज आणु नका .)

सहसा असल्या धाग्यांवरच लिहायच टाळतो मी, पण वरचे काही परतिसाद वाचुन डोक्याला शॉट लागला.

मन१'s picture

6 Aug 2012 - 5:52 pm | मन१

गौतमास मुळातून, त्रिपिटाकातून वाचायचे नि आमच्या तुकारामाबद्द्ल वाचताना (म्राठीतच असूनही) अभंग न वाचता खुशवंत वाचायचा असं का?

हा मुद्दा योग्य आहे,पण कदाचित त्यांना मराठीतले चांगले पुस्तक ज्ञात नसावे.

मनोबा, तुझ्या मताविषयी आदर आहेच !!

परंतु , होते काहीसे असे ..

बुध्द धर्माविषयी मी पाहिलेले/वाचलेले लेखक ईतर धर्माविषयी ( विषेशःता हिन्दु) तेढ ( थोडीशी का असेना ) न दाखवता लिहुच शकत नाही असे माझे मत आहे, म्हणुन मी प्रामाणिक रावांना थेट तत्वज्ञान वाचायला सांगीतले.

त्या मिलींदप्रश्न एका कोणी लिहीलेले नाही ( तो संग्रह सुवर्णबौध्दांनी लिहीलेला आहे, बौध्दयानातील) , त्यात कुठल्याही ईतर धर्माचा साधा ऊल्लेख देखील नाही. हेच त्रिपीटीकेविषयी - मुळात त्रिपीटीका मिळवायला आणि वाचुन संपवायला वेळ लागेल हे माहीत असुन मी सजेस्ट केला, मात्र वाचुन झाल्यावर केवळ "धम्म" काय आहे ते कळेल !

तेच महारांजा विषयी ..

एक तर महाराज समजायला प्रचंड अवघड आहे, त्यात महाराजांचे चरित्र लिहीताना ब्राम्हण द्वेष दाखवावाच असे काही आहे का ? ( नुकताच रिलीज झालेला 'तुकाराम ' याचे ऊत्तम उदाहरण आहे, तुकारामांच्या तत्वज्ञानाकडे लक्ष च जात नाही स्साल, मान्य आहे की त्यांच्या कालात रोष पत्करावा लागला होता, द्वेष सहन करावा लागला होता, पण महाराजांनी कधी कोणाचा द्वेष केला?????? ) , म्हणुन त्या अनुषंगाने लिहीलेले पुस्तक मला सांगावे लागले ..

असो ..महाराजांविषयी मी एक लेख ( अगदी अभ्यास करून) लिहीला होता, तेव्हा जत्रेत येणार्‍या वयोवूध्द लोकांकडुन समजुन घेतले होते. मी स्वता सुध्दा आश्चर्य-चकीत झालो होतो तेव्हा !!

हा लेखाचा दूवा ( सहसा ' ईकडच तिकड करायला आवडत नाही मला, पण आज हाच विषय दुसर्‍यांदा झाला म्हणुन हा प्रपंच )

http://www.mimarathi.net/node/945

विलासराव's picture

1 Oct 2012 - 12:02 am | विलासराव

आजच इगतपुरीहुन परत आलोय.
तिपीट्क मे सम्यक संबुद्ध हा ६ पुस्तकांचा संच आणला आहे. बुद्ध साहित्य जे पाली भाषेत उपलब्द्ध आहे त्यावरुन हे सार काढुन ही पुस्तके विपश्यानेचे आचार्य गोयंका गुरुजींनी लिहीली आहेत.