बिअरशॉपची किमया - बेवडा भरकटला - नो प्रोब्लेम.

५० फक्त's picture
५० फक्त in जनातलं, मनातलं
20 Jun 2012 - 7:54 am

आंतरजालीय सज्जनांनो,

आपल्या घरात फ्रिज असतात, पण ब-याच वेळा वेळे अभावी व बरेच वेळा आळसाने वा काही वेळा 'त्यापेक्षा ऑटो बरा, आयला डोक्याला कटकट नाही ! या हिशोबाने घरात बिअर आणुन ठेवण्याचे आपण सर्व जण (यात मी नाही आलो) टाळतो.

आपल्याला हवी तेंव्हा बिअर न मिळणे व चिल्ड न मिळणे या वेगवेगळ्या समस्या आहेत, आपल्याला वेटर चांगला मिळाला नाही बिअर गरम येते, पण दारुधंद्यातल्या वितरणातील दोषांमुळे हव्या त्या ब्रँडची बिअर न मिळण्याचा अनुभव येतो. बहुतेक वेळा क्वचित प्यार्टी देणारा दोस्त बिल भरणार असेल तर हा प्रकार घडतो.

अशी प्यार्टी आपल्या डोक्याला त्रासदायक वाटते, पण हा दोष हल्ली सुरु झालेल्या एका सोयीने सुधारता येतो, या सोयीला'' बिअर शॉप '' म्हणतात. त्याचा उपयोग आपण पाहु या.

हे बिअर शॉप सरकारी कोट्यातुन उघडलेले आहे, पण त्या मधला इंग्रजी शब्दांचे स्पेलिंग भरकटलेले आहे.

आता याच दुकानाच्या परमिटवर, याच्या मालकाच्या जावयाने एक डुप्लिकेट दुकान उघडले आहे

आता या डुप्लिकेट दुकानातुन दरवाजा उघडुन आत जा.

इथं तुमचा नाव, पत्ता, पॅन कार्ड नंबर व रेशन कार्डाची झेरॉक्स द्या.

इथल्या फॉर्म मध्ये तीन प्रकारे माहिती द्यावी लागेल,
आपल्याला हवा असलेला ब्रँड
त्याचा स्टाँगनेस
त्यात टेंपरेचर ० ते १० ठेवा,
आणि ओकेच्या वर क्लिक करा.

आता खाली तुमच्या निवडीची आणि त्या टेबलामागच्या मदतनिसिने दिलेल्या सल्याची तुलना करुन पहा.

(सर्व छायाचित्रे, आंतरजालावरुन फुकट साभार )

राहती जागाविडंबनजीवनमानविरंगुळा

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

20 Jun 2012 - 8:20 am | श्रीरंग_जोशी

तसा लेख परिणामकारक वाटतोय पण काही तरी कमी वाटते आहे?

तसे तुमचा सदस्यनाम १० वर्षांपूर्वी पुण्यातील बिअरबार वाले वापरत असत. Any beer Rs.50/- only.

कदाचित तुम्ही वैधानिक इशारा द्यायचे विसरला...

संसारा उध्वस्त करी दारू....
बाटलीस स्पर्श नका करू....

सौजन्य - आमची वाहिनी सह्याद्री वाहिनी वरील एक जुनी जाहिरात (बायको -आलात पिऊन........ मुलगी - नको बाबा नको नको असे संवाद असायचे त्यात).

कानडाऊ योगेशु's picture

20 Jun 2012 - 8:30 am | कानडाऊ योगेशु

जोशीबुवा मिपाकरांसाठीचा वैधानिक इशारा वेगळ आहे हो...
संसारा उध्वस्त करी दारू.
लोकहो संसार नका करू..

५० फक्त's picture

20 Jun 2012 - 9:37 am | ५० फक्त

होय, चकणा कमी आहे.

आणि वैधानिक इशारे आम्ही कोण देणार, हमने तो कभी पि हि नही,

रोज सकाळी झोपेतुन उठल्यावर जिवंत आहोत हे लक्षात येतं, त्याचीच नशा एवढी चढते की बाकी कसल्या नशेची गरजच पडत नाही.

असो,

श्रीरंग_जोशी's picture

20 Jun 2012 - 11:26 am | श्रीरंग_जोशी

लगे रहो ५० भाई...!

जेनी...'s picture

20 Jun 2012 - 8:55 pm | जेनी...

कै च्या कैच :D

चौकटराजा's picture

20 Jun 2012 - 8:29 am | चौकटराजा

आता याला पुढचा धागा लावणारा सौरभ उप्स म्हणून अ आ ची नेमणूक करा झालं !

चौकटराजा's picture

20 Jun 2012 - 8:32 am | चौकटराजा

मस्तच .....
आपला नम्र, किल्ली

किसन शिंदे's picture

20 Jun 2012 - 9:03 am | किसन शिंदे

फक्त ३ मिनिटात दोन वेगवेगळे प्रतिसाद???

आवडलं नाही आवडलं, काय समजायचं काय?? ;)

चौकटराजा's picture

20 Jun 2012 - 9:08 am | चौकटराजा

आवडलंच १०० टक्के. त्यात आमच्या दोन् मिपा मित्राना उचकवले आहे. तेच दोघे आणखी मस्त विडंबन आणू शकतील.

प्रचेतस's picture

20 Jun 2012 - 8:43 am | प्रचेतस

पहिला फोटू पाहूनच हहपुवा झाली.

टवाळ कार्टा's picture

20 Jun 2012 - 8:52 am | टवाळ कार्टा

शेवटचा फोटो कोणत्या पबचा आहे? ;)

नशीब शेवटच्या फोटोतला मिपाकर ओळखु आला तुम्हाला, तो कोण आहे असं नाही विचारलंत ?

किसन शिंदे's picture

20 Jun 2012 - 9:05 am | किसन शिंदे

:D

विडंबन आवडलं ब्वॉ, निदान आपल्याला तरी.. ;)

- इस्पिकराजा

मदनबाण's picture

20 Jun 2012 - 9:19 am | मदनबाण

वारुणी ओतणारी ललना विशेष आवडली ! ;)

I Love this Bartender टीव्ही शो आला डोळ्यासमोर...

;-)

बॅटमॅन's picture

20 Jun 2012 - 11:52 am | बॅटमॅन

मदिरा आणि मदिराक्षी ;)

सोत्रि's picture

20 Jun 2012 - 9:55 am | सोत्रि

50 फक्तचा धागा आणि तोही बीयरवर, मोठ्या उत्साहाने धागा उघडला पण अंमळ निराशा झाली, कुछ मजा नही आया :(

-( भरकटलेला) सोकाजी

सोत्रि साहेबांशी सहमत. काय लिहिल आहे ते नक्की कळलच नाही.
५० फक्त साहेब बहुतेक लेख लिहीताना स्वताच गंडलेले दिसतात. गोंधळलेले दिसतात.

अहो ते फोटोशॉपची किमया- फोटो धुरकटला ? नो प्रॉब्लेम ! ह्या धाग्याचे विडंबन आहे.

वल्ली साहेब, मग माझ आधीचा प्रतिसाद मी मागे घेतो.
तुम्ही माझी चुक लक्षात आणुन दिल्याबद्दल तुमचे आभार.

प्रभाकर पेठकर's picture

20 Jun 2012 - 10:39 am | प्रभाकर पेठकर

मला तर काही कळलाच नाही लेख आणि त्याचे प्रयोजन. पण असो, बिअरवर आहे म्हणजे चांगलाच असणार.

हे लक्षात येतं, त्याचीच नशा एवढी चढते की बाकी कसल्या नशेची गरजच पडत नाही S)

क्या बात है साला! ज्याम खूष झालो!

आता कधी लावतोय असं झालय! आणि नेमकी आज संध्याकाळीच पार्टी आहे!!

>हमने तो कभी पि हि नही -

यावरनं एक गझल आठवली :

कल जो पी थी अजी ये तो उसका नशा है,
तुम्हारी कसम आज पी ही नही,
हिचकीयां आ रही है, ये क्या हो रहा है?
तुम्हारी कसम आज पी ही नही

कुछ तो नशा आपकी बात का है
और थोडा नशा धिमी बरसात का
हमे आप यूं ही शराबी न कहिये
ये दिलपर असर है मुलाकात का
है मुलाकात का
थाम लिजे हमे बस यही इल्तिजा है
तुम्हारी कसम आज पी ही नही

लगे रहो!

अर्धवटराव's picture

20 Jun 2012 - 9:51 pm | अर्धवटराव

गजल आवडेश !!
शायर कोण म्हणायचे??

अर्धवटराव

गणपा's picture

20 Jun 2012 - 1:05 pm | गणपा

हे विडंबन आहे हेच लोकांना सांगावं लागावं यातच काय ते आलं. :)

बाळ सप्रे's picture

20 Jun 2012 - 3:47 pm | बाळ सप्रे

+१

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jun 2012 - 8:01 pm | अत्रुप्त आत्मा

@हे विडंबन आहे हेच लोकांना सांगावं लागावं यातच काय ते आलं. >>> यहीच बोल्ता है...!

विडंबन असं असावं,कि दिसावी मुळ जिल्बी
आशय असा असावा,की वाचक व्हावा एल्बी...!

अग्यावेताळ's picture

20 Jun 2012 - 10:27 pm | अग्यावेताळ

हे तुम्ही म्हणावं श्री अआ ?

टाकुनी स्वतः विडंबने टुकार
दुसर्‍यांना देती सल्ले चुकार...!

अत्रुप्त आत्मा's picture

21 Jun 2012 - 11:58 pm | अत्रुप्त आत्मा

विडंबने (????) टुकार >>> आपल्याला काही प्रॉब्लेम आहे का..?

आमची सगळीच विडंबने टुकार क्याटॅगरीत मोडून दिल्या बद्दल आपले हार्दिक आभार.... --^--^--^--
स्वतः एकही विडंबन न करता,तुंम्ही कसे इतके भिकार...? :-p

मूळ धागाही तेवढ्याच दमाचा असावा असं माझं प्रामाणिक मत आहे. प्रशिक्षणपर धाग्यावर विडंबक बिचारा पाणी टाकून वाढवणार ते किती ? मला तर एक स्तुत्य प्रयत्न वाटला.

सोत्रि's picture

20 Jun 2012 - 9:17 pm | सोत्रि

विडंबक बिचारा पाणी टाकून वाढवणार ते किती ?

पावसाळा सुरू होऊन पाण्याची रेलचेल झाली असली तरीही पाण्याची अशी उधळपट्टी बरी नव्हे ;)

- (पानीकम) सोकाजी

तेही खरंच म्हणा !!

जाता जाता: शेवटच्या फोटुत नातीच्या कौशल्याकडे कौतुकाने बघणारे आजोबा पाहून त्या नातीचा हेवा वाटला.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

20 Jun 2012 - 9:20 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मूळ धागाही तेवढ्याच दमाचा असावा असं माझं प्रामाणिक मत आहे.

मग तसा धागा निवडायला पाहिजे ना. उगाच कशाचेही विडंबन का करा ? मिमिक्री वाले पण सुप्रसिद्ध लोकांची मिमिक्री करतात. तुझी माझी करत नाहीत.

प्रशिक्षणपर धाग्यावर विडंबक बिचारा पाणी टाकून वाढवणार ते किती ?

दर क्ष दिवसांनी (किंवा तासांनी) मिपा बोर्डावर विडंबन आलेच पाहिजे का ? कशाला नको त्यात पाणी घालून पाणी फुकट घालवायचे ?

मला तर एक स्तुत्य प्रयत्न वाटला.

मला वेळेचा अपव्यय वाटला. जे लेखक खूप भारी लिहू शकतात त्यांनी उगाच वेळ,सर्जकता आणि शक्ती वाया घालवू नये असे माझे मत आहे.

(विडंबकांना रायटर्स ब्लॉक कधी येतो याची वाट पाहणारा ) विमे

गणपा's picture

20 Jun 2012 - 9:25 pm | गणपा

ऐसाइच बोल्ताय. :)
विमे माझे टंकायचे कष्ट वाचवल्या बद्दल धन्स.

सूड's picture

20 Jun 2012 - 9:28 pm | सूड

तू पण ना राव !!
__/\__

असो. :D

पैसा's picture

20 Jun 2012 - 8:28 pm | पैसा

पहिला फोटो बघून हसून जीव गेला!

रेवती's picture

20 Jun 2012 - 8:38 pm | रेवती

सहमत. बरीच हसले.