पुण्यातील एका पॅटीससाठी प्रसिद्ध बेकरीवजा दुकानातील हा किस्सा.
माझा एक मित्र तिथे नेहेमी जायचा. तिथल्या काउंटरवरील इसम त्याच्या ओळखीचा झाला होता.
एकदा असाच मित्र तिथे त्या इसमाशी गप्पा मारत उभा होता. तेवढयात एक गिर्हाईक आलं पॅटीस घ्यायला.
"पॅटीस आहेत का?" - गिर्हाईक
"संपले" - काउंटरवरील इसम
गिर्हाईक निघून गेलं.
"आज लवकर संपले वाटतं पॅटीस?" - मित्र
"छे!! संपले नाहीत अजून. संपतील थोड्या वेळात" - काउंटरवरील इसम
"मग त्या माणसाला का सांगितलत की संपले म्हणून?" - मित्र
"अहो सारखे लोक येत असतात काही ना काही घ्यायला. आम्हाला जरा विश्रांती नको ?" - काउंटरवरील इसम
:-)
प्रतिक्रिया
29 May 2012 - 2:45 pm | सुहास..
किस्सा एकुन हसावे की रडावे तेच कळेना !
हा किस्सा एकलात का ?
१ ) एक मनुष्य " गोखले ", साधारण चार दिवस " चितळेंच्या " दुकानात भाकरवडी च्या लाईनीत उभे रहात होते. चार दिवस " भाकरवड्या संपल्या " हा बोर्ड पाहुन परतत होते.. पाचव्या दिवशी त्यांनी विचारले " तुम्ही जास्त का बनवित नाही ? " घ्यायच्या तर घ्या असे उत्तर मिळाले ..त्यावर त्यांनी उत्तर दिले, चांगले सगळ्या दुकाना एकु जाईल अश्या आवाजात ..." अहो माझा प्रश्न नाही, माझा कुत्रा तुमच्या भाकरवड्यांशिवाय दुसरे काहीच खात नाही " =)) =)) =))
29 May 2012 - 3:06 pm | उदय के'सागर
तुम्हि सांगितलेला किस्सा एक नंबर.. अर्थात हा झाला गमतीचा भाग पण खरंच अश्या माज लोकांची (जसे हे चितळे) अशीच मारायला हवी :D
29 May 2012 - 6:01 pm | भारी समर्थ
अशोक नायगावकरांच्या मुखपुस्तिकेच्या भिंतीवरील याच विषयावरील तर्कट-
ते चितळे बंधू मिठाईवाले एक्सप्रेस हायवेवरच का नाही लिहून ठेवत की बाबा 'बाकरवडी संपली'. म्हणजे पुढे यायलाच नको मुंबईकरांना.....
-
29 May 2012 - 7:39 pm | रमताराम
म्हटलात ते बरंच झालं. मला नेहमी वाटतं एवढी नावे ठेवण्यात आपली शक्ती दवडण्यापेक्षा नॉन्-पुणेकर सरळ पर्याय का शोधत नाहीत. तुमच्याही डोस्क्याला त्रास नाही नि आमच्या. इथे सालं कोणी हळदीकुंकू देऊन बोलावल होतं का, या आमची.... जाऊ दे. आम्हाला आमचे चितळे बंधू राहू द्या तुम्ही तुमचे कोण राजपुरोहित का कोण आहेत त्यांना मांडीवर घेऊन बसा. फुकाचे टीआरपी साठी जिलब्या कशाला पाडताय.
29 May 2012 - 8:40 pm | चिंतामणी
ररा- लै भारी
29 May 2012 - 7:45 pm | रेवती
'बाकरवडी संपली'
असे पदार्थ हमखास संपणारे व्यवसाय आपण करू शकाल काय?
नावं ठेवण्यापेक्षा असा व्यवसाय करून दाखवा.
मुंबईतच सुरु करा, पुण्यापर्यंत यायची गरज पडू नये.
जे शहर आवडत नाही तिथे जायचा विचार कशाला करावा?
आवडत नाही तिथे जायचं आणि नंतर आवडलं नाही म्हणून ओरडत फिरायचं.
29 May 2012 - 10:11 pm | सूड
मला कळत नाही चितळ्यांकडच्या बाकरवड्या घ्यायला पुण्यात कशाला यायला हवं ? चितळे बाकरवडीचा पुडा सुद्धा मिळतो की !! पाव किलो बाकरवडीसाठी पुण्यात यायचा मूर्खपणा करावाच का ? पूर्वी चितळ्यांबद्दलचं माझं मत म्हणजे नावडतीचं मीठ अळणी आणि आवडतीचा.... असो असं होतं. आता चितळे दूधाशिवाय आमची सकाळ सुरु होत नसल्याने मत बदललंय. ;) आणि नायगावकरांचं फार मनावर घेऊ नका, शेवटी ते हास्यकवी आहेत. अशी वाक्य नाही केली तर टाळ्या कशा मिळणार ? एका कार्यक्रमात वेस्टर्न लाईनच्या ट्रेनमधल्या गर्दीला नावं ठेवत होते.
30 May 2012 - 12:18 am | रेवती
अगदी अगदी.
चितळ्यांच्या बाखरवड्यांसाठी मलाही पुण्यात जायला लागत नाही.
इथच हिरव्या देशातल्या भारतीय ग्रोसरीत नको इतक्या मिळतात.
30 May 2012 - 12:24 am | जेनी...
हो आमच्या इकडे सुद्धा इंडियन ग्रोसरि शॉप मद्ध्ये मिळतात
चितळ्यांच्या भाकरवड्या
पण. :(
30 May 2012 - 12:26 am | रेवती
समजलं तुम्हाला काय म्हणायचय ते.
माझ्या काही ओळखीच्यांना त्या तितक्या आवडल्या नाहीत पण सुदैवाने मला चांगल्या मिळाल्यात दोन तीन वेळा तरी.
30 May 2012 - 12:57 am | चिंतामणी
तुसुद्धा हिरव्या देशात आहेस हे एव्हाना माहीत झाले आहे सगळ्यांना. :p
30 May 2012 - 4:34 am | रेवती
मी कश्यासाठी म्हणतीये आणि चिंतुकाकांचं वेगळंच!
30 May 2012 - 4:47 am | जेनी...
रेवा आज्जी चिं तु काका अस्सेच आहेत गं
तु लक्श नको देऊस :D
बाकी चितळयान्च्या नावाने घेतलेल्या भाकरवडीने
पूरती नीराशा केली होती :(
30 May 2012 - 7:23 am | सुहास..
चितळयान्च्या नावाने घेतलेल्या भाकरवडीने
पूरती नीराशा केली होती >>>
चितळ्यांच्या णावाने घेतलेल्या बाकरवडीने पुरती निराशा केली होती.
बाकी चालु द्यात
शुध्दलेखण-अट्टाहासी पुलापलीकडचा पुणेकर
वाशोजीराव पंत
आमची कुठेही शाखा नाही.
30 May 2012 - 9:33 am | जेनी...
सुआस राव मोबायिलवरुन लिलओ :(
त्यामुले असा जाला माजा :(
30 May 2012 - 8:50 am | चिंतामणी
लिहीताना थोडेसे चुकलेच.
हा पोस्ट पूजासाठी होता हे कुठे इंडीकेट झाले नाही. त्यामुळे घोटाळा झाला.
30 May 2012 - 8:20 pm | रेवती
हा हा हा. असो.
आम्ही मॅडम केंव्हापासून झालो कोणास ठाऊक? ;)
30 May 2012 - 12:43 pm | सूड
मला पण चांगलाच अनुभव आहे. त्यांच्याकडचं गाईचं तूप म्हणजे आहाहा. पॅक उघडला की नुसता घमघमाट !!
29 May 2012 - 2:47 pm | Dhananjay Borgaonkar
हम्म्....बर्याच वेळा लोकं स्वरचित किस्से पुण्यात घडलय या नावाखाली खपवुन टाकतात.
अहो त्यांना जरा प्रसिद्धी नको? ;)
बाकी नावाला जागुन किस्सा सांगितलात :D
29 May 2012 - 2:49 pm | शैलेन्द्र
जाम हसलो.. एकंदर प्रकरण, पुणे पाहता, अशक्य नाही..
29 May 2012 - 2:55 pm | पियुशा
मला तर अशक्य वाटते ,बहुतेक तो इसम त्या दुकानात काम करणारा असावा अन त्याची मालकाशी काहीतरी खुन्नस असाव्वी ;)
पुणेकर असा स्वतः च्या पायावर स्वतःच धोंडा नाय पाडुन घेणार ;)
( आता पळ्ळा )
29 May 2012 - 2:56 pm | परिकथेतील राजकुमार
आंतरजालावरील एका मिसळीसाठी प्रसिद्ध कट्टा वजा संस्थळातील हा किस्सा.
माझा एक मित्र तिथे नेहेमी जायचा. तिथल्या चावडीवरील इसम त्याच्या ओळखीचा झाला होता.
एकदा असाच मित्र तिथे त्या इसमाशी गप्पा मारत उभा होता. तेवढयात एक सदस्य आलं धागा टाकायला.
"धागा टाकू का?" - सदस्य
"बिनधास्त" - चावडीवरील इसम
सदस्य टाकून गेलं.
"आज पुन्हा आली वाटतं जिलबी?" - मित्र
"हो!! वैताग आलाय ह्या जिलब्यांचा आणि ट्यार्पी खेचायच्या प्रयत्नांचा " - चावडीवरील इसम
"मग त्या सदस्याला का सांगितलत की बिनधास्त टाक म्हणून?" - मित्र
"अहो सारखे डायरीयावाले येत असतात काही ना काही लेखनकंडू शमवायला. आम्हाला जरा समतोल असण्याचे कौतुक नको ?" - चावडीवरील इसम
29 May 2012 - 3:04 pm | सुहास..
याला म्हणतात अस्सल पुणेकर !!
आता काय म्हणता अजातशत्रुघ्न सिन्हा ;)
29 May 2012 - 4:13 pm | चिंतामणी
__/\__
29 May 2012 - 5:56 pm | jaypal
काय काय म्हणुन फेडशील
"
सुहास जबरी किस्सारे
30 May 2012 - 11:45 am | प्रास
फेडशील की फोडशील? ;-)
29 May 2012 - 11:49 pm | स्मिता.
हे आहे खरे नेटिव्ह (native) पुणेकर... टू बी प्रिसाईझ USSP कर!
30 May 2012 - 1:34 am | जेनी...
परा
___/\___
30 May 2012 - 10:15 am | मृत्युन्जय
हे असले कुजकत हल्कत मिपाकर असतात म्हणुनच मिपाचे नाव बदनाम होते. जरा जिल्ब्यांचा अस्वाद घ्यायला शिका म्हणाव. आणी हो नविन सदस्यांना जरा प्रोत्साहन द्या.
29 May 2012 - 3:41 pm | बॅटमॅन
"धंदांत" प्रायश्चित्त दिले पाहिजे अशा लोकांना!!!
(अर्थात त्यालापण ते "बरी ब्याद मिटली" असे म्हणतील हेवेसांनल ;))
29 May 2012 - 7:09 pm | अविनाशकुलकर्णी
१ लिटर दुध द्या..
आज दुध नाहि..
का??
म्हशी ना सुटी नको का एखादा दिवस?..
29 May 2012 - 7:22 pm | इरसाल
हे चालेल का
गि: मटण द्या एक किलो
दु: आज मटण नाही
गि: का ?
दु: आज बोकड PML (Pre-Murder Leave) वर आहे.उद्या या.
29 May 2012 - 8:57 pm | आशु जोग
चितळेंचे कौतुक करणारे
आणि
चितळेंच्या प्रगतीने पोटदुखी होणारे
अशा २ पोटजाती आहेत असे निरीक्षण नोंदवतो
--
विचार करा पटेल आपल्याला
30 May 2012 - 1:01 am | चिंतामणी
पुण्याचे कौतुक करणारे
आणि
पुण्याच्या प्रगतीने पोटदुखी होणारे
अशा २ पोटजाती आहेत असे निरीक्षण नोंदवतो
(विचार कर. पटेल तुला.;) )
30 May 2012 - 1:33 am | बॅटमॅन
आत्ममग्नतेचे निकृष्ट उदाहरण.
30 May 2012 - 7:55 am | श्रीरंग
अगदी बरोब्बर!
30 May 2012 - 11:33 am | विश्वनाथ मेहेंदळे
आमचे प्यारे काका कुठे गेले ??? मागे मुंबईची प्रगती म्हटल्याने त्यांचा पोटशूळ उठला होता, आता त्याचे मत जाणून घेण्यास प्रचंड उत्सुक आहे मी !!!
4 Feb 2016 - 3:21 pm | प्रणवजोशी
कशात प्रगती करतय पुणे?
5 Feb 2016 - 4:11 pm | असंका
हे विचारायला हा धागा वर काढलात!!!!
पण मजा आली...काय एकेक प्रतिसाद!! निरागसता जपा...एक नं.
29 May 2012 - 10:06 pm | शिल्पा ब
मी पुण्यात इतक्या वेळा गेलेय अन इतक्या वेळी खरेदी केलीये पण असे लोकं कध्धीच पाहण्यात आलेले नाहीत...अगदी चितळ्यांच्या दुकानातसुद्धा. खरं खोटं देव जाणे.
29 May 2012 - 10:48 pm | jaypal
केवळ नशिबवानच नसुन तुमची पुर्व "पुण्याई" चांगली आहे म्हणुन असेल कदचीत
29 May 2012 - 11:28 pm | एक
.
30 May 2012 - 12:35 am | श्रीरंग
हम्म.. तुमच्या उगाच सलगी दाखवायला गेलेल्या मित्राला पुणेरी दुकानदारानी कसा ** बनवला / खोटा किस्सा सांगून मित्रानी तुम्हाला कसा ** बनवला, असा एकंदरीत किस्सा आहे तर!!
30 May 2012 - 1:15 am | आशु जोग
काय करणार ?
काही जणांना
असते अॅलर्जी
चितळे, गोखले, गाडगीळ(सराफ)
मेहेंदळे(हिंदुस्थान बेकरी) अशा नावांची ...
यांना परांजपे स्कीम्सवालेही
'फ्लॅट संपले' ची पाटी दाखवतात
चालायचच
30 May 2012 - 1:22 am | बॅटमॅन
आवरा!! आपल्या एक्स्ट्रापोलेशनचे वारू माध्वीभुक्त होऊन सुसाट सुटले आहेत त्यांना आवरा,नाहीतर...
नाहीतर काय? काही नाय, तुम्हाला ट्रोलराज म्हटल्या जाईल.
30 May 2012 - 3:51 pm | आबा
+१
30 May 2012 - 10:19 am | मृत्युन्जय
पुण्याच्या दुकानदारांचे असंख्य किस्से आहेत. त्यांना आणि त्यांच्यामुळे पुण्याला आणि पुणेकरांना नाके मुरडणार्यांना इतकेच सांगु शकतो:
30 May 2012 - 2:43 pm | किचेन
संतोष बेकरी का? तिथे असे किस्से वरचेवर घडत असतात.
30 May 2012 - 2:53 pm | परिकथेतील राजकुमार
पुण्यात अशा नावाची बेकरी आहे ? आणि ती पॅटिससाठी प्रसिद्ध आहे ? ऐकावे ते नवलच.
30 May 2012 - 3:01 pm | चिंतामणी
सवड कधी आहे सांग. एकदा घेउन जातो.
म्हणजे तुझा अभ्यास वाढेल.
30 May 2012 - 5:01 pm | किचेन
माहित नाही? नक्की पुणेकरच न?
30 May 2012 - 6:21 pm | परिकथेतील राजकुमार
ह्यापुढे :-
< उपरोध > प्रतिसाद < / उपरोध >
असे धोरण स्विकारावे का ?
30 May 2012 - 5:20 pm | वपाडाव
संभाजी बागेतुन फिरता फिरता कधी-मधी आपटे रस्त्यावरही चक्कर मारत जा...
चक्कर मारलीच तर आजुबाजुला पाहत देखील जा...
30 May 2012 - 11:24 pm | जेनी...
आणि चक्कर मारता मारता पर्या आपटे रस्त्यावर kuTHe पडला तर ??
त्याला घरी आणूण सोडायची जवाबदारि कोण घेनार आहात का??
एकतर पून्याचे लोक पत्ता सुद्धा नीट सांगत नाहित, :(
त्याला भलत्याच घरी नेऊन सोडतील :P
31 May 2012 - 12:01 am | सुहास..
पुण्यात अशा नावाची बेकरी आहे ? आणि ती पॅटिससाठी प्रसिद्ध आहे ? ऐकावे ते नवलच. >>>
ह्यात काय नवल ? काल परवा मी संदीप नावाची तम्बाखुची पुडी पाहिली, विठोबा नावाच्या टुथपेस्ट ची ( दंतमंजनची नव्हे !! ) जाहीरात रेडिओ वर एकतो आहे ...उद्या सदाशिवात एखाद्या घरासमोर " अब्दुल नारायण डिसूझा " आणि " घर के सामने वाहने लगाना ईज नॉट अलाव्ड " अशी पाटी दिसेल. परवा " सुप्रसिध्द श्री परा. यांचे पनीर व झणझणीत सुके मटन याचे दुकान "व " प्रत्येक खरेदी सोबत एक आकर्षक खोड रबर फ्री " त्या खाली " आमची घंटा कुठे ही शाखा नाही " अशी पाटी दिसेल , तेरवा ईतिहास कार श्री वाशोजी पंत लोहगाव वाले यांचे " शातंतामय जीवन कसे जगावे ? " असा ३०७४८ पानी ग्रंथ छापुन येईल, आणि त्या वर श्री रमतारम यांची " शांत शांत शांत " अशी कविता " ऐंशी अक्षरे भैस बराबर " या वृत्तपत्रात छापुन येईल, त्यावर श्री चेंगुबा नानुस " वात वात वात " असे विडंबन लिहीतील, आणि मग ......
2 Jun 2012 - 4:01 pm | रमताराम
हे हलकट नेहमी माझ्या नावातला 'राम' काढून 'रम' टाकत असतं.... सवय दुसरं काय.
30 May 2012 - 3:13 pm | एम.जी.
लोककथा... ऐकीव पण इन्टरेस्टिंग...
चितळ्यांचं कुमठेकर रस्त्यावरील दुकान. वेळ रात्री आठ वाजता म्हणाजे दुकान बंद होण्याची.
मालक चितळे स्वत: कुलूप लावायच्या तयारीत..
त्याच क्षणी एक माणूस बंद होणार्या शटरच्या खालून जवळपास लोळण घेत आत घुसला...
चितळ्यांनी त्याला आडवायचा प्रयत्न केला पण तरीही तो चिवट माणूस शेवटी घुसलाच.
चितळ्यांनी खवळून त्याला काय पाहिजे म्हणून विचारलं...
" बाकरवडी.." अपेक्षित उत्तर आले.
"किती वाजले घड्याळात...? आठ वाजले ते दिसत नाही. का घड्याळ चुकीची वेळ दाखवतंय.. तसं असेल तर बाकरवडी ऐवजी घड्याळ घ्या... " चितळे त्याच्यावर वतागले.
" मला बाकरवडी हवीय.."
" मिळणार नाही.. दुकान बंद झालेय... उद्या या.."
" बाकरवडी.."
"शक्य नाही... आता बाहेर पडा आधी..."
चितळ्यांचा संताप अनावर झाला. तो माणूस बाहेर पडत नाही हे बघून चितळ्यांनी शटर ओढले आणि तो माणूस आणि चितळे स्वत: दुकानात कोंडले गेले..
दोन मिनिटांनी आतला वाद वाढला तशी बाहेर गर्दी जमा झाली. गर्दी वाढतच गेली तसे वादही वाढले. मग आतून मारामारीचे, आपटाआपटीचे आवाज ऐकायला येऊ लागले.. काहीतरी फुटल्याचे आवाज आणि माग कुणाचातरी जोरात ओरडण्याचा आवाज... गर्दी अवाक होऊन बघत होती.
इतक्यात शटर परत किलकिले झाले आणि तो माणूस जिवाच्या आकांताने बाहेर पडला आणि पळायला लागला... मागोमाग चितळे बाहेर आले. चिडलेले, घामेजलेले पण तरीही चेहर्यावर एक समाधान घेऊन...
" काय झालं हो...?" गर्दीतून कुणीतरी विचारले.
" बाकरवडी पाहिजे होती... आठ वाजल्यानंतर याला.. आणि नाही म्हटले तर हातघाईवरच यायला लागला... मग दाखवले चौदावे रत्न... आठ वाजता बाकरवडी मागतो म्हणजे काय... वेळेचे भान आहे की नाही.."
" कोण होता हो...?" गर्दीतील उस्तुक प्रेक्षकाने विचारले...
" होता कुणीतरी मद्रासचा... शिवाजी गायकवाड म्हणून... "
चितळ्यांनी शटर ओढून कुलूप लावले आणि ते घराकडे निघाले...
[ ऐकीव किस्सा आहे.. पात्रे काल्पनिक आहेत... साधर्म्य असल्यास निव्वळ योगायोग समजावा...
खुलास करण्याचं कारण चितळ्यांनी बाकरवडी दिली नाही तर पुण्यात रहायच्या फायद्यांपैकी एक संपला असे होईल..]
30 May 2012 - 5:00 pm | किचेन
चितळे एवढ्या शुल्लक कारणावरून चिडण केवळ अशक्य.त्यांनी चेहऱ्यावर एक मिश्कील हसू ठेवत त्याला बाहेर काढाल असत.नाहीतर १० -१५ मिनिट गप्पा मारल्या असत्या.पण भांडण शक्यच नाही.आणि चितळ्यांकडे काय सुरक्षा रक्षक कमी आहेत, कि चितळे स्वत: झटापट करतायत?
30 May 2012 - 5:09 pm | प्यारे१
जपा. निरागसता जपा. ;)
30 May 2012 - 5:40 pm | श्रीरंग
हाहाहाहाहा! एक नंबर प्रतिसाद!!
30 May 2012 - 5:07 pm | एम.जी.
अहो, विनोदी किस्सा आहे हा...
आणि तसंच म्हटलं तर शिवाजी गायकवाड स्वतः कशाला येइल.. ड्रायव्हरला पाठवेल..
आणि ड्रायव्हर तरी त्या कुमठेकर रस्त्याच्या गर्दीत कशाला गाडी घुसवेल..?
डेक्कन, पौड रोड.. किती ठिकाणी चितळ्यांची दुकाने आहेत...
पुढच्यावेळेस असे किस्से टाकताना " विनोदी" अशी क्याटेगरी नमूद करायची खबरदारी घ्यायला हवी..
30 May 2012 - 5:10 pm | किचेन
माफी असावी .शिवाजी गायकवाड नाव झेपल नाही.
30 May 2012 - 5:19 pm | गणामास्तर
असुद्या..सगळ्यांना झेपण्या सारखं नाहीचयं ते प्रकरण.
30 May 2012 - 5:37 pm | चिंतामणी
30 May 2012 - 5:25 pm | विश्वनाथ मेहेंदळे
गुगल करा की !!! एका झटक्यात कळेल.
30 May 2012 - 11:31 pm | जेनी...
राहुदे रे कशाला उगाच :D
30 May 2012 - 5:41 pm | गवि
मूलभूत प्रश्न. "चितळे" आणि "चितळे बंधू" अशा दोन वेगवेगळ्या नावांनी बाकरवडी मिळते. "चितळे" बाकरवडी सर्वत्र मिळत नाही (मात्र एकदा मुं.पु. एक्सप्रेसवेच्या फूडमॉलमधे पाहिली होती). ही गोल आकाराची आणि लहान असते. "चितळे बंधू" बाकरवडी सर्वत्र (मुंबईतही सर्वत्र) मिळते आणि ती लांबट मोठी असते.
हे दोन वेगवेगळे ब्रँड आहेत अशी माझी खात्रीशीर माहिती आहे. पैकी "चितळे बंधू" हा नंतर बाहेर पडून काढलेला ब्रँड आहे असं ऐकलं. दोन्ही ब्रँड चाखून पाहता "बंधूं"चीच बाकरवडी उत्तम निघाली. नुसती "चितळे" बाकरवडी ही पोळीचा रोल मसाला भरुन उन्हात वाळवावा तशी बेचव लागत होती.
अधिक अनुभव आणि माहिती असल्यास या मतावर शिक्कामोर्तब किंवा खोडरबर चालवावे.
30 May 2012 - 6:03 pm | चिंतामणी
ह्यांच्याच बाकरवडी आणि दूकान बंद करण्याविषयी चर्चा चालू आहे.
पुणे आणि पुणेकरांवर खार खाणारे जेंव्हा चितळे असा उल्लेख करतात तो "चितळे बंधू" ओरीजनल (म्हणजे कृतीने) यांच्यासाठीच असतो.
थोडा अभ्यास कमी पडला तुमचा या विषयात. :p
30 May 2012 - 6:08 pm | गवि
आँ.. ? मग ती चितळे बंधू बाकरवडी मस्तपैकी आधुनिक हवाबंद प्याकिंगमधे मिळते की मुंबईत बर्याच किराणा दुकानांमधे.
त्यासाठी का इतकी मारामारी? कदाचित मूळ दुकानात ताजी अतएव खुसखुशीत मिळत असेल म्हणून तिथे जाऊन घेण्याचं जास्त महत्व.
30 May 2012 - 6:15 pm | चिंतामणी
ताजी अतएव खुसखुशीत मिळते. म्हणूनच आटापीटा करतात.
पुण्यात आला की संपर्क साध. आपण जाउ दुकानात आणि मग तु स्वतः अनुभव घे.
30 May 2012 - 6:21 pm | सूड
चिंतुकाका तुमच्या या 'अतएव' साठी टाळ्या घ्याच !! ;)
31 May 2012 - 12:14 am | सुहास..
प्रतिक्रियेला प्रतिउत्तर
मूलभूत प्रश्न. "चितळे" आणि
प्रेषक गवि Wed, 30/05/2012 - 17:41.
मूलभूत प्रश्न >>>>
अस्सल मुंबईकराकडुन अस्सल विचारवंत प्रश्न आल्याने धाग्याने वेगळे वळण घेतले आहे याचा ' कोलकात नाईट - रायडर्स ' ने विचार करावा ...
30 May 2012 - 7:12 pm | तिमा
बर्याच वर्षांपूर्वी मी जिमखान्यावरच्या चितळ्यांच्या दुकानात गेलो होतो. पायर्या चढता चढताच मला एका बाजूला लागलेली भली मोठ्ठी रांग दिसली. त्याकडे दुर्लक्ष करुन मी दुकानात जायला लागलो. एका कर्मचार्याने मला हटकले, 'अहो, रांगेतून या.'
मला बाकरवडी घ्यायचीच नव्हती, हे मी त्याला सांगितल्यावर त्याचा भूत बघावे असा चेहेरा झाला.
5 Feb 2016 - 10:11 pm | जव्हेरगंज
खिक्क्!
31 May 2012 - 2:01 pm | नाखु
जात-पुणे-धर्म....... शंभरी निश्चीत......