20080414
का रे असा अबोल तू
तीः
का रे असा अबोल तू, काहीतरी तू बोल ना ।
शब्दांना तुझ्या तहानले, मनातले काही बोल ना ॥
तोः
तू सरस परी कुठे, कुठे मी निरस रूक्षसा ।
सुरस कितीही बोललो, रुचेल का तुझ्या मना ॥
तीः
स्फटिक जणू तुझे विचार, स्पष्ट किती तुझे आचार ।
मी गुंतते गुंतते सदा, शब्दांच्या तुझ्या आवर्तनांत ॥
तोः
वळत्या केसांच्या महिरपी, मीन अक्ष बोलके ।
जिवणीच्या मोहक हरकती, सारे कसे लावी पिसे ॥
काही गीते स्वतःतच एक नाद घेऊन येत असतात. ती इतर गीतांच्या चालीत म्हणता येतीलही.
मात्र ह्या कथेत स्वतःची एक सादही आहे.
ही कविता माझीच आहे. हा कुठल्याही गीताचा अनुवाद नाही. वाटला, तर निव्वळ योगायोग समजावा.
- नरेंद्र गोळे २००८०४१४
प्रतिक्रिया
2 May 2012 - 2:07 pm | मुक्त विहारि
छान आहे कविता...
2 May 2012 - 2:28 pm | स्पा
आहा
मस्तच
2 May 2012 - 2:38 pm | अक्षया
वा!
वाचता वाचता मी विचार करत होते कि कोणते असेल गाणे..:)
सुंदर आहे कविता..
2 May 2012 - 9:13 pm | मदनबाण
छान... :)
3 May 2012 - 4:24 pm | मूकवाचक
+१
2 May 2012 - 10:21 pm | पैसा
तुम्ही आम्हाला अनुवाद ओळखायची सवय लावलीय त्यामुळे "हे गाणं कोणतं" हा विचार आपोआप चालू होतो. पण यावेळी वेगळा धक्का दिलात!
3 May 2012 - 4:47 am | चौकटराजा
तू सरस परी कुठे, कुठे मी निरस रूक्षसा ।
केशवकुमार ( आचार्य अत्रे) यांच्या या ओळींची आठवण आली
काळा कङा मी फत्तरी तू काश्मीरातील गुलदरी
वळत्या केसांच्या महिरपी, मीन अक्ष बोलके ।
जिवणीच्या मोहक हरकती, सारे कसे लावी पिसे ॥ ह्ये लई म्हंजी लईच भन्नाट ...( समोर मधुबाले सारखी कोणी आली काय गोळेसायेब ?)
3 May 2012 - 8:49 am | लीलाधर
आवडली गेली आहे... :)
3 May 2012 - 9:47 am | नरेंद्र गोळे
मुक्त विहारि, मन्या फेणे, अक्षया, मदनबाण, पैसाताई, चौकटराजा आणि चचा,
सगळ्यांना प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!