रात्र

सोनल कर्णिक वायकुळ's picture
सोनल कर्णिक वायकुळ in जे न देखे रवी...
13 Apr 2012 - 9:58 pm

डोळ्यातला चंद्र
आणि मनातला अंधार घेऊन

सत्याचे भास झेलत
स्वप्नांच्या उंबरठ्यावर

निद्रेची वाट बघत
ताटकळत उभी होती रात्र

माझा सुद्धा डोळा लागला नाही ती झोपेपर्यंत.

अद्भुतरसकवितामुक्तक

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

15 Apr 2012 - 4:11 pm | अत्रुप्त आत्मा

गल्लीतला चंद्रू
उभा...तोंडात विडी घेऊन...

धुराचे लोळ काढत...
बोळाच्या कोपर्‍यावर...

बसची वाट बघत...
ताटकळत उभा होता...मात्र...!,

रिक्षासुद्धा आली नाही विड्यांचं अख्खं बंडल-मारेपर्यंत ;-)

मुक्त विहारि's picture

15 Apr 2012 - 8:33 pm | मुक्त विहारि

च्या मारी ही असली विडंबने सुचतात बरी?

हं .... आणि हे असे झक्कास स्मायली कुठे मिळतात?

धन्या's picture

16 Apr 2012 - 8:20 am | धन्या

तुमच्या आतापर्यंतच्या विडंबनातलं खर्‍या अर्थानं विडंबन वाटलेलं काव्य. अगदी सहजरीत्या स्फुरलेलं असावं. कुठेही शब्दांची ओढाताण नाही, घाणेरडे उल्लेख नाहीत.

मस्त !!!

अत्रुप्त आत्मा's picture

16 Apr 2012 - 10:05 pm | अत्रुप्त आत्मा

@अगदी सहजरीत्या स्फुरलेलं असावं. कुठेही शब्दांची ओढाताण नाही, घाणेरडे उल्लेख नाहीत.>>> प्रामाणिक प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद :-) दखल घेतली आहे... :-)

मुक्त विहारि's picture

15 Apr 2012 - 8:47 pm | मुक्त विहारि

सोनल कर्णिक ह्यांची माफी मागून... हे विडंबन कविता करण्याचा प्रयत्न करत आहे...

मिसळपाव वर धागा
टाकला असाच काही बाही लिहून

इतर लेखांना प्रतिसाद देत
आणि कविता वाचत

कुणी तरी आपले ही
वाचेल ह्याची वेडी आशा धरत...

एकही प्रतिसाद आला नाही
जन्म संपे पर्यंत..

सोनल कर्णिक वायकुळ's picture

18 Apr 2012 - 11:25 pm | सोनल कर्णिक वायकुळ

मुक्त विहारी
माझी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. तशी मागावीशी वाटली असेल तर मुळात हेतुत गफलत आहे. मग तुमचा विडम्बनाचा प्रयत्न इथे publish करायला नको होतात.
खर तर तुमची काय किंवा इतर कोणाची काय; प्रतिभा दाखवायला तुमचे स्वतःचे लेखन फळे आहेतच की.
त्यामुळे माफीचा आव नसता आणला तरी चालला असता.

अतृप्त आत्मा,
तुमच विडंबन मात्र आवडल. खूप सहज. तुमच्या space मध्ये publish केल असत तर तुमच्या चाहत्यांच्या ब-याच प्रतिक्रिया मिळाल्या असत्या.