मला उपास करता येत नाही..अहो देवाने इतक्याउत्तम गोष्टी दिल्या आहेत त्या काही उपास करायला नाहीत...
पण माझ्या बायकोला वाटते की मी खूप धार्मिक आहे...ह्याचे कारण म्हणजे आमची "साबुदाणा खरेदी"...
बायको बरोबर खरेदी करणेआणि तो अनुभव काहीवर्षांनी सांगणे हे प्रत्येक पुरुषाचे कर्तव्य असते...
बायको आणि नवरा ह्या व्यक्ती म्हणून कितीही वेगळ्या असल्या तरी स्वभाव-धर्म सारखेच असतात...
गालावरून हळूच फिरणारा चंद्रा सारखा कोमल हात थोड्या वर्षांनी
आपल्या पाठीवर कसा तळपत्या वज्रा सारखा आदळतो,
हे समजायला (नव्हे अनुभवायला) लग्नच करावे लागते.
लग्नापूर्वी माझी खरेदी ७/८ मिनिटात होत असे..आपली कुवत आणि गरज बघून खरेदी होत असे..बरे आमची जमात मुळातच "हिप्पी"..
त्यामुळे प्यांटचे पुढून फाटणे संपून....मागून फाटणे सुरु झाले की, लज्जा भयास्तव पिताश्री वट्ट १०० रु. देत..
त्यात प्यांट आणि बियर बसत असे...
लग्नातच कपडे खरेदी भरपूर झाल्याने मला पुढील ५/६ वर्षे तरी काही खरेदी न्हवती..बायकोने पण बरीच खरेदी केल्याने माझा मेहुणा म्हणजे भगवंताचा अवतार असावा असे वाटत होते..(दर वर्षी भरपूर कपडे खरेदी करून ती तो समज खोटा ठरवू देत नाही.)..रोजचे किराणी सामान बायकोच विकत आणत असल्याने मी आपला रोज सुखी माणसाचा सदरा घालून झोपत असे..बायको पण मी किती पाण्यात आहे हे समजून घ्यायला अपेय पान करायला परवानगी देत असे..वेळ जायला काही तरी साधन हवे म्हणून वाचन पण करत असे..असा आमचा सुखी संसार काही देवाला बघवल्या गेला नाही..
एक दिवस माझा रविवार आणि बायकोचा उपवास एकाच दिवशी आले..मी आपला रविवारचा बाजार घेवून आलो तर बायको म्हणाली की तिचा उपवास आहे..मग काय ठीक आहे तू उपवास कर तो पर्यंत मी माझे जेवण बनवून घेतो..तिने साबुदाणा भिजवायला म्हणून डबा उघडला तर साबुदाणांच नाही..मला ही काही जिन्नस हवे होते म्हणून एकत्रच निघालो...मिक्सर खरेदीचा अनुभव होताच त्यामुळे पटकन जावून येवू असे वाटत होते...(लिंक देत आहे...http://full2dhamaal.wordpress.com/2012/02/27/%e0%a4%aa%e0%a4%b9%e0%a4%bf...)..पण मध्ये तब्बल साडे सात महिने गेले आहेत हे माहित न्हवते..
घराबाहेर पडलो आणि बायको सुटलीच...वाटेत येणार्या प्रत्येक दुकानाचा आणि गेला बाजार टपरीचे मालक हे नोकर असुन त्यान्चे खरे मालक म्हण्जे , आपलेच मालक आहेत असा हिचा ठाम समज होता ...आता मी सध्या तेलाच्या समुद्रात आणि वाळुच्या वाळवंटात असलो तरीपण खिशात पैशांचा दुष्काळ असतोच....साबुदाणे आणायला म्हणुन बाहेर पडलो तर १०-१२ साड्या , त्यांना म्याचींग म्हणुन २५-३० ब्लाउज, घरात असावेत म्हणुन ५/६ डझन दारु प्यायचे ग्लासेस्....(मी आधीच सान्गितले आहे , की ही पण लेख वाचते....वाचतांना मजा वाटते आणि नंतर खिशाला सजा होते...ड्राय-डे ला स्टीलच्या ग्लास मधुन द्रव पिवुन तहान भागवणारी जमात आमची, आम्हाला ग्लासचे कसले आले हो कौतुक...)..मग आता ग्लास घेतलेच आहेत तर जरा ५/६ वेगळ्या वेगळ्या बाट्ल्या घेवु या असे म्हणालो तर मला घेवुन ती तिच्या एका नातेवाइका कडे घेवुन गेली...ते बिचारे हा द्रव जगातुन नाहिसा व्हावा म्हणुन स्वतः अगस्ती बनलेले, हा द्रव तर नाहिसा झाला नाहिच पण त्यांचे लीव्हर का काही तरी बिघडले..मग मी कसा उधळ्या आहे, स्वार्थी आहे, बायकोला दर तासाला गजरा घेत नाही म्हणुन कंजूष आहे,अंगावर येणार्या कुत्र्यांना दगड मारतो म्हणुन मी मारकुटा आहे, असे माझे बरेच गुण-गान त्यांनी स्टीलच्या ग्लासामधुन त्यांचे औषध घेत घेत सांगितले ...सध्या ते "देशी" वैद्यांचे औषध घेत असावेत...बोलतांना गुंगी येत होती..(त्यांना....मला नाही..)..शेवटी त्यांना ह्या त्यांच्या अमुल्य सल्ल्याची दक्षिणा म्हणुन काही पैसे दिले...मग तिथे थोडा वेळ गेला..(बायकोच्या भाषेत थोडा वेळ म्हणजे पृथ्वीतलावर ३/४ तास , हि एक वेगळी काल-मापन गणना शाळेत शिकवत नाहीत...लग्न झाले की समजते...) म्हणुन उपासाची मिसळ, दही वडे, बटाटे वडे, कटलेट, मसाले भात..(भगर, बटाटे, रताळे, कच्ची केळी वापरुन केलेला) आणि मग लस्सी पिवून व एक १०-१२ हजार खर्च करून १/२ किलो साबुदाणा आणला...प्रश्न पैशांचा नाही आहे हो..पण हा वाया गेलेला रविवार परत कसा आणावा...एका आठवड्यातून फक्त एकदाच येणारा रविवार हा वर्षातून तब्बल ४/५ वेळा येणाऱ्या उपवासांसाठी का वाया घालावा?...
त्या दिवसापासून मी उपवासाची तारीख लिहून ठेवतो आणि सगळे पदार्थ वेळीच घरी येतील ह्याची काळजी पण घेतो...हिला वाटते की मी किती धार्मिक आणि हिची किती काळजी घेतो...
अज्ञानात सुख असते असे म्हणतात पण....इतरांच्या अज्ञानात देखील खूप सुख असते...हेच तर मी शिकलो..
प्रतिक्रिया
27 Mar 2012 - 3:17 pm | मृत्युन्जय
ही ही ही. मस्तच लिहिले आहे.
27 Mar 2012 - 3:39 pm | मुक्त विहारि
धन्यवाद....
च्यायला माझी काय हालत बेकार झाली होती..
एक तर रवीवार.. त्यातून सगळे सामान घरी...आणि तो थेरडा माझे गुण-गान स्वत: औषध घेत करत आहे आणि वर तो मसाले भात...तोच तो कच्ची केळी घातलेला...
वैऱ्यावर पण असा प्रसंग येवू नये...
आणि आता हे दु:ख तुम्हाला सांगितले तर तुम्ही म्हणता....मस्तच....
रविवार गेला उपवासापाई आणि बघणारा म्हणतो कशी मजा आली.....
27 Mar 2012 - 3:48 pm | मृत्युन्जय
गेले ४ रविवार असे वाया गेलेल्या माणसाला सांगताय हे सगळे? ;)
27 Mar 2012 - 3:52 pm | मुक्त विहारि
चला आता मी परत सुखी झालो...
इतरांच्या दु:खातच आपले सुख दडलेले असते..असे कुठलेसे स्वामी म्हणतात... (म्हणजे मीच हो !!!)
27 Mar 2012 - 3:19 pm | अमृत
मस्तच!
लिखाण आवडलं
अमृत
27 Mar 2012 - 3:30 pm | पैसा
खूप मजेशीर झालंय!
27 Mar 2012 - 3:45 pm | मन१
असेच धार्मिक रहा....
27 Mar 2012 - 3:56 pm | मुक्त विहारि
सख्खा शेजारी....
27 Mar 2012 - 4:04 pm | परिकथेतील राजकुमार
स्वतःच्या धाग्याच्या खरडफळा करणे.
27 Mar 2012 - 4:29 pm | मुक्त विहारि
चला तुमची प्रतिक्रिया आली...
आता थांबावे म्हणतो...
बाकी लेख जमला आहे असे वाटते, कारण प.रा.च्या काकदृष्टीतून काही सुटत नाही, असा अनुभव आहे...
27 Mar 2012 - 4:46 pm | तर्री
लेख एकदम हायक्लास.
हे तर अनुपमच :"वाटेत येणार्या प्रत्येक दुकानाचा आणि गेला बाजार टपरीचे मालक हे नोकर असुन त्यान्चे खरे मालक म्हण्जे , आपलेच मालक आहेत असा हिचा ठाम समज होता "
27 Mar 2012 - 5:38 pm | रेवती
लेखन आवडले.
27 Mar 2012 - 5:41 pm | यकु
चला, आता इथे साबुदाणा कुठे मिळतो ते शोधणे आले :p
27 Mar 2012 - 6:36 pm | पैसा
बायको हा जास्त मोठा फॅक्टर आवश्यक आहे.
27 Mar 2012 - 6:39 pm | यकु
म्हणजे इथे आधी रेवतीआजींना शोधणे आले! :p
29 Mar 2012 - 6:54 am | रेवती
आहे, इथेच आहे.
अपेक्षा कळवा.
29 Mar 2012 - 11:12 am | प्यारे१
आमचे येथे सर्व प्रकारचे नमुने ठोक व किरकोळ प्रकारात मिळतील असा बोर्ड आहे काय गं आज्जे तुझ्या दुकानी? ;)
29 Mar 2012 - 2:47 pm | शैलेन्द्र
"आमचे येथे सर्व प्रकारचे नमुने ठोक व किरकोळ प्रकारात मिळतील "
नमुने मिळतील पण कायमचे विकतच घ्यावे लागतील, नाहीतर उगा गडबड..
27 Mar 2012 - 6:40 pm | निवेदिता-ताई
मस्त लिहिलेय ...खी.खी.खी.
27 Mar 2012 - 6:50 pm | विनायक प्रभू
.अहो देवाने इतक्याउत्तम गोष्टी दिल्या आहेत त्या काही उपास करायला नाहीत...
खराय
27 Mar 2012 - 8:47 pm | सानिकास्वप्निल
मस्त मजेशीर लेखन :)
28 Mar 2012 - 8:23 am | ५० फक्त
विनोद निर्माण करायचा म्हणुन केलेली अतिशयोक्ती जरा अति झाल्यानं फसली आहे .
भजीच्या पिठात सोडा चिमुटभर घालावा, चमचाभर नाही, त्यानं भजी बिघडतात.
29 Mar 2012 - 4:41 am | स्पंदना
पिताजींच जरा चुकत होत का? नाय प्यांटा पुढुन फाटल्यावरच खरेदी करण्या ऐवजी मागुन फाटल्यावर कशाला वो खरेदी? जे झाकायच त्ये तर कवाच उघड पडल्याल, मग एव्हढा त्रास कशापायी?
तरीबी तुमाला तुमच्या आण्भवान काय तरी शिकवल ह्ये बेस. म्या तर सुचवीन की सरळ येक ठिक्कच आणुन ठ्येवा घरात साबुदाण्याच.
29 Mar 2012 - 11:20 am | प्यारे१
नीट फुललेल्या नायलॉन साबुदाणा चिवड्यासारखा खुसखुशीत लेख....! :)