ते प्रेत अय्यरच्या अगदी जवळ पडले होते. तिघांचीही भीतीने एकदम बोबडी वळली होती. काय करावे ते कुणालाच सुधरत नव्हते. तशाच अवस्थेत काही काळ गेला. तिघेही जवळच्या झाडावर चढून बसले. थोड्या वेळाने कोणी जनावर आसपास नाही अशी खात्री झाल्यावर मग खाली उतरले. आता त्यांची भीड थोडी चेपली होती. कुतूहलाने ते प्रेत न्याहाळू लागले. त्याच्या सर्वांगावर ओरखडे आणि गळ्याजवळ दातांनी चावे घेतल्याचे दिसत होते. जखम तशी फार काही जुनी नव्हती. फार तर तासाभरापूर्वी तो माणूस मेला होता. त्याने कपडे काही फार घातले नव्हते. एक धोतरच काय ते त्याच्या अंगावर होते फक्त. आणि जानवे.
ते रक्तमाखले जानवे पाहताना अय्यरला कळेना- ह्या इतक्या निबिड जंगलात हा एकटा माणूस काय करत होता ? थोडेसे वर चढून गेल्यावर त्याला एक पिशवी दिसली- त्यातील वस्तू इतस्तत: विखुरलेल्या होत्या. एक तांब्याची ताटली, एक कमंडलू, थोडा तांदूळ आणि ३०-४० रुपये. नक्कीच हा कुण्या देवळाचा पुजारी असावा. त्याने ती पिशवी उचलली आणि बाकीच्या दोघांना दाखवली.
“हे काय?” दोघांनी एकदमच विचारले.
“देखो, ये आदमी पुजारी था यहीके किसी मंदिर का | पास मे जो आदिवासी बस्ती है वही के लोगोंको पूछना पडेगा |”
तिघे परत फिरले. साधारण २ तास चालून गेल्यावर तोडा आदिवासींची एक वस्ती होती, तिथे गेले.
“नाम इरंत मनितन पार्त्तोम.” (आम्ही एक मेलेला माणूस पाहिला)
“एंगे?” (कुठे)
“पोरिय मलै अरुगिल.” ( त्या मोठ्या डोंगराजवळ).
“अवनु मात्तुरू?” (तो पुजारी होता काय?)
“आमा”. (हो)
“चेमिक्कवूम! कडवूळ चेमिक्कवूम!! ( देवा वाचव )
अय्यरने पुढे जरा खोदून खोदून विचारले असता मुखीयाने माहिती सांगितली. त्या डोंगरावर एक कालीमातेचे मंदिर होते. गेल्या ६ महिन्यात याआधी ३ पुजार्यांचा असाच भीषण अंत झाला होता. बहुतेक तो कोणी नरभक्षक वाघ असावा. टोळीमधील काही लोक त्याला पाहिल्याचा दावा करीत होते. त्याला मारण्याचा प्रयत्न करून देखील काही होत नव्हते.वनखात्याला सांगितले असता ते लोक देखील आले होते, परंतु वाघ बराच हुशार निघाला. त्यांच्या सापळ्यांना त्याने काही दाद दिली नव्हती आणि राजरोस डरकाळ्या फोडत तो अख्खे रान घुमवत होता. आदिवासी हळूहळू हे मानू लागले होते की तो देवीचा वाघ आहे आणि आपल्या पापाचा बदला तो घेतो आहे. अजून तरी त्याची आदिवासींच्या मुख्य वस्तीवर हल्ला चढवण्याची हिम्मत झाली नव्हती, परंतु ते सावध होते.
दुपारी टोळीतील बाकीचे लोक त्या डोंगरापाशी जाऊन त्या पुजार्याचे शव घेऊन आले आणि त्याला अग्नी दिला. त्या रात्री तिघेही आदिवासींच्या वस्तीवरच थांबले. जेवणे झाली. भात आणि चिकन असा मेनू होता. चिकन पाहताच अय्यर ने तोंड फिरवले. मुखिया हसला आणि त्याला भात वाढण्याची सूचना केली. जेवणानंतर तांदळाची बियर पिता पिता मुखिया त्या तिघांना एकेक गोष्टी सांगू लागला. पांडेने वाघाबद्दल विचारले.
“पुली इरंत , नाम मकीऴच्चीयान. आन्द्रल एन्न चेय्य? पुली कचीवूगळ ” (वाघ मेला तर आम्ही सुखी होऊ, पण काय करावे? तो सुटून जातो. )
“तो फिर क्या करेंगे? ऐसेही बैठे रहेंगे?”
“निंगळ एन्ना चेय्यूटुम?” ( तुम्ही काय करू शकता?)
मुखियाच्या या सवालावर पांडे गप्प झाला. शेकोटीच्या ठिणग्यांकडे पाहत तिघेही बसून होते. बराच वेळ एकमेकांकडे पाहत शेवटी देशपांडे बोलला,
“नावू होगतेवी.” (आम्ही जातो).
“यल्लीगे होगता इदिरा नीवु?” (कुठे जाणार तुम्ही?)
“नाळे मंदिरल्ली होग बर्तेनी. स्वल्प नोडतीने. हुलीगागी बंदूक कोडी.” (उद्या मंदिरात जाऊन येतो, पाहतो काय आहे ते. वाघासाठी बंदूक द्या).
मुखियाला काही बोलायची संधी न देताच देशपांडे त्याच्यासाठीच्या झोपडीत निघून गेला. त्याच्याकडे क्षणभर पाहत मुखिया निघून गेला. अय्यर आणि पांडे दोघेही देशपांडेच्या झोपडीत गेले.
“निम्मा तली तिरगेदा” अय्यर म्हणाला.
“अबे पागल झाला तू देशपांडे! तुझं डोकं ठिकाणावर आहे का?”. पांडेने त्याचीच री ओढली.
“देखो भाई. नर्मदेच्या खोर्यात राहताना मला याची सवय झाली आहे. ही काय भानगड आहे ते मी पाहणार म्हणजे पाहणारच. “
“आदरे नी स्वत: यारु भाविसुत्तीया?” (तू स्वत: ला कोण समजतोस?)
” ना सामान्य मनशा. आदरे अवरिगे सहाय माडबेकू. नर्मदेच्या खोर्यात आणि आधी देखील मी स्वत: शिकार केली आहे. अजून काही लोक बरोबर घेतले तर काही अडचण येणार नाही. आणि तुम्ही येणार असाल तर या नाहीतर मी तसाच जाईन.”
“भडका मत देशपांडे! आमाला तू काय समजलास? आमी येनार मंजे येनारच. मी तर स्वत: माओवाद्यांबरोबर राहिलो आहे. मला नको सांगू तुझं कौतुक.”
“नीवु अल्ली होदरे ना वब्ना येनु माडली? मै अकेला क्या करुंगा?”
देशपांडे हसला. ते तिघेही हसू लागले. “3 fools aren’t we!” पांडे म्हणाला.
“लाख मोलाची गोष्ट बोललास”.
सूर्य उगवला. पांडे, देशपांडे आणि अय्यर या त्रिकूटाबरोबर मुखियाने ५ बंदूकधारी लोक दिले होते आणि त्यांना देखील ३ बंदुका दिल्या होत्या.अय्यरला याची सवय नव्हती. तो अजूनही घाबरलेलाच होता. पण शेवटी त्याने मनाचा हिय्या केला आणि त्यांची तुकडी निघाली. सुमारे २ तास चालल्यावर तो डोंगर आला.
“हुली! हुली!” एक आदिवासी ओरडला.
“एंगे?”
“इंगे”. त्याने एका पायाच्या ठशाकडे बोट दाखविले.
“हुली इप्पोमुतू इंगे “. (वाघ आत्ताच आहे इथे)
सावधपणे ते डोंगर चढू लागले. कुठे कसलीही चाहूल येत नव्हती. आदिवासी जरा घाबरले होते- हे त्रिकुट देखील जरा भेदरले होते. जंगलात नेहमीपेक्षा जरा जास्तच शांतता होती. कुठेतरी काहीतरी गडबड आहे हे सर्वांना जाणवत होते. पण पोटातले ओठावर आणायला मात्र सगळे कचरत होते. इतक्यात एका मोठ्या डरकाळीचा आवाज त्यांच्या कानावर पडला. सगळे जिथे जागा मिळेल तिथे लपून बसले. हे तिघे बाकीच्यांपासून जरा बाजूलाच पडले होते आणि त्यांना ते लक्षातच आलं नाही.
त्यांनी कानोसा घेतला. जरा स्थिरस्थावर वाटताच ते पुढे सरकू लागले. तोपर्यंत बाकीचे आदिवासी मागेच राहिले होते. बराच वेळ काही ऐकू न आल्याने ते जरा निर्धास्त झाले होते. हळू हळू मुंगीच्या पावलांनी जात जात ते शेवटी डोंगर माथ्यावरच्या त्या मंदिरासमोर पोहोचले.
अय्यरने तोपर्यंत इकडे तिकडे पाहून घेतले. बाकीचे कोणीच दिसत नव्हते. दगडी पायऱ्या आणि दगड खोदून बनवलेले मंदिर. पुढे एक पाणवठा. तिघेही पायऱ्या चढून जातात तोच कुणाची तरी चाहूल लागली-पण वाघ तरी नक्कीच वाटत नव्हता. दगडी भिंतीवर कुणा माणसाची सावली पडली होती. जीव मुठीत धरून तिघेही मंदिरात गेले. पाहतात तर काय आश्चर्य! तो भला थोरला वाघ रक्ताच्या थारोळ्यात कालीमातेच्या मूर्तीसमोर मारून पडला होता आणि त्याच्या पोटात एका आदिवासीने भाला खुपसलेला होता. त्यांना पाहताच त्याने तो भाला काढला आणि त्यांच्याकडे तो पाहू लागला.
तिघेही आ वासून त्याच्याकडे पाहू लागले. तो होताच तसा नजरेत भरण्यासारखा. मूळचा गव्हाळ वर्ण रापलेला, भव्य कमावलेले शरीर, मोठी दाढी, मोठा केशसंभार.
एक धोतरासारखे वस्त्र कमरेला लपेटलेले आणि एक उत्तरीय. वस्त्रे जुनी आणि जीर्ण दिसत होती. पोट पुढे आले होते. अशा या ढेरपोट्या म्हाताऱ्याने एक भलाथोरला वाघ कसा काय मारला, हे त्यांच्या अजूनही पचनी पडत नव्हते. त्याला आदिवासी म्हणावे तर तोडा लोकांपेक्षा त्याचे कपडे बरेच वेगळे होते. आणि त्याची वेशभूषादेखील खेड्यातील लोकांपेक्षा वेगळी होती- जुन्या पद्धतीची होती.
त्या रहस्यमय म्हातार्याकडे तिघे पाहत राहिले. शेवटी अय्यरने सुरुवात केली-
“वणक्कम!”
त्याने अय्यर कडे पाहिले. “वण…क्कम आगत्ता..”
आता पांडे आणि देशपांडेनी कान टवकारले. तमिळ बोलता बोलता एक संस्कृत वाटणारा शब्द कसा काय आला? ते ऐकू लागले.
“निन्गळ एंगे?” (तुम्ही कुठे असता?) अय्यरने विचारले.
“एत्तीरा..” (तिकडे). त्याने दक्षिणेला बोट दाखविले.
देशपांडे आता सरसावला. त्याला एक शंका आली होती.
“दोमो वेहो?” (घर कुठे आहे?) त्याने उत्तरेला बोट दाखवले.
“इल्ले येनु माडतिरा ?” (इकडे काय करताय?)
” युस्मा…येनु?” (तुम्ही काय करताय?) त्याने उलट प्रश्न विचारला.
आता तर तिघे अजूनच बुचकळ्यात पडले. त्याची भाषा म्हणजे तमिळ, कन्नड आणि संस्कृतचे एक विचित्र मिश्रण होते. संस्कृत चा वास आल्याबरोबर तिघांनी संस्कृत सुरु केले.
“भवत: किं नामधेयं?”
काही क्षण त्याने काही प्रतिक्रिया दिली नाही आणि मग तो नुसताच हसला.
“भवान अत्र किं करोति?”
पांडे कडे रोखून पाहत काही वेळाने तो हळू हळू एकेक शब्द उच्चारू लागला.
“हुईली..क्रन्देती..महत..साम्मारती..” (वाघ आला होता त्याला मारले).
“भवान क:”?
“एग्झ्ह…घेन्ह…घेन्ह..” ( मी जाणतो ).
त्याच्या तोंडची अवेस्तन पेक्षा जुनी भाषा ऐकून तिघे रोमांचित झाले. आत्तापर्यंत पाहिलेल्या पैकी ह्याची भाषा सर्वात जुनी आणि विचित्र होती. याच्या टोळीची काही जर माहिती कळली, तर इंडो-युरोपियन भाषाशास्त्रात मोठी क्रांती घडणार होती. त्याच्या भाषेत प्रोटो-द्राविडी तसेच वैदिक संस्कृतपेक्षा देखील जुने शब्द होते. जीवाचे कान करून ते त्याचे बोलणे ऐकत होते .
“तू..क्वोये?” त्याने विचारले.
“वयं वैयाकरणिन: |” अय्यर उत्तरला.
त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मग थोड्या वेळाने तो म्हणाला
“तू..ह्मेण?” आणि मग स्वत:शीच म्हणाला..”यु”.
“किद?” मूर्ती कडे बोट दाखवून तो विचारता झाला.
एक भले मोठे प्रश्नचिन्ह तिघांच्या चेहऱ्यावर उमटले.
“जेनेज..” (देवी) पांडे उत्तरला.
” हुली इरांत, रुंबा नल्ला. धन्यवाद!” (वाघ मारल्या बद्दल धन्यवाद) अय्यर म्हणाला.
तो एकदा गडगडाटी हसला आणि त्या तिघांकडे एक दृष्टीक्षेप टाकून आला तसा निघून गेला. ते तिघे मात्र अवाक होऊन त्याच्याकडे पाहत राहिले. वाघाचा विचार त्यांच्या मनातून आता पुरता गेला होता आणि त्याची जागा त्या विचित्र आदिवासीने घेतली होती. ते भान हरपून तिकडे उभे होते तेवढ्यात बाकीचे ५ जण तिथे आले.
त्यांच्या आश्चर्याला पारावर उरला नाही. त्यांनी तिघांना विचारले की वाघाला कोण मारले? कारण वाघाची जखम ही एका भाल्याने केली होती आणि तिघांकडे बंदुका होत्या.
अय्यरने त्या रहस्यमय म्हातार्याचे वर्णन त्यांना सांगितले तर त्यापैकी कुणीही त्याला या भागात आधी कधीच पाहिले नव्हते आणि त्याच्या सारख्या इतर लोकांनापण कधी पाहिले नव्हते. पण महत्वाची गोष्ट ही होती की नरभक्षक वाघ आता मेला होता, त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे फारसे कुणी लक्ष दिले नाही . वाजत गाजत सर्वजण वस्तीपाशी आले आणि मुखियाने ती हकीकत ऐकल्यावर त्या तिघांचा मोठा सत्कार केला आणि त्यांचे मनापासून आभार मानले. रात्री मोठी मेजवानी ठेवली होती. पण तिघांपैकी कुणाचेच लक्ष तिथे लागत नव्हते. मुखियाच्या लक्षात ते आले.
” पाहुणे, तुम्हाला आमची मेजवानी आवडली नाही का? वाघाला मारल्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत.”
“नाही अय्या. तिकडे दोड्डमलैवरती आम्हाला एक अतिशय विचित्र माणूस भेटला होता. त्याने तो वाघ मारला. आम्ही काहीच नाही केलं.”
त्याचे वर्णन ऐकल्यावर मुखियादेखील विचारात पडला.
“इतके पावसाळे पाहिले मी, पण अशी कोणतीही टोळी मी कधीही पाहिली नाही. या रानात तरी असे कोणीच लोक नाहीत.”
बराच वेळ विचारूनही मुखिया काही सांगेना- खरे तर त्यालाही तीच उत्सुकता लागली होती. तेव्हा त्यांनी तो नाद सोडला. तोडा टोळीचे आभार मानून तिघांनी त्यांचा निरोप घेतला.
परतीच्या प्रवासात तिघे बोलू लागले.
“तू सांग पांडे तो कसा होता ते. आदिवासी सारखा फार काही वाटत नव्हता.” देशपांडे म्हणाला.
“त्याच्या भाषेत प्रोटो-द्राविडी आणि प्रोटो-इंडो-युरोपीय शब्द देखील होते. द्राविडी शब्द वेद्दा भाषेसारखे आणि बाकीचे तर वैदिक पेक्षा जुने . मला तर असा वाटत होतं की जणू ब्राँझ युगातील भारतात मी गेलोय.” अय्यर म्हणाला.
“अबे त्याला तर मूरत म्हणजे काय तेपण माहिती नव्हतं.” पांडे म्हणाला.
प्रत्येकाकडे काही ना काही निरीक्षणे होती, पण त्याच्या भाषेचे स्थान कोणते आणि काल कोणता? हे प्रश्न सर्वात अवघड होते. ह्या भाषेत द्राविडी आणि इंडो-युरोपीय या भाषाकुलातील इतक्या जुन्या शब्दांची रेलचेल होती, की या भाषेचे स्थान कदाचित वैदिक संस्कृत पेक्षाही महत्वाचे ठरले असते.पण मग त्या मुखीयाला देखील माहिती नाही आणि आधीच्या भाषाशास्त्रज्ञांपैकीदेखील कोणीही अशी भाषा अस्तित्वात असल्याचे लिहिलेले नाही. पण पुरेशी माहिती हाती आल्याखेरीज काही उघड करायचे नाही असे तिघांनी ठरवले.
यथावकाश म्हैसूर आले. म्हैसूर ते पुणे रेल्वे प्रवासात देशपांडे एक पुस्तक वाचत बसला होता. प्राचीन तमिळ साहित्यातील अगस्त्य ऋषींना असलेले महत्व हा त्या पुस्तकाचा विषय होता. त्यात विन्ध्य पर्वत ओलांडून अगस्त्य कसे दक्षिणेस गेले, वेलीर लोकांना त्यांनी द्वारकेतून कसे दक्षिणेत वसवण्याच्या कामी सहाय्य केले, हे सर्व वाचत असताना त्याच्या डोक्यात एक विचार आला.
>> पुस्तकात दिलेली अगस्त्य ऋषिंची बरीच चित्रे आणि मूर्तींचे फोटो अगदी त्या म्हातार्याप्रमाणेच दिसतात, तंतोतंत चेहरा आणि अगदी वाढलेल्या पोटासकट!
चल काहीही!
>>पण त्याला तू कुठला विचारले असता त्याने उत्तरेकडे बोट दाखवले!
मग काय झालं?
>>तो मुखिया पण म्हणाला की आम्ही अशा कुणाला पाहिला नाही कधी म्हणून!
कदाचित..नसेल पाहिला..असेल कोणीतरी विचित्र माणूस..
>> त्याने आपलं नाव नाही सांगितलं! त्याला तो प्रश्न कळून देखील!
उम्म….होय.
>>त्याची भाषा तर वैदिक संस्कृत पेक्षा जुनी आहे!
….होय हे खरंय…फार जुनाट आणि विचित्र बोलत होता काहीतरी. मूळ संस्कृतसारखी असेलही, पण प्रोटो द्राविडी कितीतरी शब्द होते त्यात! आश्चर्यच आहे!
>> त्याला मूर्तीपूजा माहीत नव्हती!
…………..
विचार करून देशपांडेचे डोके बधीर झाले…तो रोमांचित झाला..काय आपण खरेच त्यांना भेटलो? अगस्त्य ऋषींना? द्वारकेतून ज्यांनी वेलीर क्षत्रियांना दक्षिणेत वसविले त्यांना? विन्ध्य पर्वताचं गर्वहरण करणाऱ्या अगस्त्यांना? वातापी राक्षसाला पचविणाऱ्या आणि अक्खा सागर पिऊन टाकणाऱ्या अगस्त्यांना?
त्याने हे अय्यर आणि पांडे दोघांनाही सांगितले. जें समजायचे ते तिघेही समजून गेले होते. तिघांनी मिळून प्रोटो इंडो युरोपीय आणि प्रोटो द्राविडी भाषांच्या सरमिसळीचा काळ त्या ऐकलेल्या भाषेच्या आधारे काढला आणि सध्याच्या रूढ काळापेक्षा तो कितीतरी जुना आहे, हे सिद्ध केले. त्यांच्या पेपरची जगभरात खूपच वाहवा झाली. काही शब्दांची व्युत्पत्ती त्यांनी जी मांडली होती, ती सर्वांनी मान्य केली- रूढ असलेल्या कोणत्याही पद्धतीने ते शब्द स्पष्ट करता येत नव्हते. तशा शब्दांना त्यांनी अगस्त्य शब्द असे नाव दिले-जें प्रोटो इंडो इराणियन आणि प्रोटो द्रविडीयन यांचे मिश्रण होते- पण अंदरकी बात अर्थातच कुणालाही कळली नाही- कधीच.
(समाप्त)
प्रतिक्रिया
23 Mar 2012 - 11:13 pm | बॅटमॅन
पहिला भाग
http://www.misalpav.com/node/21101
दुसरा भाग
http://www.misalpav.com/node/21104
24 Mar 2012 - 12:32 am | JAGOMOHANPYARE
अगस्ती ऋषीना मूर्तीपुजा माहीत नव्हती हे पटत नाही.. वातापि गणपति या गाण्यात अगस्ती मुनींचा कुंभसंभव म्हणून उल्लेख आहे, त्यानी गणेशाची उपासना केली. http://www.youtube.com/watch?v=miUl-KlXcu0 हे गाणे वातापि ( बदामी ) येथील गणपतीवर आहे.. त्याचा आणि वातापि राक्षसाचा काही संबंध आहे का? कुंभसंभव म्हणजे कुंभातून जन्मलेले म्हणजे अगस्ती ऋशीच ना? की आणखी कोण? की ते अगस्ती वेगळे आणि हे वेगळे?
24 Mar 2012 - 9:14 am | प्रचेतस
महाभारतात वनपर्वात अगत्स्याची कथा पुढीलप्रमाणे आहे.
संततीप्राप्तीद्वारे पितरांना मुक्ती मिळावी म्हणून विदर्भ राजाची कन्या लोपामुद्रा हिच्याशी अगत्स्य विवाह करतो. लोपामुद्रा राजकन्या असल्याने ती राजशय्येची अट घालते तेव्हा धनप्राप्तीसाठी अगत्स्य वेगवेगळ्या राजांकडून धन गोळा करत इल्वल राक्षसाकडे येतो. इल्वलाचा भाऊ वातापि. कुठलेही रूप धारण करण्याची क्षमता असणारा. हा वातापी मेंढा बनून इल्वल त्याचे मांस शिजवून अतिथींना वाढत असे. जेवण झाल्यावर वातापीस बाहेर ये म्हणून हाक मारल्यावर वातापी अतिथींचे पोट फाडून बाहेर येत असे.
अगस्त्यालाही इल्वल वातापीला शिजवून वाढतो पण अगत्स्य वातापीला पूर्ण पचवून त्याचा नाश करतो व शरण आलेल्या इल्वलाकडून धनाचा स्वीकार करतो.
ही कथा म्हणजे अपान वायुवरचे एक रूपक आहे तसेच वेदकाळी मांसभक्षण सर्वमान्य होते याचेही एक द्योतक आहे.
24 Mar 2012 - 12:51 am | बॅटमॅन
@JAGOMOHANPYARE
वेल... अगस्त्य ऋषी हे वैदिक सप्तर्षींमधील एक होते आणि वेदकालीन समाजात मूर्तीपूजा नव्हती, या गृहीतकावर कथेतील मूर्तीपूजेचा भाग आधारलेला आहे. आता अगस्त्य ऋषींनी विन्ध्य ओलांडून दक्षिणेत वस्ती केली तसेच तमिळ भाषा तयार केली अशीदेखील मान्यता आहे. याचा अर्थ जर आपण असा घेतला, की विन्ध्य पर्वत पार करून ते अनार्य मुलुखात आले आणि तिथल्या लोकांना वैदिक संस्कृती "शिकवली", तर कदाचित लिंगपूजेसारखा प्रकार त्यांच्या दृष्टीक्षेपास आला देखील असेल. तरीही त्या काळात एकंदर मुर्तीपूजेशी त्यांचा परिचय असावा, हे मला सयुक्तिक नाही वाटत. आता नंतरच्या काळात त्यांच्यावर बरीच कवने लिहिली गेली, तेव्हा पूर्वीच्या लोकांना उत्तरकालीन मान्यतांमध्ये रंगवण्याचा प्रकार झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जे गाणे आपण दिलेत, त्याचा संदर्भ मला नाही माहिती, परंतु माझे मत हे असे आहे.
24 Mar 2012 - 12:51 am | JAGOMOHANPYARE
कुंभमुनी म्हणजे अगस्ती Agasthya was created in a pitcher - kumbha. He got the name Kumbha Muni, Kumbha Sambhava, and KalasOdhbhava from that reason.
http://www.visvacomplex.com/Rishi_Agasthya_Vinayaka.html
24 Mar 2012 - 12:53 am | बॅटमॅन
बरोबर, कुम्भमुनी म्हणजे अगस्त्यच..
24 Mar 2012 - 3:47 am | रामपुरी
चांगला विषय, चांगली मांडणी पण शेवट जरा घाईघाईत उरकल्यासारखा वाटला...
24 Mar 2012 - 7:48 am | ५० फक्त
शेवटचा भाग जाम गंडला आहे, प्राचीन भाषांचा उल्लेख गुढ वातावरण निर्मितीसाठी उपयुक्त होता, पण तो असा एकदम नेउन न पटणा-या जागी आणि पद्धतीने आणुन संपवला आहे,
म्हणजे अगदी पुरणपोळ्याची तयारी करुन, शेवटी भजी तळलेल्या तेलातच पु-या करुन कणिक संपवल्या सारखं झालंय.
24 Mar 2012 - 8:08 am | बॅटमॅन
>>म्हणजे अगदी पुरणपोळ्याची तयारी करुन, शेवटी भजी तळलेल्या तेलातच पु-या करुन कणिक संपवल्या सारखं झालंय.
ह्म्म्म :)
24 Mar 2012 - 8:42 am | नगरीनिरंजन
विषय पाहून अपेक्षा उंचावल्या होत्या पण शेवट अपेक्षाभंग करणारा ठरला.
तुमचा भाषांचा अभ्यास असेल तर त्यावर स्वतंत्र लेखमाला लिहावी असे सुचवतो.
24 Mar 2012 - 8:52 am | रणजित चितळे
अजून एका ठिकाणी त्यावेळच्या तमिळनाडू बद्दल वाचल्याचे आठवत आहे मला...
The Lost Continent of Kumari Kandam
“Silappadikaran”, one of the five celebrated Tamil epics, written in the first century A.D. by llango Adigal, makes frequent references to a vast tract of country called “Kumari Nadu” (and now identified as Lemuria or Gondwanaland by European scholars) extending far beyond the present Kanyakumari, the southern most tip of modern India, laying submerged in the Indian Ocean. It is said that ancient Madurai (Taen Madurai) was the seat of the Tamil Sangam (literary academy) and Kavatapuram or Muthoor was the capital of the Pandyan Kingdom. The Tamil commentators Atiyarkunallar. Nachinarkkiniar and llampuranar mention the submersion of the two rivers Kumari and Pahroli in Tamilkam. Silappadikaram says that the distance between these two rivers was 700 kavadam (about 1,000 miles) and that it was divided into Thahga, Madurai, Munpalai, Pinpalai, Kunra, Kunakkarai and Kurumparai Nadus (States), each containing seven Nadus, or 49 in all. The country was interspersed with mountains with a bewildering variety of flora and fauna of a bygone age.
Peninsular India extended from Kanya Kumari, forming a sprawling continent touching Africa in the West, Australia in the south and occupying a large portion of the Indian Ocean. From 30,000 B.C. to 2,700 B.C. natural cataclysmic landslips occurred as a result of earthquakes and volcanic eruptions which periodically affected the surface of the earth and the ocean beds. As the continent of Lemuria was sinking in the western portion, people migrated to Asia, Australia and the lands of the Pacific. The Lemurians also colonized North and South America, the Nile valley where they found the Egyptian civilization and the continent of Atlantis between Europe and North America.
One of the most prominent of the mountains in Lemuria was the Mani Malai where precious stones like ruby were mined. Much gold was mined from this Meru mountain. This gave rise to an ancient proverb in Tamil “Meruvai cherntha kakamum ponnam”, which means “When near the mountain of gold, even the crow is golden”. It is said that Chinese labourers were employed by the Pandyan King and when they went down the mines from the surface they appeared like a huge army of small ants. This is confirmed by ancient Chinese chronicles. The Meru mountain had 49 peaks. By its side flowed the Peru Aru on either side of two other rivers, the Kumari and the Pahroli.
Sir T.W. Holderness in his scholarly work, People and Problems of India has written that “peninsular India, south of the Vindhyan mountains, is geologically distinct from the Indo-Gangetic plain and the Himalayas. It is the remains of a former continent, which stretched continuously to Africa in the space now occupied by the Indian Ocean. The rocks of this land mass formed are among the oldest in the world.”
Geological evidence of Gondwanaland
As first theorized by the German geologist, Wagner, in the 1930’s and later proved by geophysical research and other projects, the continents of Africa, Australia, Peninsular India, South America, Ceylon and Antarctica were at one time joined, like the pieces of a jigsaw puzzle, but later drifted apart, like moving plates, with a few parts sinking into the ocean. Thus modern geology’s “plate tectonics” confirms what was sometimes thought of as “myth” by early European Indologists in the 19th century.
According to numerous palaeomagnetic data on the India-Asia collision, subduction of the Indian plate
Under the Eurasian plate began 110 million years ago. The Indian plate moved north wards at an average rate of 14.9 ± 4.5 centimetres per year from 70 million years ago until about 40 million years ago, when it slowed to its present rate of 5.2 ± 0.8 centimeters per year.
Furthermore Professor A.C. Seward of Cambridge University has pointed out in his book Plant Life through the ages that, based upon fossil evidences, the first vascular plants lived during the Devonion Period that is 405 to 346 million years ago. Professor Edward Vulliamy and his collaborators, based on plant fossils, have drawn six ancient landscapes of the world during various geological periods going as far back as 405 million years ago. A study of these maps reveals that the only portion of the world that has been in continuous existence as land is southern India, while all the other countries of the world have been submerged in the ocean either in part or fully during some period or other since 405 million years. This has permitted the development of a culture of unusual antiquity and stability.
Among the previously listed places associated with the 18 Siddhas, except for Kasi (Benares) and Poyur (Girnar) all of them are in southern India, Particularly, in Tamil Nadu. It is no coincidence that this area is also, according to geology, among the oldest land masses of the world, and that it has never been covered over by the ocean during the geological ages. Near the city of Madras, at Pallavaram, are some of the oldest rock formations in the whole world. The ancient Tamil literature written by the Siddhas speaks of the movement of continents and of seismic activity. When by the erosion of the Vindhyan mountains, the Indo-Gangetic sea become filled, and the Deccan Traps were formed in the Tamil peninsula, the Siddha Agastyar moved to the Pothigai mountains, north of what is now Trivandrum. The literary and cultural civilization of the Yoga Siddhas was born here and has continued to this day without a break. Later Agastyar and the Tamils migrated to what is now known as Java, in Indonesia and Cambodia. This is confirmed by the archaeological evidence found in the temple dedicated to Agastyar. The temple of Angor Wat in Cambodia is laid out according to the principles found in the writings of the Siddhas. There are also references in the Siddha literature to the huge ancient continent, Kumari Kandam, with its epicenter in that is now the southern most tip of southern India.
24 Mar 2012 - 2:12 pm | बॅटमॅन
@ रणजीत चितळे:
कुमारी कांडम हा प्रकार मुख्यत: तमिळनाडूमधील देवनेय पवनर यांनी प्रसृत केलेला आहे. जसे ओक आणि वर्तक प्रभृती हिंदुत्ववादी/हिंदुत्वप्रेमी मानतात की अंटार्क्टिका =यमलोक , दक्षिण अमेरिका=पाताळ, त्याप्रमाणे काही द्रविडवादी लोकांचे म्हणणे आहे की लेम्युरीया उर्फ कुमारी कांडम हा एक अतिविस्तृत भूप्रदेश होता, अगदी मादागास्कर बेटापासून ते ऑस्ट्रेलियापर्यंत पसरलेला. आणि त्याचा बहुतेक भाग पाण्याखाली बुडाला, उरलेला तो तामिळनाडू इत्यादी इत्यादी...हे दावे बिनबुडाचे आहेत, इतकेच आत्ता याठिकाणी नोंदवतो. याची आठवण करून दिल्याबद्दल आभार.
http://en.wikipedia.org/wiki/Devaneya_Pavanar
24 Mar 2012 - 9:02 am | प्रचेतस
कथा आवडली.
शेवट मात्र घाईघाईत उरकल्यासारखा झाला आहे.
24 Mar 2012 - 11:10 am | प्रास
कथाबीज आणि कथेची सुरूवात खूपच आवडली. या विषयावर म्हणजे पहिल्या भागात वर्णन केलेल्या विषयावर आणि तदनुषंगाने भाषाविचारावर उत्तम कादंबरी प्रकारचे लिखाण करता येईल असं आत्ता नक्की वाटतंय मात्र भरपूर अभ्यास करून हे साध्य करावं लागेल....
बॅटमॅन, लिखाण दमदार होऊ शकेल तुमचं!
पुलेशु
24 Mar 2012 - 3:01 pm | निश
बॅटमॅन साहेब, प्रास साहेबांच्या मताशी सहमत.
सगळे भाग आवडले.
24 Mar 2012 - 5:50 pm | हैयो हैयैयो
वाक्यबदल.
भाषाभगिनींच्या मिलाफाची एक छान कथा लिहिल्याबद्दल अभिनंदन. आपली कन्नडभाषा छान आहेच, तमिळभाषेचा सराव केल्यास लवकरच तीही आपणास येवू लागेल ह्यात शंका नाही. असो. चुका काढावयाच्या म्हणून नाही, तर कथेस सफाई यावी म्हणून खालील वाक्ये बदलता येतात का पहावे. मराठीभाषेची वाक्यरचना आणि तमिळभाषेची वाक्यरचना जवळपास एकसारखी असली तरीही व्याकरणशास्त्रदृष्ट्या काही अंतर दोहों भाषांच्या वाक्यरचनेमध्ये खचितच आहे. तसेच, केवळ शब्दासमोर शब्द असा विचार न करता, त्या भाषेची संस्कृती देखील शब्दांत उतरल्यास सौंदर्य नक्कीच वाढेल.
धन्यवाद.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
“नांगळ ओरु इरंद मनिदनै पार्त्तोम.” (आम्ही एका मेलेल्या मनुष्यास पाहिलोत.)
“एंगे?” (कुठे)
“अन्द पेरिय मलैक्कु अरुगिल.” ( त्या मोठ्या डोंगराच्या जवळ).
“अवर वाद्दियारा?” (ते पुजारी काय?) (तमिळभाषेत मराठीभाषेप्रमाणे त्रयस्थ व्यक्तीचा उल्लेख एकेरी कधीही होत नाही.)
“आमांग”. (हो)
“हैयो! हैयैयो! कडवुळे काप्पाट्रु!! (अरे बापरे, देवा वाचव ) ('सेमिक्कवुम' चा अर्थ 'वाचवावे' / 'साठवावे' असा होतो. जसे घरात गूळ साठवणे / वाचवणे)
“पुलि इरंदाल नाम महिऴच्चियडैवोम. आनाल एन्न सेय्वदु? पुलि कैयिल वरवे वरादु” (वाघ मेला तर आम्ही सुखी होऊ, पण काय करावे, वाघ हाती लागतच नाही.)
“अप्प? नींगळे एदावदु सेय्वीर्हळा? (मग? तुम्हीच काही करता कां?)
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
24 Mar 2012 - 6:44 pm | बॅटमॅन
@ हैयो: सर्वप्रथम तमिळच्या चुका सुधारल्याबद्दल मनापासून आभार!!
दुसरे असे, की मला तमिळ भाषा येत नाही, फक्त लिपी येते. गुगल ट्रान्सलेट तुकड्यातुकड्याने वापरून मी ते आदिवासींचे तमिळ सजवले आहे, त्यामुळे तशा चुका झाल्या आहेत. आपण दिलेली सुधारित व्हर्जन मी ब्लॉग वर नक्कीच अपडेट करेन संदर्भासह. सेमिक्कवूम चा अर्थ साठवण करणे असा होतो, हे पाहून मजा वाटली. मिपावर बहुसंख्य लोकांना तमिळ येत नसल्यामुळे ते खपून गेले, नाहीतर माझे अवघड होते ;)
असो. पुन्हा एकदा धन्यवाद :)
24 Mar 2012 - 8:40 pm | प्रास
तुम्ही खरोखरच महान आहात, अन्यथा अनेक महिन्यांचं हायबरनेशन संपवून तुम्ही हैयो हैयैयोंना प्रतिसाद देण्यास भाग पाडू शकला नसता. बॅटमॅन, मिपा तुमचे आभारी राहिल...... :-)
आता हैयो हैयैयोंना विनंती की त्यांनी मिपावर पुन्हा लिहिते व्हावे.
24 Mar 2012 - 6:01 pm | पैसा
लेखमालिका अचानक संपवल्यासारखी वाटली, कारण या विषयावर सविस्तर वाचायला नक्कीच आवडलं असतं!
सर्वप्रथम, नीरस चर्चेचा विषय कथेच्या माध्यमातून मांडल्याबद्दल अभिनंदन! मला खात्री आहे तुम्ही एखादी कादंबरी नक्कीच लिहू शकाल!
हैयो हैयैयो यांचा प्रतिसाद आवडला. हैयो हैयैयो साहेब, शक्य तर तमिळ भाषा आणि त्यातल्या साहित्याबद्दल काही लिहू शकाल का? (अवांतरः तुमच्या आयडीचा अर्थ "अरे बापरे" असा आहे का? :) )
24 Mar 2012 - 8:24 pm | श्रावण मोडक
बादवे, ही जी भाषा आहे तीच नाडीग्रंथात असते का? सहज शंका आली म्हणून विचारलं.
कथा गंडली.
25 Mar 2012 - 9:56 pm | शैलेन्द्र
नका ना हो नाड्या ओढु..
"कथा गंडली.:" अल्मोस्ट.. असचं म्हणतो.. पण एक नविन विषय म्हणुन छान वाटली वाचायला..
25 Mar 2012 - 6:23 pm | रामदास
धन्यवाद
25 Mar 2012 - 10:29 pm | रमताराम
प्रथम तुमच्या भाषांबद्दलच्या मांडणीला दाद देतो. अनेक मतमतांतराच्या आवर्तात सापडलेला हा विषय खूपच तपशीलाने मांडला आहे तुम्ही.
परंतु दुर्दैवाने कथा म्हणून लेखन फसले आहे असा माझा समज झाला आहे. (मतांतराचा आदर आहेच.) कथेला मुळात गाभाच नाही त्यामुळे मांडणीचा फारसा विचारही केला नाही. केवळ एक व्यक्ती सरमिसळ भाषा बोलणारी सापडली (भले दुर्गम जंगलात का होईना) तर त्यावरून थेट भाषांच्या परस्परसंबंधांबद्दल नवा सिद्धांत निर्माण होणे हे फारच बाळबोध वाटले. (*त्यातून ते अगस्ती ऋषी वगैरे आणखीनच ओढूनताणून आणल्यासारखे वाटले. )
खरंतर इतका सुंदर विषय तुम्हाला सापडला नि त्यावर ललित लिखाण करावेसे वाटले याबाबत तुमची करावी तेवढी स्तुती थोडीच आहे. परंतु इतके सशक्त कथाबीज वाया घालवले याची खंत वाटते. खरेतर तुम्ही व्यक्तिरेखांचा केलेला विचार पाहता इथे दीर्घकथेचा बाज स्पष्ट दिसतो. कदाचित हे न जाणवल्यामुळे शेवटच्या एकाच भागात कथा उरकून टाकलेली दिसते. त्यामुळे नमनाला घडाभर तेल खर्चल्यासारखे वाटले. आग्रहाची विनंती ही की कृपया पुनर्लेखन करण्याचे मनावर घ्यावे नि कथा जशी तुमच्या मनात फुलेल तशी तिला फुलू द्यावी, शेवटाची घाई करू नये. आणि हो ते 'ट्विस्ट इन द टेल' चे आकर्षणही दूर ठेवले तर कदाचित अधिक चांगली विस्तारू शकेल. ही 'कथा' (story) आहे 'गोष्ट' (tale) नव्हे (त्यामुळे त्या रंजन हे अपरिहार्य नव्हे) हे ध्यानात घेतलेत तर हा मोह टाळता येईल.
पु. ले. शु. आणि हो अनधिकाराने दिलेला अनाहुत सल्ला आवडला/पटला नाही तर आगाऊच क्षमस्व.
ता. क. : शीर्षकही उगाचच बादरायण संबंध जोडणारे असायला हवे असे नाही. ;)
25 Mar 2012 - 10:40 pm | बॅटमॅन
@रमताराम:
हे मला मान्य आहे की कथा म्हणून मांडणी मला नाही जमली पुरतेपणी. तिघे भाषाशास्त्रज्ञ त्या आदिवासीला भेटतात त्यानंतर काय करायचे, हा प्रश्न मला पडला होता आणि त्याचे उत्तर मला तेव्हाही आणि आत्ताही समाधानकारकपणे नाही मिळालेले अजून..असो. सल्ल्याबद्दल आभारी आहे :) पुनर्लेखन पाहू जमेल तेव्हा आणि तसे :)
25 Mar 2012 - 10:59 pm | श्रावण मोडक
ररांशी पूर्ण सहमती दर्शवून म्हणतो की, पुनर्लेखन कराच. :)