[या बातम्यांचा मुख्य उद्देश विनोदनिर्मिती नसून फक्त रिपोर्टींग आहे. एक टैम्पास कल्पना म्हणून आनंद घेणेत यावा इति विज्ञापना.]
नमस्कार!
मिपा बुलेटिनमध्ये सादर आहेत आजच्या ठ्ळ्ळ-क* बातम्या (*मनसेच्या खळ्ळं-फट्याक सारखं हे ठ्ळ्ळ-क वाचावं)
भानामतीचा फेरा कायम
विंगकमांडर ओकांनी आजही भानामतीचा फेरा कायम राखला. अंनिस ही कुठल्याही भोंदु बाबा इतकीच भोंदु संस्था आहे या त्यांच्या मताचा ओकांनी आज पुन्हा एकदा येथे पुनरुच्चार केला. गवि वगैरे सदस्यांनी अंनिस एकदाची हरल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे; तर ननि यांनी भानामतीचे लेख सतत पडत असल्याने एखाद्या स्थळाचा किंवा आयडीचा बळी द्यावा लागेल अशी भीती बोलून दाखवली. नट्यांच्या अंगावरील कपडे गायब असण्यामागे भानामतीच असावी असा संशय अनेक सदस्यांनी बोलून दाखवला. यावर विंगकमांडर ओक गालातल्या गालात हसुन भानामतीवरचा नवीन लेख लिहायला बसल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
धर्म-जातहिन होण्याचा हक्क असावा: हुप्प्या
धर्म किंवा जातीचा कायदेशीर त्याग करता येणार नसल्याचा निर्णय नुकताच एका न्यायालयाने दिला आहे. या निर्णयावर हुप्प्या यांनी उडी घेतली. हुप्प्या यांनी धर्म-जातीचा त्याग करु न देण्याचा हा प्रकार मूर्खपणाचा आहे काय यावर चर्चासत्राचे आयोजन केले. या चर्चासत्रात मिका यांनी संविधानातील कायद्यांच्या आधाराचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला यावर हुप्प्या यांनी संविधान हा धर्मग्रंथ नसून त्यात बदल संभवतात असे जोरदार प्रतिपादन केले. हे चर्चासत्र मध्येच सोडून जाऊन मूकवाचक यांनी सर्व मानव प्राण्यांनी जात धर्माचा त्याग करुन केवळ 'सस्तन प्राणी' म्हणवून घ्यायला हवे असे उद्विग्न मत व्यक्त केले. अनेक नामवंत सदस्यांनी या चर्चासत्रात भाग घेतला.
मेणबत्ती व टोपीबाजीवरुन कहर
नुकत्याच पार पडलेल्या मनपा निवडणुकीकडे मेणबत्तीप्रेमी व टोपीबाजांनी पाठ फिरवली. हे लोकशाहीसाठी घातक असल्याचे प्रतिपादन कॉमन मॅन यांनी केले. या प्रतिपादनावर अनेक सदस्य उखडले असून ननि यांनी कॉमन मॅन असले धागे टाकण्यापूर्वी कॉमन सेन्स वापरत नसल्याबद्दल दु:ख व्यक्त केले. चिडलेल्या ननिंकडे तिरक्या नजरेने पाहून कॉमन मॅन यांनी मनसे-सेनेच्या संभाव्य युतीवर हळूच धागा टाकला. संपादक मंडळाने हस्तक्षेप करुन हा धागा वेळीच बासनात गुंडाळला. कॉमॅंच्या या धाग्यावर रिवाजाप्रमाणे मतमतांतराचा धुराळा उडाला. त्या धुरळ्यावरच 'मेणबत्त्या-टोप्या-टोप्या-मेणबत्त्या' उसळत राहिल्या आणि नवे लेखन तपासणार्यांच्या डोक्याला शॉट लागला. एकूणच कॉमन मॅन हा मिपासाठी चिंतेचा विषय बनत असल्याची कुजबूज सुरु झाली आहे.
चिमण्या हद्दपार होणे क्लेशकारक : लिना शेडसाळे
मोबाईल क्रांतीपूर्वी लाखोंच्या संख्येने आढळणार्या चिमण्या आज नामशेष होत आहेत. मानवी जीवनाशी निगडीत असलेल्या या पक्ष्याचे नामशेष होणे क्लेशकारक असल्याचे मत शेडसाळे यांनी व्यक्त केले. शेडसाळेंनी व्यक्त केलेल्या या मतावर गविंनी चिमण्यांना रहाण्यासाठीच्या पेट्यांचा उपाय सुचवला. अनेक सदस्यांनी चिमण्या आजही अस्तित्वात असून त्यांच्याबद्दल चिंता करण्याची गरज नसल्याचे गवि म्हणाले. चिमण्यांचा धागा पाहून प्रकाश यांनी कावळे उडवून पाहिले - पण ते फुसके निघाले.
सडाफटिंग पाकसिद्धीवर पब्लिक खूश
विमे, प्रास आणि गवि यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच एका दूरस्थ स्थळी सडाफटिंग पाकसिद्धीचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसांच्या या कार्यक्रमात सहभागी तिघांनीही आपापल्या पाककौशल्याचे दर्शन घडवले - ते दर्शन झाल्यानंतर कित्येक सदस्यांनी इनो घेतल्याची कबुली दिली आहे. अशा सडाफटिंग पाकसिद्धी बैठका होण्याची नितांत गरज असून पुढील पाकसिद्धी इंदुरच्या आसपास होईल अशी चिन्हे आहेत.
भाजे लेणीतील गूढाचा उलगडा होणार
मिपाचे इंडियाना जोन्स वल्ली यांनी नुकतीच भाजे येथील लेण्यांना भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांना लेणीत आढळलेल्या गूढाबद्दल अभ्यासपूर्ण शैलीत विवेचन केले आहे. लेणीतील गजमूर्ती कोणाची आणि तिचा काळ नेमका कुठला या मुद्यांसह वल्लींनी प्राचीन लेणीनिर्मितीकडे लक्ष आकर्षित केले. यावेळी चित्रा यांनी लेणीतील गजमूर्ती प्रसेनजीत व अजातशत्रूची असेल असे मत व्यक्त केले. यासंदर्भात वल्ली व चित्रा यांच्या दरम्यान रंगलेल्या संवादाचा वाचकांनी आनंद घेतला. वल्ली यांच्यावर हौशी इतिहासप्रेमींना लेण्यांमध्ये घेऊन जाण्याची जबाबदारी आल्याबद्दल मत विचारले असता त्यांनी संमिश्र भावना व्यक्त केल्या.
पाभेंना झाली गावाकडची आठवण
आज पाषाणभेद उर्फ दगडफोड्या यांना गावाकडची आठवण झाली आहे. मुक्तछंदात केलेल्या या काव्यात त्यांनी गावाकडचे चित्र जीवंत केले असून ते पाहून अनेक सदस्य गावाकडे निघाल्याचे कळते.
टीपः-सदर लेख यशवंत एकनाथ प्रतिष्ठान तर्फे आमचेकडे पेस्टवण्यासाठी आलेला असुन आम्चा यात व्यक्तिशः कुठेही हात अगर लेखणी नाही...तसे काही यक्कू प्रतिष्ठान व अन्य कुणाला वाटल्यास तो एक वैचारिक योगायोग समजावा ;-)
प्रतिक्रिया
22 Feb 2012 - 6:46 pm | अत्रुप्त आत्मा
यक्कू प्रतिष्ठानचे हापिसामधुन सदर लेख पिसता येत नसले कारणाने,तो त्यांनी आंम्हाला पिसावयास दिला आहे याची नोंद घेणेत यावी ;-)
म्हणजे मुळ लेखक यक्कू,फक्त वापरलय आमचं कुंकू... ;-) त्यामुळे प्रतिसाद यक्कूंच्या नावानी पाडावेत ही इनंती ;-)
22 Feb 2012 - 6:46 pm | वपाडाव
मालक, अजुन २ ब्रेकिंग न्युज बाकी राहिल्या की हो...
22 Feb 2012 - 6:48 pm | मोहनराव
अनुमोदन!
22 Feb 2012 - 10:56 pm | अत्रुप्त आत्मा
@यशोधन वर्तक यांचे मिपावर धडाक्यात आगमन - आगमनातच तिळे*>>>
22 Feb 2012 - 6:48 pm | हंस
बातम्यांचा आढावा भारी घेतला आहे, दर आठवड्याला हे सदर चालवावे ही विनंती.
24 Feb 2012 - 11:07 am | विसोबा खेचर
अगदी सहमत..
छानच रिपोर्टींग..! :)
तात्या.
22 Feb 2012 - 6:59 pm | अन्नू
आत्ताची जिलेबी खमंग आणि गोग्गोड झाली.
++१००. आता होऊनच जाऊ द्यात.
22 Feb 2012 - 7:32 pm | मी-सौरभ
मोगॅम्बो खुष हुवा :D
22 Feb 2012 - 9:21 pm | प्रचेतस
मिपा बुलेटीन हे सदर दर आठडयाला येत राहावे अशी यक्कुशेठना विनंती.
22 Feb 2012 - 9:50 pm | आशु जोग
>.>
टीपः-सदर लेख यशवंत एकनाथ प्रतिष्ठान तर्फे आमचेकडे पेस्टवण्यासाठी आलेला असुन आम्चा यात व्यक्तिशः कुठेही हात अगर लेखणी नाही...तसे काही यक्कू प्रतिष्ठान व अन्य कुणाला वाटल्यास तो एक वैचारिक योगायोग समजावा <<
ही देखील एक महत्त्वाची बातमी आहे
22 Feb 2012 - 11:04 pm | अत्रुप्त आत्मा
@ही देखील एक महत्त्वाची बातमी आहे>>> व्वा...काय चाणाक्ष आहात हो तुंम्ही? पण त्या बात मधे मी कुठाय..?
23 Feb 2012 - 11:17 pm | आशु जोग
एकूण मजा आहे तर !
संतोष पावलो...
22 Feb 2012 - 9:58 pm | मन१
आम्हाला हापिसातून मिपाअॅक्सेस नाही. त्यामुळे असले धागे उपयुक्त.
22 Feb 2012 - 10:12 pm | ५० फक्त
आधी बुधवारच्या कविता होत्या आता बातम्या, काय काय ठेवलंय त्या बुधवारात कोण जाणे.
23 Feb 2012 - 6:49 pm | मी-सौरभ
पुणेकर असून तुम्हाला बुधवारात काय काय आहे ते माहीत नाही :(
अरेरेरेरे!!!!
23 Feb 2012 - 3:20 am | पाषाणभेद
टिट्..टिट्..टिट्..टिssssट्...
नमस्कार. यक्कू प्रतिष्ठान.
अत्रुप्त आत्मा आठवड्याच्या बातम्या देत आहे.
ठळक बातम्या:
भानामतीचा फेरा कायम
धर्म-जातहिन होण्याचा हक्क असावा: हुप्प्या
मेणबत्ती व टोपीबाजीवरुन कहर
चिमण्या हद्दपार होणे क्लेशकारक : लिना शेडसाळे
सडाफटिंग पाकसिद्धीवर पब्लिक खूश
भाजे लेणीतील गूढाचा उलगडा होणार
पाभेंना झाली गावाकडची आठवण
{{नंतर पहिल्या ४ बातम्या देणे}}
[[पहिल्या ४ बातम्यांनंतर विश्रांती. त्यादरम्यान अत्रुप्त आत्मा यांनी पाण्याशी संबंधीत विधी करावेत. त्यावेळेदरम्यान यक्कूप्रतिष्ठान काही सरकारी छापाच्या जाहिराती वाजवेल.
त्यांची एक झलक:
टिंग...टिंग...टिंग...
१)
कोरस:
मिसळपाव मिसळपाव खाव खाव खाव खाव
याहो या मिसळपाव खा
मिसळपाव खाणे अन वाचणे शरीराला हितकारक असते.
मिसळपाव.कॉम संकेतस्थळाकडून जनहितार्थ प्रसारीत.
२)
"काय ग सगूणे, ज्येवायला काय क्येलंय?"
"ह्ये काय इचारनं झालं का धनी? त्ये यक्कू प्रतिष्ठान रेडू वर न्हेमी सांगत्यात की मिसळपाव खा...मिसळपाव खा...म्हून. इसरलात का काय? त्येंचं ऐकूनशान आपल्या घरीबी दर्रोज मिसळपावच बनती बघा.
तुमी कांदा कापायला घ्या. म्या ताटं करतीच."
टिंग...टिंग...टिंग...टिडींग...
]]
{{नंतर पुन्हा उरलेल्या बातम्या देणे}}
शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या:
{{पुन्हा ठळक बातम्या वाचणे/ लिहीणे}}
यापुढील बातमीपत्र पुढल्या बुघवारी सकाळी प्रसारीत होईल.
यक्कू प्रतिष्ठानवरील बातमीपत्र संपले. नमस्कार.
डिर्डीढिंग..डिर्डीढिंग..डिर्डीढिंग..डिर्डीडिर्डीडिर्डीढिंग...
(खालील यक्कू प्रतिष्ठानचे गीत वाजवावे.)
जनजन सतत बोलती
मनामनात विचार करती
चारी ठाव चारी ठाव
मिसळपाव
मिसळपाव
23 Feb 2012 - 9:35 am | सूड
ह्या ममिसळपाव मिसळपाव मिसळपाव वरुन पूर्वी प्रभातवर गप्पा म्हणून एक एकांकिका यायची. त्याची आठवण झाली.त्यातत योगेश सोमण असा बोंबलत असायचा, ' जरुर या , भेट द्या, लाभ घ्या, माझ्याऽऽऽ बायकोचीऽऽऽ खानावळ' आणि माधवी सोमण 'येणार नाही' असं म्हणून धाडकन त्या सेल्समनच्या तोंडावर दार बंद केल्याचा अभिनय करायची.
23 Feb 2012 - 4:10 pm | अत्रुप्त आत्मा
@त्यादरम्यान अत्रुप्त आत्मा यांनी पाण्याशी संबंधीत विधी करावेत.>>> पाण्यशी सं-बंधित अनेक विधी आहेत,पण आंम्ही पटकन करू शकू असा विधी म्हणजे श्राद्ध...!
आम्चे येथे वैकुंठ कैलास कृपे करुन येथिल मृतवत आयडींना कायमची मुक्ति देण्यासाठी त्यांचे पिंड दर्भा ऐवजी त्यांच्याच धाग्यांच्या सं-दर्भावर ठेवले जातील,व आठवणींच्या पाण्याने विधिवत तर्पण करुन मिळेल..तरी इच्छुकांनी आपल्या आवडत्या मृतवत आय.डीं.चे नाव लवकरात लवकर नोंदवावे...प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य...त्वरा करा,आणी लवकर नावे भरा...! अंतिम मुदत..येत्या रविवारचे आत...किंवा फार फार तर,सोमवार बाहेर मंगळवार पर्यंत ...
आपला(च) आत्मंम भट्ट बुले-टिन कर
23 Feb 2012 - 9:48 am | प्यारे१
____/\____
कहर....!
यकु आणि भटजी, दोघांनाही सा न.
खतरा हाय राव!
मुख्य बातम्यांबरोबर खालच्या सरकत्या पाट्या सुद्धा सुरु करु या...
पराची गुलजार नार कुठपर्यंत आली (पहा कधीतरीच)... गविंनी केला नवीन एअर क्रॅश... स्पावड्यानं पाहिलं नवीन ग्रहण... प्राजुतै/क्रांतीतैनं नवीन पुरस्कार जिंकला... ५० फक्त ची विवाहबाह्य संबंधांवरची नवीन थरारक मालिका... गणेशा/ प्रकाशची नवीन कविता... पियुशाची नवीन जिल्बी... सानिका आणि स्वप्निलमध्ये चमच्यांवरुन वाद.... वल्लीची भटकंती आता एका 'नवीन अँकर'बरोबर....बिकां/ श्रामो यांनी संघाची घेतली बाजू ;) .... गणपा पाकृ करताना फसला...!
23 Feb 2012 - 10:01 am | अन्या दातार
मिपावर फुटकळ धाग्यांची रेलचेल.
मदतीच्या धाग्यांमुळे बोर्डाचा खफ.
जोड्या जुळवा (आयडी व विशेषणांच्या बरं का ;) ) मिपा विशेष स्पर्धा- प्रायोजक चौकटराजा पत्तेवाला
23 Feb 2012 - 10:10 am | गवि
हिंदीत ब्रेकिंग न्यूजना जो पंच आहे तो मराठीत नाही रे.
"मिपा पर मददयाचना करनेवाले धागों का कहर.. अफरातफरी का माहोल.."
"मिलिटरी स्कूलवाले धागे पर मुतभेड.. बवाल में कई प्रतिसादों के लापता होने की आशंका.."
"यौन शिक्षा संबंधित धागोंपर नाराज जनता का हमला.. लेखक ने बदली अपनी चाल.. गुलाबों की कथा लिखकर अपनायी गांधीगिरी.."
"मंदाकिनी कांड मेरे निजी आयुष्य की सत्यघटना..परा का सनसनीखेज खुलासा.."
"सडाफटिंग कट्टा मामले में मेरे शामिल होने का आरोप - एक साजिश.. गवि का हैरतअंगेज खुलासा.. बोर्डपर खलबली.."
23 Feb 2012 - 11:23 am | राजो
मुठभेड :P
23 Feb 2012 - 11:59 am | यकु
_____/\____
कहर आहेत हेडलाइन्स!!
23 Feb 2012 - 1:50 pm | हंस
हिंदीत ब्रेकिंग न्यूजना जो पंच आहे तो मराठीत नाही रे
पटलं हो! आणि ब्रेकिंग न्यूज एकदम चुरचुरीत!
ओर भी आन्दो!
23 Feb 2012 - 10:06 am | पियुशा
छान छान :)
23 Feb 2012 - 10:54 am | स्वातीविशु
दर बुधवारी हे बुलेटिन प्रसारीत करावे, ही विनंती. :-)
23 Feb 2012 - 11:53 am | पप्पु अंकल
च्यामारी एकदम धरुन फ़ट्याक….एक नंबर पोस्ट आहे…..
जोरदार टाळ्या या भन्नाट प्रकारासाठी..
दर आठवड्याला हे सदर चालवावे ही विनंती.
23 Feb 2012 - 11:54 am | नगरीनिरंजन
खतरनाक बुलेटीन आहे!
दर आठवड्याला यायला काहीच हरकत नाही!
=)) =)) खपलेलो आहे!
23 Feb 2012 - 1:59 pm | गणेशा
एकनाथ, गवि आणि पाभे ..
जबरीच हो ..
बुलेटीन चालते ठेवा ..
23 Feb 2012 - 2:10 pm | पैसा
कहर आहे! यकु, गवि, भटजी आणि पाभे
"मिपा पर चौकडी के खतरनाक कारनामे!!"
धमाल आली. बुलेटिन कोणीही लिहा पण चालू ठेवा म्हणजे झालं.
23 Feb 2012 - 7:38 pm | छोटा डॉन
>>धमाल आली. बुलेटिन कोणीही लिहा पण चालू ठेवा म्हणजे झालं.
+१, हेच म्हणतो.
मजेशीर प्रकार आहे, ह्याचे एका चांगल्या मजेशीर उपक्रमात रुपांतर झाले तर नक्कीच आवडेल.
पुढच्या धाग्याची वाट पहातो आहे. नियमीत लिहावे ही विनंती
- छोटा डॉन
23 Feb 2012 - 4:20 pm | चिगो
मस्तच आहे हा प्रकार.. गविंचा "मिपा इंडीया टिव्ही" पण खासच..
दर आठवड्याला पुनःप्रक्षेपण व्हायला पाहीजे ह्याचं..
26 Feb 2012 - 3:28 pm | अन्नू
अहो एक ब्रेकिंग न्युज राहीली की हो,
"आपल्या जिलीबीवर कधीच ढुंकून न बघणारे डॉक्टरसाहेब आता मिपावरच्या इतर लेखांवर आपली मते टंकायला लागलेत."
27 Feb 2012 - 11:33 am | शशिकांत ओक
मित्रा अतृप्त आत्म्या
काय हे!,
ओकांच्या लेखनाला टॉप बिलिंग !!...
वाचवत नाही मित्रा!!!,
जे अंनिसवाल्या अनेकच्या घसटीतील व प्रेमळ संबंधातील, त्यानी ओकांना कुठे व कसाही का असेना प्रथम क्रमांकाचा मान (?) खरोखर अतृप्त आत्मांच्या वासनांशी भानामती नामक करणीताईंचा काही विशेष संबंध असल्याशिवाय असल्याशिवाय - (पहा हा शब्द न कळत दोनदा टाईप होण्यामागे काहीतरी 'राज' असेल काय?) हे घडणे शक्य नाही असे एक पुर्वीचे अंनिस प्रेमी व आताशेचे वाळीत पडलेल्या प्रकाश काकांचे मत असेल असे मानतो.
27 Feb 2012 - 12:03 pm | मीनाक्षी देवरुखकर
=))
मस्तच