चांदणे पांघरलेले आकाश .....
दिसतंच नाही अलीकडे ,
ढगांनी भरलेले आभाळ .....
कोसळतच नाही अलीकडे,
स्वच्छ निरभ्र आकाश सुद्धा ......
नकोसेच वाटते अलीकडे ,
पण .......असो....... खुशाली कळवत राहा ........
क्षितिजावर लुकलुकणारे तारे
मंद झालेत बहुदा ......
थेंबा थेंबा ने बरसणारे ढग
नुसतेच गर्जत राहतात आता........
श्वासात दरवळणारा ओल्या मातीचा सुवास
हरवलाच आहे कुठेतरी ......
पण .......असो....... खुशाली कळवत राहा ........
स्वप्नात येतेस कधीतरी
बरसणाऱ्या ढगांना घेऊन .......खरंच .......
डोळ्यातले पाणी टिपतेस ना....
तेव्हा आकाश निरभ्र झाल्याचे भासते .......खरंच..
जगाचा विसर पडावा .....अशी ती भेट आपली
क्षितिजा पलीकडचे जग पहिल्याची जाणीव ती ......खरंच .......
पण .......असो....... खुशाली कळवत राहा ........
'काल' संपला तरी 'आज' जगत चाललोय .......
काळाच्या 'आज' मध्ये 'उद्याही' पाहत चाललोय ......
क्षणभंगुरच आहे हे आयुष्य ...स्वतालाच समजावतोय........
क्षण क्षण वेचताना परत तुलाच आठवत चाललोय .....
पण .......असो....... खुशाली कळवत राहा ........
प्रतिक्रिया
7 Feb 2012 - 2:56 pm | पक पक पक
'काल' संपला तरी 'आज' जगत चाललोय .......
काळाच्या 'आज' मध्ये 'उद्याही' पाहत चाललोय ......
छान आहे , आवड्ले ......अजुन किती भाग आहेत.....?
7 Feb 2012 - 3:15 pm | वपाडाव
विशेष आवडले...
7 Feb 2012 - 4:09 pm | गणेशा
कविता नेहमीप्रमाणेच आवडली ...
7 Feb 2012 - 6:03 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
आवडली.
15 Feb 2012 - 4:39 am | अरुण मनोहर
वाह! खरंच!
>>डोळ्यातले पाणी टिपतेस ना....
तेव्हा आकाश निरभ्र झाल्याचे भासते .......खरंच..
<<