निजाम फोर्ट अहमदनगर अर्थात अहमदनगर भुइकोट किल्ला
थोड्क्यात ओळ्ख /इतिहास :-
१५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून विभक्त झालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, इ.स. १४९० मध्ये सीना नदीकाठी पूर्वीच्या भिंगार शहराजवळ नवीन शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी कैरो, बगदाद या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुर्हाणशहा, सुलताना चांदबिबी यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे १६३६ पर्यंत टिकली.मोगल बादशहा शाहजहान ने इ.स. १६३६ मध्ये अहमदनगर काबीज केले. इ.स. १७५९ साली पेशव्यांनी अहमदनगरवर ताबा मिळवला तर १८१७ रोजी ब्रिटिशांनी अहमदनगरवर विजय मिळवला. शहरात अहमदनगरचा भुइकोट किल्ला, चांदबीबी महल , फरियाबाग्,बागरोजा घुमट ,अशी अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. या शहराला नगर या नावानेसुद्धा ओळखतात.
आज ओळख करून घेऊयात " अहमदनगर निजाम फोर्ट अर्थात भुईकोट किल्ला
(सग्रहीत छायाचित्र )
हा भुईकोट किल्ला अंडाकृती आकारात बांधलेला असून या किल्ल्याचे क्षेत्रफळ १ मैल - ८० यार्ड इतके विस्तारलेले आहे .त्या काळी हा एकमेव असा किल्ला होता जो जमिनीवर बांधलेला , तितकाच मजबूत अन जिंकण्यासाठी अतिशय कठीण असा होता .
ह्या किल्ल्याला चहुबाजूने खंदक आहे अन या खंदकात त्याकाळी मोठमोठ्या मगरी अन सुसरी सोडलेल्या होत्या ( असे ऐकिवात आहे )अचानक आक्रमण झालेच तर ह्या खंदकाचे दरवाजे त्वरित बंद करून शत्रूला जायबंदी करण्यात येत असे अन टेहळणी अन छुप्या खिडक्यांमधून शत्रूवर तोफांचा अन बंदुकीचा मारा होत असे . ह्या किल्ल्याला बचावासाठी एक झुलता पूल बांधलेला होता कि जेणेकरून आपत्तीप्रसंगी ह्या पुलाचा वापर करून बचाव करून घेणे सोपे होईल हा किल्ला मजबूत ,चहुबाजूने भरभक्कम तटबंदी अन जिंकण्यास अतिशय कठीण असल्यामुळे " दगाबाजी " करूनच काही जणांना या किल्ल्यावर वर्चस्व स्थापता आले.
• भुईकोट किल्ला हा हुसेन निझामशाह यांनी १५५३ साली बांधण्यास सुरवात केली.
• चांदबिबीने जुलै १६०० मध्ये युध्दात किल्ला लढवला. परंतु मोगलांनी तो जिंकला.
• १७५९ साली पेशव्यांनी मोगलांकडुन विकत घेतला.
• १७९७पेशव्यांनी शिंदे घराण्याच्या ताब्यात दिला.
• १२ ऑगस्ट १८०३ ला जनरल वेलस्लीने जिंकला.
• १९४२ च्या चले जाव आंदोलनातील राजकीय कैद्यांना येथे डांबण्यात आले, त्यात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉ. पी.सी. घोष इत्यादी होते.
• १९४७ ला भारत सरकारच्या सैन्य दलाच्या ताब्यात.
अहमदनगर शहराच्या पुर्व दिशेला भुईकोट किल्ला आहे. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉ. पी.सी. घोष इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे पाहण्यास मिळतात. याच किल्ल्यात डॉ. पी.सी.घोष यांनी हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन हा ग्रंथ शब्दबद्ध केला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान व मौलाना आझाद यांनी गुबार - ए - खातिर हे ग्रंथ याच शहरात लिहिले.
हे काही स्वतंत्र सेनानी जे " चले जाव " च्या आंदोलन काळात अहमदनगर भुईकोट किल्ल्यात कैदेत ( नजर कैदेत ) होते
नावे कालावधी
१) सरदार वल्लभ भाई पटेल १० ऑगस्ट १९४२ - १८ एप्रिल १९४५
२) पंडित गोविंद पंत १० ऑगस्ट १९४२ - २८ मार्च १९४५
३) आचार्य नरेंद्र देव १० ऑगस्ट १९४२ - २८ मार्च १९४५
४) आचार्य जे .बी. कृपलानी १० ऑगस्ट १९४२ - 27 मार्च १९४५
५) मौलाना अब्दुल कलाम आझाद १० ऑगस्ट १९४२ - १७ एप्रिल १९४५
६) पंडित जवाहरलाल नेहरू १० ऑगस्ट १९४२ - २८ मार्च १९४५
७) असफ अली १० ऑगस्ट १९४२ - ३ एप्रिल १९४५
८) डॉ.पी सी घोष १० ऑगस्ट १९४२ - २० मे १९४४
९ ) पंडित हरेकृष्ण मेहताब १० ऑगस्ट १९४२ २९ मार्च १९४५
१० )शंकरराव देव १० ऑगस्ट १९४२ १८ एप्रिल १९४५
हे आहे प्रवेशद्वार :
प्रवेश द्वारातील तोफा :
हा आहे किल्ल्याचा अन्तर्गत जीना :
हे नेत्याचे कक्ष :-
मौलाना अब्दुल कलाम आझाद
नेहरु कक्ष : ( इथे त्याचे साहित्य देखील जतन करुन ठेवलेले आहे )
नेहरुनी वापरलेल्या काही वस्तु :-
हा डायनिन्ग हॉल :
चला आता किल्ला पाहुया जरा :- :)
ही आहे किल्ल्याच्या आतली दुमजली पडवी फूट्पाथ म्हणू हव तर
ह्या आहेत शत्रुवर आक्रमनाकरिता बनवलेल्या छुप्या चोर खिड्क्या :)
यातुन बन्दुकीचा अन तोफाचा मारा केला जाइ
हा आहे खन्दक
किल्ल्याची गच्ची :
काही भागाची पडझड झाली आहे
ही गर्दी :
ही आहे वाळ्लेल्या गवतातील हिरवळ - ;)
हाच तो झुलता पुल ( आ.जा वरुन )
अन हा मी काढलेला फोटु ;) सध्याची पुलाची अवस्था
असो तुर्तास इतकच :)
बाकीची माहीती अन फोटो क्रमश :
:)
प्रतिक्रिया
2 Feb 2012 - 4:23 pm | पैसा
मस्त माहिती आणि फोटो. तो खंदक आता सगळीकडे शिल्लक नाही का?
2 Feb 2012 - 4:25 pm | प्रशांत
माहिती आणि फ़ोटो उत्तम..
2 Feb 2012 - 4:25 pm | बिपिन कार्यकर्ते
ग्रेटच! हे बघायला आवडलं! धन्यवाद!
एक शंका : अनुस्वार मुद्दाम दिले नाहीयेत की चुकून तसं झालंय? ;)
2 Feb 2012 - 4:28 pm | स्पा
उत्तम माहिती
पण अशुद्ध लेखन .. जेवणातल्या खड्यासारखं बोचत होतं
असो बरीच सुधारणा आहे :)
2 Feb 2012 - 4:30 pm | यकु
मस्त!
आणखी येऊ द्या.
2 Feb 2012 - 4:31 pm | अन्नू
वा! मस्तच. निजामकालीन ऐतिहासिक माहीती अगदी डिटेलवारी दिलेली दिसतेय. (तुर्तास वाचण्याचे टाळतो कारण; इतिहास हा विषय म्हणजे डोक्यावरच पाणी! ;) )
बाकी पोट्टु खुपच छान आलेले आहेत. ते बघुन काही क्षण इतिहासात वावरतोय अस वाटलं.
2 Feb 2012 - 4:40 pm | पियुशा
@ पैसा
खन्दक आहे अजुन जसा च्या तसा सर्व बाजुने ,फक्त पाणी खराब झालेले आहे फार :)
@ स्पा ,सॉरी शक्तिमान इतक टाईप करायच होत अन ते ही घाइत त्यामुळ शुद्ध - लेखनाकड लक्ष नै दिल ;)
अजुन एक माहीती
ह्या किल्ल्याच्या दुरुस्तीकरिता शासनाने जवळ जवळ ५५ कोटी अनुदान मन्जुर केले आहे :)
इथे लवकरच एक भव्य गार्डन अन किल्ल्याभोवतीचा तलाव दुरुस्त करुन त्यात नॉकानयन अन इतर सुविधा निर्माण करन्याचा आराखडा मन्जुर झालेला आहे :) अन कामही सुरु झाले आहे
( हे वर लेखात टाकायच राहुन गेल होत )
धन्यवाद :)
2 Feb 2012 - 4:50 pm | वपाडाव
एक प्रश्न :: झुलत्या पुलाचा फटु झुलत झुलतच काढावा अशी अट आहे का?
गवतावरील हिरवळीवर झुम करता आलं तर बघा....
(झुमलेला फटु व्यनितुन दिला तरी चालेल....) ;)
5 Feb 2012 - 10:26 am | पियुशा
@ व .प्या
एक प्रश्न :: झुलत्या पुलाचा फटु झुलत झुलतच काढावा अशी अट आहे का?
अरे समोरुन फोटो काढ्ला होता पण अन्तर जास्ती असल्याने फोटोत पुलच दिसत नव्हता ,मग किल्ल्याच्या एका तोफ डागण्याच्या खिडकीत अक्षरश : लिटरली लोळुन हा फोटो काढ्ला आहे त्यात मोबाइल हातातुन सटकण्याची भीती होती म्हनुन घाइघाइत फोटु तिरका आला आहे :)
2 Feb 2012 - 4:52 pm | मुक्त विहारि
अजुन लिहा ....नगर बद्दल.....
भेट द्यायलाच लागेल.....
2 Feb 2012 - 5:00 pm | इरसाल
मस्त.
काही मुद्दे.....(आणी गुद्देही)
१) मौलाना अब्दुल कलाम आझाद .........अबुल कलाम
२) १३ व्या फोटोत हे कोण स्वतःला आणि चिमुरडीला तोफेच्या तोंडी देताहेत (५०राव काय .....संदर्भ फ्लावरची सुकी भाजी )
३) किल्ल्याची गच्ची :d .....गच्चीसह चाळ झालीच पाहिजे
४) २३ वा फोटो एक पांढरा पंजाबी ड्रेस उत्सुकतेने किंवा असूयेने तुमच्याकडे पाहतोय
५ )२४ वा फोटो हिरवळीत काही सुकलेले गवत आणि काही भरगच्च काड्या दिसत आहेत.त्यातच डावीकडे मुलगा आणि उजवीकडे मुलगी सेम पोझ मध्ये का आहेत.(अधिकमाहीतीसाठी काळा शर्ट आणि निळा टी-शर्ट )
5 Feb 2012 - 2:21 pm | किचेन
:) निरीक्षण भारी आहे राव.तुमच्यामुळे मला मोजत मोजत फोटो बघावे लागले.
2 Feb 2012 - 5:03 pm | ५० फक्त
माहिती अन किल्ल्याचे माहिती देणारे फोटो एकदम मस्त,
पण शुर वीरांच्या रक्तानं पावन झालेल्या किल्ल्याची माहिती देताना तो हिरवळीचा पक्षी तरुण मुलींचा फोटो खटकला, एकदम अस्थानी आहे तो. तो काढुन टाकलात तर बरं होईल.
2 Feb 2012 - 5:10 pm | सुत्रधार
फोटो पण अन माहिती पण ....
2 Feb 2012 - 5:27 pm | सुहास झेले
मस्त माहिती..... हा किल्ला बघायला नक्की आवडेल :) :)
2 Feb 2012 - 5:32 pm | अन्या दातार
चान चान. परगती चांगली आहे ;)
2 Feb 2012 - 5:57 pm | प्रास
अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्याच्या माहितीने भरलेला हा दुसरा भाग आपल्याला आवडला ब्वॉ!
पियुबै छान माहिती दिलीय.
पण मला पडलेला प्रश्न वेगळाच आहे....
"या लेखाचं संपादन झालंय की पियुबैंचं टंकन इतकं सुधारलंय?"
2 Feb 2012 - 6:07 pm | मनराव
>>१९४७ ला भारत सरकारच्या सैन्य दलाच्या ताब्यात.<<
हा किल्ला सुद्धा फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला जाण्यासाठी खुला असतो का........??
2 Feb 2012 - 6:35 pm | रेवती
फोटो माहिती आवडली.
2 Feb 2012 - 7:34 pm | गणेशा
माहिती छान !
फोटो मात्र दिसले नसल्याने निराशा झाली..
पिकासा वरुन फोटो आले असते तर दिसले असते !
2 Feb 2012 - 11:12 pm | प्रास
येरे माझ्या मागल्या...... :-(
3 Feb 2012 - 12:09 am | वपाडाव
तुम्ही त्याला श्वासही घेउ देउ नका... टप्पुन बसलात काय त्याच्यावर....
3 Feb 2012 - 10:40 am | प्रास
पुढे होणार्या गोष्टींची सवय त्याला आपण मित्रांनी नाही लावायची तर कुणी? मित्रं असतात कशासाठी? ऑ?
2 Feb 2012 - 8:37 pm | प्रभाकर पेठकर
छान आहेत छायाचित्रे आणि माहिती. अभिनंदन.
2 Feb 2012 - 10:34 pm | जाई.
छान माहिती व फटु
2 Feb 2012 - 10:38 pm | शिल्पा ब
माहीती अन फोटो आवडले.
2 Feb 2012 - 11:02 pm | प्रचेतस
वर्णन आणि फोटो छान. गर्दी टाळून फोटो काढता आले असते तर सौंदर्य अधिक खुललं असतं.
खंदकही एकदम सुरेख.
2 Feb 2012 - 11:06 pm | सुनिल पाटकर
माहिती छान ,फोटो एकदम मस्त.
3 Feb 2012 - 7:42 am | ५० फक्त
आभाराचे दोन शब्द टाकले असते तर पुणेकरांनी वाईट नसतं मानलं, असो
3 Feb 2012 - 8:45 am | अत्रुप्त आत्मा
व्वा व्वा...चान चान हो...वृत्तांत आणी फटू सुद्धा... ;-)
आमास्नी आवड्ल्यालं फटू- दुसरा,मंग फुडं-११ ते १४,आनी अमच्या तिरंग्यामुळे शान वाढलेला शेवटचा
आरं आरं आरं...हो...त्ये येक र्हायलच की... त्ये वाळल्येल्या गवता वरची हिरवळ चान/चान हे,,,पण एवडी दर्दी/गर्दी हुती म्हनल्यावर हिरवळच काय लॉन बी मिळालं अस्तं..नव्ह का..?
3 Feb 2012 - 10:33 am | पियुशा
सर्व वाचकाचे मनापासुन आभार :)
( चला ,हुस्श.... फटु काढण्यासाठी केलेली धड्पड, धावपळ ,भावाला १० दिवस आधीपासुन लावलेला मस्का ;) हे सर्व सार्थकी लागले म्हणायचे ;) )
3 Feb 2012 - 12:55 pm | उगा काहितरीच
मराठवाड्यातील आणखी काही निजामशाही प्रदेशा बद्द्ल माहीती येउद्दा !! (परभणी , हिंगोली , नांदेड)
_ परभणीकर...
3 Feb 2012 - 4:18 pm | स्वातीविशु
अतिशय सुन्दर फोटो व माहिती. खन्द्क पाहुन लक्षात येते की हा किल्ला जमिनीवर बांधला असूनही अजिंक्य असा का होता?
3 Feb 2012 - 4:42 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
असेच म्हणतो.
5 Feb 2012 - 2:25 pm | सानिकास्वप्निल
खुप छान माहीती व सुंदर फोटो :)