आता नावे पुसली गेली असतील
किनाऱ्यावरची ...........
आता उनेही सहन होत असतील
डोंगरावरची ...........
आता पावसात पक्षीही भिजत असतील
झाडावरचे ..............
पण .......असो....... खुशाली कळवत राहा ........
किनारे हे भांडण्यासाठी असायचे
आणि समजवण्यासाठी .....
डोंगर हे फिरण्यासाठी असायचे
आणि छेडण्यासाठी .....
झाडे हि सावलीसाठी असायची
आणि भिजण्यासाठी ......
पण .........असो........ खुशाली कळवत राहा ........
शंख अन शिंपले देणे घेणे व्हायचे...
डोळ्यातील आसवांचे येणे जाणे असायचे...
उन सावलीचा खेळ खेळायचा ...
हातातला हात न कधी सोडायचा ...
भिजताना पाहायचे एकमेकांना ..
आणि चिंब बरसणाऱ्या पावसाला .....
पण .........असो........ खुशाली कळवत राहा ........
आता आठवणी या अशाच दाटायाच्या,
काहीतरी विसरण्यासाठी.....
जीवन हे असेच चालायचे ,
कुठेतरी थांबण्यासाठी ...
पत्र हे असेच लिहायचे ,
कधी न धाडण्यासाठी ....
पण .........असो........ खुशाली कळवत राहा ........
प्रतिक्रिया
2 Feb 2012 - 2:07 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
मस्त! मस्त!! मस्त!!!
2 Feb 2012 - 2:18 pm | सुहास झेले
व्वा व्वा ... आवडली :) :)
2 Feb 2012 - 2:30 pm | मूकवाचक
कविता आवडली.
हे आमच्या लाडक्या नवोदित कविवर्गासाठी -
आता पोटे टम्म फुगली असतील
खाणार्यान्ची ......
आता हात भरून आले असतील
तळणार्यान्चे .......
आता साठा सम्पत आला असेल
हवाबाण हरडेचा ......
पण ...... असो ...... जिलब्या तळत रहा ....
2 Feb 2012 - 2:36 pm | मोहनराव
सहीच!!
2 Feb 2012 - 2:36 pm | सुहास झेले
=)) =)) =)) =))
2 Feb 2012 - 2:59 pm | प्रचेतस
आणि सतत पाकात बुडवत राहा.
2 Feb 2012 - 5:06 pm | यकु
=)) =)) =)) =))
विडंबनसंभाव्यता प्रचुर काव्य! आणखी थोडं लिहा.
2 Feb 2012 - 2:41 pm | sneharani
सुंदर, मस्त कविता!
:)
2 Feb 2012 - 3:08 pm | मेघवेडा
छान! :)
2 Feb 2012 - 3:12 pm | उदय के'सागर
खुपच मस्तं कविता... अगदी अश्शी भिडली मनाला ... छानच!
2 Feb 2012 - 3:37 pm | प्रीत-मोहर
मस्त!!! :)
2 Feb 2012 - 3:51 pm | जाई.
कविता आवडली
2 Feb 2012 - 3:52 pm | पैसा
छान कविता.
2 Feb 2012 - 4:32 pm | श्यामल
सुरेख कविता ! आवडली.
2 Feb 2012 - 5:35 pm | वपाडाव
अश्याच कविता येउ द्या...
अवांतर :: ह्या विडंबनकारांना आवर घातला पैजे... नको तिथे हलवाइ उभे करतात... काय चाल्लंय काय...
2 Feb 2012 - 11:27 pm | गणेशा
कविता लाजवाब
3 Feb 2012 - 12:27 am | इन्दुसुता
कविता आवडली.