२०१२... अजून काय???

सुहास झेले's picture
सुहास झेले in जनातलं, मनातलं
25 Jan 2012 - 5:25 pm

काल संध्याकाळी ऑफिसमध्ये पोचलो आणि नेहमीप्रमाणे ईमेल चेक करत बसलो. कामाचा प्रचंड कंटाळा आला होता (तो नेहमीच येतो म्हणा ;)). एक नियम नेहमी पाळतो, क्लायंटचे ईमेल सगळ्यात शेवटी चेक करतो. साले एक से एक मनहूस असतात, कारण त्यात नेहमीच एकच चर्चा असते टार्गेट्स..टार्गेट्स आणि टार्गेट्स.

म्यानेजरचा पहिला ईमेल बघितला, त्याला हाय प्रायोरीटी असं मार्क केलं होतं. ***ATTENTION*** म्हटलं झालं, काही तरी नवीन जबाबदारी दिली असणार. रागातच तो ईमेल उघडला आणि त्यात सूर्याचे काही फोटो दिले होते. म्हटलं आता काय झालं?

त्यात त्यांनी एक बातमी दिली होती -

(CNN) The largest solar storm for seven years is expected to send a shower of radioactive solar particles racing towards Earth at almost 1,400 miles a second this week, according to NASA. The flare, caused by a huge eruption on the sun's surface on Sunday, is expected to affect GPS systems and other communications when it reaches the Earth's magnetic field on Tuesday..

Solar flares are our solar system's largest explosive events and can last from minutes to hours, according to NASA, releasing up to a billion tons of matter in the process. NASA says the flare may also spark an unusually large display of auroras, which may be visible at lower latitudes than normal. The dazzling array of brightly colored lights, known as the Aurora Borealis or Northern Lights, can frequently be seen in northern Canada, and the far north of Europe, from Greenland to Iceland and Norway.

This week's powerful solar storm has already seen the lights visible as far south as Scotland, Northern Ireland and Yorkshire, in northern England.

मग त्यांनी नासा ने काढलेले फोटो दिले होते आणि एक यादी होती आमच्या सॅटेलाईटस् ची, ज्यांच्या द्वारे आम्ही आमच्या कस्टमर्सना आणि जगभरातल्या सैनिकांच्या नेटवर्कला सुविधा पुरवत असू. त्यात पुढे म्हटले होते की, पुढचे ७-८ दिवस हे जीपीएस, मोबाईल आणि सॅटेलाईट इंटरनेट सर्विसेस पुरवणाऱ्या कंपन्यांना कठीण आहेत आणि ह्या सुविधा काही काळासाठी बंद होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला खूप तक्रारी येतील, त्यांना हे नीट समजावून सांगा.

मग ह्या बद्दल थोडं गुगलून बघितले, आणि खालील माहिती सापडली. जाणकारांनी अजून माहिती दिल्यास बरं होईल.

आता हे सोलार स्टॉर्म/सोलार फ्लेअर नक्की काय?

ही एक प्रकारची नैसर्गिक खगोलीय घटना आहे, जी सूर्याच्या पृष्ठभागावर घडते. एक प्रकारचे वादळंच म्हणा सोप्या शब्दात. अशी वादळे तिथे होतंच असतात, पण जेव्हा मोठ्या प्रमाणावर अश्या प्रकारची घटना घडते, तेव्हा सूर्य नेहमीपेक्षा ६-७ पट उर्जा उत्सर्जित करतो. नासाने सांगितलं आहे की, २००५ मध्ये अशी घटना घडून गेली आहे, पण त्याचा जास्त परिणाम पृथ्वीवर झाला नाही. शास्त्रीय भाषेत ह्याला कोरोनल मास इजेक्शन (Coronal Mass Ejection - CME) असे म्हणतात.

आपण किती चिंता करायला हवी?

ह्यावेळी किमान २८ तासापूर्वी अशी प्रचंड वादळे सूर्याच्या पृष्ठभागावर घडलेली नासाने आणि International Space Station मधल्या अवकाश संशोधकांनी बघितली आहेत. ह्या घटनेमुळे सोलार पॅनलमध्ये अगणित उर्जा उत्सर्जित झाली आहे. ही उर्जा मोजणे अशक्य आहे. कारण जोपर्यंत ह्या उर्जालहरी आपल्या वातावरणावर आदळत नाहीत, तोपर्यंत ह्यांची तीव्रता कळत नाही. त्यामुळे थोडे चिंतेचे वातावरण सगळ्या संशोधकांमध्ये आहे. पण इतकं नक्की की, ही तीव्रता सूर्याच्या आत्ताच्या उर्जेच्या ६-७ पट असू शकते.

ह्यामुळे काय परिणाम होणार?

ह्या घटनेचे दुष्परिणाम जास्त करून सॅटेलाईट कम्युनिकेशनला पडू शकतो. पृथ्वीवरील मोबाईलसेवा, इंटरनेटसेवा आणि विमानांना दिशा दाखवणारी यांत्रिक सुविधा थोड्यावेळासाठी बंद होईल. त्यामुळे धृवीय भागातील विमान उड्डाणे बंद होतील, किंवा त्यांचे मार्ग बदलले जातील. सुरक्षेच्यादृष्टीने अमेरिकेतील काही भागात वीजपुरवठादेखील खंडीत केला जाईल. जर ही तीव्रता खूपंच जास्त असेल तर, सॅटेलाईट बंद पडून, गुरुत्वाकर्षणाअभावी पडू देखील शकतात.

ह्या आधी अश्या घटनेमुळे पृथ्वीला काही अपाय झाले आहेत का?

१९८९ - २००१ मध्ये आलेल्या सोलार स्टॉर्म/सोलार फ्लेअरमूळे अमेरिका आणि कॅनाडा भागात ब्लॅक आऊट झाला होता. जेव्हा ही उर्जा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करते, तेव्हा तुम्हाला आकाशात विचित्र रंगछटा दिसतात. युरोपात आणि उत्तर अमेरिकेत हे बुधवारी आढळून आले आहे. त्याचे फोटोदेखील प्रसिद्ध केलेले आहेत नासाच्या वेबसाईटवर. भारतात अजून ह्याचे परिणाम जाणवले नाहीत, किंवा सांगितलेले नाहीत.

काल झालेल्या सोलार स्टॉर्मचा हा व्हिडिओ - http://www.youtube.com/watch?v=GHGg6pEPON4

बघू पुढे काय होतंय..... :(

नासाच्या लिंकवर तुम्हाला ह्या बद्दल अजून माहिती मिळेल - http://www.nasa.gov/mission_pages/sunearth/news/classify-flares.html

http://www.nasa.gov/mission_pages/sunearth/news/News012312-M8.7.html

विकिपीडिया माहितीचा दुवा - http://en.wikipedia.org/wiki/Solar_flare

सर्व फोटो साभार सीएनएन आणि नासा

- सुझे !!

विज्ञानसंदर्भमाहिती

प्रतिक्रिया

पारा's picture

25 Jan 2012 - 5:36 pm | पारा

पृथ्वीच्या २०१२ सालच्या सर्वानाशाबद्दल हे ही एक भाकीत वर्तवण्यात आलं होतं, किंबहुना असे आधी झाले आहे आणि आपण आधी ह्याचा सामना केला आहे हे ऐकून बरं वाटलं.

तसे पाहता आपण दिवसेंदिवस wireless होत चाललो आहोत आणि अश्या विद्युत-चुंबकीय लहरींचा अतिशयच वापर करू लागलो आहोत. दुर्दैवाने अश्या काही कारणाने उपग्रह किंवा संदेशवहन यंत्रणा बंद झाल्या तर काय? हा विचारही अंगावर काटा आणतो आताशा !

संपूर्ण वैश्विक पसाऱ्यात आपण किती छोटे ह्याची अजून एकदा आठवण करून दिली एका फोटोने.
असो, माहितीपूर्ण लेख.

धन्यवाद !

आताच तुझ्या ब्लॉगवर हे वाचत होतो.
विंटरेस्टींग आहे.

मी-सौरभ's picture

25 Jan 2012 - 6:46 pm | मी-सौरभ

विंटरेस्टींग आहे.

सहमत

दादा कोंडके's picture

25 Jan 2012 - 7:23 pm | दादा कोंडके

"नोईंग" सिनेमाची आठवण झाली. त्यात सोलार फ्लेअर्स मुळे पृथ्वीचा विनाश झालेला दाखवलाय. सेफ्टी सिस्टीम्स ईले़ट्रॉनिक असल्यावर काय काय होउ शकतं याची कल्पनाही करवत नाही.

आजच सकाळी मला ढगात तांबड्या रंगाच्या छ्टा दिसल्या होत्या. सुर्योदयाचावेळी दिसतात त्या पेक्षा निश्चितच वेगळ्या होत्या. बहुतेक त्याचाच परिणाम असावा.

तिमा's picture

25 Jan 2012 - 8:21 pm | तिमा

कॉलिंग अदिती, शास्त्रशुद्ध स्पष्टीकरण व प्रतिक्रियेसाठी.
लेख आवडला. वर दिलेली माहितीही चांगलीच आहे. त्याबद्दल धन्यवाद.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Jan 2012 - 10:19 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

धाग्यातही सर्वसामान्यांना समजेल अशी माहिती चांगल्या प्रकारे दिलेली आहे.

"सोलर मॅक्झिमा" अपेक्षेपेक्षा थोडा उशीराने का होईना आलेला आहे. सध्या सूर्याबद्दल एक मालिका लिहीत आहे. शक्यतोवर याच आठवड्यात तिसरा भागही टाकते, ज्यात अशा सर्व घटनांबद्दल सविस्तर लिहीते आहे. हा सर्व सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा प्रताप. पहिले दोन भाग इथे वाचता येतील. भाग -१ , भाग २.

हल्ली आठवड्यातून एकदातरी आमच्या लोकल चॅनलचा वेधशाळावाला ऑरोराचा फोटो दाखवतो. याच आठवड्यात धाग्यात टाकलेला शेवटचा फोटो दाखवला; तोच ऑरोरा. aurora एवढा 'इमेज सर्च' केला तरी हा काय सुंदर प्रकार असेल याची कल्पना येईल. ही सर्व सूर्याचीच कृपा.

दादा कोंडके: साध्या डोळ्यांनी हा प्रकार दिसणं कठीण आहे. खग्रास ग्रहणात, प्रत्यक्ष खग्रास स्थिती असतानामात्र साध्या डोळ्यांनी अशा प्रचंड कमानी, स्फोट दिसू शकतात.

फेसबुकावरही स्पष्टीकरणासकट या व्हीडीओची पॉप्युलॅरिटी पाहून मोगँबो खुष हुआ।

सुहास झेले's picture

26 Jan 2012 - 12:31 pm | सुहास झेले

अदिती,

दोन्ही भाग वाचले. एकदम मुद्देसूद आणि माहितीपूर्ण लेख. खूप आवडले. पुढल्या भागाच्या प्रतीक्षेत !!

:) :)

गणपा's picture

26 Jan 2012 - 12:49 pm | गणपा

अगदी असेच म्हणतो.
शाळासोडल्यावर या विषयावर प्रथमच इतक चांगल वाचलं.
दुव्यां बद्दल धन्यवाद अदिती.

पाषाणभेद's picture

26 Jan 2012 - 4:02 pm | पाषाणभेद

हे aurora पाहण्याच्या वेळा काय आहेत? सकाळी की संध्याकाळी? मोकळ्या जागी चांगले दिसतील की शहरातदेखील दिसू शकतील?

पैसा's picture

25 Jan 2012 - 8:35 pm | पैसा

चांगली माहिती आणि फोटो. याचा निश्चित परिणाम माहिती नाही तोपर्यंत "वेट अ‍ॅण्ड वॉच!" उगीच लोकांमधे गोंधळ पसरवून देण्यात काही अर्थ नाही. आपल्याकडे तर लोक अष्टग्रही आणि इतर कशालाही घाबरतात. या लेखासारखी डिटेल माहिती सर्वांपर्यंत पोचलीच पाहिजे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jan 2012 - 11:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुझे, माहितीपूर्ण लेखाबद्दल धन्स रे........!!!

सोलार स्टॉर्म/सोलार फ्लेअरच्या उर्फ सूर्यावरील वादळाचा काळ कंच्या तारखेपासून ते कंच्या तारखेपर्यंत (पुढचे ७-८ दिवस म्हणजे केव्हा पासून)असा काही अंदाज-बिंदाज ?

बादवे, डिस्कव्हरीवर सोलार शिष्टीमवर दुपारच्या वेळेस एक चांगला कार्यक्रम असतो. सर्वच कळत नाही, पण या अजब सृष्टीत आपण किती छाटछुट आहोत हे समजून घेता येते.

-दिलीप बिरुटे
(सावध)

सुहास झेले's picture

26 Jan 2012 - 12:38 pm | सुहास झेले

सर, हे सोलार फ्लेअर २४ तारखेपासून सुरु झाले सूर्यावर. त्यामुळे त्याचा प्रभाव २५ जानेवारी ते ३-४ फेब्रुवारीपर्यंत राहील. काही अपडेट्स मिळाले नासाचे कंपनीकडून तर नक्की सांगेन, तूर्तास इतकीच माहिती आहे :)

परिकथेतील राजकुमार's picture

26 Jan 2012 - 2:01 pm | परिकथेतील राजकुमार

सकाळीच ह्याबद्दल वाचले होते.
एका दैनिकात 'सूरज पे आया त्सुनामी' हे वाचून मात्र पुढे अधिक वाचणेच थांबवले.

गणपा's picture

26 Jan 2012 - 2:05 pm | गणपा

=)) =))
कहर

५० फक्त's picture

26 Jan 2012 - 7:22 pm | ५० फक्त

ही माहिती जबरदस्तच, तसेच आदितीचे दोन्ही धागे पण खुप माहितीपुर्ण, आदितीतै इथं सुद्धा प्रसिद्ध करा ना ती माहिती.