मिपाकर मित्रमंडळींनो,
`आपला अभिजित` नावाने मिपावर वावरणारा त्रस्त समंध गेले काही दिवस, काही महिने कुठे गायब झाला, असा प्रश्न आपणांस पडला असणे साहजिक आहे. अर्थात, हा आपला माझा समज. `तुझ्यावाचून मिपा ओस पडलंय रे बाबा, कधी परततोयंस` अशी आर्त साद मला कुणी खव किंवा टपाल हापिसातून घातलेली नाही. मिपावर एकाहून एक सरस आणि सुरस लेखकु असताना अस्मादिकांची विशेष दखल घ्यावी असे नाही. तरीही अस्मादिक कुठे होते, आणि सध्या काय करतायंत, हे सांगण्याचा हा आगाऊ प्रयत्न.
गेले काही दिवस खाजवायला फुरसत नाहीये. मिपावर तर फिरकलो नव्हतोच, पण ब्लाॅगलाही गंज चढलाय. गुंतलोय एका वेगळ्या माध्यमात. टीव्ही सिरियलच्या लिखाणात. एका प्रसिद्ध मालिकेसाठी काही महिने संवादलेखनासाठी साहाय्य करत होतो, आता माझ्या नावे एक स्वतंत्र मालिका प्रसारित होऊ लागली आहे. स्टार प्रवाह वरची `दोन किनारे दोघी आपण.` (संध्याकाळी ७, रात्री १०,३० आणि सकाळी ११.३०.) पटकथालेखिका आहेत अपर्णा पाडगावकर आणि संवाद मी लिहितो.
गेले काही महिने, वर्षं अभिजित पेंढारकर नावाच्या माझ्या संगीतकार नावबंधूने माझं जिणं हराम केलंय. लोक किती मूर्ख, नादान आणि अकलेचे खंदक असतात, हे या नावबंधूमुळेच मला कळलं. `तुमचा मुलगा सिरियलमध्ये काम करतो का हो, गुंतता हृदय हे मध्ये नाव येतं, ते तुम्हीच का,` अशा उथळ, बिनबुडाच्या आणि बाष्कळ प्रश्नांनी हैराण झालो होतो. अरे डोळेफुटक्यांनो, तुम्हाला देवानं जी पंचेंद्रियं, ज्ञानेंद्रियं दिल्येत, त्यांच्यावरची धूळ झटकून कधीतरी ती वापरात आणा ना, असं कळवळून सांगावंसं वाटायचं. पार्श्वसंगीत - अभिजीत पेंढारकर, असं ढळढळीत अक्षरात लिहिलेलं तुम्हाला वाचता येत नाही का रे नतद्रष्टांनो, असं विचारायचं तोंडावर यायचं. पण कमावलेल्या सभ्यतेशी प्रामाणिक राहून मी गप्प राहायचो.
आता मात्र कुणी विचारलं, की `दोन किनारे दोघी आपण`चा संवादलेखक तूच का रे बाबा, तर मी छाती पुढे काढून सांगू शकतो...हो, तो मात्र मीच!!
प्रतिक्रिया
11 Jan 2012 - 1:20 pm | मराठी_माणूस
नविन उपक्रमास शुभेच्छा.
बाकी नावबंधुंच्या घोटाळ्यासाठी ईतके नाराज व्हयचे कारण कळले नाही
11 Jan 2012 - 1:38 pm | मन१
कार्यारंभास शुभेच्छा.
11 Jan 2012 - 2:48 pm | आचारी
पण मालिका एकदम बकवास आहे .............. या लोका॑ना नेमका काय स॑देश द्यायचा असतो या मालिका॑मधुन????? टायटल आणि मालिका या मध्ये सुतराम स॑ब॑ध नसतो .............. कोण तो वेडा मुलगा आणि त्याला बर॑ करायला निघालेली त्याची बायको काहि तरी स॑ब॑ध आहे का? फालतु पणा आहे .............आणि जन सामान्यात यातुन कोणता चा॑गला स॑देश जातो?
11 Jan 2012 - 4:31 pm | किचेन
मालिकेत सुरुवातीपासूनच (अगदी नावापासून) गोंधळ आहे.बर त्या तनयाला जरा चपला आणि थोडीशी तरी अक्कल द्या हो.आपला नवरा वेडा आहे,आपण स्वतः नाही हे जरा सांगा तिला.वेड्या नवर्याने उन्हात उभ राहायला सांगितलं कि हि लगेच उभ राहते.काय हे? तुम्हाला मालिकेसाठी सावाद्लेखनाची एवढी छान संधी मिळालीये.त्याबद्दल अभिनंदन.पण पूर्वापार चालत आलेला गोंधळाचा वारसा तुम्ही पुढे नेऊ नका.आणि मी तशी हि मालिका बघत नाही..पण घरी इतर बघतात.कधी कधी काही भाग डोळ्यासमोरून गेलेत ते आजीबात आवडले नाहीत.तनयाला तुला बोलता येत याची जाणीव करून द्या.तिच्या नवर्याच्या आईच पण जरा कौन्सलिंग करा.
11 Jan 2012 - 5:54 pm | मी-सौरभ
आमच्या समजूती प्रमाणे हे सगळे बदल सभ्यगृहस्थ असलेले आपले संवाद लेखक त्यांच्या मर्जीने करु शकत नाहीत.
हे सर्व कार्य निर्माते, चॅनेलवाले आणि पटकथा लेखक करतात.
एनी वे: मालिकेसाठी शुभेच्छा!!
(जाहिरात वाचल्या गेली आहे)
11 Jan 2012 - 1:45 pm | पिलीयन रायडर
जे लोक तुम्हाला उत्सुकतेनी , कौतुकानी विचारत होते.. "ते तुम्हीच का??" तेव्हा तुम्हाला लोक उथळ, बिनबुडाच्या आणि बाष्कळ प्रश्नांनी हैराण करणारे आणि डोळेफुटके वाटत होते...
अता तुम्ही काही तरी लिहिताय तर तेच लोक जेव्हा हाच प्रश्न विचारतील तेव्हा ते खुप हुशार, पंचेंद्रियं, ज्ञानेंद्रियं यावरची धुळ नित्य नियमाने झटकणारे वाटतील ना??
थोड नीट सांगितलं असतं ना तर आम्हाला पण तुमचं कौतुक वाट्लं असतं, की तुम्ही संवादलेखक आहात...
असो....
11 Jan 2012 - 2:26 pm | मृगनयनी
'पिलियन रायडर' यान्च्याशी अंशतः सहमत!!! :|
"थोड नीट सांगितलं असतं ना तर आम्हाला पण तुमचं कौतुक वाट्लं असतं, की तुम्ही संवादलेखक आहात.." हे पटलं......
लोकान्ना काय माहित की ते सन्गीत देणारे 'अभिजीत पेन्ढारकर' तुम्ही नाहीत!!... तुम्ही मिडियावाले... आणि "ते" अभिजीतदेखील ग्लॅमरक्षेत्राशी सम्बन्धित....त्यामुळे नॉर्मली लोकांचा गैरसमज होणे साहजिकच आहे.. पण त्यासाठी त्यांना तुम्ही सभ्यतेच्या मर्यादा पाळून "डोळेफुटक्या" वगैरे....दिलेली येवढी दूषणं "इथे" मान्डणं.... योग्य वाटत नाही....
आणि उलट आता तुमच्या सन्वादलेखनामुळे या गोन्धळात भरही पडू शकते..... ;) ;) ;)
सन्वाद लिहायचात तुम्ही.. आणि चुकुन लोकान्ना वाटायचं.. की "त्या"अभिजीतने लिहिलंय.... ;)
असो.. जोक्स अपार्ट... गुड लक फॉर युअर सिरियल!!!
11 Jan 2012 - 2:04 pm | स्वातीविशु
जाहिरात.....जाहिरात.......जाहिरात..........
11 Jan 2012 - 2:08 pm | प्रचेतस
संवादलेखनास शुभेच्छा.
11 Jan 2012 - 2:17 pm | इष्टुर फाकडा
या लेखाचे प्रयोजनच कळले नाही. निव्वळ जाहिरात असेल तर ती होण्याची सुतराम शक्यता नाही असेच वाटते !
12 Jan 2012 - 2:06 pm | विश्वनाथ मेहेंदळे
आपल्या अचीवमेंटस इतरांना सांगावे असे सगळ्यांना वाटते. त्यांच्या क्षेत्रात त्यांना बराच मोठा ब्रेक मिळाला आहे. त्यामुळे त्यांना ही गोष्ट आपल्याला सांगावीशी वाटली, त्यात न कळण्यासारखे काय आहे?
अभिजित भाऊ, अभिनंदन !!!
इथे एक निरीक्षण नोंदवतो (तशी सवय आहे मला ), स्वतःच्या अशा अचीवमेंटस स्वतः मिपावर लिहिल्या तर लोकांना आवडत नाहीत. त्यापेक्षा मित्राला (किंवा डु आयडी ;-) ) सांगून त्याने लिहिल्या तर सगळे अभिनंदन करायला धावतात. किंवा तुम्ही इथे जरा जुने असला आणि तुमचा कंपू (मित्रमंडळ) असेल तर त्यातील लोक अशा वेळेला अभिनंदन करतात मग इतर पण करतात.
थोडक्यात, पुढील वेळे सोहम न म्हणता सो...यं* असा धागा येऊ देत. ;-)
* प्रास/सूड/इतर संस्कृत जाणकार, शब्द बरोबर आहे का ??
12 Jan 2012 - 2:26 pm | प्रास
विमेकाकांशी तंतोतंत सहमत.
अगदी अगदी, फक्त तो सोSयं सोSयं असावा. तसाही हा धागा सोSहं सोSहं असणं अपेक्षित होतंच..... ;-)
12 Jan 2012 - 3:14 pm | विश्वनाथ मेहेंदळे
मी आधी लिहिलेला अवग्रह पुसून तिथे तीन टिंब टाकली. म्हटले मूळ शीर्षकाशी प्रामाणिक राहू. त्या भानगडीत व्याकरणाशी प्रतारणा झाली ती गोष्ट वेगळी.
पण आता मोनोगॅमी मिथ आहे असा निष्कर्ष मराठमोळा काकांनी काढल्याने प्रतारणा करण्यासाठी आपण मोकळे आहोत असे समजून शीर्षकाशी घरोबा केला ;-)
12 Jan 2012 - 3:34 pm | प्रास
आता याच्याशी रुपयातले सोळा आणे सहमत.....
13 Jan 2012 - 3:45 pm | इष्टुर फाकडा
बरोबर आहे तुमचं, पण एकुणात जो सूर लावला आहे लेखात तो 'मला बघा' असा वाटला आणि असले काही मिपा वर आधी पहिले नसल्यामुळे वेगळे वाटले येवढंच.
शिवाय त्यांचे बाकीचे काही लिखाण (जे मी आधी बघायला हवे होते...) पाहण्यात नसल्याने हा लेख वेगळ्या एन्गल ने डोळ्यात भरला.
13 Jan 2012 - 6:08 pm | विश्वनाथ मेहेंदळे
मलाही फारशी कल्पना नव्हती, पण आपला अभिजीत यांनी बरेच आणि चांगले लिखाण केले आहे. सध्या त्यांचेच जुने जुने लिखाण उकरून वाचतो आहे. (हा या धाग्यामुळे मला झालेला फायदा) चांगले लिहिले आहे. गेले बरेच महिने ते लो प्रोफाईल असल्याने नाव वाचताक्षणी अंदाज नाही आला.
असो, टीका करणारे आणि स्तुती करणारे विचार करूनच करतात असे नाही. "गतानुगतिका: लोका:" या प्रमाणे बरेचसे चालते. :-)
16 Jan 2012 - 9:30 am | नगरीनिरंजन
सहमत आहे. अचूक निरीक्षण.
विमेकाकांनी "मराठी संस्थळाचे मानसशास्त्र" अशी लेखमाला लिहावी असे नम्रपणे सुचवतो.
11 Jan 2012 - 2:19 pm | गणपा
अभिनंदन रे आपल्या माणसा. :)
11 Jan 2012 - 2:21 pm | पियुशा
अभिनंदन !
अन शुभेच्छा :)
11 Jan 2012 - 2:24 pm | स्वाती दिनेश
अभिनंदन आणि शुभेच्छा अभिजित.
स्वाती
11 Jan 2012 - 2:39 pm | विसुनाना
अभिनंदन आणि यापुढील वाटचालीस शुभेच्छा.
(नावातल्या सारखेपणामुळे समजुतीचे घोटाळे होतात. त्याबद्दल 'मायबाप' रसिकांवर अभिनिवेषयुक्त शाब्दिक प्रहार होऊ नयेत.)
11 Jan 2012 - 2:55 pm | गणपा
विसुनानांच्या कंसातल्या वाक्याशी सहमत.
11 Jan 2012 - 2:53 pm | दिपक
अभिजीतदा, तुझ्या नविन कार्यास शुभेच्छा. वेळ काढुन मिपावर लिहित रहा.
11 Jan 2012 - 4:40 pm | प्यारे१
स्टार प्रवाह वरची `दोन किनारे दोघी आपण.`
(संध्याकाळी ७, रात्री १०,३० आणि सकाळी ११.३०.)
पटकथालेखिका : अपर्णा पाडगावकर
संवाद : आपला अभिजित.
विषय संपला. ;)
©º°¨¨°º© प्यारे ©º°¨¨°º©
आमचे राज्य नाही.
Only Monkeys Have Red ****s ...
11 Jan 2012 - 5:11 pm | धन्या
>> लोक किती मूर्ख, नादान आणि अकलेचे खंदक असतात, हे या नावबंधूमुळेच मला कळलं.
>> अरे डोळेफुटक्यांनो, तुम्हाला देवानं जी पंचेंद्रियं, ज्ञानेंद्रियं दिल्येत, त्यांच्यावरची धूळ झटकून कधीतरी ती वापरात आणा ना, असं कळवळून सांगावंसं वाटायचं. पार्श्वसंगीत - अभिजीत पेंढारकर, असं ढळढळीत अक्षरात लिहिलेलं तुम्हाला वाचता येत नाही का रे नतद्रष्टांनो, असं विचारायचं तोंडावर यायचं.
>>>>पण कमावलेल्या सभ्यतेशी प्रामाणिक राहून मी गप्प राहायचो.
आधीच्या दोन वाक्यांचा विचार करता तिसरं वाक्य तुम्हाला तरी पटतं का?
आता कळले, मालिकांचा जो रतिब चालू असतो त्या मालिका इतक्या फालतू का असतात ते.
हा धागा तुम्ही केवळ त्या कुठल्या मालिकेचेसंवाद लेखक आहात याची जाहीरात करण्यासाठी काढला आहे. :)
असो, आमच्या शुभेच्छा !!!
11 Jan 2012 - 6:22 pm | योगी९००
नमस्कार आभिजित..
पहिले प्रथम तुमचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा...
आजकालच्या जगात आपण काय काम करतो हे सांगणे आवश्यक आहे त्यामुळे जरी ह्या लेखाचा उद्देश जाहिरात असला तरी हरकत नाही. त्यामुळेच तर मला कळले की तुम्ही संवादलेखन पण करू शकता..एक गोष्ट नक्की की मी ती मालिका तुमच्यासाठी का होईना पण बघेन जरूर...
पण हा लेख नाही आवडला.... कारण तुम्ही लिहीलेल्या "अरे डोळेफुटक्यांन..." वगैरे वगैरे मुळे.. ..पण आतापर्यंतचे तुमचे बहुतेक लिखाण मला आवडले होते.. (टाळण्याची कला, वेळेचे महत्व आणि बाकी बरेच..) तुमच्या सर्व लिखाण..अशी 'ग' ची बाधा दिसली नव्हती...(थोडे स्पष्टच लिहीले आहे)..लोकांचा असा गैरसमज होणे साहजिकच आहे...त्यामुळे तुमची फुकट प्रसिद्धी होते आहे हे विसरू नका...कदाचित संगीतकार अभिजित यांना संवाद लेखन तुम्हीच करता काय असेही लोक विचारत असतील...
11 Jan 2012 - 7:23 pm | गवि
चालू सिरियल्स पाहता त्यातील एकीचे संवाद आपण लिहितो हे चारचौघांत कबूल करणं मोठं धाडसाचं काम आहे.
त्याबद्दल कौतुक.
ही फ़क्त सुरुवात आहे. बहुतेकवेळा नाईलाजाने दुस-याच्या कथेवर मीटरप्रमाणे बाय ऑर्डर संवादलेखनाचा रतीब घालण्याने करियर सुरु करावी आणि चालू ठेवावी लागते.
पण पुढे प्रस्थापित झाल्यावर काहीतरी विलक्षण वेगळं आमच्यासमोर आणाल अशी आशा ठेवून आहे.
All the best..
11 Jan 2012 - 8:14 pm | सोत्रि
एक नंबर प्रतिसाद!
- ('गवि'पंखा) सोकाजी
11 Jan 2012 - 8:45 pm | रेवती
आम्हाला टिव्ही बघण्याची वेळ सुदैवाने येत नाही.
सुदैवानेच म्हणावे लागेल अश्या मालिका चालू असतात असे ऐकिवात आहे.
तुम्ही संवाद लेखक आहात हे समजल्याने मालिका तयार होतानाच्या पायर्या सांगू शकाल काय.
कथेचा विचार झाल्यापासून ते पडद्यावर येईपर्यंत टिमला काय काय सोसावे लागते?
नंतरचे सोसणे प्रेक्षक करतात असे ऐकून आहे. ;)
दर्जा असा का झाला? आपले मत जाणून घेण्याची इच्छा आहे.
तुम्ही केलेल्या संवाद लेखनात पडद्यावर येईपर्यंत बदल होत जातात काय?
तसे असेल तर उगीच लेखकाला प्रेक्षकांनी नावे का ठेवावीत?
एकंदरीतच तुमची प्रगती वाचून भारी वाटलं.
11 Jan 2012 - 8:51 pm | पैसा
एका सीरीयलचं संवादलेखनाचं काम करताय त्यासाठी अभिनंदन. पण तुमच्या नावाचा दुसरा कोणी जास्त प्रसिद्ध आहे म्हणून तुम्हाला वैषम्य वाटतंय का? स्पष्ट विचारते म्हणून रागवू नका. तुम्हाला जर काही करून दाखवायचं असेल तर कोणाला शिव्या देण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष केन्द्रित करा.
11 Jan 2012 - 9:16 pm | सूड
दोघींना दोन किनार्यांवर ठेवण्यास वापरायच्या भाषेची सावली या लिखाणावर पडल्या सारखं वाटलं.
11 Jan 2012 - 9:22 pm | गणेशा
शुभेच्छा !
मात्र लिखानातुन जसा गर्व जाणवतो आहे तसा पुढे न जाणवता एक अभिमानास्पद वाटचाल होत रहावी अशी इच्छा !
11 Jan 2012 - 10:51 pm | निवेदिता-ताई
अभिनंदन आणि शुभेच्छा अभिजित.
11 Jan 2012 - 11:33 pm | कवितानागेश
अय्या,
माझं जिणं हराम केलंय, मूर्ख, नादान आणि अकलेचे खंदक, उथळ, बिनबुडाच्या आणि बाष्कळ प्रश्नांनी हैराण झालो, डोळेफुटक्यांनो, तुम्हाला देवानं जी पंचेंद्रियं, ज्ञानेंद्रियं दिल्येत, त्यांच्यावरची धूळ झटकून कधीतरी ती वापरात आणा ना, नाही का रे नतद्रष्टांनो,
असे सगळे संवाद लिहिणार तुम्ही?
:)
शुभेच्छा!
12 Jan 2012 - 12:08 am | पाषाणभेद
दोन किनार्यांवरून मौजमजेत नाव हाकलणारा नावाडी एकच आहे काय? लगे हात थोडक्यात मालिकेचे कथानकही सांगून टाका कारण माझ्या घरी टिव्ही नाहिये. (मी कुण्णा कुण्णाला सांगणार नाही कथानक मग तर झालं. बाकी लिहीत रहा.)
12 Jan 2012 - 7:59 am | स्पा
सर्वच प्रतिसाद जबराट
मिपाकरांच्या "ट्येम्प्युत" बसवण्याच्या कलेचा साला आपण फ्यान हौत
अवांतर : हल्लीच्या सर्व झ , ट दर्जाच्या मालिका पहायचे घरातील सर्वानीच बंद केल्याने, लेखाविषयी "णो comments " !!
12 Jan 2012 - 8:11 am | ५० फक्त
जाहिरातीवर जास्त काय प्रतिसाद देणार, +१०० टु गवि, योगी ९०० आणि पैसातै.
12 Jan 2012 - 8:33 am | स्पा
आम्हाला द्या कि +१०० :P
आम्हाला बी आवडते ४ लोकांनी वाहवा केलेली
12 Jan 2012 - 8:41 am | प्रचेतस
वाहव्वा वाहव्वा.
अजून ३ जणं या रे आता इकडं.
12 Jan 2012 - 11:36 am | मिसळलेला काव्यप्रेमी
वाहव्वा वाहव्वा.
अजून २ जणं या रे आता इकडं.
12 Jan 2012 - 11:42 am | प्यारे१
वाहव्वा वाहव्वा.
अजून १ जण या रे आता इकडं.
12 Jan 2012 - 11:47 am | गवि
आलो आलो.. स्पावड्या.. वाहवा.. तुझ्याशी १००% सहमत..
(आता खाली ब्लू कोरलात दुपारी चारच्या सुमारास मिसळ घाल मला.. )
12 Jan 2012 - 11:55 am | मी-सौरभ
वाहवा
वाहवा
वाहवा
वाहवा
वाहवा
12 Jan 2012 - 1:14 pm | सूड
वाहवा वाहवा !!
स्वगत : काय दिवस आलेत माताय, स्पाची वाहवा करतोय. ;)
12 Jan 2012 - 1:39 pm | प्यारे१
अरे ते 'स्पावड्या हुबा र्हायला ,आमी नाय पायला' सुरु आहे.
त्याचं काय्ये, लहान मुलांची वाढ कौतुकानं 'जास्त' होते असं म्हणतात. ;)
12 Jan 2012 - 7:21 pm | ५० फक्त
पण लहान मुलं ' जास्त' कौतुकानं गुळाचा गणपती बनतात असं ऐकलं आहे.
12 Jan 2012 - 11:52 am | स्पा
सर्वांचे मनापासून आभार
डोळे पाणावले =))
12 Jan 2012 - 11:56 am | प्रचेतस
पण मिसळीचं काहीच बोलत नाही, बघा कसा बेरकी आहे ठाकुर्लीचा बोका. ;)
12 Jan 2012 - 12:00 pm | किसन शिंदे
'आपल्या' अभिजित साहेबांची एवढी चांगली जाहिरात वाचायची सोडून काय अवांतरपणा चालवलाय रे. ;)
12 Jan 2012 - 5:39 pm | मालोजीराव
मी प्रतिक्रिया देईपर्यंत १४५८ वाचने झालेली...म्हणजे तशी पुरेशी जाहिरात झालीये !
;)
12 Jan 2012 - 11:59 am | प्यारे१
>>>डोळे पाणावले
डोळे जातील भा* अशानं.
सारखे सारखे (इथे 'चान चान' शब्द सुचले होते पण सगळेच * झाले असते) बरे पाणावतात रे? ग्लिसरीनच्या गोडावूनचा रक्षक आहेस का? :)
12 Jan 2012 - 12:13 pm | स्पा
भा. सं.
नि
ताकीद
दिल्याने
अवांतर
टाळत
आहे
;)
12 Jan 2012 - 12:15 pm | मराठमोळा
आयला,
हा धागा पाहिलाच नव्हता. :)
अॅनी पब्लीसिटी इज गुड पब्लीसिटी - या राजकारणी वृत्तीतून हा लेख लिहिला आहे असं वाटलं. ;)
>>गेले काही दिवस खाजवायला फुरसत नाहीये.
मग गेल्या काही दिवसातलं एकदमच खाजवून घेतलेलं दिसतय.
>>लोक किती मूर्ख, नादान आणि अकलेचे खंदक असतात
वरील प्रतिसादातून हा गैरसमज दूर झाला असावा.
>>आता मात्र कुणी विचारलं, की `दोन किनारे दोघी आपण`चा संवादलेखक तूच का रे बाबा, तर मी छाती पुढे काढून सांगू शकतो...हो, तो मात्र मीच!!
हो संगितल्यावर कुणी मारण्याचा किंवा खून करण्याचा प्रयत्न केला का?
असो..
टीवी मालिकांमधे काडीचाही रस नसल्याने पुढील लेखनास शुभेच्छा..
12 Jan 2012 - 1:20 pm | सुहास..
अभिदा आधी चेपु वर शुभेच्छा दिल्याच आहेत ,
या लेखावर काय बोलु ?
तुझ लिखाण नेहमीच आवडत आले आहे . सिरियल बाबत मात्र अनुत्सुकता असलेली तुला माहीत आहेच :)
12 Jan 2012 - 5:22 pm | आपला अभिजित
`मी एका सिरियलचे संवाद लिहितोय रे बाबांनो` (`माझं कुठेतरी दुकान सुरू झालंय` या चालीवर वाचावे.) एवढा साधा संदेश देण्यासाठी हा धागा टाकला होता. त्यावर तब्बल ४९ हाकारे (प्रतिसाद) आलेले पाहून अक्षरशः भडभडून आलं. आत्ता डोळे पुसत ही प्रतिक्रिया देतोय. असो.
साधी गोष्ट असली, तरी साधेपणानं का सांगावी, या मूळच्या खवचट कोकणी प्रवृत्तीला जागून थोडंसं शैलीदार (डोंबल!) लिहिण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून ब-याच जणांच्या भावना दुखावलेल्या दिसतात. बाकी भावनांचा खेळ असलेल्या एखाद्या मालिकेत संधी मिळाल्याची माहिती देतानाच लोकांच्या भावना दुखाव्यात, हा समसमा संयोग!!
असो. माझा धागा नीट वाचला असेल, तर हे सहज लक्षात येईल, की मी दुस-यांना दूषणं देण्याआधी स्वतःलाच त्रस्त समंध वगैरे म्हणून घेतलंय. एकदा स्वतःला शिव्या दिल्या, की मग जगाची अक्कल काढायला आपण मोकळे, हा आपला माझा एक (गैर)मसज. तर (तेही) असो. आक्षेप दुस-या कुणी अभिजीत पेंढारकराने संगीत-पार्श्वसंगीत देण्याला, मालिकांच्याच माध्यमात असण्याला नव्हता, तर लोकांच्या बालबुद्धीला होता. `संगीतकार अभिजित पेंढारकर तूच का रे,` असं कुणी विचारलं असतं, तर खुलासे करायला माझी काहीच हरकत नव्हती, नाहीये. पण `पार्श्वसंगीत, संगीत - अभिजीत पेंढारकर` असं ढळढळीत अक्षरांत लिहिलेलं असताना ते न वाचताच तू अमक्या मालिकेसाठी लिहितोस का, तमक्या मालिकेसाठी लिहितोस का, असं विचारणा-या लोकांच्या डोळे झाकून काम करण्याला आक्षेप होता आणि असेल.
हे म्हणजे `सोम्या गोम्या कापसे` असं नाव सांगितल्यानंतर `आम्ही लहान असताना आमच्या गावात गोम्या कापसे नावाचा एक बेवडा होता. तू त्याचाच मुलगा का रे,` असं विचारण्यापैकी आहे. अजूनही मी मालिकेसाठी लिहितो, असं म्हटल्यावर अच्छा अच्छा...अरे हो की. (माझा दुरान्वयेही संबंध नसलेल्या आणि कदाचित माझ्या नावबंधूने संगीत दिलेल्या) तमक्या मालिकेत तुझं नाव वाचलंय, असं सांगणारे महाभागही थोडे नाहीत. त्यांच्यापुढे नतमस्तक होण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही...तर हेही असोच.
बाकी, मी माजलोय, गर्व चढलाय, मस्ती आलेय, वगैरेसुद्धा काहींनी इथे आडून आडून किंवा थेट सुचवलंय. तर मी हवेत गेलेलो नाही, असं नम्रपणे सांगू इच्छितो रे बाबांनो. बाकी अधिक माहिती ज्यांना हवी असेल, त्यांनी वैयक्तिक संपर्क साधावा, ही (पुन्हा एकदा!) नम्र विनंती!!
12 Jan 2012 - 6:44 pm | योगी९००
खुलासा थोडाफार पटला मला...
पण मूर्ख, नादान आणि अकलेचे खंदक असल्या शब्दांऐवजी "काही जण केवढे बावळट असतात...(किंवा लोकं वेडेपणा करून असे काहीही विचारतात)...असे लिहिले असते तर कदाचित कोणालाच इतके काही वाटले नसते...
बाकी आधीच्या १० प्रतिक्रिया वाचल्या की सर्वसाधारण लोकांचे पण मत साधारण त्या १० प्रतिक्रियांप्रमाणेच होते..हा माझा अनुभव आहे..बर्याच जणांना तुमचा लेख वाचून "माजलोय, गर्व चढलाय, मस्ती आलेय," असे वाटले नसेन पण खालच्या प्रतिक्रियावाचून मात्र तसे नक्की वाटेल...(जसे मला वाटले..)
12 Jan 2012 - 9:19 pm | मराठी_माणूस
खुलासा पटला नाही.
संगीत देणे हे तसेही चांगल्या दर्जाचे काम आहे. तुम्ही दिलेल्या "बेवड्या" च्या उदाहरणा पेक्षा हजार पटीने चांगले.
12 Jan 2012 - 11:31 pm | रेवती
प्रतिसाद पटला नाही.
13 Jan 2012 - 12:46 am | सुहास..
तर लोकांच्या बालबुद्धीला होता. `संगीतकार अभिजित पेंढारकर तूच का रे,` असं कुणी विचारलं असतं, तर खुलासे करायला माझी काहीच हरकत नव्हती, नाहीये. पण `पार्श्वसंगीत, संगीत - अभिजीत पेंढारकर` असं ढळढळीत अक्षरांत लिहिलेलं असताना ते न वाचताच तू अमक्या मालिकेसाठी लिहितोस का, तमक्या मालिकेसाठी लिहितोस का, असं विचारणा-या लोकांच्या डोळे झाकून काम करण्याला आक्षेप होता आणि असेल. >>>>
हे लई वेळा पटलं रे अभिदा !!
अभिदा च्या, कमी शब्दात, आशय वाचकांपर्यत पोहोचवणार्या लेखनाच्या फॅन
12 Jan 2012 - 6:03 pm | सोनल कर्णिक वायकुळ
मुळ पोस्ट, प्रतिक्रिया आणि त्यावर खुलासा, सगळच गमतीने वाचतेय.
आभिजित, सगळ्यात आधी अभिनन्दन. आणि य निमित्ताने काही आगन्तुक आगाऊ सल्ले.
य क्षेत्रात सध्या भरपुर सन्धी आहे. सिरियल्स चा खच पडलाय सगळिकडे. आणि म्हणुनच वेगळेपण हरवण्याची ही शक्यता तितकिच जास्त आहे. त्याच वेळि वेगळेपण सिद्ध करण्या साठी सुद्धा याहुन चान्गलि वेळ नाही.
सन्वाद लेखनात उतरण्यापुर्वी तु अभ्यास केल असशिलच. पण राहवत नाही म्हणुन सान्गते. प्रतिमा ़उल्कर्णिन्च्या मालिकन्च अभ्यास केलयस क कधि? हिन्दि मधे रवि राय यन्च्या मालिक पाहिल्यास का? नसशिल तर जरुन बघ.
तुझे सन्वद गर्दित हरवु नयेत या साठी शुभेछा.
टायपिन्ग च्या चुका समजुन घेशिलच.
12 Jan 2012 - 6:37 pm | तिमा
सर्वप्रथम अभिनंदन. त्यानंतर थोडे मिपावरील प्रतिक्रियांबद्दल.
मिपावरील बहुतांशी मंडळी बहुश्रुत, जाणकार व स्पष्टवक्ती आहेत. त्यामुळे, तुम्ही हीच बातमी जर वेगळ्या तर्हेने, इतरांवर आगपाखड न करता सांगितली असती तर तुमचे सगळ्यांनी कौतुकच केले असते. तसे ते बर्याचजणांनी केलेही आहे. पण स्पष्टवक्ते मिपाकर कुणालाही चार शब्द सुनवायला मागेपुढे पहात नाहीत. इथे कुठल्याही प्रकारचा ढोंगीपणा नाही. त्यामुळेच तर इथे यायला सर्वांना
आवडते. तुम्ही माझ्यापेक्षा वयाने लहान असाल या समजुतीने हे लिहिले आहे. राग मानू नये.
पुढील करियरसाठी तुम्हाला शुभेच्छा.
12 Jan 2012 - 7:00 pm | अन्या दातार
जेब्बात तिमा. जियो.
12 Jan 2012 - 7:04 pm | आपला अभिजित
मा. माणूसघाणे,
तुम्ही माणुसकीच्या भावनेतून दिलेला सल्ला आवडला.
बाकी समस्त मिपाकरांनो, अरे गमतीनं लिहिलंय बाबांनो. आणि ते कुठल्याही मिपाकरालाही उद्देशून लिहिलेलं नाहीच आहे. हक्कानं शिव्या देतानाही एक आपुलकीचं नातं असावं लागतं. आपल्यात ते टिकून आहे, टिकून राहील.
असो.
12 Jan 2012 - 10:34 pm | धन्या
किती सारवासारव करायची ती. थेंबातून गेलेली हौदातून थोडी ना येते. ;)
14 Jan 2012 - 7:47 am | सूड
. थेंबातून गेलेली हौदातून थोडी ना येते.
+१
अगदी अगदी, जो बूंदी से गयी वो लाडु से नय आती हय ! ;)
16 Jan 2012 - 6:15 am | विश्वनाथ मेहेंदळे
>>थेंबातून गेलेली हौदातून थोडी ना येते.
ते सगळे ठीक आहे, पण वरील वाक्य कुठल्या भाषेत लिहिले आहे म्हणायचे ???
13 Jan 2012 - 4:14 pm | श्यामल
किती सारवासारव करायची ती. थेंबातून गेलेली हौदातून थोडी ना येते. >>> अगदी हेच लिहायला आले होते....... मी मुळ पोस्ट आणि त्यावरील प्रतिक्रिया आणि आताची तुमची सारवासारव वाचली. आणि मलाही असेच वाटले की अभिजित, तुम्हारा थोडा चुक्याच. पण तरीही आताच्या यशाकरीता तुमचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा अभिजित.
13 Jan 2012 - 6:23 pm | विजुभाऊ
माझे नाव आडनाव आणि जगातील एका सर्वात मोठ्या हीरेव्यापार्याचे नाव आडनाव देखील सारखेच आहे.
मला कसे कोणी अजून हीर्याची डिलेव्हरी दिली नाही ? ;)
13 Jan 2012 - 9:01 pm | मृगनयनी
येक्कद्दम चोक्कस्स!... विज्जूभाय!!!! :)
तुम्ही फिल्म 'इन्डस्त्री' मध्ये "भरत शहा" या नावाने पण विडम्बित आहात कं!! ;) ;) ;)