राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने 'मराठी संकेतस्थळांची स्पर्धा २०१२' आयोजित करण्यात येत आहे. त्यासंबंधीचे संस्थेचे निवेदन इथे दिले आहे.
--------------------------------------------------------------
संगणकावर मराठीतून माहितीचा देवाणघेवाण करण्याचे प्रमाण वाढले आहे. शासनातील विविध विभागांकडे असणारी माहिती लोकांना सहज उपलब्ध व्हावी ह्यासाठी प्रयत्न होत आहेत. कला, क्रीडा, संस्कृती, विज्ञान, अर्थव्यवहार अशा विविध विषयांवरील माहिती आज मराठीतून संगणकावर उपलब्ध होऊ लागली आहे. ह्या व्यवहाराला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने राज्य मराठी विकास संस्थेने ह्यापूर्वी २००६ आणि २०१० ह्या वर्षात मराठी संकेतस्थळांची स्पर्धा आयोजित केली होती. ह्या स्पर्धांना उत्तम प्रतिसादही लाभला होता. म्हणून ह्या वर्षीही सीडॅक, मुंबई ह्यांच्या सहकार्याने राज्य मराठी विकास संस्था ‘मराठी संकेतस्थळांची स्पर्धा २०१२ ’ ही स्पर्धा आयोजित करत आहे. ही स्पर्धा यंदा तीन गटांत घेण्यात येईल.
१.शासकीय संकेतस्थळे
२. अशासकीय संकेतस्थळे
अ. मराठी वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या ह्यांची संकेतस्थळे
आ. इतर संकेतस्थळे
ह्या स्पर्धेतील पुरस्कार पुढीलप्रमाणे देण्यात येतील.
पहिल्या शासकीय संकेतस्थळे ह्या गटासाठी पहिले, दुसरे,तिसरे, असे अनुक्रमे १५,०००, १०,००० आणि ५,००० रुपयांचे पुरस्कार देण्यात येतील. दुसऱ्या अशासकीय संकेतस्थळे ह्या गटातील अ. मराठी वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या ह्या विभागाला पहिले, दुसरे, तिसरे असे अनुक्रमे १५,०००,१०,००० आणि ५,००० रुपयांचे पुरस्कार देण्यात येतील. तर आ. इतर संकेतस्थळे ह्या विभागाला पहिले, दुसरे, तिसरे असे अनुक्रमे ३५,०००, २०,००० आणि १५,००० रुपयांचे पुरस्कार देण्यात येतील.
दि. ०९/०१/२०१२ पासून दि. ३१/०१/२०१२ पर्यंत http://www.rmvs.maharashtra.gav.in ह्या राज्य मराठी विकास संस्थेच्या संकेतस्थळावर तसेच http://www.cdacmumbai.in ह्या सीडॅक, मुंबई ह्यांच्या संकेतस्थळावर ऑनलाइन प्रवेशपत्रिका उपलब्ध करून देण्यात येईल.
वरील कालावधीत स्पर्धकांनी ऑनलाइन प्रवेशपत्रिका संपूर्ण भरून स्पर्धेतील सहभाग नोंदवायचा आहे.
संकेतस्थळासाठी वापरलेली प्रमाणके (स्टॅण्डडर्स), वापरलेला टंक (फॉण्ट), संकेतस्थळाची तांत्रिक गुणवत्ता, वापरासंबंधी पुरवलेल्या सोयी, उपयुक्तता, अद्ययावतपणा, वापरकर्त्यांना सहभागाची सोय (इण्टर अॅक्टिव्हनेस), माहितीची मांडणी, भाषेचा दर्जा, माहितीचा संग्रह इत्यादी निकषांवरून तज्ज्ञ परीक्षकांकडून सहभागी संकेतस्थळांचे परीक्षण करण्यात येईल.
शासनाचे विविध विभाग तसेच विविध विषयांवर संकेतस्थळे निर्माण करणाऱ्या व्यक्ती, संस्था इत्यादींनी ह्या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन राज्य मराठी विकास संस्थेने केले आहे.
प्रतिक्रिया
9 Jan 2012 - 11:50 am | स्पा
मिसळपावला मनापासून शुभेच्छा !!!!
9 Jan 2012 - 11:55 am | गवि
मिसळपावला स्पर्धेत भाग घ्यायची गरज आहे का?
9 Jan 2012 - 11:57 am | स्पा
मिसळपावला स्पर्धेत भाग घ्यायची गरज आहे का?
संदर्भासहित स्पष्टीकरण द्या (२० गुण )
9 Jan 2012 - 12:01 pm | गवि
ज्यांनी जज्ज पॅनेलवर असायला हवे त्यांनी स्पर्धेत उतरुन कसं चालेल?
स्पष्टीकरण समाप्त.
9 Jan 2012 - 12:04 pm | सुहास झेले
स्पा, पुर्ण मार्क मिळाले नं? :) :) :)
9 Jan 2012 - 12:24 pm | विश्वनाथ मेहेंदळे
हे काही खास पटले नाही. मिपाने व्यर्थ complacency ला बळी पडू नये असे वाटते.
भाग जरूर घ्यावा. जिंकले तर उत्तम, नाही जिंकले तर वांदा नाही.
(जिंकले नाही तर संस्थळ चांगले नाही असे काही नाही, त्या अर्थी वांदा नाही)
9 Jan 2012 - 12:12 pm | स्पा
अजिबात नाही.. अवांतर केल्याबद्दल शून्य मार्क....
हे म्हणजे उगाच स्वतःची लाल केल्यासारखं वाटल... स्पष्ट बोलल्याबद्दल माफी असावी
शासनाचे विविध विभाग तसेच विविध विषयांवर संकेतस्थळे निर्माण करणाऱ्या व्यक्ती, संस्था इत्यादींनी ह्या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन राज्य मराठी विकास संस्थेने केले आहे.
निदान यासाठी तरी.. मिपाने सहभागी व्हायला हव असे वाटते
म्हणजे ज्यांना, हे संस्थळ माहिती नाही.. असे हि लोक इकडे येऊन संस्थळ वाढीस हातभार लागेल
अवांतर : विमे निरीक्षण नोंदवतो आहेस न रे?
9 Jan 2012 - 12:17 pm | गवि
ऐला. एकदम शून्य गुण म्हणजे कचराच..
बरं. सोदाहरण स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. (गुण वाढवण्यासाठी)
शासकीय गायनस्पर्धा आहे.. त्यात लता आशा फारच अद्वितीय म्हणून बाजूला राहूदेत..
इव्हन सुनिधी चौहानने तरी भाग घ्यावा का त्यात ?
तिथे खरोखरच चांगला आवाज असलेल्या प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर यांनीच भाग घ्यायचा.. :)
9 Jan 2012 - 12:23 pm | स्पा
शासकीय गायनस्पर्धा आहे.. त्यात लता आशा फारच अद्वितीय म्हणून बाजूला राहूदेत..
इव्हन सुनिधी चौहानने तरी भाग घ्यावा का त्यात ?
तिथे खरोखरच चांगला आवाज असलेल्या प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर यांनीच भाग घ्यायचा.
तेच म्हणतोय ....
लता आशा = ५० वर्षे अनुभव (गायनाचा)
सुनिधी "चव्हाण " - १० वर्षे अनुभव (गायनाचा???)
प्रथमेश, आर्या - ३ ४ वर्ष
आता कोणाला प्रसिद्धीची * जास्त गरज आहे?
*प्रसिद्धी अर्थातच संस्थळ वाढीसाठी
9 Jan 2012 - 12:30 pm | गवि
ते जे म्हटले आहे ते मिपाभिमानातून कौतुकाने आणि केवळ त्याच मनोभूमिकेतून म्हटले आहे.
त्यात
-मिपाने खरेच स्पर्धेत भाग घेऊ नये.
-मिपाने स्पर्धेचा जज्ज व्हावे.
-मिपा ज्येष्ठ आहे / नाही
अशापैकी काहीही "स्टेटमेंट" नाही. शिवाय मिपाने काय करावे किंवा नाही हे सांगण्याची कोणतीही पात्रता किंवा पद माझ्याकडे नाही. तस्मात मिपाने या स्पर्धेत भाग घेतला तरी आनंदच आहे आणि भाग घेतल्यावर ती जिंकावी याचीही सदैव इच्छा असेलच.. तेव्हा कौतुकापलिकडे त्या म्हणण्यात काही पाहू नये ही विनंती.
9 Jan 2012 - 12:33 pm | स्पा
आता १०० पैकी १०० मार्क :)
9 Jan 2012 - 12:37 pm | सुहास झेले
:) :)
9 Jan 2012 - 1:08 pm | अत्रुप्त आत्मा
अता "मस्तानि" ला "मस्तानि"देणार... ;-)
9 Jan 2012 - 1:58 pm | मी-सौरभ
तुलाच या स्पर्धेसाटि परीक्षक करावे म्हंतो ;)
9 Jan 2012 - 2:05 pm | स्पा
=))
ब्वर्र ब्वर्र...
मग मिपालाच पहिलं पारितोषिक मिळेल :D
9 Jan 2012 - 7:22 pm | डावखुरा
एक्पण लिंक न्हाय उघडत भौ..
9 Jan 2012 - 9:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'मराठी संकेतस्थळांची स्पर्धा २०१२' यात मिसळपाव डॉट कॉम ने सहभागी व्हावे असे मला वाटते.
-दिलीप बिरुटे
(शुभेच्छुक)
9 Jan 2012 - 10:10 pm | अत्रुप्त आत्मा
मि.पा.नी या स्पर्धेत सहभागी झालेच पाहिजे >>>
<<< (संयुक्त मिपाराष्ट्र आंदोलक) अत्रुप्त आत्मा :-)
9 Jan 2012 - 11:14 pm | टुकुल
मिपाने नक्कीच भाग घ्यावा.
--टुकुल
10 Jan 2012 - 10:55 am | सुशान्त
पहिला पत्ता लिहिताना एक चूक झाली होती. त्यामुळे त्रास झाला असल्यास क्षमा करावी.
http://rmvs.maharashtra.gov.in/rmvs/?q=home ह्या दुव्यावर स्पर्धेची माहिती पाहावी.
10 Jan 2012 - 12:12 pm | विसोबा खेचर
राज्य मराठी विकास संस्थेला 'सर्वोत्तम कोण' हे ठरवण्याचा अधिकार आहे असं व्यक्तिश: मला वाटत नाही..
मिसळपावने अशा कुठल्याही स्पर्धेत भाग घ्यावा असंही मला वाटत नाही. अर्थात, ही माझी व्यक्तिगत मतं आहेत. मिपाच्या मालकांचा आणि चालकवर्गाचा निर्णय निश्चितच अंतिम असेल..
मिपा सर्वोत्तम होतं, सर्वोत्तम आहे आणि सर्वोत्तम राहील असाच 'मिपा संस्थापक' आणि एक सामान्य मिपाकर म्हणून माझा विश्वास आहे. त्याकरता राज्य मराठी विकास संस्थेच्या प्रमाणपत्राची गरज नाही..!
(मिपा संस्थापक) तात्या.
10 Jan 2012 - 12:49 pm | मन१
वसंत "खां" साहेबांनी रेडिओची गायन का संगीतपरिक्षा अशाच कारणाने दिली नसल्याचे ऐकले आहे. त्याची आठवण झाली.
10 Jan 2012 - 12:38 pm | पियुशा
+१०००००००० टु तात्या :)