जालरंग प्रकाशन दरवर्षी ’शब्दगाऽऽरवा’ हा हिवाळी अंक (e-Publication) प्रकाशित करते. ह्या वर्षीच्या 'शब्दगाऽऽरवा २०११' मध्ये प्रकाशित झालेला माझा एक लेख इथे पुन: प्रकाशित करतो आहे.
माणूस हा किस्सेबाज असतो. त्याला किस्से ऐकायला, सांगायला फार आवडते. अरे हो, पण ते किस्से झाल्याशिवाय कसे ऐकणार, सांगणार? मग ते किस्से करणे हेही त्याचे आवडते काम बनले. असंख्य किस्से आपल्या आजूबाजूला घडत असतात. काही किस्से आपण घडताना प्रत्यक्ष पाहतो. तर बरेचसे ऐकीव असतात. मी आज तुम्हाला काही किस्से सांगणार आहे, दारू किस्से. सगळे मी प्रत्यक्ष अनुभवलेले तर काही मी स्वतः केलेले. पण हे सगळे किस्से घडतात अजाणतेपणी. कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी त्याची पूर्ण माहिती करून घेणे किती आवश्यक असते हे कळेल हे किस्से वाचून. चला तर मग बघूयात काही दारू किस्से...
एकदा मी गावी गेलो होतो. माझ्या मामाचा मित्र मला त्याच्या घरी घेऊन गेला. माझ्याकडे परदेशी दारूच्या बाटल्या असतात ह्याचे त्याला खूप कौतुक होते. घरी नेऊन माझ्यासमोर एक खंबा ठेवला आणि म्हणाला “इंग्लिश आहे, मामाची काळजी करू नको. जेवायची वेळ होते आहे, ताट-पाणी घेताहेत, चल थोडीशी घेऊ”. एवढे बोलून त्याने स्टीलचे दोन ग्लास आणि दोन पाण्याचे तांबे टेबलावर ठेवले. खंबा उघडून दोन्ही स्टीलचे ग्लास अर्धे - अर्धे भरले आणि उरलेल्या जागेत पाणी टाकून ग्लास भरले. एक ग्लास माझ्या हातात देऊन म्हणाला, “चियर्स, विंजीनेरसाहेब”. आणि पुढे काही कळायच्या आत घटाघट तो ग्लास गटकावुन मोकळा झाला. मी आपला एक एक सीप घ्यायला लागलो तर म्हणाला, “अरे उरक लवकर, हे काय मुळूमुळू पितोहेस लहान पोरांनी दुदु प्यायल्यासारखे”. काय बोलावे ह्याचा विचार करेपर्यंत त्याने त्याचा दुसरा ग्लास भरला आणि मला काही समजायच्या आत गट्ट्म करून खाली ठेवला. "काय मटणाचा मस्त वास सुटलाय रे, उरक की लवकर" असे म्हणत तिसरा ग्लास भरला आणि संपवलासुद्धा. आता त्याचे डोळे तांबारले आणि माझे मात्र पांढरे व्हायची वेळ आली होती. असलेरोमनाळ, दांडगट किस्से गावोगावी असेच होत असतात.
खेडेगावातच असे किस्से होतात असे नाही. उच्चभ्रू आणि शहरी वातावरणातही असे किस्से होतच असतात, खास 'सोफिस्टीकेटेड' टच असतो त्याला. एका उच्चभ्रू, गर्भश्रीमंत महाशयांच्या 'पेंट हाउस' मध्ये जाण्याचा योग आला. अशीच दारूवर चर्चा सुरू झाली आणि विषय ब्रॅन्डीवर आला. त्यांच्यामते ब्रॅन्डी हा प्रकार 'डाउन मार्केट' असतो. ते हे सांगत असताना मागे त्यांच्या कपाटात कोन्यॅक दिसली. मी एकदम चमकून त्यांना हे काय विचारले तर त्यांनी खुशीत येऊन त्यांनी ती बाटली फ्रान्स वरून आणली असे सांगितले. मग त्यांना विचारले, “आता तर म्हणालात की ब्रॅन्डी डाउन मार्केट आहे मग ही बाटली कशी काय?” तर त्यांनी हसत हसत उत्तर दिले “अरे ही कोग्नक आहे, फ्रान्स एअरपोर्ट वर एका सेल्सगर्लने सजेस्ट केली. मोठी गोड होती रे मुलगी”. मी त्यावर काय बोलणार कपाळ. त्यांना कोन्यॅकचा उच्चारही धड करत येत नव्हता आणि ती एक ब्रॅन्डी आहे हेही त्यांच्या गावी नव्हते. थोडी-थोडी घेणार का असे त्यांनी विचारले. नाही म्हणण्याचे पातक तर माझ्याकडून घडणे शक्यच नाही. मी हो म्हटल्यावर त्यांनी नोकराला सांगून टेबल लावायला सांगितले. कपाटातून त्यांनी सिगारचे पाकीट काढले तेही क्युबन.ते बघून मी त्यांना माफ करून टाकले. माझा एकदम त्यांच्या विषयीचा आदर वाढला, पण क्षणभरच. लगेच ते म्हणाले “त्या एअरपोर्टच्या छोकरीने सांगितले कोग्नक बरोबर हा सिगार मस्त लागतो, काय गोड हसायची रे ती मुलगी”. मी मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला. टेबलवर बसलो तर ब्रॅन्डी बरोबर कोका - कोला. राग गिळून त्यांना म्हटले, “मला कोक नको मी तशीच घेईन”. तर भूत बघितल्यासारखा चेहरा झाला त्यांचा. त्यांनी सिगार पेटवून एक झुरका मारला आणि चक्क 'इन-हेल' केला (सिगारबद्दल माहिती नसणार्यांसाठी - सिगार 'इन-हेल' करत नाहीत), ते बघून मला त्यांच्या त्या पेंट हाउसवरून खाली उडी मारावीशी वाटली आणि पुढ्यातली कोग्नक प्यायची इच्छाही मेली. 'मोर नाचते म्हणून लांडोर नाचते' असले हे उच्चभ्रू प्रकार बर्याच पेंट हाउसेस मध्ये होतच असतात.
खरे धमाल किस्से होण्याचे कुरण म्हणजे विमानप्रवासात मिळणारी दारू. एकतर विमानात दारू किती, कशी, कोणती मागावी ह्याचा संकोच माणसाला खूप नर्व्हस करतो. त्यात सतत हसणार्या हवाइसुंदर्यांच्या त्या कृत्रिम वागण्यामुळेही माणूस जरा बावचळून जातो. त्यांच्या मधाळ पण कृत्रिम हास्यामुळे बर्फासारखा वितळून काही बाही करून जातो आणि मागे उरतात किस्से.
एकदा मी एका प्रवासात माझे अत्यंत आवडते पेय, रेड वाइन मागवली. माझ्या शेजारच्या महाशयांनीही रेड वाइन मागवली. हवाइसुंदरीने ग्लास आणि बाटली दिल्यावर तिच्याकडे त्यांनी बर्फ मागितला आणि ग्लासभर बर्फ घेऊन त्यात बाटलीतील रेड वाइन ओतली. मी हळूच डोळ्याच्या कोपर्यातुन हवाइसुंदरीकडे बघितले तर ती निष्काम कर्मयोग्याप्रमाणे, 'अजून काही सर?' असे म्हणत चेहेर्यावर तेच कृत्रिम हसू घेऊन पुढे गेली. तिला ह्या असल्या प्रकारांची सवय असावी.
एकदा एका सहप्रवाशाने व्हिस्की आहे का म्हणून विचारले. आहे आणि ती पण ब्लॅक लेबल म्हटल्यावर तर गडी एकदम खूश झाला. हवाइसुंदरीने विचारले,“लार्ज ऑर स्मॉल सर”? “एक्स्ट्रा लार्ज”, शेजारी. तिने ग्लासात बर्फ टाकून व्हिस्की ओतली आणि“एन्जॉय युवर ड्रिंक सर” म्हणून तेच कृत्रिम हास्य पसरून पुढे गेली. आता तो 'एक्स्ट्रा लार्ज' असलेला ग्लास बर्फ आणि व्हिस्कीने भरून गेलेला त्यात पाणी टाकायलाही जागा नव्हती. ह्याला काय करावे ते कळेचना. 'नीट' घ्यायची सवय असावी लागते. तशी चव जिभेवर रुळलेली असावी लागते. एक घोट घेतला त्याने तसाच. पण त्याने त्याची झालेली पंचाईत त्याच्या चेहेऱ्यावर लगेच दिसली. तो घोट गिळावा की थुंकावा,आणि थुंकावा तर कुठे? असे भलेथोरले, 'एक्स्ट्रा लार्ज' प्रश्नचिह्न त्याच्या डोळ्यात उभे होते. कसाबसा त्याने तो घोट तोंड वेडेवाकडे करत गिळला आणि तो उरलेला ग्लास तसाच ठेवून दिला. त्या हवाइसुंदरीच्या नजरेला नजर द्यायची त्याला इतकी चोरी झाली की बिचारा न जेवता तसाच झोपून गेला.
आम जनता जाऊद्या हो, मागे एका मंत्री महोदयांनी असेच विमानात दारू पिऊन तमाशा केला होता. आपण 'चौफुल्याच्या बारीत'बसलेलो नसून विमानात आहोत हेच ते बिचारे विसरून गेले होते.
कामाच्या निमित्ताने मला परदेशी दौरे करावे लागतात. माझ्यासाठी ती पर्वणीच असते. देशोदेशींची दारू चाखायची आणि घरी घेऊन (विकत हो) यायची संधी मिळते त्यावेळी. अशीच मी एकदा माझ्या मित्रांसाठी टकीला घेऊन आलो. उत्साहाने त्यांना टकीलाची माहिती दिली. टकीला 'नीट' प्यायची पद्धत समजावून सांगितली (थोडीशी चावट असलेली फ्रेंच पद्धतही सांगितली). त्यावर फक्त एक जण 'नीट' टकीला शॉट मारायला तयार झाला. बाकीच्यांची काही छाती होईन 'नीट' शॉट घ्यायची. त्यांनी चक्क सोडा, कोक मागवून ती टकीला चक्क त्यांतून प्यायली. एकच बाटली आणली म्हणून माझा आणि माझ्या सात पिढ्यांचा उद्धार करून एक व्हिस्कीचा खंबा मागवला. धरणीमाता दुभंगून मला त्याक्षणी पोटात घेईल तर किती बरे, असे वाटले त्यावेळी.
कॉलेज जीवनात असताना कधीतरी मित्रांबरोबर बियर प्यायला सुरुवात होते, मजे-मजेत. पण त्यावेळी पैश्याची चणचण भयंकर असते. पॉकेट्मनी संपून गेल्यावर बियर प्यायची इच्छा झाल्यावर कशी प्यायची हा मोठा यक्षप्रश्न असतो कॉलेजकुमारांपुढे. मला आणि माझा एका मित्राला नाही पडायचा कारण त्या मित्राचा दादा आमचा सीनियर असल्यामुळे त्याच्याबरोबर आम्हाला बियर प्यायला मिळायची.
एकदा त्या मित्राचे नातेवाईक मुंबई बघायला आले होते. योगायोगाने ते त्याला भेटले. गप्पा मारून परत जाताना त्यांनी त्याला 20 रुपयांची नोट दिली. महिनाअखेरीस आख्खे 20 रुपये म्हणजे मज्जाच हो. मग आमचा दोघांचे, ते 20 रुपये बियरवर उडवायचे ठरले. तेव्हा बियर 18रुपयांना मिळायची. वाइन शॉपमधून बियर आणणे वगैरे गोष्टी तर या आधी कधीच केल्या नव्हत्या. कसेबसे धाडस करून वाइन शॉप मधून बियर आणली. आख्खी बाटली हाताळणे आणि आता ती संपवणे असली दुहेरी जबाबदारी आम्हाला पार पाडायची होती. ह्याच्या आधी मित्राच्या दादाचे मित्र ग्लास भरून आम्हाला देत असत. आम्ही निमूटपणे तो ग्लास संपवून काहीतरी अचाट काम केले असा आव चेहर्यावर आणून त्यांच्यामधून निघून जायचो.
आता ते सर्व सोपस्कार आम्हालाच पार पाडायचे होते आणि तिथेच खरी गोची होती. ती बाटली उघडून कशी आणि किती बियर ग्लासात ओतायची ह्यावर आमचे एकमत होईना. मी ह्यांआधी माझ्या मामाला त्याच्या मित्रांबरोबर दारू पिताना बघितले होते. ते पाण्यातून घेताना त्यांना बघितल्यामुळे बियर मध्ये पाणी टाकून प्यावी असे माझे मत होते. तर त्याचे मत होते थम्प्स अप टाकून घेतात. मी माझी बाजू वरचढ होण्यासाठी वकिली मुद्दा मांडला, “जर थम्प्स अप टाकले तर बियर काळी होईल, तुझ्या दादाबरोबर पिताना बियरचा रंग पिवळाच होता”. हे त्याला पटले. त्या वरचढ झाल्याच्या खुशीत मला अजून आठवले की कधी कधी मामा पाण्याऐवजी सोड्यातूनही घ्यायचा. मग मित्राला ते सांगितल्यावर तोही आज एक भारी अचाट काम करायच्या खुशीत ‘बियर आणि सोडा’ अशा प्लॅनला झाला. बियर तर आणली होतीच, मित्र लगेच सोडा घेऊन आला. उरलेले 2 रुपयेही सार्थकी लागले. मग आम्ही दोघांनी ती बियर सोड्यात मिक्स करून प्यायला सुरुवात केली. रंग पिवळाच होता पण चव नेहमीपेक्षा वेगळी लागत होती. अशी चव का लागते असा प्रश्न आम्हा दोघांनाही पडला. एकदाची ती बाटली संपली आणि अचाट काम करून 'सीनियर' झाल्याचा अभिमान उराशी दाटला.
पण ते चवीचे कोडे तसेच होते. तो भुंगा काही केल्या पिच्छा सोडेना. मग एकदा परत मित्राच्या दादा बरोबर बसायची संधी मिळाली. तिथे त्याला आणि त्याच्या मित्रांना ती सर्व गोष्ट आम्ही सांगितली. ती ऐकून सगळेजण येड्या सारखे खोखो हसत सुटले. कितीतरी वेळ ते हसतच होते अगदी डोळ्यात पाणी येईपर्यंत. मग त्यांनी आम्हाला त्या दिवशी व्यवस्थित 'दीक्षा' दिली. तेव्हा आम्हाला दोघांना कळले की आम्ही कसला किस्सा करून बसलो होतो ते. त्यानंतर बरेच दिवस कॉलेजमध्ये आम्हाला 'सोडामिक्स' असे नाव पडले होते.
असे बरेच किस्से आहेत, आता एवढेच बस, बाकीचे पुन्हा कधीतरी.
प्रतिक्रिया
5 Jan 2012 - 9:52 am | मोदक
>>>>आम जनता जाऊद्या हो, मागे एका मंत्री महोदयांनी असेच विमानात दारू पिऊन तमाशा केला होता. आपण 'चौफुल्याच्या बारीत'बसलेलो नसून विमानात आहोत हेच ते बिचारे विसरून गेले होते.
एक मा (?) मुख्यमंत्री महोदय मुंबई दिल्ली प्रवासात इतके झिंगले की... पायलट ला त्यांनी दिल्ली विमानतळावर विमान उतरूच दिले नाहे.. आकाशात बराच वेळ घिरट्या घालायला लावल्या...
आधी यांचे विमान ताळ्यावर आले.. नंतर ते बसलेले विमान जमिनीवर. ;-)
(अशोक जैनांचे "राजधानीतून" नावाचे खल्लास पुस्तक आहे.. वरील किस्सा तिथूनच.)
सोत्रि, तुम्ही म्हणताय तो हाच किस्सा का..?
5 Jan 2012 - 10:17 am | प्रभाकर पेठकर
ते म्हणाहेत त्या प्रसंगात तर्र मंत्रीमहोदयांनी हवईसुंदरीशी गैरवर्तन केले होते. त्यावर स्टाफ ने संप पुकारून, गदारोळ उठला होता.
5 Jan 2012 - 10:29 am | मोदक
हे माहीत नव्हते.. नाव सांगू शकाल का..? (किंवा व्यनि करा..)
मी म्हणतोय ते मंत्री महोदय माहीत असतीलच.... ;-)
5 Jan 2012 - 10:41 am | प्रभाकर पेठकर
नांव आठवत नाही. खुप जुनी गोष्ट आहे.
5 Jan 2012 - 11:16 am | मराठी_माणूस
"अधिक" का ?
5 Jan 2012 - 2:44 pm | चिरोटा
होय. माझ्या माहितीप्रमाणे एयर इंडिया फ्लाईटमध्ये हे घडले होते. श्रीरामपूरच्या ह्या गड्याने रेड वाईन प्रमाणाबाहेर ढोसली आणि हवाई सुंदरी , एक महिला प्रवासी बरोबर असभ्य वर्तन केले होते.
7 Jan 2012 - 6:15 pm | चिंतामणी
रेड वाईन नव्हे
सिवास रेगल प्यायली होती.
जास्तीची माहिती- हे महाशय बॅरीस्टर होते आणि महाराष्ट्राचे काही काळ उपमुख्यमंत्रीसुद्धा होते.
8 Jan 2012 - 8:54 pm | चंबा मुतनाळ
त्यांच नाव रामराव आदिक!!
5 Jan 2012 - 9:59 am | मोदक
कोन्यॅक खूप जुना ब्रँड आहे का हो..?
5 Jan 2012 - 10:13 am | सुनील
कोन्याक हा ब्रॅन्ड नाही. एका प्रकारच्या ब्रॅन्डीला कोन्याक म्हणतात. तीचे अनेक ब्रॅन्ड बाजारात मिळतात. कोवाझिये हा त्यातीलच एक ब्रॅन्ड माझा आवडता!
5 Jan 2012 - 11:14 am | सोत्रि
कोन्यॅक हे फ्रांस मधील एका महानगराचे नाव आहे जिथे ब्रॅन्डी तयार केली जाते.
त्यामुळे ह्या महानगरात तयार होणार्या ब्रॅन्डी कोन्यॅक नावाने ओळखल्या जातात.
कोन्यॅक (महानगर) मधे बर्याच कंपन्या ब्रॅन्डी बनवतात. त्यामुळे ब्रॅन्ड बरेच आहेत.
- (साकिया) सोकाजी
अवांतर: लवकरच 'गाथा ब्रॅन्डीची' प्रकाशित करणार आहे. कार्यबाहुल्यामुळे जरा वेळ होतो आहे.
9 Jan 2012 - 5:40 pm | पक पक पक
अवांतर: लवकरच 'गाथा ब्रॅन्डीची' प्रकाशित करणार आहे. कार्यबाहुल्यामुळे जरा वेळ होतो आहे.
पण त्या आधी किस्से 'पार्ट २' प्रकाशित करा ,वाचायला फार मजा येते आहे......
5 Jan 2012 - 10:14 am | प्रभाकर पेठकर
टकीलाची माहिती दिली. टकीला 'नीट' प्यायची पद्धत समजावून सांगितली (थोडीशी चावट असलेली फ्रेंच पद्धतही सांगितली).
आम्हालाही दिक्षा द्या की महाराज. आम्हीही 'टकिला' बाबतीत अडाणीच आहोत. चावट पद्धत इथे सांगायची नसेल तर व्यनि करावा. असो.
माझेही पहिले मादक पेय बिअरच होते. बाकिच्या मित्रांनी व्हिस्की मागविली होती. त्यात ते सोडा भरत होते हे, माझे निरिक्षण. 'तू काय घेणार?' असे विचारल्यावर त्यातल्या त्यात बिअर सौम्य असते ह्या ऐकिव माहितीवर मी 'बिअर' असे उत्तर दिले. झाले. बिअर आSSली. (अप्सरा आSSलीच्या चालीवर). माझा मित्र माझ्यासाठी ग्लास भरू लागला. भरता भरता ग्लास थेट गळ्यापर्यंत भरल्यावर मी म्हणालो,'अरे! बस..बस! सोड्याला थोडी जागा ठेव की' त्यावर मस्तपैकी हशा पिकला आणि कोकराला दारूतला पहिला धडा मिळाला.
5 Jan 2012 - 11:04 am | सोत्रि
'थोडीशी चावट असलेली फ्रेंच पद्धत' ज्यांना हवी आहे त्यांनी कृपया व्यनी पाठवावे म्हणजे उत्तर देण्यास सोप्पे जाईल :)
- (चावट) सोकाजी
5 Jan 2012 - 10:36 am | साबु
आम्हालाही दिक्षा द्या की महाराज. आम्हीही 'टकिला' बाबतीत अडाणीच आहोत. चावट पद्धत इथे सांगायची नसेल तर व्यनि करावा. - असेच म्हणतो...
मी पण बीअर ने सुरवात केली... पहिली बीअर घरी कींवा बार मधे न पीता.. लाम्ब एका डोन्गराच्या ( दिघीचा डोन्गर) खाली जाउन पिलो... पण तिथे जाइपर्यन्त...बीअर गरम झाली... त्यामुळे आवडली नाही...नन्तर.. काही मित्रानी व्यवस्थित दीक्षा दिली...
असो... मस्त किस्से...
5 Jan 2012 - 10:44 am | सुनील
अफलातून किस्से.
5 Jan 2012 - 11:14 am | मी-सौरभ
बीअर अन् सोडा / स्प्राईट यांचे शँडी नावाचे कॉकटेल बनवतात ना?? मी ट्राय केलय सुरवातीच्या दिवसात बरं लागायच ;)
पण थंड बीअर म्हंजे जन्नत :)
5 Jan 2012 - 11:56 am | सोत्रि
शँडी: ३ पार्ट बीयर आणि एक पार्ट 'Gingel Ale'
- (साकिया) सोकाजी
5 Jan 2012 - 1:06 pm | स्वाती दिनेश
बीअर+स्प्राईट ला जर्मनीत 'राडलर' असे नाव आहे.
किस्से मस्त!
स्वाती
5 Jan 2012 - 11:37 am | सुमो
असे बरेच किस्से आहेत, आता एवढेच बस, बाकीचे पुन्हा कधीतरी.
नवीन किस्से वाचायला आवडतील...
कॉलेज जीवनात पैशांची चणचण असतेच... त्यावर आम्ही मित्रांनी शोधलेला उपाय म्हणजे
एक निप डिप्लोमॅट व्हिस्की+ एक एल्पी बीअर दोघांत शेअर करायची....
विमान उंच जायचं त्यावेळी..
5 Jan 2012 - 12:29 pm | चिगो
झ्याक किस्से, सोत्रि.. मलाही कोन्याकचा उच्चार विमानातच एकानी सांगितला होता, आधी मीपण "कोग्नॅक"च म्हणालो होतो.. तसेही दारुच्या बाबतीत आमची तयारी कच्ची आहे.. ;-)
सिंगापुर एअरलाईन्समध्ये आमच्या एका मित्राने फुकट मिळतेय म्हणून तीन-चार पेग रिचवले.. (मोठा ग्रूप असल्याने सोवळ्या लोकांची ह्यानेच घेतली) आणि थोड्या वेळाने मग वॉक्कन पोटातली सगळी दारु समोरच्या सिटच्या पाठीवर आणि टिव्ही स्क्रिनवर पसरली.. :-p
5 Jan 2012 - 3:12 pm | मेघवेडा
नशीब वकार युनुसचा बाऊन्सर कुणाच्या तोंडावर नाय बसला! =))
5 Jan 2012 - 1:45 pm | आत्मशून्य
हॅ हॅ हॅ
5 Jan 2012 - 2:40 pm | विजुभाऊ
कामाच्या निमित्ताने मला परदेशी दौरे करावे लागतात
झैरात झैरात झैरात
5 Jan 2012 - 3:18 pm | मन१
भन्नाट.. .
आमचाही किस्सा:-
आमच्या फ्लॅटवर एक आयुर्वेद भोक्ते पण नानाविध व्याधींनी ग्रस्त असे महाशय रहायचे. कुठले कुठले चूर्ण, काढे,कुटजारिष्ट व च्यवनप्राश असे काय काय पठ्ठ्याने जमवलेले. तो आमच्या अभ्या. एकदा अट्टल बेवडा जग्या अचानक डाफरत डाफरत रोगग्रस्त अभ्यावर चढून बोंबलत अभ्याची गोमूत्राची बाटली मागू लागला. आम्हाला काही कळेना.
गोमूत्रातील रस अचानक गाढवाच्या मुतासारखा वास मारू लागला म्हणून रोगट अभ्याने बाटली थेट केरात फ्फेकलेली.
हे ऐकून बेवडा जग्या भडकला. जाउन महत्प्रयासाने सोसायटीच्या कचर्याच्या ढिगातून हुडकून हुडकून त्यानी ती बाटली विजयी मुद्रेने घरी आणली आणि वर तोंड करून सम्जावणी सुरु:-
"त्याचं काय झालं काल बाबा फ्लॅटवर येणार होते आणि ऐन वेळेला ही एवढी निम्मा पगार खर्च करून आणलेली तब्बल २० वर्षे जुनी शॅम्पेन(का वाइन?) शंका येउ नये म्हणून ह्याची गोमूत्राची बाटली रिकामी करून, धुवून त्यात टाकली. सकाळी पाहिलं तर बाटलीच गायब. ह्याला गाढवाच्या मुतासारखा वास मारते म्हणायला गाढवाचं मूत ह्या अभ्यानं कधी घेतलय काही समजत नै"
मला प्रथमच कळलेली गोष्ट अशी की दहा बारा हजाराची २००ml दारूही येउ शकते, ती "तसा" वासही मारू शकते.
कोरडा
5 Jan 2012 - 5:44 pm | आचारी
मी आणि माझा मित्र होटेल मध्ये गेलो होतो .............तेव्हा ओर्डर देताना त्याने अन्डा करि ऐवजी अन्डा कैरी अशी ओर्डर दिली ..........त्या वेटरचा चेहरा अगदी बघण्यासारखा झाला होता .......हा हा हा !!हा हा हा !!
5 Jan 2012 - 8:31 pm | रेवती
दारवांमधलं अगदी ओ कि ठो कळत नसल्याने काय म्हणावं समजत नाहिये.
बियरमध्ये सोडा घालत नाहीत एवढच माहित आहे.
5 Jan 2012 - 10:09 pm | किचेन
मी आणि आमचे हे पटायाच्या बीचवर संध्याकाळी फिरत होतो.तेव्हा त्याच्याकडून दारूचे काही धडे मिळाले.अमुक कशापासून बनते,कोणती कडक असते,कोणती सौम्य,त्यांच्या चवी कशा असतात वगैरे....सुरुवात करण्यासाठी पटाया वाईट नाहीये अस म्हणून त्याने बीचवरून कोणतीतरी बाटली आणली पण.....मी मात्र अपेयपान नको म्हणूनच अडले होते...पण खूप आग्रहास्तव एक घोट घेतला (बाटलीच तोंडाला लावली होती), त्याचा वास,चव मी कधीही विसरू शकणार नाही.अम्ला,तिक्त,मधुर,लावण,कटू यांमध्ये कशातच ती चव बसत नव्हती.तो घोट घशाखाली जायच्या आधीच दुपारी मेहनीतेने शोधलेल्या भारतीय हॉटेलमध्ये खालालेले सगळे पदार्थ बाहेर निघाले.
लोकांना का आवडतात लिकर ?
6 Jan 2012 - 1:25 am | नाटक्या
तुने पी ही नही!!!
6 Jan 2012 - 12:28 pm | वपाडाव
प्लीज किचेनतै.... थोडंसं नीट लिव्हा की.... डिकोड करता करता चक्कीत जाळ होतो की वो.....
6 Jan 2012 - 2:16 pm | अन्या दातार
करा की हो वपाडाव.
आम्लः आंबट
तिक्त (बहुदा संस्कृत): तिखट
मधुरः गोड (यात तरी न समजण्यासारखे काही नाहीये)
कटू (हाही संस्कृतच बरं): कडू
किचेनतैंना संस्कृतातलेही काही शब्द येतात हे दाखवायचे असावे कदाचित. प्रत्येक वेळेस कसले हो तुमचे नवाबी चोचले पुरवायचे?? ;)
(नवाबी तरीही असुद्दलेखनाची सवय असणारा) अन्या
6 Jan 2012 - 2:39 pm | मृत्युन्जय
नवाबी तरीही असुद्दलेखनाची सवय असणारा
खपलो च्यायला. तुला नवाबी षौक आहेत की काय?
6 Jan 2012 - 3:45 pm | सोत्रि
:O
खपलो तिच्यायला !
- (साधेच षौक असलेला) सोकाजी
6 Jan 2012 - 3:49 pm | विजुभाऊ
आम्ल = अंबट
मधूर = गोड
तिक्त = तुरट
कटू = टोचणारी ( तिखट )
कशाय = कडू
लवण = खारट
7 Jan 2012 - 3:38 pm | किचेन
१०विला शाळेत संस्कृत मध्ये एक सुभाषित होत.विसरलात वाटत?
7 Jan 2012 - 5:05 pm | प्रास
अम्ल = आंबट
मधुर = गोड
तिक्त = कडू
कटू = तिखट
कषाय = तुरट
लवण = खारट
7 Jan 2012 - 5:53 pm | किचेन
बरोबर!
9 Jan 2012 - 1:09 am | मोदक
(चहाला कषाय पेय म्हणतात, यावरून) कषाय = कडू
मोदक.
9 Jan 2012 - 1:53 am | प्रभाकर पेठकर
बिन दुधाच्या चहाची चव तुरट असते. प्रमाणाबाहेर उकळल्यास कडवट होते.
कषाय म्हणजे तुरटच.
9 Jan 2012 - 3:16 am | शिल्पा ब
आत्ता कसं अगदी अस्सल मराठी संस्थळावर आल्यासारखं वाटतंय. ;)
9 Jan 2012 - 9:53 am | प्रभाकर पेठकर
म्हणजे आपण नुसतीच बघ्याची भूमिका घेऊन ताशेरे ओढताय म्हणून??
10 Jan 2012 - 9:16 pm | मोदक
मान्य..
सुधारणा केली आहे.
धन्स. :-)
9 Jan 2012 - 2:31 pm | विश्वनाथ मेहेंदळे
हा असा तर्क लावायचा म्हणजे कमाल आहे. म्हणजे कुणीतरी चुकून चहाला कषाय नाव दिले असेल, तर मूळ शब्दाचा अर्थ कसा काय बदलेल ??
अवांतर :- प्रास भाऊ संस्कृत चे अभ्यासक आहेत. त्यांच्या इतक्या बेसिक ज्ञानावर केवळ तर्काच्या आधारे प्रतिवाद करण्यात काहीही हशील नाही :-)
9 Jan 2012 - 2:46 pm | प्रास
आमच्या अभ्यासाच्या बेसिक लेवलमुळेच तर्काच्याच काय पण कशाच्याही आधारे कोणत्याही माहितीची शहानिशा न करता प्रतिवाद होऊ शकतो.
उगाच का आपल्या भाषेत "बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर" म्हणतात.... ;-)
9 Jan 2012 - 2:40 pm | प्रास
अहो, ते चहाला 'कषाय' पेय असं नाव नाहीये हो.
चहा हे 'काषाय' पेय आहे.
काषाय = लाल ( किंवा भगवा) रंग.
धन्यवाद!
11 Jan 2012 - 12:12 am | मोदक
:-)
9 Jan 2012 - 2:30 pm | विश्वनाथ मेहेंदळे
तुमचीच वाट बघत होतो. कडू आणि तिखट चा घोळ आहे हे आठवत होते. कारण शाळेत आम्हाला हे शिकवताना शब्दार्थात चुकून उलटे लिहिले आहे असे आम्हाला आधी वाटले होते. मग शब्दकोश चाळून तेच बरोबर आहे हे कळले. षड्रसांचा श्लोक होता काहीतरी, त्यात होते.
9 Jan 2012 - 11:05 pm | किचेन
सहमत.१० वित अनेकदा १०वित अनेकदा या दोन शब्दांचे अर्थ सांगितले होते.पण आम्ही बाईकडून सांगण्यात चूक होत असेल अस म्हणून आमचाच खर करायचो.एकदा तर मी आणि माझी मैत्रीण मागच्या बाकावर बसून तवाल्पना करत होतो.बाईंनी उभ करून याच दोन शब्दांचे अर्थ विचारले.आणि आम्हीही तिक्त म्हण्जे तिखट व कटू म्हण्जे कडू असंच सांगितलं होत.
9 Jan 2012 - 11:35 pm | प्रचेतस
तवाल्पना म्हणजे काय हो?
आज तव्यावर किती पोळ्या लाटायच्या याची कल्पना का आज कोणती तवाभाजी करायची याची कल्पना?
10 Jan 2012 - 10:14 am | सोत्रि
खी...खी...खी... कसली भारी कल्पना आहे राव ही, तवाल्पना :)
- (कल्पनेत रमलेला) सोकाजी
6 Jan 2012 - 1:31 pm | सोत्रि
किचेनतै,
मी लिहीलेल्या 'गाथा' वाचा जरा, प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळेल ;)
- (साकिया) सोकाजी
7 Jan 2012 - 9:36 am | चिंतामणी
आम्ल, तिक्त, कटु, मधुर, लवण आणि कशाय हे षडरस आहेत.
तुमच्या लिस्टमधे "लवण" राहीले की हो.
7 Jan 2012 - 10:03 am | सोत्रि
चिंका,
किचेनतैनी लवण चा 'लावण' केल्यामुळे तुमची जरा नजरचुकच झाली.
त्यांच्या 'शुद्ध(?) लेखनशैली'शी तुम्ही परिचित असूनही तुमच्याकडून अशी चूक व्हावी हे नवलच आहे .
;)
किचनतै, चिंकांना एकडाव माफी द्या ही विनंती _/\_
- (चुकून चुकणारा) सोकाजी
6 Jan 2012 - 3:01 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्त लिहीलं आहेस रे सोकाजी! कोग्नक आवडलं ... ती चावट पद्धत काय ते इमेलातून कळवच मलाही.
तुझ्या प्रवासातल्या किश्श्यांवरून मी साधारण वर्षभरापूर्वी प्रवासात भेटलेल्या काही विसंवादी पात्रांच्या पेय्यपानाबद्दल खरडलं होतं ते आठवलं. हे पहा.
7 Jan 2012 - 9:56 am | चिंतामणी
>>>पाहिलं तर कळलं पर्याची आणि याची आवड एकच होती. ट्वायलाईट-एक्लिप्स पहात हा भाई हिरविणीचा क्लोजअप आला की टाळ्या मारत होता.
हान तिच्या मायला.
तिथेसुद्धा पराला सोडला नाही.
10 Jan 2012 - 2:00 pm | परिकथेतील राजकुमार
मला देखील अदितीच्या किश्शांचीच आठवण झाली आणि त्यावरुन रंगलेल्या चर्चेची देखील ;)
किस्से भारीच रे सोत्रि.
7 Jan 2012 - 9:57 am | प्रदीप
ह किस्सा पहा..
http://www.youtube.com/watch?v=SjA-NyF5XL8
7 Jan 2012 - 10:14 am | सोत्रि
अशक्य...... त्या विडो मध्ये म्हटल्याप्रमाणे 'होली शीsssट'!
:) :)
- (एवढी वाइन फुकट गेल्याने कळवळलेला) सोकाजी