'डर्टी पिक्चर' : उलाला...उलाला...उलाला...उलाला

सोत्रि's picture
सोत्रि in जनातलं, मनातलं
2 Dec 2011 - 11:39 pm

बराच गाजावाजा करत आज एकदाचा ’डर्टी पिक्चर’ झळकला. फ़र्स्ट डे फ़र्स्ट शो असला भक्तीभाव कधीच नव्हता. सध्या जास्त काही कामधाम नाही त्यात शुक्रवार, त्यामुळे फ़र्स्ट डे फ़र्स्ट शो नाही पण फ़र्स्ट डेला पिक्चर टाकता आला.

एका सी ग्रेड अभिनेत्री, सिल्क स्मिता, हीची शोकांतीका पडद्यावर दाखवली. पिक्चर मधे विषेश तसे काही नाही. तसे काही नाही म्हणजे, चांगली पटकथा, उत्कृष्ट दिग्दर्शन, उच्च निर्मीतीमुल्य वगैरे असले काही. साधी सरळधोपट कथा आहे. तसा 'आंबटशौकीन' मसाला भरपूर आहे.

एका खेड्यातली लहान मुलगी जीला मोठ्या शहराचे आकर्षण आहे आणि तीची आई तीला शहरात नुसता झगमगाट आहे जो तिच्यासाठी चांगला नाही हे सांगत असते. जरा मोठी झाल्यावर ती पळून शहरात जात अगणित स्ट्रगलर्स प्रमाणे स्टुडिओज जे उंबरठे झिजवते. तुझ्यात काही नाही असे नकार सतत ऐकत असते. अशीच एकदा पिक्चर बघायला ती थिएटरमधे गेली असता एक माणुस तीला २० रुपये देऊन हॉटेलात चल असे म्हणतो. आणि इथे तीला उपरती होते की जर हा माणूस मला जर २० रुपये देऊ शकतो तर माझ्यात नक्कीच काहीतरी आहे. त्याला गुंगारा देउन ती तिथुन निसटते पण तीचा सिनेप्रवास 'सील्क' ह्या नावाने व्यवस्थित मार्गी लागतो. इथुन पुढे कथा आपल्याला माहिती असलेल्या नेहमीच्याच वाटेने पुढे जाते. तीचे नसरूद्दीन शहाबरोबर प्रेम प्रकरण, तीचे खुप सक्सेस मिळवणे, पुढे अहंकारामुळे मुजोरीपणा करणे, सरत्या काळात हताश होउन नैराश्य येणे आणी मग आत्महत्या अशी वळणे घेत हा चित्रपट संपतो. चित्रपटात बरेच पिटातल्या प्रेक्षकांना खूष करणारे संवाद आहेत. ते फारच बोल्ड आणि खुसखुशीत आहेत.

बस चित्रपट म्हणून एवढेच. चित्रपटाला २ स्टार्स.

अहो थांबा, एवढेच लिहायला हा लेख नाही लिहीला. ह्या सगळ्यात महत्वाचे राहीलेय की, ते म्हणजे 'विद्या बालन'.

अगदी कमी चित्रपटात यादगार भुमिका करून, फिल्मफेअर सारखेच अनेक ­पुरस्कार मिळवणारी प्रतिथयश आणि आघाडीची अभिनेत्री, विद्या, जेव्हा सिल्क स्मितावर चित्रपट करणार असे जाहीर झाले तेव्हा सर्वांच्या भुवया वर गेल्या होत्या. त्यात प्रोमोजमधे होणारे तीचे दर्शन अधिकच उत्सुकता वाढवत होते. पण.....

विद्या ही भूमिका अक्षरश: जगली आहे. सी ग्रेड अभितेत्रीच्या जिवनावरचा पिक्चर म्हणजे त्यात बोल्ड सीन्सची भरमार असणे सहाजिकच आहे. पण विद्याने कुठेही ते 'व्हल्गर'ते कडे झुकणार नाही ह्याची काळजी घेतली आहे. सगळ्याच बोल्ड सीन्समधे 'सेन्शुअल' दिसली आहे ती.

सुरूवातीला स्ट्रगल करणारी आणि अगदी टिपीकल 'साऊथ ईंडिअन', चपट्या केसांचा, एकदम नॉन ग्लॅमरस लूक असणारी सिल्क एकदम खरीखुरी वाटते. तीला बघूनच असे वाटत रहाते की, अरे, ही कशी काय सेक्स बॉम्ब होऊ शकेल. पण त्यानंतर चित्रपटात ब्रेक मिळाल्यानंतरचा तीचा लूक तर एकदम घायाळ करणारा.

असे कपडे घालूनही विद्या अजिबात न अवघडता वावरली आहे चित्रपटभर. ह्या भुमिकेसाठीतीने बरेच वजन वाढवले आहे. खासकरून जेव्हा तीचे करीयर उतरतीला लागलेले असते त्याकाळासाठी तर तिने वजन अतिशय वाढवले आहे. थुलथुलीत पोट, घेरदार मांड्या असल्या अवतारातही ती अजिबात न डगमगता अतिशय आत्मविश्वासाने तोकड्या कपड्यांमधे बिनधास्त 'शो ऑफ'करते. संपूर्ण पिक्चर फक्त तिच्यामुळे 'दर्शनिय' आणि 'सहनीय' झाला आहे. खरेच, हा फक्त विद्याचाच सिनेमा आहे.

आता काही कमकुवत बाजू:
पूर्ण चित्रपटात सिल्क नर्तकी म्हणून दाखवली आहे. पण विद्या नाचण्यात कमी पडते. तीथे तीचा ग्रेस सिल्क स्मीतासारखा नाही, कमी पडतो.
इमरान हाश्मीचे कॅरॅक्टर एकदम हुकलेले वाटते. तो पिक्चरमध्ये नसता तरीही चालले असते.
इंटरवलनंतर पिक्चरचा वेग जरा मंदावला जातो आणि चित्रपट जरा रटाळ होतो.

मोराल ऑफ स्टोरी म्हणजे, विद्यासाठी एकदा(च) हा चित्रपट जरूर बघावा. पण जर विद्याच आवडत नसेल तर हा चित्रपट बघण्यात काही अर्थ नाही,पैसे आणि वेळ दोन्ही फुकट.

चित्रपटमतअनुभवसमीक्षाविरंगुळा

प्रतिक्रिया

हे काय नुसती चित्रंच टाकलीत ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
;)

कुंदन's picture

2 Dec 2011 - 11:52 pm | कुंदन

हलवा मग धागा "कलादालन" मध्ये.

टवाळ कार्टा's picture

2 Dec 2011 - 11:48 pm | टवाळ कार्टा

:P

दादा कोंडके's picture

2 Dec 2011 - 11:58 pm | दादा कोंडके

धन्यवाद सोकाजीराव!
बादलीभर लाळ गळाली वगैरे पाकृ प्रतिक्रीया चालतील का?
चविनी चित्रं बघून घेतली. आता लेख वाचतो! :)

हे भगवान!
ही विद्या बालन उताराला लागलेल्या नसरु चाचाच्या माथी यावी ना. ;-)
इश्किया मध्येही, त्या राजनीती मध्येपण आणखी कुणीतरी (की हीच हो?) आणि इथेही.

कपिलमुनी's picture

3 Dec 2011 - 7:04 am | कपिलमुनी

लकी माणुस

( कोणत्या भांड्यामधुन पाणी पितो...चौकशी केली पाहिजे )

चांदीच्या ग्लासा तून पीत असेल बहुतेक :P

कपिलमुनी's picture

6 Dec 2011 - 6:02 pm | कपिलमुनी

खोतांची बाल्यावस्था संपून पौगंडावस्था सुरु झाली आहे ;)

धमाल मुलगा's picture

8 Dec 2011 - 11:11 am | धमाल मुलगा

मेलो तिच्यायला..ठसकून उसकून!

या नावाचा शिनेमा येतोय हेच मुळात २ दिवसांपूर्वी विद्या बालचे भजे (प्रतिसाद) वाचल्यावर समजले.
मग त्याचा ट्रेलर पाहिला आणि शिनेमाची उत्सुकता वाटायला लागली.
आता वेळ मिळाल्यावर पाहीन.
उगीच घाईगडबडीने (तरातरा जाऊन) पाहण्यासारखा नाही हे कळवल्याबद्दल धन्यवाद.

टवाळ कार्टा's picture

3 Dec 2011 - 1:49 am | टवाळ कार्टा

रेवती (किंवा आणखी कोणी ताई / माई / आक्का / वैनी / काकू / आज्जी...ज्याने त्याने आपापल्या वयाप्रमाणे संबोधन वापरा) यांनी न टंकलेला प्रतिसादाचा भाग .... खालचे वाक्य

मग काहितरीच काय... तरातरा जाउन पहायला तो काय शारुक किंवा जॉनचा शिनेमा वाटला ;)

रेवती's picture

3 Dec 2011 - 9:50 am | रेवती

शाहरूख आणि जॉन घाणेरडे वाटतात.

सुहास झेले's picture

3 Dec 2011 - 5:13 am | सुहास झेले

लैच भारी.... बघुया कधी योग येतोय बघायचा ;)

कपिलमुनी's picture

3 Dec 2011 - 7:06 am | कपिलमुनी

;)

कपिलमुनी,

अहो पिक्चरचा विषयच असा आहे की विद्या आणि तीचे हे फोटो ह्या शिवाय दुसरे काहीच नाही त्यात.
त्यामुळे फक्त ह्या फोटोंमुळे 'हिरवा' म्हणत असाल तर सांगतो, हा चित्रपट सह'कुटंब' बघितला गेल्या आहे. 'कसली 'सेन्शुअल' दिसते ना विद्या' हा माझ्या बायकोचा डायलॉग आहे पिक्चर बघतानाचा. :)

चला, आता विद्याचे फोटो 'डोळेभरून' पहाताना पकडलो गेलो तरी हरकत नाही ;)

- (सध्या 'विद्या'मय) सोकाजी

हि असली चित्र असलेला सिनेमा तुम्ही सहकुंब बघितलात?

प्रचेतस's picture

7 Dec 2011 - 1:10 pm | प्रचेतस

चित्र नाही हो, चलचित्रं

सोत्रि's picture

7 Dec 2011 - 5:00 pm | सोत्रि

हो का काय झाले? :shock:

बायकोच म्हणाली होती की हा सिनेमा 'बघायचाच' म्हणुन :)

- (सहकुटुंब विद्यामय झालेला) सोकजी

नशीबवान आहात. ;)
मी तर माझ्या नवर्याला चुकुनही परवानगी देणार नाही.अगदी घरी सी डि आणून पण नाही.

सोत्रि's picture

7 Dec 2011 - 6:03 pm | सोत्रि

अहो नवर्‍याने दुसर्‍या कुणाबरोबर जाऊन तो पिक्चर बघितला जाण्यापेक्षा तुमच्याबरोबर बघितलेला बरा की नाही?
सांगा, पटले की नाही? ;) (कृ. ह. घे.)

- (सध्या विद्यामय) सोकाजी

प्रचेतस's picture

7 Dec 2011 - 6:07 pm | प्रचेतस

_/\__/\__/\_

माझा नवरा पत्नीवार्ता आहे.तो अस कधीच करणार नाही.माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे.
समजा तुमच्या बायकोने परवानगी दिली नसती तर काय तुम्ही शेजारच्याच्या बायकोला घेऊन गेला असता? ;)

जाई.'s picture

7 Dec 2011 - 6:59 pm | जाई.

पत्नीवार्ता नाही हो पत्नीव्रता असे टंका

विश्वनाथ मेहेंदळे's picture

19 Dec 2011 - 9:28 pm | विश्वनाथ मेहेंदळे

जाई बाई, नवरा स्त्रीलिंगी असतो का हो ??

जाई.'s picture

19 Dec 2011 - 9:57 pm | जाई.

विमे गुरुजी धन्यवाद
मला ते पतिव्रताप्रमाणे पत्नीव्रता वाटल होतं
रच्याकने पत्नीनिष्ठ हा पर्याय कसा वाटतो?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Dec 2011 - 2:06 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>मिस्टेक कबूल
तुम्ही मिपावर किंवा एकूणच जालावर नवीन दिसत आहात. नाही, पटकन चूक कबूल केली म्हणून म्हटले ;-)

>>विमे गुरुजी धन्यवाद
गुरुजी नका म्हणू. त्यासाठी खूपच वेगळे लिखाण करावे लागते म्हणे (मुळात लिखाण करावे लागते).

>>मला ते पतिव्रताप्रमाणे पत्नीव्रता वाटल होतं. रच्याकने पत्नीनिष्ठ हा पर्याय कसा वाटतो?
चांगला आहे की, किचेन ताईंना कसा वाटतो, ते एकदा विचारून घेऊ.

वपाडाव's picture

8 Dec 2011 - 10:37 am | वपाडाव

तुम्ही शेजारच्याच्या बायकोला घेऊन गेला असता?

ते तिच्यावर अवलंबुन असेल ? हो का नाय सोकाजी..........

विश्वनाथ मेहेंदळे's picture

19 Dec 2011 - 9:27 pm | विश्वनाथ मेहेंदळे

ये बात कुछ हजम नही हुई ....
तुमचा तुमच्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे मग चित्रपट बघण्यासारख्या निरुपद्रवी गोष्टीवर बंदी का? असे चित्रपट बघून तो लगेच नॉन पत्नीव्रत होईल अशी भीती वाटते का हो ?? ;-)

स्मिता.'s picture

7 Dec 2011 - 6:58 pm | स्मिता.

मी तर माझ्या नवर्याला चुकुनही परवानगी देणार नाही.अगदी घरी सी डि आणून पण नाही.
तुम्ही नक्की किचेनताई आहात की किचेन दादा? नाही म्हणजे तुम्ही नवर्‍याला परवानगी देणार नसल्यापेक्षा तुम्हालाच बायको परवानगी देत नसावी असं वाटतंय ;)
बाकी हा चित्रपट 'सहकुटुंब' का बघू नये याचं कारण कळलं नाही. मी तर स्वतःच हा चित्रपट डाऊनलोड करून नवर्‍यासोबत पाहिला.

सोत्रि's picture

7 Dec 2011 - 7:00 pm | सोत्रि

बाकी हा चित्रपट 'सहकुटुंब' का बघू नये याचं कारण कळलं नाही. मी तर स्वतःच हा चित्रपट डाऊनलोड करून नवर्‍यासोबत पाहिला.

एक नंबर, मलाही हेच म्हणायचे होते :)

- (सहकुटुंब विद्यामय) सोकाजी

अन्या दातार's picture

7 Dec 2011 - 11:50 pm | अन्या दातार

असली म्हणजे कसली? (हे वाक्य तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकात जसे म्हणले आहे त्या अर्थाने घ्यावे ;) )

अत्रुप्त आत्मा's picture

3 Dec 2011 - 10:38 am | अत्रुप्त आत्मा

मॉर्निंग शो टाकणेचा इचार करणेत येइल...परिक्षण झ्याक झाले हाय... :-)

परिकथेतील राजकुमार's picture

3 Dec 2011 - 12:31 pm | परिकथेतील राजकुमार

सोत्रिला कंपूतून डच्चू देण्यात आलेला आहे !

असे शिणीमे फक्त 'डायरेक्टर्स कट' बघायचे असतात राव. ;) कधी शिकणार तुम्ही ?

असो..

आता तुम्ही नियम मोडलाच आहात तर आम्ही देखील बघून घेतो.

सोत्रि's picture

3 Dec 2011 - 2:32 pm | सोत्रि

हो रे, हो खरं आहे तुझे. मलाही खरेतर शिनेमे 'डायरेक्टर्स कट' बघायलाच आवडतं.

पण ह्या वेळेला दोन कारणे होती.

१. इश्किया बघितल्यापासून विद्या माझ्या टॉप ५ लिस्ट मधे फार वर आली आहे आणि प्रोमोज मधेले तीचे 'रुपडे' फारच 'गोंडस' दिसत होते.

२. कधी नव्हे ती बायकोची आज्ञा झाली की हा पिक्चर बघायचाच म्हणून ( तुला नाही अजुन हे कळायचे ;) )

- (सध्या 'विद्यामय') सोकाजी

रेवती's picture

3 Dec 2011 - 7:04 pm | रेवती

इष्किया नावाचा सिनेमा आहे?
शिनेमा कसा आहे याबद्दल क्रिपया कळवणे.
बाकी विद्या मिळवण्याबाबत कोणतेही बोलणे द्व्यर्थी वाटू शकेल.;)

इंटरनेटस्नेही's picture

3 Dec 2011 - 7:25 pm | इंटरनेटस्नेही

इष्किया नावाचा सिनेमा आहे?

होय.

शिनेमा कसा आहे याबद्दल क्रिपया कळवणे.

भिकार. आम्ही तर डाउलोड केला होता.. तो सुद्धा पुर्ण बघु शकलो नाही.
-
इंटिया ;)

सोत्रि's picture

3 Dec 2011 - 9:46 pm | सोत्रि

भिकार

जरा खुलासा कराल का?

- (सध्या विद्यामय) सोकाजी

इंटरनेटस्नेही's picture

4 Dec 2011 - 1:05 am | इंटरनेटस्नेही

विद्या बालन तर चांगलीच आहे यात काही वाद नाही.. पण चित्रपट मात्र खास नाही..

माहितीबद्दल धन्यवाद.
सध्या तुम्ही (सोकाजी व इंटाजी) दोघेही विद्यार्थी आहात.;)

आपली आज्ञाधारक,
विद्यार्थीनी

आज्जे,
बाकी, माणूस अनंतकाळाचा विद्यार्थी असतो हे तु सिद्ध केलेस बर का ;)

असो, इश्किया हा चित्रपट विद्याइतकाच चांगला आहे. पण ह्या चित्रपटाची जान आहे अर्शद वारसी.
'डर्टी..' मधे फक्त विद्या लक्षात रहाते तसे इश्कियाचे नाही. चित्रपटातील प्रत्येक पात्र लक्षात रहाते आणि स्टोरीत चपखल बसते. सबब इश्किया बघण्याचे करून अभिप्राय कळविणे.

- (विद्या आणि अर्शदचा पंखा) सोकाजी

रेवती's picture

4 Dec 2011 - 10:31 am | रेवती

शिनेमा (इष्किया) बघायचा प्रयत्न करीन, अर्थातच अभिप्राय देईन.

प्रॉमिसल्याप्रमाणे अभिप्राय देतिये.
(विमानात पाहिला) इश्किया आवडला.
सगळ्यांची कामे चांगली झालीत.
मला खरच वाटलं होतं की विद्याचा नवरा मेलाय म्हणून.
नंतर मात्र मरतो. काही प्रसंग पळवत पाहिले कारण मुलगा शेजारीच बसून बघत होता.;)

इंटरनेटस्नेही's picture

20 Dec 2011 - 1:34 am | इंटरनेटस्नेही

(विमानात पाहिला) इश्किया आवडला.

आपण विमानाने प्रवास करतो हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न. ;) कृपया हलकेच घेणे. ;)

मला खरच वाटलं होतं की विद्याचा नवरा मेलाय म्हणून.

हीच या चित्रपटाची खासियत आहे. ;) =))

मोहनराव's picture

3 Dec 2011 - 5:14 pm | मोहनराव

एक वेगळा हाताळलेला विषय म्हणुन सिनेमा पाहायला काहीच हरकत नाही. विद्याचे रुपडे पाहायला बाकी कसाही का असेना चित्रपट झेलु शकतो. :)

आताच्या सहाफुटी सरळसोट हिरोईनामध्ये दिसायला चांगली हिच वाटते.

धमाल मुलगा's picture

8 Dec 2011 - 11:12 am | धमाल मुलगा

सरळसोट विरुध्द वळसेदार असा हा सरळसोट सामना आहे हे मान्य केल्याशिवाय पर्यायच नाही. :)

गौरी१२'s picture

6 Dec 2011 - 10:48 am | गौरी१२

आताच्या काळात विद्या हि दिसायला सुंदर आहेच पण एकमेव "अभिनय" करणारी अभिनेत्री आहे. मला विद्या "पा " चित्रपटात प्रचंड आवडली होती. तीचासाठी मला हा 'डर्टी.. सिमेमा पाहायचाय ..... :)

(मिपा वाले ..... ते उलाला .. गाण्यातलं "लाडकी तू है बडी बुमबाट ..." म्हणजे काय ?? :) )

सोत्रि's picture

6 Dec 2011 - 11:21 am | सोत्रि

आताच्या काळात विद्या हि दिसायला सुंदर आहेच पण एकमेव "अभिनय" करणारी अभिनेत्री आहे

प्रचंड सहमत!

"लाडकी तू है बडी बुमबाट ..." म्हणजे काय ??

बुमबाट म्हणजे रापचिक असावे ;)
अ‍ॅक्चुली अश्या शब्दांचे अर्थ नसतात शोधायचे भावना समजून घ्यायच्या असतात :lol:

- (सध्या विद्यामय) सोकाजी

छोटा डॉन's picture

6 Dec 2011 - 11:00 am | छोटा डॉन

पिक्चर बरा आहे.
पिक्चरच्या सुरवातीलाच एक जबराट, बुम्बाट साऊथ इंडियन म्युझिकचा तुकडा दिल खुष करुन टाकतो. पुर्वार्ध नक्कीच चांगला आहे, शेवटी शेवटी पिक्चर जरा गुंडाळल्यासारखा वाटला आणि त्यामुळे बरेच तुकडे मिस झाल्याने त्याचा बॅलन्स गेला, शेवटचे काही मिनिट्स तर खुप कंटाळल्यासारखे झाले होते.
असो.

काही चांगले मुद्दे :
१. सगळ्यांची अ‍ॅक्टिंग ( हो, तुषार कपुरचीही अ‍ॅक्टिंग बरी होती, त्याने ह्यापेक्षा जास्त प्रयत्न केला असता तर हास्यास्पद झाले असते )
२. डायलॉक्स ... एकदम तुफान आहेत !
३. नेमकी आणि सुरेल गाणी .... उलाला उलाला आणि इश्क सुफियाना

थोडक्यात :
कुठे डिव्हिडी वगैरे मिळाली किंवा नेटवरुन उतरवुन घेतला असेल तर 'पळवत पळवत' पाहण्यासारखा आहे, असो. ;)

- (काटछाटप्रिय)छोटा डॉन

नितिन थत्ते's picture

6 Dec 2011 - 12:15 pm | नितिन थत्ते

>>नेमकी आणि सुरेल गाणी .... उलाला उलाला आणि इश्क सुफियाना

उलाला उलाला हे भप्पी लाहिरींच्या (जितू-जया प्रदाच्या) "उइ अम्मा उइ अम्मा..... साडी हवा हो गयी" वरून सरळ उचललेलं गाणं आहे - मधल्या पीसेस सकट(भप्पींनी कोठून उचलले होते ते ठाऊक नाही).

परिकथेतील राजकुमार's picture

6 Dec 2011 - 12:46 pm | परिकथेतील राजकुमार

थत्ते चाचा, बहूदा कधी नाही ते हे साँग उचलेगिरी नसावे. बाकी हे गाणे मवाली चित्रपटातील आहे.

असेच आपले अजून एक आवडते गाणे म्हणजे 'एका आंख मारू तो ...' ;)

रविवारी आपण पण 'डर्टी पिक्चर' पाहीला. चित्रपट फक्त आणि फक्त विद्या बालन आणि धांसू संवाद ह्यांनीच व्यापलेला आहे, आणि म्हणूनच सुसह्य देखील झाला आहे. विद्या बालन शब्दश "बुम्बाट'.

तिचा इश्किया देखील असाच मनात घर करुन राहीलेला चित्रपट. वेगळ्या विषयाला आणि आवाक्याला हिंदी दिग्दर्शक हात घालत नाहीत म्हणणार्‍यांनी हा चित्रपट जरूर पहावाच. अभिषेक चौबेचे डायरेक्शन आणि विशाल भारद्वाजचा स्क्रीन प्ले.. अमेझिंग.

रविवारी आपण पण 'डर्टी पिक्चर' पाहीला.

थेटरात जौन का रे?

नसल्यास....... हॅ हॅ हॅ तुला कळले असेलच मला काय म्हणायचेय ते.
व्यनीची वाट पहात आहे. ;)

परिकथेतील राजकुमार's picture

6 Dec 2011 - 2:29 pm | परिकथेतील राजकुमार

ह्या टैमाला थेटरात जाउन बघीतला.

आणि गम्मत म्हणजे फुकटात पहायला मिळाला ;) ज्या प्रेमळ व्यक्तीने माझे तिकीट मी यायच्या आधीच काढून ठेवले, त्या व्यक्तीने पैसेच मागीतले नाहीत :P

सोत्रि's picture

6 Dec 2011 - 4:56 pm | सोत्रि

त्या व्यक्तीने पैसेच मागीतले नाहीत

हॅ हॅ हॅ, महिमा बुम्बाट विद्याचा :lol:

- (सध्या विद्यामय) सोकाजी

सोत्रि's picture

6 Dec 2011 - 4:53 pm | सोत्रि

परा,
ह्या विद्यामय प्रतिसादाबद्दल माझ्याकडून एक लार्ज!
चियर्स :beer:

- (सध्या विद्यामय) सोकाजी

सोत्रि's picture

6 Dec 2011 - 4:54 pm | सोत्रि

द्विरूक्तीमुळे प्रकाटाआ.

सोत्रि's picture

6 Dec 2011 - 7:16 pm | सोत्रि

पण तसे विशाल - शेखरने मान्य केलेले आहेच.
८०च्या दशकातील गाण्यांनी इन्स्पायर्ड असे हे गाणे आहे आणि त्यामुळेच भप्पींना ते गाणे गायला लावायची आयडीया त्यांनी लढवली. भप्पीदांनीच हे एका मुलाखतीत सांगीतले आहे.
व्हिडो मिळाला की डकवतोच.

- (भप्पीदांच्या काही काही गाण्यांचा पंखा) सोकाजी

थत्ते जी

भप्पीदानी गाणे फक्त गायले आहे.

संगीत दिग्दर्शन विशाल-शेखरचे आहे.

वपाडाव's picture

6 Dec 2011 - 7:02 pm | वपाडाव

मिथुन लुथरियाच्या चित्रपटांची संवाद ही नेहमीच जमेची बाजु असते. ते संवाद रजत अरोडा याने लिहिलेले आहेत... वन्स अपॉन --- मुंबै मधील संवादही यानेचं लिहिले आहेत....

तो वरचा व्हिडिओ किती विनोदी आहे. गाणं छान आहे पण ते बघायला विनोदी आहे. त्यात "जीतुजीं"नी काय विनोदी डान्स केलाय .... ( डान्स कि योगासने केलीत ?;) ) खास करून सुरवातीचा भाग ते गाणे सुरु व्हायचा आधी (म्हणजे ०.१५ सेकंद ते ०.३४ सेकंद) १९ सेकंद एकच स्टेप केलीय जीतुजींनी.... तिथे खूप हसायला आले . (सकाळचा मॉर्निंग वॉक चा प्रकार फास्ट फॉरवर्ड मध्ये पहिल्यासारखा वाटला. ;) )

धमाल मुलगा's picture

8 Dec 2011 - 11:11 am | धमाल मुलगा

च्यायला, त्या डार्टी पिक्चरमध्ये इतकं काय मोठं अश्लिल वगैरे आहे ते काय कळ्ळं नाय बा. त्यात जे सीन्स आहेत तसे किंवा त्यापेक्षाही जास्त 'इंटेन्सिटी' असलेले सीन्स पेरलेले कित्येक हिंदी सिनेमे आहेत की. हां, आता सिनेमा एका अश्या बाईच्या जिवनावर आहे की जी 'तसल्या' भूमिका करायची, तर त्या अनुशंगाने सिनेमातले सीन्स बरेच फिके (माईल्ड ह्या अर्थाने म्हणतोय.) आहेत. विचार करा, भट्ट क्यांपने हा सिनेमा केला असता तर काय झालं असतं?

सिनेमा पुर्णतः विद्या बालनचा आहे हे अगदी मान्य भो. बाकीचे आपले शब्दशः 'सपोर्टिंग अ‍ॅक्टर'.

मला ह्या सिनेमातला सर्वात आवडलेला प्रसंग म्हणजे, शेवटी शेवटी सिल्कला कामं मिळेनाशी होतात, तेव्हा ती कामं मागत फिरताना, अगदी सुरुवातीला ज्यानं तीला हाकलून दिलेलं असतं त्याच्यासमोर येते. त्यावेळी तोही म्हणतो, "काम तर देता येणार नाही, पण काही पैशांची मदत करु शकेन" त्यावेळी सिल्क त्याला पाच रुपये मागते आणि तो गोंधळून फक्त पाच रुपये? विचारतो त्यानंतरची विद्याच्या चेहर्‍यावरचे भाव आणि संवादफेक....क्या बात है!

मला ह्या सिनेमातला सर्वात आवडलेला प्रसंग म्हणजे, शेवटी शेवटी सिल्कला कामं मिळेनाशी होतात, तेव्हा ती कामं मागत फिरताना, अगदी सुरुवातीला ज्यानं तीला हाकलून दिलेलं असतं त्याच्यासमोर येते. त्यावेळी तोही म्हणतो, "काम तर देता येणार नाही, पण काही पैशांची मदत करु शकेन" त्यावेळी सिल्क त्याला पाच रुपये मागते आणि तो गोंधळून फक्त पाच रुपये? विचारतो त्यानंतरची विद्याच्या चेहर्‍यावरचे भाव आणि संवादफेक....क्या बात है!

लाँग लिव्ह रजत अरोडा !!
लैच खच्चिक संवाद अन पटकथा लिहितो बे हा माणुस ......
टोप्या बंद ह्याला.....

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Dec 2011 - 7:05 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला तर ब्वॉ 'डर्टी पिच्चर'मधे विद्या बालनच्याही पुढे बरंच काही दिसलं. हे पहा.

स्पा's picture

9 Dec 2011 - 12:35 pm | स्पा

.

प्यारे१'s picture

9 Dec 2011 - 12:42 pm | प्यारे१

स्पावड्या,
"हा दुसर्‍या संस्थळावरचा बिन्दू इकडे आणून स्वतःची लाल करायचा प्रयत्न का करत आहेस रे तू?
तुला हा बिन्दू इकडे देखील टाकता आला असताच ना? आधी मोठ्या तोर्‍यात गेलेलास ना तिकडे?
आता का आता का? (प्रशांत दामले स्टाईल)"
- कशी वाटते रे ही प्रतिक्रिया? मी एकदा देणारे बरं तुला! ;)

अवांतरःसाला, कुत्रं विचारत नाही तरी फुडंफुडं करायची सवय जात नाही लोकांची.....

मुख्य विषयः डर्टी पिच्चर पाहिला नाही. विद्या बालन प्रयोगशील अभिनेत्री आहे असं एकंदर दिसतंय.

मी-सौरभ's picture

9 Dec 2011 - 3:38 pm | मी-सौरभ

असल्या विक्षिप्त प्रतिक्रिया का देत आहात तुम्ही???

प्यारे१'s picture

9 Dec 2011 - 3:50 pm | प्यारे१

अरे राजा अंथरुण पाहून 'पाय' पसर जरा. काहीपण का बोलतो आहेस ? ;)
नाहीतर गणपाचा 'पाया' रस्सा हाणावा लागेल.

मी-सौरभ's picture

9 Dec 2011 - 5:20 pm | मी-सौरभ

स्वारी श्क्तीमान...

गणपाने बनवलेला (गणपाचा नाही बरं) पाया खायला मी कधीही तयार आहे...

सुहास..'s picture

9 Dec 2011 - 5:30 pm | सुहास..

अवांतरःसाला, कुत्रं विचारत नाही तरी फुडंफुडं करायची सवय जात नाही लोकांची..... >>>

मी काही बोललो की (टारगेट करण्याच्या लायकीचे नसलेले ) काही लोक्स लगेच 'टारगेट' करतो आहे म्हणुन बोंबलायला लागतात, म्हणुन तुर्तास " प्यारे गुर्जी की जय " म्हणतो आणि इथेच थांबतो ;)

धन्यवाद

=))

हा बिंदू कलात्मकेतेच प्रतिक आहे
असा अपमान करू न्ये त्याचा

चित्रपट फार तर घरी बघाय्च्या कामाचा वाटतोय.

मला मुळात असा म्रुत व्यक्तीचे काहीतरीच चित्रण करणारे पिक्चर काढावेत का असा प्रश्न पडतो.
मागे थेट्रात जाउन "shoot out at lokhandwala" हा बॉलीवूडपत पाहिला होता.
त्यातला एक गुंड (IIT graduate)माया डोळस(विवेक ओबेरॉय) गुंडागर्दी सुरु करताना , वाढवत जाताना त्याची आई अमृता सिंग त्याला कसे अजून अजून हल्कत, गुंड, नीच,भड्वा बनायला उद्युक्त करते हे दाखवले आहे. एक अत्यंत घाणेरडे, विकृत पात्र म्हणजे त्या गुंडाची आई असे दाखवले आहे. कुठलीही आई आपल्या मुलाला असे करील असे वाटत नाही. ती स्त्री आजही जिवंत आहे. तिने ह्या चित्रपटातील अशा चित्रणाविरुद्ध कोर्टाची पायरीही गाठली होती. पण बहुतांश गरिब व निराधारांचा होतो तसाच तिचाही तित्थे पराभव झाला व चित्रपट उच्चारवात सुरुच राहिला.

हे सांगायचे कारण काय, की तेव्हापासून अशा सत्यकथा म्हणवून घेणार्‍या व्यावसायिक चित्रपटांची तिडिक बसली. शहाण्याने व्यावसायिक सिनेमे बनवातेत किंवा थेट माहितीपट(documentary)ससंदर्भ बनवावा. कुणाच्याही जीवनाची किंवा मृत्यूची अशी थट्टा मांडून थेट्रात त्याचा "खेळ" करु नये.

पण कुणाला काय दाखवतोय ह्याचे भान ठेवावे.

चित्रपट पाहिल्यावर हा तिच्यावर "आधारित" सिनेमा आहे व चित्रण जसेच्या तसे नाही हे समजणारे आपल्या तुमच्याआमच्यासारखे सुबुद्ध इथे तरी अत्यल्प संख्येने आहेत. इतरांसाठी "ती तशीच होती. त्यात दाखवले आहे ना." असे म्हणत चवीचवीने गप्पा मारायची सोय होते. कुणाही बद्दल असे बोललेले दाखवलेले मला तर आवडत नाही.

कल्पना करा एखाद्याच्या काही "असे काही" घडले आहे व घरच्यांना त्याचा आधीच बराच त्रास आहे. त्यात पुन्हा माध्यमे "अरेरे किती हा त्रास "म्हणत पुन्हा पुन्हा तोच तोच प्रसंग आंबटशौकीन समाजात दाखवतात तेव्हा त्यांना वेदनायुक्त आयुष्य जगायला भाग पाडतात.

आजही अशा माठ्यांमध्ये वावरतो की जे तावातावाने अकबर्-सलिम-अनारकली ह्यांच्याबद्द्ल मुघल ए आजम बघून व तो खरा समजून बोलत असतात. त्यांना कितीही कळवळून सांगितले की "बाबा रे त्या पिक्चर मध्ये सर्व काही निव्वळ cinematic liberty म्हणूनच पहा. सलिम्-अनारकलीच्या ऐकिव दंतकथेत एक germ सापडला म्हणून त्या के आसिफने त्याचा एक परिकथेसम चित्रपट बनवला आहे. त्यात जी एवढी मोठ्ठी शेवटची लढाई व शाहजादा सलिमचे धैर्य दाखवले आहे, ते मुळात घडलेलेच नाही. म्हणजे आख्खीच्या आख्खी लढाई ही निव्वळ फ्यंटसी आहे." मूळ सलिम व अकबर कसेही असले तरी असे नक्कीच नव्हते. तरी पब्लिक ऐकत नाही.
"अशा" पब्लिक मध्ये "तसे" वर्णन करून दाखवणे, तेही सत्य व्यक्तीचे म्हणजे त्याच्या परिचितांना मनस्तापच ना.

मनोरंजनासाठी बॉलीवूडवाले कशाचे काय करतील सांगता येत नाही."बॉलीवूड" हा एकच शब्द माझा पूर्वग्रह बनवण्यास पुरेसा आहे.असो. माझे शब्द तोकडे पडताहेत. आता थांबतो.
चित्रपट पाहून मग नक्कीच पुन्हा प्रतिक्रिया देइन.

disclaimer:- माझ्या तक्रारी मुख्यतः अशा चित्रपटांबद्द्ल आहेत. परिक्षण जमले आहेच, ह्यात शंका नाही.

प्रभो's picture

9 Dec 2011 - 8:34 pm | प्रभो

ओ भाऊ तो माया डोळस आय टी आय पास असतो..आय आय टी नाही.... :)

मनोरंजनासाठी बॉलीवूडवाले कशाचे काय करतील सांगता येत नाही."बॉलीवूड"

मनराव, हे मात्र अगदी लाख बोल्लात. १००% सहमत.

- (तरीही बॉलीवूड प्रेमी) सोकाजी

विद्या बालन साठी हा सिनेमा बघितला, अतिशय आवडला....
यावरून उत्सुकता निर्माण झाली, ती अशी की सिल्क स्मिता चे सिनेमे कोणकोणते आहेत ? जालावर आहेत का ?

श्रीदेवी- कमलहसनचा सदमा.

(चित्रपट छान आहे. पण सिल्क स्मिथावाला भाग ठिगल लालल्यासारखा वाटतो.)