आमची प्रेरणा सध्याचे 'मिपा वरचे प्रतिसादित विषय'
(कृपया सर्व जण हे विडंबन मजेत घेतील या बद्दल विश्वास आहे )
चाल : चढाओढीने चढवीत होते ग बाई मी पतंग उडवीत होते
--------------------------------------------------------------------------
खेळीमेळीन लिहीत होते !
ग बाई मी प्रतिसाद वाचीत होते.!!
कौल लाविला मर्मस्थानी !
गाणं शिकुन लहानपणी !
इतिहास अभ्यासित होते !
ग बाई मी प्रतिसाद वाचीत होते. !!
काथ्याकुटाला आला ग रंग
नाही आम्हा कवितेचं अंग
देव चरित्र सांगीत होते !
ग बाई मी प्रतिसाद वाचीत होते. !!
आजी-काकूंचा घेऊ आशीर्वाद !
भयपटाचा धरला मी हात !
गुन्हेगाराला पकडित होते ग !
बाई मी प्रतिसाद खरडीत होते !!
--------------------------------------------------------------------------
मुळ गाणे-
चढाओढीने चढवीत होते
ग बाई मी पतंग उडवीत होते
होता झकास सुटला वारा
वर पतंग अकरा-बारा
एकमेकांना अडवित होते
ग बाई मी पतंग उडवीत होते
काटाकाटीस आला ग रंग
हसू फेसाळ घुसळीत अंग
दैव हारजीत घडवीत होते
ग बाई मी पतंग उडवीत होते
माझ्या दोऱ्यानं तुटला दोरा
एक पतंग येई माघारा
गेला गुंतत गिरवीत गोते
ग बाई मी पतंग उडवीत होते
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - आशा भोसले
चित्रपट - लाखात अशी देखणी (१९७१)
प्रतिक्रिया
17 Jul 2008 - 4:10 pm | मनस्वी
शाब्बास अमोल!
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
17 Jul 2008 - 11:46 pm | पिवळा डांबिस
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
एक विचारू मनस्वी?
विवेकानंद केस बारीक कापत असत की लांब (>३ इंच) ठेवत असत?
:)
माझा मुद्दा हा की माणसाच्या केसांचा आणि विचारशक्तीचा काय संबंध?
17 Jul 2008 - 4:12 pm | शितल
छान जमले आहे विड॑बन.
17 Jul 2008 - 4:15 pm | मदनबाण
अमोलराव मस्तच..
(पतंग बदवणारा)
मदनबाण.....
17 Jul 2008 - 4:27 pm | प्रमोद देव
मस्त!!!
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
17 Jul 2008 - 5:30 pm | नरेंद्र गोळे
एकदम सही आहे! खासच!!
17 Jul 2008 - 8:11 pm | llपुण्याचे पेशवेll
कविता आवडली रे अमोल.
(लेप्टी लावून पतंग उडवणारा)
पुण्याचे पेशवे
17 Jul 2008 - 8:11 pm | राधा
सही लिहिलय.........
17 Jul 2008 - 11:30 pm | वरदा
मस्त आहे....
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
17 Jul 2008 - 11:39 pm | पिवळा डांबिस
छान आहे रे अमोल!
कीप इट अप!!!
18 Jul 2008 - 12:34 am | विसोबा खेचर
मस्त कविता...!
अभिनंदन केळकरसाहेब...!
आपला,
(पतंगप्रेमी) तात्या.
18 Jul 2008 - 9:03 am | अमोल केळकर
आपल्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद
अमोल
गुरुने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा !!
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा