गुलजार नार ही ...

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
28 Nov 2011 - 3:28 pm

(डिस्क्लेमर :- ह्या कथेतील स्थलकालाचे वर्णन, पात्रे ही काल्पनिक असून निव्वळ कथेमध्ये रंग भरण्यासाठी वापरली आहेत. ह्या वर्णनाचे कुठल्याही स्थलकालाशी, व्यक्तींशी साम्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.)

स्त्री हा चर्चेचा विषय असू शकतो हे समजायलाच आम्हाला १० वी पर्यंतचा काळ लागला. अर्थात दोष हा सर्वस्वी आमचा नसून, आमच्या पालकांचा होता हे इथे नमूद करावे लागेल. मुलाच्या भवितव्यासाठी त्यांनी 'भावे स्कूल' सारखी शाळा निवडावी आणि ती फक्त मुलांचीच असावी हा माझा दोष म्हणता येईल काय ? बरं शाळा बदलायची शक्यता नव्हतीच. आमचे मार्क्स देखील इतके भरीव असायचे, की ह्या शाळेतून काढल्यावर ह्या कार्ट्याला 'वस्ती शाळा' तरी प्रवेश देतील का ? अशी त्यांना शंका असावी.

पुढे यथावकाश आम्ही १० वी चे शिक्षण एकदाचे संपवले आणि ११वी मध्ये दाखल झालो. सायन्स सारख्या शाखा आमच्यासाठी नव्हत्याच आणि त्यातच देशाचे भले देखील होते म्हणा. त्यामुळे मग आम्ही कॉमर्सच्या राजमार्गावरती पाऊल ठेवले. एखादा मनुष्य तोंडात चांदीचा चमचा जन्माला घेऊन येतो म्हणतात. आम्ही कदाचित पिपाणी घेऊन आलो असणार. ११ वी च्या प्रवेशाला देखील आमची माननीय संस्था आमच्यासाठी नयनांची निरांजने घेऊन हजर झालीच. ११ वी साठीच्या संस्थेच्या कॉलेजच्या यादीत आमचे नाव अगदी दुसर्‍या पानावरती झळकले. घरच्यांना एखादी जड झालेली पोरगी सासरी पडल्यावरती होतो तसा आनंद झाला. पाठोपाठ शाळेच्या कॉलेजमध्येच शिकणे कसे महत्त्वाचे / उत्कर्षाचे इ. इ. चे उपदेश करणारे नातेवाईक आणि हितचिंतक हजर झालेच. आणि पुन्हा एकदा आमची रवानगी 'म.ए.सो. मुलांचे विद्यालय' मध्ये करण्यात आली. अर्थात निदान बाजूच्या वर्गांमध्ये आता LIC च्या बॅचेस भरू लागल्या होत्या आणि त्यात मुली देखील होत्या ही त्यातल्या त्यात आनंद देणारी बातमी कानावर आली होती.

आठवड्याभरातच LIC बॅचच्या मुली पाहून स्वतःचाच विमा उतरवायला लागतो का काय अशी शंका यायला लागली. ह्या मुलींना वर्षभर पाहतं राहिलो असतो, तर एकतर शिक्षणाला तरी विटलो असतो किंवा बायकांना तरी. अर्थात देव अगदीच काही वाईट नाही ह्याचा अनुभव आम्हाला लवकरच मिळाला आणि ट्रेनी म्हणून काही सुबक आणि त्यातल्या त्यात प्रेक्षणीय अशा 'मॅडम्सची' आमच्या वर्गांवर नेमणूक झाली. बहुत करून सर्व वर्गमित्र हे शाळेत असल्यापासूनच एकत्र असल्याने आम्ही ११ वी च्या दूसर्‍या दिवसापासूनच आमचे रंग उधळायला सुरुवात केली होती. पहिला दिवस हा कोण कुठल्या विषयासाठी आहे, कोणाला वर्गशिक्षक नेमले आहे, शारीरिक शिक्षणासाठी कोण उरावर बसणार आहे इत्यादी माहिती जमवण्यातच गेला. वर्गशिक्षक म्हणून पाटील सरांना नेमल्याचे कळले आणि आमचा आत्मा संतोष पावला. पाटील सर म्हणजे संत माणूस हो. 'किरंगळी दाखवून बाहेर गेलेला विद्यार्थी पुन्हा परत का आला नाही' हा प्रश्न देखील त्यांना सहसा पडत नसे. तर अशा एकूण गुलाबी वातावरणात नव्या ट्रेनी दाखल झाल्या आणि आमच्या खर्‍या कॉलेज जीवनाला सुरुवात झाली.

आजूबाजूच्या वर्गात अधे मध्ये ह्या ट्रेनी दिसायला लागल्या होत्या. अर्थात हे वर्ग म्हणजे 'अ' तुकडी, अर्थात सायन्स वाले. 'अ'' म्हणजे सायन्स, 'ब' म्हणजे कॉमर्स इंग्रजी माध्यम, 'क' म्हणजे कॉमर्स मराठी माध्यम अशी साधारण आमच्या 'झोपडपट्टीची' रचना होती. LIC ची एक खोली आणि तिला लागून असलेले आमचे चार वर्ग, बाहेरच्या सामुदायिक भिंतीवरती बरेचसे रंग उडालेले ज्ञानदेवाचे चित्र, वर्गासमोर फरशीचे देखणे ग्राउंड आणि उजव्या हाताला लायब्ररी असे मनमोहक स्ट्रक्चर असताना देखील आमच्या वर्गांना झोपडपट्टी का म्हणायचे ते मला कधीच कळले नाही. असो.... तर एक दिवशी आमच्या हेडमास्तरांनी अचानक प्रवेश करून मी व माझे काही अभ्यासू मित्र ह्यांना 'आजपासून तुम्ही सेक्रेटरीयल प्रॅक्टिस आणि अकाउंट्स ह्या तासांना शेवटच्या बेंचेसवरती बसायचे' असे प्रेमाने समजावले आणि उद्यापासून आपल्या वर्गावर ट्रेनींची ड्यूटी लागणार हे आम्ही ओळखले.

दुसर्‍या दिवशी कॉलेजच्या युनिफॉर्म मधली निळी पँट व्यवस्थित कपाटात बोळा करून टाकून दिली आणि पांढरा शर्ट आणि निळी जीन्स अशा वेषात आम्ही कॉलेजात प्रवेश केला. लवकरच आपण जगात एकमेव हुशार नसून, आपले सहाध्यायी देखील आपल्याच ताकदीचे बुद्धिमान आहेत हे आमच्या लक्षात आले. जोशी, पटवर्धन, मोकाशी, काणे असले निरुपद्रवी जीव सोडले तर वर्गात सगळीकडे निळ्या जीन्सच झळकत होत्या. काहींच्या आजूबाजूला मंद सुवास देखील जाणवत होता. एकुणात यौवनबहर ओसंडूच चालला होता म्हणा ना. 'बाई नवीन असल्याने आपण मागे बसलो काय किंवा पुढे बसलो काय, तिला काय कळणारे' ह्या विचाराने आम्ही हेडमास्तरांची आज्ञा फाट्यावर मारत नेहमीच्या ठिकाणीच मुक्काम केला. पहिले दोन तास संपले आणि सेक्रेटरीयलच्या तासासाठी नवीन नेमणूक झालेल्या 'मंदाकिनीने' आत पाऊल टाकले. ह्या मॅडमचे आडनाव खरेतर 'केंजळे' होते, मात्र तिच्या डोळ्यांच्या रंगामुळे आधीपासून 'अ' तुकडी वरती हेरगिरी करणार्‍या आमच्या हेरांनी तिचे नामकरण करून टाकलेले होते. बाई आल्या आल्या सगळ्यांकडे बघून गोड हसली. आम्ही देखील शक्यतो 'दात काढल्यागत' वाटू नये अशा प्रकारात गोड वगैरे म्हणता येईल अशी स्माईल दिली. बाईने फळा पुसला, मागे वळली आणि शांतपणे तिने आपल्या पर्समधून एक कागद बाहेर काढला. आता बहुदा ओळखीचा कार्यक्रम संपन्न होईल असे वाटत असतानाच बाईने कागदावरील अक्षरे वाचायला सुरुवात केली आणि आम्ही मान खाली घालून मागच्या बाकाकडे कुच केली.

हेडमास्तरांनी बाईला इतक्या तयारीने पाठवले असेल अशी अपेक्षा नव्हती. अर्थात इतक्यातच आमचे नाव इतके दुमदुमले असेल अशी अपेक्षा देखील कुठे होती ? लाजेने आणि दसपट संतापाने आमचे गाल लालेलाल व्हायला हवे होते खरे, पण भावे स्कूलचे विद्यार्थी असल्याने 'निर्लज्जपणाने होत आहे रे, आधी निर्लज्जपणाच पाहिजे' हे आमच्या रक्तात भिनलेले होते. अर्थात अशा प्रकारे झालेली ओळख पुढील 'कारकीर्दीस' घातक असणार हे लक्षात आलेच होते, त्यामुळे पुढील आठवडाभर शक्य ते सर्व सहकार्य आमच्यातर्फे बाईंना पुरवण्यात आले.

लवकरचपुढल्या किंवा मधल्या बाकावरची आमची उपस्थिती मंदाकिनीला खटकेनाशी झाली आणि आम्ही सुटकेचा निःश्वास सोडला. पुढे काही दिवसातच मंदाकिनी जीव तोडून शिकवत असताना तिकडे दुर्लक्ष करून तिचे निरीक्षण करण्यात एक वेगळाच परमानंद मिळतो हा साक्षात्कार आम्हाला झाला आणि आम्ही झपाटून गेलो. दिवसातले सगळे तास हे मंदाकिनीचेच असावेत असे आम्हाला वाटू लागले. मंदाकिनी बोलताना हळूच आपल्याकडे तिरका कटाक्ष टाकते, आपण तिच्याकडे बघताना तिने आपल्याला पकडले की ती हळूच ओठांच्या कोपर्‍यात हसते, बर्‍याचदा मुद्दामच आपल्या बाजूला चकरा मारत हिंडते असे देखील आम्हाला जाणवायला लागले होते. अशातच एके दिवशी आम्ही आमच्याहून थोडे जास्ती विद्वान असलेल्या काही मित्रांच्या गोड बोलण्याला फसून 'प्यासी पडोसन'ला हजेरी लावली आणि आमच्या शिक्षणाला वेगळीच दिशा मिळाली.

'पडोसनच्या' दिव्य साक्षात्कारानंतर आमच्या मेंदूत अनेक उलथा पालथी घडल्या. आता स्त्री ह्या गोष्टीकडे बघण्याची आमची दृष्टीच पूर्णपणे बदलून गेली. मंदाकिनी नुसती सुंदरच नसून 'सुबक' आहे असा नवीन साक्षात्कार आता आम्हाला घडला होता. इतके दिवस बाईने सतत बोलत राहावे, हसत राहावे इ. इ. जे काही आम्हाला वाटायचे त्यात आता बाईने साडी नेसून यावे, बाईच्या हातातील खडू खाली पडावेत इ. विचारांची देखील भर पडायला लागली. अभ्यासाच्या पुस्तकाबाहेरील ज्ञान मिळवण्यासाठी आता आमची धडपड वाढली. मग पडोसनपेक्षाही सुप्पर डुप्पर सिनेमे असतात, श्रीकृष्ण - विजयानंद सारख्या थेटरात कॉलेजच्या कपड्यांवर आणि आयकार्ड शिवाय आत सोडतात, स्वारगेट - डेक्कन सारख्या भागात हैदोस-मदमस्त-रंगेल मैना अशा प्रकारची ज्ञानवर्धक पुस्तके मिळतात ह्यांचा देखील साक्षात्कार झाला. जूही, माधुरी आता बकवास वाटून चित्रपट, कथा सगळ्याच ठिकाणच्या नायिकांच्या जागी मंदाकिनीचा चेहरा येऊ लागला. अशातच एकेदिवशी आमची लॉटरी लागली आणि आम्ही मंदाकिनीच्या घरी तिच्या आग्रहावरून हजेरी लावली.
त्या रविवारी बहुदा काही खास कार्यक्रम असल्याने आमच्या परमपूज्यांच्या शॉपीमध्ये बर्‍यापैकी गर्दी होती. अशातच बॅंकेचे काम अडले आणि ते करण्यासाठी आम्ही दुकानात हजेरी लावली. रविवारी देखील बँक उघडी ठेवायला सुरुवात करणार्‍या बँकांचे आभार. काम संपवून मी दुकानात हजेरी लावली आणि अक्षरश: मंत्रमुग्धच झालो. काउंटरवरती मंदाकिनी गुलाबी शिफॉनची साडी, नेटचा स्लिव्हलेस, ओठांना फिकटशी गुलाबी लिपस्टिक अशा धुंद अवतारात उभी होती. साला आमचा तर एकदम पुतळाच झाला होता. तेवढ्यात तीर्थरूपांनी आमचा जयघोष केला आणि आम्ही काउंटर मागे हजर झालो. मंदाकिनी देखील मला पाहून आश्चर्यचकित झाली. मग आम्ही वडलांना तिची ओळख करून दिली, त्यावर तीर्थरूपांनी 'अरे वा ! ह्या येतात आपल्याकडे नेहमी' इ. इ. सांगत चक्क ५२/- रुपये डिस्काउंट देऊन टाकला. मंदाकिनी खूश झालेली दिसत होती. तेवढ्यातच तिचे सगळे सामान पॅक होऊन आले आणि तिने हसत हसत टाटा केला. अर्थात टाटा करताना ती काहीतरी बोलली देखील, पण आमची ब्रह्मानंदी टाळी लागल्याने ती काय बोलली हे समजण्याच्या आम्ही पलीकडे गेलो होतो.

अचानक गलका ऐकू आला... भानावर येऊन बघतो तो मंदाकिनी बाईंनी दाराच्या नॉबला साडी अडकून सपशेल लोटांगण घातले होते आणि त्यांच्या पिशव्या इतरस्त्र विखुरल्या होत्या. आजूबाजूच्या बायकांच्या मदतीने त्या स्वतःला सावरून कशातरी उभ्या झाल्या. तोवर काही नालायक आणि आगाऊ लोकांनी त्यांचे सामान देखील भरून दिले, त्यामुळे मग नुसतेच मंदाकिनीच्या तोंडाकडे पाहतं उभे राहणेच आमच्या हातात उरले. मंदाकिनीचा पाय बहुदा मुरगाळला असावा, तिच्या चेहर्‍यावरती वेदना जाणवत होत्या. मी पटकन पुढे होऊन तिला आमच्या केबिनमध्ये काहीवेळ आराम करण्यास सुचवले. थोडे आढेवेढे घेऊन ती आली देखील. मग पाऊल शेकायला तिला बर्फ आणून दिला आणि हातासरशी एक लिम्का देखील समोर ठेवला. 'तू खूप कामात नसशील तर मला घरापर्यंत सोडशील ? अरे पटकन मदतीला येईल असे आता घरी कोणीच नाहीये...' मंदाकिनीने विचारले आणि आम्ही एकदम आकाशात विहार करायला लागलो. लगेचच रिक्षा बोलावून आम्ही तिचे सामान आत भरले, तोवर थोडीशी लंगडत ती देखील आत येऊन बसली. शक्यतो मध्ये सुरक्षित अंतर ठेवून आणि नाना कल्पना रंगवत मी तिच्या शेजारी बसलो आणि आमचा प्रवास सुरू झाला....

(क्रमशः)

कथासाहित्यिकमौजमजाप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रकाश१११'s picture

28 Nov 2011 - 3:36 pm | प्रकाश१११

मस्तच लिहिले आहे. वा ..!!
आवडले ........!!

ऋषिकेश's picture

28 Nov 2011 - 3:52 pm | ऋषिकेश

पुढे पुधे पुदे...
छ्या! असं वाचलं की अक्षरंही चुकीची उमट्ताहेत ;)
एक लाळेरं विकत घ्यावं असं काहि लिहिणार आहेस का रे? :P

अत्रुप्त आत्मा's picture

28 Nov 2011 - 4:00 pm | अत्रुप्त आत्मा

पुढे पुधे पुदे...
छ्या! असं वाचलं की अक्षरंही चुकीची ++++++++++++++++++++++ १११११११११११११११११११११११११११ :bigsmile:

@-एक लाळेरं विकत घ्यावं असं काहि लिहिणार आहेस का रे? :-p :-p :-p ख ह प लो

VINODBANKHELE's picture

28 Nov 2011 - 3:54 pm | VINODBANKHELE

आमचा प्रवास सुरू झाला....

प.रा.भाई सुप्पर डुप्पर हिट्ट.....................माल्लीक्काआआआआ व्हनार....................

अत्रुप्त आत्मा's picture

28 Nov 2011 - 3:55 pm | अत्रुप्त आत्मा

मी तिच्या शेजारी बसलो आणि आमचा प्रवास सुरू झाला.... अता 'पुढचा' प्र-वासही लवकर चित्रीत करा ;-)
आपल्या या लेखमालेनी थंडी नसल्याची सगळी कसर भरुन निघणारसे वाटते...वाहव्वा... काळजाला उबारा देणारे मद-मस्त लेखन केल्याबद्दल धण्यवाद...

@- त्यात आता बाईने साडी नेसून यावे, बाईच्या हातातील खडू खाली पडावेत इ. विचारांची देखील भर पडायला लागली.--- :-D क ह र

अवांतर-आपण आमच्या एक गल्ली पलीकडच्या साळत (खरोखर) व्हता काय? आमची ती टीळक रोडची नो इंग्लीस कूल... लै जुन्या आठवणी जाग्या केल्यात राव... येकदम झाक बगा

विनायक प्रभू's picture

28 Nov 2011 - 4:09 pm | विनायक प्रभू

मोकलुनी आस
जाहले उदास

पाषाणभेद's picture

28 Nov 2011 - 4:10 pm | पाषाणभेद

आमच्या प्रकृतीला मानवणारे सुंदर लेखन. पुढले लेखन वेगाने आले पाहिजे हे हक्काचे सांगणे.

पियुशा's picture

28 Nov 2011 - 4:35 pm | पियुशा

भारी लिहलय रे ;)

sagarpdy's picture

28 Nov 2011 - 4:37 pm | sagarpdy

'पडोसनच्या' दिव्य साक्षात्कारानंतर आमच्या मेंदूत अनेक उलथा पालथी घडल्या.

जमलं परा भाऊ! ;-)

छे छे छे काय दिवस आलेत परावर. चक्कं ढिस्क्लेमर टाकावा लागतोय. ;)

पुढे.........(आले लगेच माऊस सरसावून वाचायला. गपा.)?

मनीच्या बाता : गण्या या पर्‍याचे आधीचे क्रमशः पुर्ण झाले काय रे?

सोत्रि's picture

28 Nov 2011 - 8:08 pm | सोत्रि

गण्या या पर्‍याचे आधीचे क्रमशः पुर्ण झाले काय रे

अगदी अगदी....

मनीच्या बाता :

- (ही 'मनी' कोण असा प्रश्न पडलेला ) सोकाजी

प्यारे१'s picture

28 Nov 2011 - 5:08 pm | प्यारे१

शाळा- मिलींद बोकील
.
.
.
.
प्र'शाळा- प्रसाद ताम्हणकर. ;)

सेक्रेटरीयलच्या तासासाठी नवीन नेमणूक झालेल्या 'मंदाकिनीने' आत पाऊल टाकले.
ती सुद्धा 'मंदाकिनी'च होय ! ;)

मंदाकिनी बोलताना हळूच आपल्याकडे तिरका कटाक्ष टाकते, आपण तिच्याकडे बघताना तिने आपल्याला पकडले की ती हळूच ओठांच्या कोपर्‍यात हसते, बर्‍याचदा मुद्दामच आपल्या बाजूला चकरा मारत हिंडते असे देखील आम्हाला जाणवायला लागले होते.
हॅहॅहॅ... भावनाओंको समझो क्या ? ;)

त्यात आता बाईने साडी नेसून यावे, बाईच्या हातातील खडू खाली पडावेत इ. विचारांची देखील भर पडायला लागली.
यालाच क्रियेटिव्ह थिंकींग म्हणतात का रे भाउ ? ;)

आता स्त्री ह्या गोष्टीकडे बघण्याची आमची दृष्टीच पूर्णपणे बदलून गेली. मंदाकिनी नुसती सुंदरच नसून 'सुबक' आहे असा नवीन साक्षात्कार आता आम्हाला घडला होता.
दॄष्टीकोन महत्वाचा हे पुन्हा अधोरेखीत झाले काय ? ;)

काउंटरवरती मंदाकिनी गुलाबी शिफॉनची साडी, नेटचा स्लिव्हलेस, ओठांना फिकटशी गुलाबी लिपस्टिक अशा धुंद अवतारात उभी होती.
परफेक्ट स्ट्रक्चर अ‍ॅनॅलिसीस ! ;)

आमचा प्रवास सुरू झाला....
चांगलय ! गाडीचा गियर पडला म्हणायचं तर ! ;)

(अभ्यासु विद्यार्थी) ;)

माहाशय प्रवासाला गति द्या ! वचतो आहोत.

आदिजोशी's picture

28 Nov 2011 - 6:12 pm | आदिजोशी

हा परा अतिशय हलकट माणूस आहे. लेखमाला अर्धवट सोडून वाचकांना टांगत ठेवायची त्याची सवय माहिती असल्याने शेवटच्या भागावरच प्रतिक्रीया देईन असे म्हणतो.

पाषाणभेद's picture

28 Nov 2011 - 6:39 pm | पाषाणभेद

नक्की नक्की. त्याचप्रमाणे पुढल्या लेखातलं पहिलंच वाक्य "आणि तितक्यात रिक्षाचं मागचं चाक पंक्चर झालं" असं असणार आहे.
अगदी केकताच्या सिरीयल सारखे करतोय. बाकी तुमचेच गुण घेतलेय म्हणा. त्यामुळे कुणाला बोलावे ते समजत नाही. असो. वाचतो बापडा पुढील भाग.

विनायक प्रभू's picture

28 Nov 2011 - 6:27 pm | विनायक प्रभू

अंडर स्टेटमेंट ऑफ द सेंचुरी जोशी बुवा.

स्वाती२'s picture

28 Nov 2011 - 6:31 pm | स्वाती२

पुढे?

मन१'s picture

28 Nov 2011 - 7:15 pm | मन१

प्रतिसादही क्रम्शःच देइन.
तर प्रतिसादाची सुरुवातः-
हा लेख मला....

क्रमशः

मन१'s picture

28 Nov 2011 - 7:15 pm | मन१

प्रतिसादही क्रम्शःच देइन.
तर प्रतिसादाची सुरुवातः-
हा लेख मला....

क्रमशः

प्रचेतस's picture

28 Nov 2011 - 7:16 pm | प्रचेतस

लैच झ्याक लिवलय.
पुढचा भाग येउ द्या मालक आता लवकर.
ते भन्नाट संपवायचं पण मनावर घ्या की आता.

आत्मशून्य's picture

28 Nov 2011 - 7:38 pm | आत्मशून्य

डिस्क्लेमर आवडला. हा भाग म्हणजे सूरूवातीचा शेवट आहे की शेवटाची सूरूवात हे स्पश्ट नसल्याने, पूढील भागाच्या प्रतिक्षेत.

पैसा's picture

28 Nov 2011 - 7:43 pm | पैसा

पुढचा भाग याचवर्षी लिही मग उरलेली प्रतिक्रिया लिहीन!

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Nov 2011 - 7:58 pm | बिपिन कार्यकर्ते

+१

अविनाशकुलकर्णी's picture

28 Nov 2011 - 7:48 pm | अविनाशकुलकर्णी

मस्तच लिहिले आहे. ....परा..
मजा आ गया..................

सोत्रि's picture

28 Nov 2011 - 8:01 pm | सोत्रि

लेख वाचायच्या आधि क्रमशः आहे का ते बघितले, आणि अपेक्षेप्रमाणे ते होतेच.
सबब त्या चक्क्याच्या दह्यासारखे स्वतःला टांगून ठेवायला आवडत नसल्यमुळे लेखमाला सुफळ संपुर्ण होऊ देण्याची वाट बघावी म्हणतोय.

आशा आहे पुढील वर्षापर्यंत पूर्ण होइल ;)

- (भन्न्नाटचा क्रमशः संपण्याची वाट बघणारा) सोकाजी

किसन शिंदे's picture

29 Nov 2011 - 3:00 pm | किसन शिंदे

भन्नाटचा पुढचा भाग वाचण्याच्या प्रतिक्षेत....

प्रतिक्रिया पुढच्या भागाला देईन .. ;-)

सन्जोप राव's picture

28 Nov 2011 - 8:27 pm | सन्जोप राव

सध्या एवढेच.....

रेवती's picture

28 Nov 2011 - 8:29 pm | रेवती

हा हा हा.
काय रे बाबा!
मनातल्या मनात हसत होते.
पुढचे लेखन लवकर कर रे.

चतुरंग's picture

28 Nov 2011 - 8:33 pm | चतुरंग

तू 'सेंट भावे'चंच प्रॉडक्ट असणार ह्याबद्दल तुला भेटताक्षणीच खात्री पटली होती आता तू कबुलीच दिली आहेस! ;)

(अएसोच्याभाफिहाचा)रंगा

सर्वसाक्षी's picture

28 Nov 2011 - 9:26 pm | सर्वसाक्षी

क्रमश: हा शेवटचा शब्द सोडता अत्यंत प्रवाही लेखन.

शिल्पा ब's picture

29 Nov 2011 - 2:57 am | शिल्पा ब

+१

ब्रिटिश टिंग्या's picture

28 Nov 2011 - 10:07 pm | ब्रिटिश टिंग्या

मचाकवरील ष्टुरीचा पहिला भाग वाटतोय! :)

गणपा's picture

29 Nov 2011 - 12:15 am | गणपा

=))
माझ्या मनातला प्रतिसाद टिंग्याने टंकलाच शेवटी...

चिंतामणी's picture

28 Nov 2011 - 11:16 pm | चिंतामणी

च्यायला काही लिहायला घेतलेस की हे पहीले लिहीतोस का???J) J-) :crazy:

मंदाकिनीचं लग्न व्हायच्या आत लिहा पुढचा भाग म्हणजे झालं, लेखाची लिंक शाळेतल्या सगळ्या मित्रांना पाठवली अन आश्चर्य कधी फोन न घेणा-यांनी सुद्धा केले.

लई भारी लई भारी.

प्रीत-मोहर's picture

28 Nov 2011 - 11:24 pm | प्रीत-मोहर

हाहाहा... प्रा काय रे हे....

श्रीरंग's picture

28 Nov 2011 - 11:32 pm | श्रीरंग

क्लास!
आणी सेंट भावेज ला _/\_

श्रावण मोडक's picture

29 Nov 2011 - 2:48 pm | श्रावण मोडक

हं...!
आज सहज हे वाचले. पूर्वीचं कमवा आणि शिका वेगळं असावं. ;)

विलासराव's picture

29 Nov 2011 - 1:10 am | विलासराव

मस्त.

पिवळा डांबिस's picture

29 Nov 2011 - 3:56 am | पिवळा डांबिस

पहिलं घडाभर नमन चांगलं जमलंय. आवडलं!
पुढे येऊ द्या, वाट बघतोय!

लीलाधर's picture

29 Nov 2011 - 8:50 am | लीलाधर

परा ईरादा पक्का मग दे धक्का, कशाला करतोयस विचारांचा चक्का
लवकरच येउंदे तुझा हुकुमाचा एक्का!!

वाचनीय, अप्रतिम :)

राजो's picture

29 Nov 2011 - 9:04 am | राजो

सही!!

हं.... Good Old Days!!!

गवि's picture

29 Nov 2011 - 9:54 am | गवि

.. रिक्षेतून घरी????

अरे वा..

म्हणजे आय मीन, अरे देवा..

....आता????

रिक्षा में शिक्षा..??

चिगो's picture

29 Nov 2011 - 11:57 am | चिगो

>>मंदाकिनीचा पाय बहुदा मुरगाळला असावा, तिच्या चेहर्‍यावरती वेदना जाणवत होत्या. मी पटकन पुढे होऊन तिला आमच्या केबिनमध्ये काहीवेळ आराम करण्यास सुचवले.

उल्लेख केलेल्या हैदोस टायपातल्या पुस्तकांची इष्टाईल हा भाऊ.. ;-)

>> 'तू खूप कामात नसशील तर मला घरापर्यंत सोडशील ? अरे पटकन मदतीला येईल असे आता घरी कोणीच नाहीये...' मंदाकिनीने विचारले

आयला !! येकदम झक्कास..

>>नाना कल्पना रंगवत मी तिच्या शेजारी बसलो आणि आमचा प्रवास सुरू झाला....

लौकर लिवा पुढचं.. उगा आमच्या कल्पना (अ)शक्तीला ताण नको.. ;-)

किचेन's picture

29 Nov 2011 - 2:39 pm | किचेन

आमचे बंधुराजाही भावे हायस्कूल मध्येच होते.एकदा शाळेच्या बाहेर तीर्थरूपांनी तुमच्यासारख्या अनेक पोरांना टपोरीपणा करताना बघितले आणि आधीच काळजी घेतलेली बरी ह्या विचाराने तीर्थरुपानी त्यांची हि शाळा बदलून पाचगणीमध्ये वसतिगृहात टाकले. त्यांचा हा निर्णय तेव्हा पटला नव्हता,आत्ता पटला.कारण बंधुराजाही तुमच्यासारखेच अ,ब,क,ड,ई,फ,ग,.... यांमध्ये सगळ्यात शेवटची येईल अशा तुकडीत होते!

मृत्युन्जय's picture

29 Nov 2011 - 3:24 pm | मृत्युन्जय

लै "भन्नाट" लिहिले आहे रे.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

29 Nov 2011 - 3:47 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

आधीचे संपवून नविन लिखाण प्रकाशित करावे असा नियम मिपा वर असायला हवा. :(

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

29 Nov 2011 - 3:49 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

काय त्रास आहे राव!! उंदराला एकदा टिचकी दिली तर दोन वेळा टचकला!!
असो.
ते भन्नाटच बघा लवकर!!

आठवड्याभरातच LIC बॅचच्या मुली पाहून स्वतःचाच विमा उतरवायला लागतो का काय अशी शंका यायला लागली.

बेस्ट! मला आमच्या विमा एजंट डोळ्यासमोर आल्या!

प्रभो's picture

29 Nov 2011 - 8:27 pm | प्रभो

लवकर लिही बे पुढचा भाग..

डिस्क्लेमर :- ह्या कथेतील स्थलकालाचे वर्णन, पात्रे ही काल्पनिक असून निव्वळ कथेमध्ये रंग भरण्यासाठी वापरली आहेत. ह्या वर्णनाचे कुठल्याही स्थलकालाशी, व्यक्तींशी साम्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.)

अरेच्या म्हणजे हे सर्व स्वप्नरंजन आहे का योगायोग ?
असो पराशेठ शाळेपासूनच तुमची प्रगती अगदी वाखाणण्याजोगी हो !

मोहनराव's picture

30 Nov 2011 - 2:09 pm | मोहनराव

पराशेठ यु आर सिंपली ग्रेट!!

सुहास..'s picture

30 Nov 2011 - 8:13 pm | सुहास..

काय रे हे !

पुणेरी मोड >> कुमारवयामध्ये मध्ये उधळलेले रंग सार्वजनिक ठिकाणी सांगत फिरतात का ? <<< ;)

(अवांतर : लई भयानक जोक असणार आहे लेखात ;) )

अभिज्ञ's picture

1 Dec 2011 - 11:30 am | अभिज्ञ

../\..
भन्नाट लिवलेय मालक.
शीर्षकावरून वाटले होते कि प-याने एखाद्या लावणीचे रसग्रहण वगैरे केले असावे.
;)

अभिज्ञ

धमाल मुलगा's picture

1 Dec 2011 - 11:36 am | धमाल मुलगा

परा'जी,
तुमच्यामध्ये दडलेला प्रतिथयश लेखक झळकतो आहे ह्या कथेमधून. कथेचं नावही मोठं दिलखेचकच. किस्से भारी रंगणार ह्याची खात्रीच वाटते हों.

स्वगतः तिच्यायला, ब्र्यांच कोणतीही असो, मएसोचे पासाउट बराब्बर ओळखता येतात साले. ;)