खळखळणारे पाणी भिडे कातळाला
सांगे गुज मनीचे त्या स्थितप्रज्ञाला
तोही मग हलकेच घेई कवेत त्याला
पाणीही मग सरसावे आलिंगनाला
हळुवार बोलणे त्यांचे वाटे खळाळता झरा
शुभ्र लाटाही मग उठाती त्यांच्या साथीला
चाले संवाद त्यांचा क्षणोक्षणी, दर एक ऋतूत
निसर्गही मग देई दाद त्यांच्या मैत्रीला
प्रतिक्रिया
23 Nov 2011 - 11:58 am | मिसळलेला काव्यप्रेमी
..........
23 Nov 2011 - 12:07 pm | सुहास झेले
सुंदर...
एक विनंती - कविता/लेख पोस्ट करताना मध्ये दोन - चार दिवसांचे अंतर ठेवले तर बर् होईल....नाहीतर बाकी धागे दुर्लक्षित होतात. धन्यवाद :)
23 Nov 2011 - 5:01 pm | पियुशा
अर्र............
ताई ,माई, अक्का जरा उसन्त द्या की १-२ दिवसाची !
सगळ एक साथ ,कमाल आहे ब्वॉ तुमची ;)
कविता छान :)
23 Nov 2011 - 7:26 pm | प्रभाकर पेठकर
हया
प्रेमकाव्य, कविता, शृंगार प्रकारात प्रकाशित झालेल्या कवितेत लग्ना आधीच
निसर्गही मग देई दाद त्यांच्या मैत्रीला
म्हणजे परिस्थिती फार बिकट होऊन जाईल की.
24 Nov 2011 - 8:56 am | विदेश
कवितेतील हलकं प्रेम आणि हळुवार शृंगार आवडला.