"
चंद्रकांत तुकाराम कुंजीर (वय 51, रा. भारती विद्यापीठामागे, कात्रज) हे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. 2004 मध्ये याच महाविद्यालयातून पदवी घेऊन बाहेर पडलेल्या एका विद्यार्थिनीशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. एका खासगी कंपनीत नोकरीस असलेली ही तीस वर्षीय तरुणी सप्तरंग आकाश, भेकराईनगर, फुरसुंगी येथे राहते. कुंजीर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडल्यामुळे तिने टेस्ट ट्यूब बेबी तंत्राद्वारे त्यांच्या मुलाची कुमारी माता होण्याची इच्छा व्यक्त केली. कुंजीर व तरुणीच्या नातेवाइकांनी समजूत काढूनसुद्धा ती बधली नाही. ऐकले नाही तर बदनामी करीन किंवा स्वतःचे बरेवाईट करण्याच्या धमक्या तिने दिल्या. त्यामुळे कुंजीर तयार झाले. लक्ष्मी रस्त्यावरील एका रुग्णालयात झालेल्या प्रक्रियेअंती ती गरोदर राहिली. पण या बाबीला कुंजीर यांच्या कुटुंबीयांचा विरोध होता. अशातच ती तरुणी पडल्याने गर्भपात झाला. कुंजीर व त्यांच्या नातेवाइकांनी मारहाण केल्यामुळे गर्भपात झाल्याची फिर्याद तिने दिली. त्यानंतरही तिने त्रास देणे सुरूच ठेवले. तिने फ्लॅटची मागणी केल्यामुळे तिला फ्लॅट घेऊन दिला. धमक्यांना घाबरून पुन्हा या प्रक्रियेसाठी मदत केली. या वेळी तिने स्वतःचे नाव शीतल चंद्रकांत कुंजीर असे नोंदविले. पण ही गर्भधारणाही टिकली नाही. पुन्हा अशीच प्रक्रिया करण्याची मागणी केल्यानंतर नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या या तरुणीने त्यांच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात मारहाणीची फिर्याद दिली. यामध्ये कुंजीर यांना अटक झाली. दरम्याच्या काळात तिने कुंजीरऐवजी दुसऱ्याच पुरुषाची मदत घेतली आणि तेच कुंजीर आहेत, असे भासवून डेक्कन येथील रुग्णालयात पूर्वीच्या प्रक्रियेच्या वेळी घेतलेले कुंजीर यांचे वीर्य घेऊन ही प्रक्रिया पूर्ण करून घेतली. ही बाब लक्षात आल्यानंतर कुंजीर यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी या तरुणीविरुद्ध फसवणुकीचा, तसेच बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ती काम करीत असलेल्या कंपनीत तिला अटक करण्यासाठी पोलिस गेले असता ती फरारी झाल्याचे आढळून आले.
प्रतिक्रिया
8 Nov 2011 - 11:57 pm | नर्मदेतला गोटा
वर्तमानपत्रामधील बातमीवरून
http://www.esakal.com/esakal/20111108/5462120897906034687.htm
8 Nov 2011 - 11:54 pm | यकु
बर.
मग आपण सगळ्यांनी मिळून आता काय करायला पाहिजे असं म्हणता?
9 Nov 2011 - 12:15 am | धन्या
पत्रकार,
अहो असं बोलायचं नसतं. अशाने नविन होतकरु लेखक नाउमेद होउन जातात. ;)
9 Nov 2011 - 12:23 am | ५० फक्त
@ यशवंत एकनाथ, असं ओ काय, तुमचिच स्वाक्षरी बघा ना
जस्ट फिल दि लाईन्स - इट्स अबाऊट लाईफ.
@ धना, हो आणि होतकरु पालक सुद्धा.
9 Nov 2011 - 12:53 am | पिवळा डांबिस
कदाचित लेखकाला,
"मिपाकरांनो सावधान! आपापले लंगोट घट्ट कसून ठेवा!!"
असा संदेश द्यायचा असेल!!!!
:)
9 Nov 2011 - 9:39 am | वपाडाव
अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापकाची भुमिका....
काय म्हंता.....
9 Nov 2011 - 9:44 am | मदनबाण
अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापकाची भुमिका....
हॅहॅहॅ... बरोबर रे वड्या. ;)
सोबत घरगुती शिकवणी सुद्धा घ्यावी ! म्हणजे जास्त लक्ष देउन अभ्यास घेता येईल.
(कर्नल ज्युलीअस नगेंद्रनाथ विल्फ्रेड सिंग) ;)
9 Nov 2011 - 10:05 am | वपाडाव
तरीच म्हणलं तुला इतक्या जाड भिंगाचा चष्मा कसा काय लागला तो?
9 Nov 2011 - 10:11 am | मदनबाण
तरीच म्हणलं तुला इतक्या जाड भिंगाचा चष्मा कसा काय लागला तो?
हे स्व:अनुभवाचे बोल आहेत काय ? ;)
9 Nov 2011 - 10:27 am | ५० फक्त
अरे टेस्ट ट्युबची साईज ती काय असते आता त्यात असले प्रयोग करायचे म्हणजे चष्मा लागणारच की.
9 Nov 2011 - 10:36 am | मदनबाण
अरे टेस्ट ट्युबची साईज ती काय असते आता त्यात असले प्रयोग करायचे म्हणजे चष्मा लागणारच की.
हॅहॅहॅ...तू टेस्ट ट्युब बेबी पाहतोयस होय ! मला वाटल... असो. ;)
तसेही घरगुती शिकवणी घेताना,जवळुन शिकवता येत असल्याने,नंबर वाढण्या पेक्षा कमी व्ह्यायला हवा ना ! ;)
जे पाहायला हवे ते तू पाहत नाहीस आणि उगाच आपलं नंबर वाढण्याची चिंता करतोयस... ;)
9 Nov 2011 - 11:11 am | वपाडाव
काय रे..... जवळचा चष्मा नाही लागत का लोकांना.... का फक्त दुरचाच लागतो.....
का तुला दुरुन 'डोंगर' साजरे आहेत ??
9 Nov 2011 - 11:17 am | मदनबाण
काय रे..... जवळचा चष्मा नाही लागत का लोकांना.... का फक्त दुरचाच लागतो.....
का तुला दुरुन 'डोंगर' साजरे आहेत ??
वड्या आधी काय बघायचे ते नीट ठरव ! नंतर चष्म्याचा विचार कर हो... ;)
नाहीतर लांबचा जवळचा करण्यातच वेळ जायचा आणि अभ्यास काही व्ह्यायचा नाही. ;)
9 Nov 2011 - 10:16 am | चिरोटा
प्राध्यापक्,विद्यार्थिनींची झेंगाटे पूर्वीपासून आहेत. सहसा दोन्ही बाजू 'शांत' झाल्या की झेंगाट मिटते. पण ही केस जरा अतीच आहे.
9 Nov 2011 - 11:50 am | गवि
१) कुंजीर यांच्यात न्यूटन डार्विन पातळीचे असे काय गुण आहेत की त्यांचा अनुवंश घेऊन मूल व्हावे अशी इच्छा आहे?
२) मूल हवेच तर "टेस्ट ट्यूब" पद्धतीचा आग्रह का?
धन्यवाद
16 Nov 2011 - 10:28 pm | नर्मदेतला गोटा
" कुंजीर यांच्यात न्यूटन डार्विन पातळीचे असे काय गुण आहेत की त्यांचा अनुवंश घेऊन मूल व्हावे अशी इच्छा आहे?"
खरा मुद्दा आहे
"मूल हवेच तर "टेस्ट ट्यूब" पद्धतीचा आग्रह का?" ++++++१११११
16 Nov 2011 - 11:00 pm | आत्मशून्य
.