पल पल दिल के पास.... एक स्वर्गीय अनुभव

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
29 Sep 2011 - 4:12 pm

पल पल दिल के पास! स्वर्गीय आनंद!!! इथे

सुरवातीचे गिटार व अकॉर्डीयनने गाण्याची एन्ट्री तर फारच रंगली आहे.
मोहक राखी अन् भावूक धर्मेंदर!
त्या सिनेमाचे एक आणखी वैशिष्ठ्य- त्यातील धर्मेदरचे विविध ड्रेसेस. त्यात तो फारच रुबाबदार वाटतो.
"हर रात यादों की बारात ले आए। " म्हणताना त्याच्या लांब कॉलरच्या रंगीत शर्टात.... वा वा.
गाण्याची माधुरी त्यातील मधील व्हायोलिन व ड्रम वरील ठेकावाले सेंटर पीसेसनी जास्त वाढते.
त्या काळातील माझे लांब कॉलरचे, प्रिंटेड डिजाईनचे शर्ट मला त्या वर्षांतील आठवणींना "एक मेहका मेहका सा पैगाम" देत उजाळा देतात.
एव्हर ग्रीन गाण्यात उदासी मूड क्षणात बदलायचे विलक्षण सामर्थ्य आहे.

शशिकांत ओक

संगीतप्रेमकाव्यमौजमजाचित्रपटआस्वाद

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

29 Sep 2011 - 6:35 pm | नितिन थत्ते

सहमत आहे.

धन्या's picture

29 Sep 2011 - 6:39 pm | धन्या

किती अपेक्षेनं धागा उघडला होता... :(

का कोण जाणे शाळेच्या दिवसांमध्ये वाचलेल्या गोनिदांच्या "मोगरा फुलला" या संत ज्ञानेश्वरांच्या जीवनावरील कादंबरीतील एक वाक्य कायम आठवते - अपेक्षा फार नसल्या म्हणजे अपेक्षाभंगाचं दु:ख सहन करावं लागत नाही. ;)

पांथस्थ's picture

29 Sep 2011 - 9:19 pm | पांथस्थ

किती अपेक्षेनं धागा उघडला होता...

खरं आहे.

कधी कधी अस होतं की एखाद गाणं ऐकुन मन उल्हासित होतं, गतकाळच्या रम्यं आठवणी दाटुन येतात. पण लिहायला गेल्यावर ते सगळं तेव्हढ्या जोमाने उतरत नाही.

लगता है गाना सुनके ओकसाब दुसरी दुनियामे खो गये है :)

५० फक्त's picture

29 Sep 2011 - 7:07 pm | ५० फक्त

''त्या काळातील माझे लांब कॉलरचे, प्रिंटेड डिजाईनचे शर्ट मला त्या वर्षांतील आठवणींन'''' साहेब असला एखादा फोटो टाका की तुमचा,

प्रास's picture

29 Sep 2011 - 7:55 pm | प्रास

ओककाका,

अगदी अगदी.... तसा एखादा फोटो टाकाच.

:-)

प्रास आणि हर्षद भौ,
आपली फरमाईश कळली . त्यावेळच्या फोटोचे अलबम हवाईदलातील पोस्टींगच्या धबडग्यात खराब झाले. लांब कॉलरचा एक मिळाला पण त्यातील

लांब कॉलर मधील  शशिकांत

लांबी नीट कळत नाही तरीही डकवतो. पहा. नीट दिसत नाही म्हणून नका इतकेच.

प्रास's picture

29 Sep 2011 - 9:18 pm | प्रास

लांब कॉलर दिसली.

भारी आहे हं एकदम तुमचा फोटो....!

:-)

फर्माईश इतक्या तातडीने पूर्ण करण्याबद्दल धन्यवाद!

:-)

पांथस्थ's picture

29 Sep 2011 - 9:23 pm | पांथस्थ

मला वाटलं "महेका महेका पैगाम" आहे तर फोटोत एखादि दुसरी व्यक्ती देखील असेल... :)

बाकी आमच्याकडे लांब कॉलरवाले शर्ट नसले तरी ह्या गाण्याच्या आठवणी मेहक्या मेहक्याच आहेत...गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ;) ....

आपली फरमाईश कळली .

काय बाबा एक एक फरमाईश करतात लोक. म्हणे तुमचा असा असा फोटो दाखवा. ;)

धन्य, धनाजी,

काय बाबा एक एक फरमाईश करतात लोक

आपला पण येऊ दे ना खास पोझमधला एखादा फोटू...
मी तर बाबा आपुलकीने करतोय फरमाईश... वाकड्यात न शिरता....

धन्य, धनाजी,

काय बाबा एक एक फरमाईश करतात लोक

आपला पण येऊ दे ना खास पोझमधला एखादा फोटू...
मी तर बाबा आपुलकीने करतोय फरमाईश... वाकड्यात न शिरता....

५० फक्त's picture

30 Sep 2011 - 8:01 am | ५० फक्त

ओकसर, धनाजीचे जाम भारि स्टाइलमधले फोटो आहेत, त्याला हो म्हणुदे फक्त मि विशिष्ट आयडिला सांगतोच लगेच टाकायला

प्रचेतस's picture

30 Sep 2011 - 8:43 am | प्रचेतस

लै भारी स्टाईलबाज फटू हैत. धनाजीराव हो म्हणाले तर लगेच फोटू टाकतील काही विशिष्ट आयडी.

मृगनयनी's picture

30 Sep 2011 - 10:18 am | मृगनयनी

शशिकान्त'जी खूपच हॅन्डसम दिसता तुम्ही वरच्या फोटोत !!. :)

त्याचबरोबर लेखासाठी नेहमीच्या आपल्या विषयापेक्षा खूपच हल्काफुल्का विषय निवडल्याबद्दल अभिनन्दन!!!..:)

छान वाटले...... :) :) :)

धन्या's picture

30 Sep 2011 - 10:25 am | धन्या

ओक सर भवसागर तरुन गेलेत. आम्ही अजून किनार्‍यावरच आहोत. स्टाईलबाज फोटो असे सार्वजनिक मंचावर टाकले तर आम्हाला कुणी नावेत घेईल का ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Sep 2011 - 11:22 am | बिपिन कार्यकर्ते

तुम्हाला नावेत जायचे आहे की कवेत ते आधी एकदा ठरवा!

प्रास's picture

30 Sep 2011 - 12:53 pm | प्रास

तंतोतंत सहमत.....

धनाजीराव,

विच्छा सर्वांची पुरी करा!

:-)

आम्हाला नावेत बसून, कुणा कन्येला कवेत घेऊन पल पल दिलके पास राहायला आवडेल. परंतू सर्वांची विच्छा पुरी करणे शक्य नाही ;)

मृगनयनी's picture

30 Sep 2011 - 11:59 am | मृगनयनी

धनाजीराव, प्रत्येकाची नाव वेगळी असते हो!!!!... ;) ;)

आणि शशिकान्त'जीन्च्या पाठी या जन्मीचे प्लस मागच्या जन्मीचे पुण्य असल्याने त्यान्ची नाव सुखरुप भवसागर तरुन गेली...

तुमची नाव कशी तरणार.. असा प्रश्न पडला असेल.. तर तुम्ही तुमची नाडीपट्टी बघा... :)

धन्या's picture

30 Sep 2011 - 1:38 pm | धन्या

तुमची नाव कशी तरणार.. असा प्रश्न पडला असेल.. तर तुम्ही तुमची नाडी(पट्टी) बघा...

इल्यास्टीकच्या नाडया नाव पैलतीराला ओढून नेण्याइतपत मजबूत नसतात.

मृगनयनीजी ,
फोटोत तसा दिसत होतो. आताचे ध्यान आगळे आहे....
नाडीवरील नवधागा आपल्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत....

वाहीदा's picture

1 Oct 2011 - 12:36 pm | वाहीदा

Wow ! you really look handsome ! धर्मेंद्र चा प्रभाव आहे का अजूनही तुमच्यावर ? :-)
मला ही वाटले होते तुमच्या सौ. ,यांचा ही फोटो असेल बरोबर ...
असो,
धाग्यात तुम्ही या गाण्याचे रसग्रहण कराल अशी माफक अपेक्षा होती ती पूर्ण करणार का ? काही नाहीतर राखीच्या सुंदर Dreamy डोळ्यांबध्दल तरी लिहा , ती उडणार्‍या प्रत्रां पाठी, पत्रांसह कशी धावते ते तरी लिहा काही नाहीतर तो मधून मधून डोकावणार्‍या धर्मेंद्र बध्द्ल तरी काही ओळी खरडा सर !

शशिकांत ओक's picture

1 Oct 2011 - 1:09 pm | शशिकांत ओक

वाहीदा,
अग चित्रफीतीत राखी-धर्मेंदरला पहातानाचा आनंद - डोळ्यांची मेजवानी तर गीतातील स्वरमधुर्य कानांना मिळत असताना शब्दांनी कुरवाळाचे टाळले.
तो फोटो पत्नी समावेतच होता. त्यातील माझ्या कॉलरसाठीचा भाग तेवढाच दर्शवला इतकेच.

चेतन सुभाष गुगळे's picture

1 Oct 2011 - 1:21 pm | चेतन सुभाष गुगळे

ओक सर,

तुम्ही धर्मेंद्रचे फॅन आहात का? असल्यास मला एक मदत करू शकाल काय? मला धर्मेंद्रचा "गंगा की लहरें" हा चित्रपट फार आवडला होता. पुन्हा पाहायची इच्छा आहे. टोरंट किंवा ऑनलाईन वॉचींग उपलब्ध असल्यास त्याची लिंक देऊ शकाल काय?

धन्या's picture

2 Oct 2011 - 1:38 am | धन्या

खिक !!!

स्मिता.'s picture

1 Oct 2011 - 1:21 pm | स्मिता.

धाग्यात तुम्ही या गाण्याचे रसग्रहण कराल अशी माफक अपेक्षा होती ती पूर्ण करणार का?

या विनंतीला माझेही अनुमोदन. खरंच कुणा जाणकारानं या गाण्याचं रसग्रहण केलेलं आवडेल. परवा हे गाणं पाहिलं आणि त्यातले राखीचे भाव बघून पूर्ण चित्रपट बघायची इच्छा झाली.
(मात्र काल चित्रपट पाहून त्यात राखी आणि २ गाण्यांशिवाय काहीच आवडले नाही :( )

तस सिनेमांच्या बाबतीत माझे ज्ञान कमी आहे. पण गाणी आवडतात. हे गाणेही सुंदरच आहे.

स्वानन्द's picture

1 Oct 2011 - 3:23 pm | स्वानन्द

माझ्या पण अगदी आवडीचे गाणे. अर्थात बी४यु वर गाण्याचा व्हिडीओ पण पाहिला आहे.. पण गाणे ऐकताना सतत डोळ्यासमोर आला नाही तरी गाण्याची गोडी काही कमी होत नाहीच... सुंदर गाणे!!

प्रकाश घाटपांडे's picture

1 Oct 2011 - 3:50 pm | प्रकाश घाटपांडे

आम्हाला अगोदर वाटले की पल्स पल्स दिल के पास तुम रहेती हो हे नाडीला उद्देशून आहे की काय!
त्याच काय हाय की क्वाँची पल्स कोन्ला कुड लागन काय सांगता यायनी ब्वॉ!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Oct 2011 - 8:54 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>> आम्हाला अगोदर वाटले की पल्स पल्स दिल के पास तुम रहेती हो हे नाडीला उद्देशून आहे की काय !

हाहाहाहा......

-दिलीप बिरुटे

चित्रगुप्त's picture

3 Oct 2011 - 1:49 am | चित्रगुप्त

पल्स पल्स हे अनेकवचन झाले, ज्याचा मराठी तर्जुमा नाड्या नाड्या असा.

त्यामुळे पल पल याचा तर्जुमा नाडी नाडी असा.

नको तिथे ओकांची नाडी खेचल्याबद्दल प्रायश्चित्त म्हणून नाडी काढवून त्यात सांगितलेली प्रयश्चित्त कृत्ये यथासांग करावीत.

नितिन थत्ते's picture

3 Oct 2011 - 7:39 am | नितिन थत्ते

प्रायश्चित्त म्हणून लेंग्यातली नाडी काढून परत घालणे. असे १०८ वेळा करणे.

पांथस्थ's picture

3 Oct 2011 - 4:50 pm | पांथस्थ

कुणाच्या?? ;-)

शशिकांत ओक's picture

3 Oct 2011 - 10:32 pm | शशिकांत ओक

मित्रांनो,

यमराज्यातील चित्रगुप्तांनी दिलेला निवाडा पाळला नाही तर काय काय अद्दल घडेल याची जाणीव ठेऊन....

प्रायश्चित्त कृत्ये यथासांग करावीत.

इति पल पल नाडीचा आनंद लुटणारा.

अप्पा जोगळेकर's picture

1 Oct 2011 - 3:52 pm | अप्पा जोगळेकर

गाणं सुंदर आहे याच्याशी पूर्ण सहमत.
राखी बद्दल काहीसे वेगळे मत आहे.
या हिरॉईनचं नाव काढल की 'विशंबर, मेरे बेटे आएंगे' हा डोक्यात जाणारा एकच ड्वायलाक आठवतो.

स्वानन्द's picture

1 Oct 2011 - 3:57 pm | स्वानन्द

>>या हिरॉईनचं नाव काढल की 'विशंबर, मेरे बेटे आएंगे' हा डोक्यात जाणारा एकच ड्वायलाक आठवतो.

:D "आयेंगे.. मेरे करन अर्जुन आएंगे" 'आएंगे' म्हणण्याची श्टाईल तर लाजवाब :D

विसोबा खेचर's picture

4 Oct 2011 - 3:20 pm | विसोबा खेचर

शशिकांता, छान रे..!

(तुझा फ्यॅन) तात्या.

तात्या ,
बऱ्याच दिवसांनी आपला दिलासा देणारा प्रतिसाद आलाय. धन्यवाद.
आजची राखी पुर्वीच्या राखीची राख आहे अशी गुलज़ारची गुजा़रिश आहे म्हणे...
तर दातांच्या कवळीमुळे धर्मेंदरचा चेहरा-मोहरा पार बदला आहे. अशी हेमाची तक्रार आहे म्हणे...
आता आपणच निकाल द्यावा...

शरभ's picture

4 Oct 2011 - 6:25 pm | शरभ

खरच भुतकाळात जायचा सोप्पा उपाय म्हणजे गाणी...