"मी लहान असताना घरासमोरून जाणाऱ्या रस्त्यावरच्या गाड्याना पाहून एक दिवस कुणी तरी गाडी थांबवून उतरणारी व्यक्ति माझे वडिल व्हावेत अशी मी उगाचच कल्पना करीत रहायचो. परंतु ती कल्पना कधीच सत्यात उतरलं नाही."
मधूकर सामंतांच्या घरी एकदा रवीवारी त्यांना भेटायला आणि गप्पा गोष्टी करायला म्हणून गेलो असता,त्यांचा एक विद्दार्थी त्यांना भेटायला म्हणून आला होता.माझी त्याच्याशी ओळख झाल्यावर मी त्याला असंच कधी तरी माझ्या घरी जेवायला बोलवलं होतं.
देव,धर्म,श्रद्धा,आध्यात्म ह्या विषयावर त्याचा गाढा अभ्यास होता.त्याने त्याच्या डॉक्टरेटचा प्रबंध ह्याच विषयावर अभ्यासला होता.
"तुझा देवाच्या अस्थित्वार विश्वास आहे की नाही"
असा त्याला सरळ प्रश्न करून त्याचा विचार समजून घ्यायला मी थोडा उत्सुक्त होतो.
तो मला म्हणाला,
"माझा देवाच्या अस्थित्वावर विश्वास आहे.माझी आई मला लहान असताना त्या आसमंतातल्या अगाध शक्ति बद्दल-जी नेहमीच होती आणि नेहमीच असणार- असं वर्णन करून सांगायची त्या देवावर नव्हे.
मी चार वर्षाचा असताना माझे वडील रागाने घरातून निघून गेले त्यावेळी मला ज्याने आपल्या कवेत घेवून समजावून सांगितलं त्या देवावर माझा विश्वास आहे.
घरात अन्नाचा कणही नसताना, पांघरायला गोधडी नसताना, आई चूल पेटवण्याच्या परिस्थितीत नसताना,ज्याने चतकोर भाकरी दिली रहायला आसरा दिला आणि धीर दिला त्या देवावर माझा विश्वास आहे.
ज्यावेळी माझी आई पण खंगून खंगून मृत पावली,अशावेळी मी जेव्हा पोरका झालो त्यावेळी मला जवळ घेवून माझी समजूत घालून मला कानात सांगितलं "सर्व काही ठीक होणार.काळजी करू नको"
ज्यावळी मला आदर दाखवून "बाळा" असं म्हटलं,त्या देवावर माझा विश्वास आहे.
ज्या देवाने त्याच्या अस्थित्वा बद्दल माझ्या अंतरात विश्वास निर्माण केला.थंडी वाऱ्या पासून माझं संरक्षण केलं,ज्याच्या आवाजाने माझ्या जीवनात आलेल्या घनघोर वादळात मी यकःश्चीत आहे असं सांगितलं जाताना,
" नाही,तसं नाही तू पण काहीतरी आहेस "
असं सांगून ज्याने मला दिलासा दिला,मला ज्याने जन्म दिला,ज्याचं नांव मी लावतो,तो मला सोडून गेल्यावर,
"तू माझाच आहेस"
असं म्हणून मला जगण्याचा दिलासा दिला.त्या देवाचं अस्थित्व मी मानतो.
एखाद्दाचे वडिल त्या मुलाचा हात हातात घेवून फिरायला जाताना पाहून मला त्यांचा हेवा वाटतो.त्या वडिल-मुलांमधल्या होणाऱ्या पक्षी,झाडं,फूलं फूलपाखारं ह्यांच्या चर्चे बद्दल किंवा कसलीच चर्चा न करता अगदी जवळून चालताना एकमेकाचा श्वासाचा भास होईल इतकं जवळून चालताना,एकमेकाच्या हृदयाचे ठोके ऐकू येतील इतकं जवळून चालताना पाहून सुद्धा हेवा वाटतो.
मी लहान असताना घरासमोरून जाणाऱ्या रस्त्यावरच्या गाड्याना पाहून एक दिवस कुणी तरी गाडी थांबवून उतरणारी व्यक्ति माझे वडिल व्हावेत अशी मी उगाचच कल्पना करीत रहायचो. परंतु ती कल्पना कधीच सत्यात उतरलं नाही.
मी अठरा वयाचा असताना मला आठवतं माझ्या डोळ्यात एक ही टीप न आणता अपघातात निर्वतलेल्या माझ्या वडिलांचं प्रेत पहात उभा होतो. मला कित्येक वर्ष पोरका करून एका निश्चल दुःखात टाकून ते निघून गेले होते.
अनेक वर्षा नंतर मी घरात टांगलेल्या वडिलांच्या तस्विरी समोर उभा राहून गेली कित्येक वर्षे त्यांच्याशी होवू घातलेला पण न झालेला संवाद करण्यासाठी आज माझ्या डोळ्यातून घळघळा वहाणारे अश्रू न रोखता जणू सांगत होतो की मी आता एक उमदा तरूण झालो असून माझ्या आयुष्यात त्यानी असायला हवं होतं ह्याची मी किती आतुरतेने इच्छा करत होतो.पण आता मला कळून चुकलं होतं की त्यांच्या गैरहजेरीची पोकळी देवाच्या अस्थित्वाच्या मानण्याने भरून निघाली होती."
हे सर्व ऐकून मी त्याल म्हणालो,
"खरंच एखादा देवा बद्दल असा पण विचार करू शकतो.हे तुझं ऐकून त्या देवाच्याच माणसाला असाही विचार करू देण्याच्या ह्या देवाच्याच देणगीचं कौतुक केलं पाहिजे"
श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रिया
7 Jul 2008 - 12:38 am | अभिषेक पटवर्धन
वाह, वाचुन मन अगदी भरून आलय. असच लिहित रहा.
7 Jul 2008 - 9:50 pm | श्रीकृष्ण सामंत
आपल्याला आनंद झाला हे वाचून मला बरं वाटलं
आपल्या सर्वांना आनंद होईल असं लेखन करायचा मी नक्कीच प्रयत्न करीन
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
7 Jul 2008 - 1:24 am | प्राजु
आई नेहमीच सांगते... मानलं तर सगळंच आहे नाहीतर काहीच नाही". हा शेवटी श्रद्धेचा भाग आहे. माणसांतला देव शोधणं मला आवडतं आणि प्रयत्नही तसाच असतो.... एखाद्या शेंदूर फासलेल्या केशरी दगडासमोर हात जोडण्यापेक्षा मला वेळोवेळी मदत करणारा, मार्ग दाखवणारा आणि प्रसंगी माझा आत्मविश्वास वाढवणारा तो/ती.. माझ्यासाठी देवच आहे.
लेख आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
7 Jul 2008 - 10:05 am | II राजे II (not verified)
एखाद्या शेंदूर फासलेल्या केशरी दगडासमोर हात जोडण्यापेक्षा मला वेळोवेळी मदत करणारा, मार्ग दाखवणारा आणि प्रसंगी माझा आत्मविश्वास वाढवणारा तो/ती.. माझ्यासाठी देवच आहे.
अगदी हेच म्हणतो .....
मालिक की मेहर !
राज जैन
येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता
7 Jul 2008 - 9:53 pm | श्रीकृष्ण सामंत
आपलं म्हणणं पटण्या सारखं आहे
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
7 Jul 2008 - 9:45 pm | श्रीकृष्ण सामंत
आपल्याला माझा लेख आवडला हे वाचून बरं वाटलं.
आपल्या आईचं म्हणणं अगदी बरोबर आहे.हा श्रद्धेचा भाग आहे यात वाद नाही.मला असं वाटतं आपल्या सभोवती देवभोळे लोक असल्याने मुर्ती पूजेच्या संदर्भातून भक्तिभाव वाढवावा-मग शेंदूर फासून दगड ठेवून सुद्धा- उद्देश साध्य करायचा भाबडा प्रयत्न असावा.पण नंतर नंतर अतिच होऊ लागल्याने संताना सुद्धा माणसातला खरा देव समजावून सांगावा लागला.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
7 Jul 2008 - 7:46 pm | प्रकाश घाटपांडे
श्रद्धा ही माणसाला जगायच बळ देते हे आम्ही मानतोच.
प्रकाश घाटपांडे
7 Jul 2008 - 9:46 pm | श्रीकृष्ण सामंत
आपल्याशी मी पूर्ण सहमत आहे
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
9 Jul 2008 - 9:21 am | विसोबा खेचर
श्रद्धेशिवाय जगणं मुश्कील आहे!
आपला,
(श्रद्धाळू) तात्या.
9 Jul 2008 - 10:29 am | श्रीकृष्ण सामंत
तात्याराव,
मी आपल्याशी पुर्ण सहमत आहे.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
9 Jul 2008 - 10:00 am | विजुभाऊ
मला कित्येक वर्ष पोरका करून एका निश्चल दुःखात टाकून ते निघून गेले होते.
हे शब्दांच्या पलीकडले
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
9 Jul 2008 - 10:31 am | श्रीकृष्ण सामंत
विजुभाऊ ,
खरचं ,हे शब्दांच्या पलीकडले आहे.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com