श्री. चित्रगूप्त यांच्या चित्रकलेच्या धाग्यावर मी माझे एक चित्र टाकले होते. त्याबद्द्ल त्यांनी दोन चांगले शब्द काढले होते. त्याने हुरळून जाण्याइतका मी मुर्ख निश्चितच नाही. पण तेवढ्यात श्री राजेश घासकडबींनीही माझी काही चित्रे पहायची इच्छा प्रदर्शीत केली म्हणून काही चित्रे टाकत आहे. (त्यांचाही रसभंग झाल्यास त्यांनी उदार अतःकरणाने माफ करावे) एक बाळबोध प्रयत्न म्हणून रसिकांनी याची चिरफाड करू नये ही विनंती :-)
माझे पहिले ऑइल पेंटींग. -
On the Rocks
मग हे प्रत्यक्ष बघून काढलेले - नांदोसच्या जवळ कोकणात.
सूमेर
धीर येऊन मग याच्या वाटेला गेलो. - रजा जर बिंदू भोवती रेंगाळतो, तर म्हटले आपण रेषेभोवती रेंगाळावे.
त्याला नाव दिले -
Stripped Mind.
आता स्वतःच काढलेल्या फोटोंचे software वापरून पेंटींग करायला लागलो आणि आता तेथेच जरा स्थिरावलो आहे. एक दोन विकली सुद्धा.
चाफा -
Trees
Abstract by Nature -
हे विकले.....
कसा वाटला माझा प्रवास ?......
:-) :-) :-)
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
13 Aug 2011 - 7:23 pm | राजेश घासकडवी
चित्रं छान आहेत. तिसरं आणि सहावं विशेष आवडलं. इतकी चांगली चित्रं असताना लेखात नकारात्मक स्वर का ठेवला आहे ते कळलं नाही.
सॉफ्टवेअरचा वापर करून पेंटिंग म्हणजे काय? हे पेंटिंग शेवटी कॅनव्हासवर करता की डिजिटल फॉर्ममध्येच रहातं?
13 Aug 2011 - 7:36 pm | जयंत कुलकर्णी
नाकरात्मक स्वर ठेवला होता ( आता काढला आहे) कारण मला स्वतःला यापेक्षा चांगली चित्रे काढायची होती. ....
म्हणजे फोटोशॉप वापरून फोटो पेंटींगमधे रुपांतर केले. याचे प्रिंट कॅनव्हासवर काढले की झाले.
13 Aug 2011 - 7:32 pm | रेवती
हा कुठला आलाय फसलेला प्रयत्न!
खुपच सुंदर आहेत सगळी चित्रं.
13 Aug 2011 - 7:38 pm | जयंत कुलकर्णी
सुंदर नाहीत पण ठीक आहेत. पण मी आता शेवटच्या प्रयोगात बर्यापैकी यश मिळवले आहे. त्यात माझी फोटोग्राफी पण उपयोगी पडते...
13 Aug 2011 - 8:46 pm | डॉ.श्रीराम दिवटे
उत्तम चित्रे आहेत ही. तुमच्या श्रीगणेशाचे (पहिले) चित्र भावले.
13 Aug 2011 - 10:26 pm | प्रास
तुमच्या स्वतःच्या चित्रांबद्दलचा मॉडेस्ट दृष्टीकोन समजतोय. त्यातही तुम्ही म्हणता आहात त्याप्रमाणे तुम्ही इंप्रूव्ह होत आहात ते ही कळतंय, पण बॉटम लाईन ही आहे की.....
आता आम्ही तुमच्या फोटोग्राफी आणि चित्रकला या दोहोंचेही फ्यान....
तुमचा (एकूणच) फ्यान :-)
13 Aug 2011 - 11:35 pm | चित्रगुप्त
चांगली चित्रे आहेत.
मला यातली पहिली दोन जास्त आवडली, कारण...
फोटोशॉप मधे काम करणे सोपे, सोयिस्कर असले, आणि त्यात कितीही, कसेही बदल करायला वाव असला....
तरी ते निसर्गभ्रमण, योग्य तो स्पॉट शोधणे, चिखल-मातीत डुगडुगत्या स्टुलावर वा दगडावर बैठक मारून चित्राला बसणे, ते पॅलेट, रंगा - ब्रशांचा पसारा, लिन्सिड-टर्पेंटाईन चा वास.... चित्र कसे होईल याची हुरहुर...... ही सर्व मजा काही औरच.
शेवटी चित्र कसे बनले, विकले गेले वा नाही, यापेक्षा ते बनवतानाचा आनंद जास्त महत्वाचा, असे मला वाटते.
पुढील चित्रांसाठी शुभेछा.
13 Aug 2011 - 11:36 pm | चित्रगुप्त
चांगली चित्रे आहेत.
मला यातली पहिली दोन जास्त आवडली, कारण...
फोटोशॉप मधे काम करणे सोपे, सोयिस्कर असले, आणि त्यात कितीही, कसेही बदल करायला वाव असला....
तरी ते निसर्गभ्रमण, योग्य तो स्पॉट शोधणे, चिखल-मातीत डुगडुगत्या स्टुलावर वा दगडावर बैठक मारून चित्राला बसणे, ते पॅलेट, रंगा - ब्रशांचा पसारा, लिन्सिड-टर्पेंटाईन चा वास.... चित्र कसे होईल याची हुरहुर...... ही सर्व मजा काही औरच.
शेवटी चित्र कसे बनले, विकले गेले वा नाही, यापेक्षा ते बनवतानाचा आनंद जास्त महत्वाचा, असे मला वाटते.
पुढील चित्रांसाठी शुभेछा.
14 Aug 2011 - 12:30 am | श्रावण मोडक
आवडली चित्रं.
14 Aug 2011 - 8:14 am | निवेदिता-ताई
सुंदरच....आवडले
14 Aug 2011 - 11:33 am | जयंत कुलकर्णी
सर्वांना धन्यवाद !
खरे सांगायचे तर मला जरा धीर आला.
:-)
14 Aug 2011 - 11:45 am | मृत्युन्जय
चाफ्याच्या फुलाचा चक्क फोटो काढुन कुलकर्णी काका ते आपले चित्र म्हणुन खपवत आहेत. :)
गंमत सोडा. चित्रे खरेच सुंदर आहेत. तुम्ही उगा आपला नम्रपणा दाखवत आहात :)
14 Aug 2011 - 12:13 pm | जयंत कुलकर्णी
:-)
त्याच्या वरचे वाक्य वाचा की राव ! त्या वाक्याखालची सर्व चित्रे ही त्याच पद्धतीने तयार केली आहेत. (फोटोच आहेत ते मुळचे).
पण खरे सांगतो मला यापेक्षा चांगले काम करायचे होते.
14 Aug 2011 - 1:19 pm | तिमा
चित्रे आवडली जयंतराव. सर्वात शेवटचे अॅबस्ट्रॅक्ट जास्त आवडले.
तुम्हाला पैलु तरी किती?
14 Aug 2011 - 2:02 pm | प्रचेतस
सुंदर चित्रे जयंतराव.
आवडली.
14 Aug 2011 - 4:44 pm | पप्पु अंकल
तुम्ही फोटोशॉप वापरता कि, कोरल ड्रा ?
पुढील चित्रांसाठी शुभेछा.
14 Aug 2011 - 6:08 pm | ५० फक्त
लै भारी आहेत चित्रं ओ उगा का नम्रता दाखवताय,
चाल्ले पुन्हा वर नम्रता कुठं दिसतीय बघायला....
14 Aug 2011 - 11:14 pm | जाई.
मस्त आहेत ही चित्रे
विशेषतः चाफा व कोकणातील चित्रे तर फारच आवडली
15 Aug 2011 - 1:20 am | इंटरनेटस्नेही
सुंदर चित्रे!
15 Aug 2011 - 1:32 am | सोत्रि
जयंतजी,
चित्रे अतिशय आवडली. मला चित्रकलेतील फार काही विषेश कळतं अस नाही. पण सर्वच चित्रे आवडली.
- (अपुर्ण चित्रकार) सोकाजी
अवांतर (स्वगत) : अचानक उर्मी येउन काही पेन्सिल स्केचेस काढली होती ती स्कॅन करून टाकावी काय आता ?
15 Aug 2011 - 9:01 am | चित्रगुप्त
अचानक उर्मी येउन केलेली पेन्सिल स्केचेस स्कॅन करून पाठवा लवकर.
चित्रकलेसाठी शुभेच्छा.
चित्रकाराच्या नजरेतूनः जाणिजे चित्रकर्म
http://misalpav.com/node/18741
मी चित्रकार कसा बनलो... काही आठवणी
http://misalpav.com/node/18587
15 Aug 2011 - 7:11 am | धनंजय
चित्रे आवडली.
15 Aug 2011 - 12:25 pm | मदनबाण
चाफा फारच आवडला... :)
15 Aug 2011 - 12:26 pm | मदनबाण
*
16 Aug 2011 - 12:30 am | प्राजु
सुरेखच आहेत सगळी चित्रे!
अप्रतिम.
16 Aug 2011 - 8:34 am | स्पंदना
अय्या ! ही साधारण बरी चित्र तर मग आम्ही काढतो अन लपवुन ठेवतोन्ती कसली म्हणायची. माझ्या नवर्यान एक डायलॉग हल्लीच सेट केलाय, " मन मे एक तन मे दुजा।" म्हणजे मनात आपण अस करायच अस ठरत खर पण जेंव्हा प्रत्यक्षात करायला जातो तेंव्हा आपला तेव्हढा वकुब नाही हे ध्यानी येत.
माझ ऐका जयंत साहेब, दैवी कला आहे हातात, उगा फोटो काढुन कंप्युटर्वर बसुन खर्या कलेला गंज नका चढवु. तुमच्या आर्थिक कारणा साठी वापरा, पण स्वतः साठी अन कौतुकान मिरवण्या साठी तुमच्या हात्ची, मनात ठसलेली , अन कागदावर उतर्लेली कलाकृतीच खरी. अन ती चित्र खरेच सुरेख आहेत.
बाकि 'सुमेर ' जरा उलगडुन सांगाल का? काय कळ्ळ नाय.
16 Aug 2011 - 9:01 am | जयंत कुलकर्णी
" मन मे एक तन मे दुजा।" म्हणजे मनात आपण अस करायच अस ठरत खर पण जेंव्हा प्रत्यक्षात करायला जातो तेंव्हा आपला तेव्हढा वकुब नाही हे ध्यानी येत.
बरोबर आहे. तसंच झालय.
17 Aug 2011 - 4:22 am | चित्रा
शेवटचे चित्र झाडाच्या बुंध्याप्रमाणे वाटते. ते थोडेसे अधिक दुरून पहायला हवे असे वाटले. पण सुंदर आहेत सर्व चित्रे.
17 Aug 2011 - 1:04 pm | जयंत कुलकर्णी
तुम्हाला वाटले ते अगदी बरोबर आहे. झाडाच्या बुंध्याचाच क्लोज-अप आहे तो. मी त्याचे अडीच फूट रुंद आणि ४ फूट उंच अशी फ्रेम तयार केली आहे.
:-)
17 Aug 2011 - 4:41 pm | इरसाल
आतापर्यंत तुमच्या लेखनाचा फ्यान होतो आता तर तुमच्या चित्रकलेचा हि फ्यान झालो.
हवांतर : माझे वडीलही अश्याच प्रकारे कोणत्याही फोटोवरून (पेन्सिलने १ x १ चे स्क़ेअर बनवून) अगदी सेम फोटो हाताने चितारतात.
18 Aug 2011 - 7:36 pm | मुलूखावेगळी
१,२,४,७ जास्त आवडले
सोफ्ट्वेअर नी न काढलेली चित्रे जास्त छान वाटतात मलातरी.