किती सजवू मी माझं मला

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
21 Jul 2011 - 10:00 am

किती सजवू मी माझं मला

किती सजवू मी माझं मला
मन रिंगण घाली तूला ||धृ||

आरसा समोर उभी राहून
वेणी घातली गजरा माळून
फुले सुगंधी डोई शोभती
भुलली मी त्या गंधाला ||१||

नयनांची दोन दले हालती
हाती कांकणे किणकिणती
कर्णभुषणे शोभती कानी
रत्नमाळा हलती गळा ||२||

सुवर्णकांचन सुगंधदर्वळ
आनंदाचे फुलले परिमळ
उंची वस्त्रे रेशीम स्पर्शी
पांघरले शुभ्र शरीरा ||३||

शृंगारूनी शरीरा मन प्रसन्न झाले
मजसमीप हर्षाचे वारे वाहीले
लवकरी येवूनी मिठीत घेवून
साजरे कर धुंद क्षणांना ||४||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२१/०७/२०११

शृंगारप्रेमकाव्यकविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

21 Jul 2011 - 10:19 am | मिसळलेला काव्यप्रेमी

आवडेश!!

सुंदर लिहिले आहे पा भे. :) खूप दिवसांनी येणे झाले आणि बरे वाटले.

खुप दिवसानी अगदी मनापासुन कविता आवडली ..
अप्रतिम

किती सजवू मी माझं मला
मन रिंगण घाली तूला ||धृ||

गळा रत्नमाळा हलती डुलती
हाती कांकणे किणकिणती
कर्णभुषणे शोभती कानी
कपाळी खुलतो टिळा ||२||

हे विशेष आवडले.

---
अवांतर :
तरीही संपुर्ण कवितेत " कपाळी खुलतो टिळा" हि ओळ तितकीशी फिट वाटली नाही वाचताना .
शृंगारीक आणि प्रियकराच्या/पतीच्या ओढीने नतणार्या नायिकेचे स्पष्ट चित्र निर्माण होते आहे.. फक्त या ओळीने थोडेसे वेगळे रुप प्राप्त होत आहे असे उगाच वाटले..

परिकथेतील राजकुमार's picture

21 Jul 2011 - 4:34 pm | परिकथेतील राजकुमार

तरीही संपुर्ण कवितेत " कपाळी खुलतो टिळा" हि ओळ तितकीशी फिट वाटली नाही वाचताना .

नयनांची दले हालती
हाती कांकणे किणकिणती
कर्णभुषणे शोभती कानी
रत्नमाळा हलती गळा ||२||

हे कसे आहे? ;)

परा छान लिहिले आहे.. पण शाहिर पाषाणभेदांना हा संपुर्ण प्रकार आवडला नाहि तर ?

बाकी नयनांची दले हालती मस्त ओळ आवडली मनापासुन.

धन्या's picture

21 Jul 2011 - 4:29 pm | धन्या

आम्हाला लखकन "सुंदरा" आठवली. फरक एव्हढाच त्या सुंदरेचे वर्णन कुणीतरी आशिक करतो. ईथे तुमची सुंदराच स्वतःच वर्णन करत आहे...

काय भारी दिवस होते राव ते अकरावी बारावींचे... अशा छान छान शृंगारिक कविता अभ्यासायला असायच्या. मास्तर लोकसुद्धा अगदी रंगात येऊन शिकवायचे...

जशी कळी सोनचाफ्याची न पडू पाप्याची दृष्टी सोप्याची नसेल ती नार
अति नाजुक तनु देखणी गुणाची खणी उभी नवखणी चढून सुकूमार...

जशी मन्मथ रति धाकटी, सिंहसम कटी, उभी एकटी, गळ्यामधी हार...
अंगी तारूण्याचा बहर, ज्वानीचा कहर, मारिते लहर मदन तल्वार...

आहा... काय ओळी आहेत...

इंजिनीयरींगला ऑप्शनल का होईना, भाषा हा विषय का ठेवत नाही राव...

- धनाजीराव वाकडे

मदनबाण's picture

21 Jul 2011 - 7:02 pm | मदनबाण

आरसा समोर उभी राहून
वेणी घातली गजरा माळून
फुले सुगंधी डोई शोभती
भुलली मी त्या गंधाला
खल्लास्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स.... ;)

दफोराव (नक्की रावच ना ? ;) ) सद्या फुल स्वींगवर दिसताय... ;)

जाता जाता :---- च्यामारी दफोचा आयडी हॅक झालाय काय ?

विदेश's picture

21 Jul 2011 - 10:11 pm | विदेश

प्रेमकाव्यातला शृंगार मस्त खुलला आहे !

पाषाणभेद's picture

22 Jul 2011 - 8:01 am | पाषाणभेद

@ गणेशा अन परा: उचीत बदल केला आहे, तसेच शेवटचे कडवेही वाढवले आहे.
त्यात काय वाटून घ्यायचे? आवडले की सांगायचे. आपली कविता तशीही ओपनसोर्स असते.

तुमचे अन इतरांचेही मनापासून व्यक्तिश: धन्यवाद.
(हे म्हटले म्हणजे 'आता प्रतिक्रिया येवू देवू नका' असे नव्हे!)
:-)