पिसी जेसी चा पुढचा भाग

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
2 Jul 2008 - 2:37 am

चार की पाच आठवत नव्हतं.पाय कापसाचे झाले होते. मी व्हीटी स्टेशनच्या बाहेर बस स्टॉपवर जेमतेम उभा होतो. समोर थोडी जास्तच झाली असावी.व्होडाफोनची जाहिरात चमकत होती. टॅक्सी की बस कन्फ्युज् झालो होतो. दमणच्या एअरपोर्ट वर कसं जायचं आठवत नव्हतं.मला व्होडाफोनचा राग आला .दूर हो या यार. तुमचा लोगो मेलेल्या जंतासारखा दिसतो. मी दुसरी जाहिरात बघीन.वा. वा. पार्ले... पण पार्ले तुम्ही सुद्धा फसवता. बिस्कीट आत्महत्या कपात करतं पण तुम्ही मऊच बिस्कीट बनवा.जाऊ दे.टॅक्सी....टॅक्सी इधर आव. दमण एअरपोर्ट चलो.. फास्ट चलो. विमान उडनेवाला है. टॅक्सीवाला झूम्झूम निघाला. दमण एअरपोर्ट. दारात आलो. टॅक्सीवाला हलकट पैसे न घेता फुर्रकन पळाला. इमिग्रेशन काउंटरला चक्क बाई होती. माधुरी ओह माधुरी..पासपोर्ट वर शिका मारला. आय लव्ह यू.. वा. वा.. हाउ रॉमँटीक.. पाठीमागून कोणीतरी कॉलर पकडली..बाप रे बायको. तीच्या हातात चाबूक होता.. ए .. इधर आव. पासपोर्ट काढून घेतला. दहा फटके.. बादमे जाव..
माझ्या आयुष्याचा कोंडवाडा केलास आता पळतोस काय..पाच फटके.. तू असताना मी विधवा ... पाच फटके. ..मी पळणारच होतो.. समोरून टॅक्सीवाला आडवा आला. साक्षात विरकर हाहाहाहा..त्याच्या हातात जॅक होता. आता तुझी गाडी डीमर्‍यावर भटा... परत मागे वळलो तर सासरे उभे .त्यांच्या हातात चिमटा मोठा लोखंडी चिमटा... तयासारखे भोगणे प्राप्त झाले असं म्हणून त्यांनी माझ्या जांघेत चिमटा खुपसला..ज्जाळ नुस्ता ज्जाळ.. आग लागली..
..
-------------------------------------------------------------------
बाळकृष्ण जोशी.. जोशी ... जोशी साब .
उठ लवकर .आ कर. हां आ कर . शाबाश. डोळे उघड.
परत जाळ उठला. झपकन फोकस आला. हॉस्पीटलचा बेड. हाताला ड्रीप.. एक दोन .. एक दोन...
स्साला तुमी पोलीस लोक केटला मारते.. यानी काय केला .. मर्डर के रेप
शांती ..... आरे, हा शॉक मधी गेला तर तुमी काय बोलते ते ३०२ अने ३०४..
मी पूर्ण जागा झालो . वेदना डल झाल्या . समोर एक कोट घातलेला डॉक्टर उभा होता.माझ्याकडे बघून म्हणाला
दवा दिला तुला मी. ..तुम्ही जंटलमन ... कसा काम करते..
खोदाके वास्ते विरकर मी सांगते ते प्रॉमीस लिव तू..आगळा टाईम मी नाय त्रीट करणार..
-------------------------------------------------------------------
-परत डोळ्यावर गुंगी आली.एकेक चित्र पुन्हा समोर यायला लागलं.
बँक ऑफ क्रेडीट अँड कॉमर्स . वेल. यु वेर सिनीयर मॅनेजर क्रेडीट, सॉरी , जंटलमन वी वाँट टो बी बिगर बँक ..पण आमची बीसीसीआय नाही ..साधी कॉऑपरेटीव आहे...परवडणार नाही आम्हाला..छे ..पगाराचा प्रश्न नाही....स्टाफचं मोराल जपावं लागतं ..तशी तुम्हाला पैशाची कमी नसावी.. तुमची बँक बुडलीच आहे.
आत बाहेर येत जात राहीलो रात्रभर.उजळणी सात दिवसाची चुकीच्या क्रमात येत होती. अलट पलट. अलट पलट.
-------------------------------------------------------------------------------------------------
विरकर जागचा उठून उभा राहीला.
आईये सर. इब्राहीम मुल्ला .
सर, आपको कौन नही पहचानता. मै विरकर. आयो. इस केसका.
महाडीक जोशीला आणा.
ये साब कौन है?
ये मेरा पीए. पिल्ले. एफ.आय. आर. इसने लिखा था. यस. ही होल्ड्स माय पॉवर ऑफ
ऍटर्नी...
पिल्ले आप इधर बैठीये.
विरकर आप जरा मेरा स्टेटमेंट लेकर ..
ऑफकोर्स..
मी समोर उभा राहिलो.
आप इनको पहचानते है? दोघांनीही नकार दिला.
इसके खातेमे आया था आपका दस लाख रुपया. ये है मास्तर माइंड. जबतक ये प्रोडुस करता वो शेट्टीको तबतक..महाडीक त्या रां..विरकर थांबला, त्या मिसेस शेट्टीचे फोटो दाखवा त्यांना..
बँक रेकॉर्ड मधले फोटो महाडीकनी दाखवले.पिळ्ले उठून उभा झाला.
ये चोर ..माय गॉड..
क्या हुआ पिल्ले.
सर यही है वो मोबाईल चोर्.
पिळ्ले विरकर कडे वळून म्हणाला
साब ये लडकी हमारे ऑफीस मे आयी थी. मेरा मोबाईल चोरके गयी मैने कंप्लेंट लिखाया था कोलाबा पोलीस स्टेशनमे. मै कॉपी देता हूं कल.
और क्या लेके गयी थी? और क्या? विरकर चा आवाज बदलला. पिळ्ले कडे रोखून बघत म्हणाला
याद करो . करना पडेगा.
आता त्यानी लेटरहेडची कॉपी समोर टाकली.
ये साईन तुम्हारा नही है? ये लेटरहेड तुम्हारा नही है? इसमे लिखा है ये दस लाख रुपाया जमा करो मिसेस शेट्टीके खातेमें.
पाच मिनीटे गोंधळ. एकाच वेळी मुल्ला. विरकर , पिळ्ले एकमेकांन अकाहीतरी सांगत होते.विरकनी आता पिळ्ले ला बाजूला घेतले.
मेरेको बता कौन है ये शेट्टी तेरी .. बोल ..
तेरेको क्या लगा कंप्लेंट लिखके काम निकल जायेगा तेरा.
पिल्ले थरथरा कापायला लागला. मुल्लासाहेब शांत बसून होते.
आय विल नॉट इंटरफिअर बट नो थर्ड डीग्री विरकर
मै तबतक ये जंटलमन से बात करूंगा.
माझ्याकडे बोट दाखवत त्यानी विचारलं.
महाडीक या मादर... जोशीला तीन नंबर मधे घेउन जा साहेब येतील .
तुम्ही बाहेर थांबा
------------------------------------------------------------------------------------------------- इब्राहीम मुल्ला साधारण साठीचे असावेत. वर्षानुवर्ष भोगलेली मिरासदारी चेहेर्‍यावर दिसत होती. लाल गुलाबी चेहेरा .परफेक्ट कट चे कपडे. हातात एक सॉलीटेर. साधारण चार कॅरटचा. ब्राउन गुस्सी शूज. एक बेफिकीरी.यशाची कायम खात्री.दहा मिनीटात ते मूळ विषयाकडे आले.
तुमने चोरी की है तो पैसा वापस दो. अगर नही तो पैसा मै भरूंगा.
आप को मालूम होना चाहीये ये एस्क्रो अकांउंट का पैसा है. अगले हप्ते वैती चिटणीस का डीमांड आयेगा. हमारे फर्म के इज्जत पचास -साठ लाखमे नही बिकेगी.पैसा मिला तो मै कुछ कर सकता हूं.
मैने अभीतक होम मे बात नही किया है.
एक बार बात करू तो ...आपको मालूम नही...
इथे त्याचा फ्लो तोडायचा मी ठरवलं.
तो क्या होगा ? परेशानी? वो तो पहलेही हो गयी है?
थर्ड डीग्री आपके पीए को नही .
मुझे क्यू?
वो भी तो चोर हो सकता है. शायद उसने और मैने मिलकर ..
नही डिक्रा.. नॉट दॅट इझी.. यु कांट प्रोव्होक मी.
म्हातारा अचानक खुषीत आला.
वो लडकी तुम्हारी पार्टनर थी.
तूम मार खाओगे. उसको बचाओगे.
मुझे मालूम है. चार दिन बाद तुम जाओगे जेसीमे. बादमे विरकर भी तुम्हारा दोस्त बनेगा. आज वो आयो है. चार दिन बाद नही. मुझे पैसा चाहिये अगर है तो.मै वखत ...
आता मला परत बोलायला चान्स मिळाला.
दस लाख मेरे खातेमे आया. मैने ये कब कहा की मै नही जानता मनोरमा को.
कैसे जानते हो?
एक एमेलेम मिटींग मे मिली थी. चार महीने पहले. मै पैसोके तंगी मे था. डर्बी नजदीक आयी थी. मेरे खातेमे आया पैसा मैने खर्चा किया.
बीस दिअन यही बात समझा रहा हूं मै.
मै समझ रहा था मनोरमा को मै उल्लू बना रहा हूं.सी गँबलर आय मे बी. बुट नॉट थीफ.
यू मिन तूम पैस लौअटाना चाहते हो?
जितना मेरे खाते मे आया .
बाकी का साठ लाख?
मेरे खातेमे नही आया था वो? अनिल सिंग और संदीप बहल . उनके खातेमे गया था वो.मैअ नही पहचानता उनको.
येस . आय मे बाय द स्टोरी.
लेकीन तुम्हारा आयो मानेगा . ?
आयो आपका है. आप कंप्लेनंट हो मै नही. एक लांब श्वास घेऊन तो खाली बसला. ठिक है.
अगर दस लाख आया तो ..?
नो ...नो..... धिस विल नॉट वर्क.
धिस विल. मी डोळ्याल डोळे भिडवत सांगीतलं.
कैसे? मी दहा मिनीटं बोलत होतो. इब्राहीम मुल्ला मन लावून ऐकत होता.
लेकीन एक शर्त है. मी दम खायला थांबलो. ये कुछ भी डिस्क्लोज नही होगा जुम्मेरात तक.
वादा है.
खोदा के वास्ते दगा नही.
जब रुपया मिलेगा तब आप का वकील आयेगा. ठिक है?
ठिक है.
इससे अपना फायदा क्या होगा . मिश्रा विचारत होता.
देख मिश्रा अपने अकांउंट मे पैसा आया ये बँकींग ट्रँझेक्शन है.अब ये गलत है फिर भी एंट्री रिवर्सीबल है.मेहेताका आया हुआ पैसा जमा कर दे वो खातेमे.
दो अलग अलग केस बनती है.
साठ लाख से अपना कोई वास्ता नही बनता.
दस लाख बँक मे गये मेहेता केस के बाहर्.लेकीन थोडा ड्रामा जरूरी है. विरकर नही मानेगा इस बात को.
मेहेता छूट जायेगा लेकिन संदिप और अनील सिंग जबतक नही आते तबतक अपना बेल नही होगा.
अपना फायदा बादमे होगा .
-------------------------------------------------------------------
पिळ्ले चं स्टेटमेंट संपत आलं होतं. त्याला विरकरनी एकेक बारीक प्रश्न विचारला.
दस लाख का चेक लेने बँका प्यून आया था?
यस सर.
बँक से फोन आया था?
यस सर.
फिर बादमे पचास लाख का चेक लेने भी बँकका प्यून आया था?
यस सर.
मेरेको एक बात बता तुमने बँकमे फोन किया था?
नो सर.
तो बँकवालेको कैसा पता चलता है की तुम्हारे पास चेक तयार है?
जो दस लाख का चेक लेके गया वो प्यून पचास लाख का चेक लेके गया था?
यस सर्.तो पिळ्ले अब ये बताव बँकवालेको कैसा पता चलता है के तुम्हारा चेक तयार है?
मै दलाल को फोनकरता हूं. इसमे भी दलाल?
यस सर्.कौन है बे ये दलाल.पिळ्लेचे धाबे दणाणले.बुला ले उसको .ये तो मालूम पडे.तेरा और उसका क्या चल रहा है?
क्या नाम है उसका. बोल भाई जल्दी बोल.विरकरला धागेदोरे सापडल्यासारखं वाटत होतं
बोरकर ? ठीक है कल बुला ले उसको तू.
बहोत दलाली जमा हो गयी है तेरे पास.
होम मे कौन है रे तेरा? बहोत फोन आ रहे थे उनके. उसको भी बता देता हूं तेरे दलाली का चक्कर .अगले टाईम सोचेगा फोन करनेसे पहले.
मुल्ला साहेबाला हे सगळं नविन होतं .पिल्ले चपापला.तपासकामाची दिशा बरोबर असल्याची विरकरची खात्री होत आली .
-------------------------------------------------------------------
मुल्लासाहेब जाताना विरकरला म्हणाले
"वेल , ऑफीसर ऑल दी बेस्ट."
म्हातार्‍याची पाठ वळल्यावर विरकरनी पिळ्लेला ऐकू जाईल अशी शिवी दिली."सिनीअर सगळे हरामी. आरोपीशी हे डायरेक्ट बोलणार. आयो पेक्षा हे मोठ्या लवड्याचे."
"भटा काय डील झालं रे त्याच्यासोबत?"
"तो म्हणाला आज पिळ्ले नाही सुटला तर तो मला इस्टेटीचा वारस बनवेल.फक्त बाई कुठे ते सांग?"
पिळ्ले सकट सगळे हसले. पण पिळ्ले जास्तच हसला.
विरकरनी त्याला विचारलं
" क्या रे ..बहोत हस रहा है ..."
पिळ्ले म्हणाला
" मराठी नही आता लेकीन इतनाही समझा ....फक द बाई किधर है...."
चार टेबल सोडून प्रधान च्या नाकातून चहा बाहेर आला .
----------------------------------------------------------------------------------------------
स्साला, हसत हसत मारतो विरकर,प्रधान म्हणाला.
हो ना . मी म्हणालो. मला टायपींग येत हे कळल्यानंतर प्रधानचा मी टायपीस्ट झालो होतो.
मला एक कळत नाही विरकरला यात अजून कमाई कशी झाली नाही.
म्हणजे कशी केली नाही असं विचारा ना.प्रधान खुदकन हसला. स्साला मी विसरतोच तू दोन नम्बरचा आरोपी आहेस.भटा किती दिलेस रे तू?
देण्यासारखा पुरावा कुठे आहे त्याच्याकडे अजून.प्रधान परत विचारात पडला.माझ्याकडे ही केस येणार होती पण आमचा एसीपी नविन आहे ना. डायरेक्ट आला आहे. विरकर त्याचा ट्रेनर होता ना. प्रोबेशनला.एकसुस्कारा.
योग्य ती संधी आली होती.समजा तुमच्याकडे केस आली तर ?प्रधान माझ्याकडे बघत राहीला. म्हणजे विरकरला प्रमोशन मिळतय का ?
आजकाल तुम्ही त्याला जवळचे. मी हसलो. तसं नाही. पण ..
तू माग ते देतो. मला काही नको . मी सांगतो तेव्हढं करा. काय करू बोल.मी आरोपी आहे हे
तो विसरला होता.
विवेक जाळण्याची ताकद मत्सरात असते.
दोन कामं कराल?
सांग. बस एव्हढंच. हो आत्त्तातरी.चलो डन.
-------------------------------------------------------------------हिल रोडच्या गल्लीत त्या ईमारतीच्या खाली उभंराहून तो विचार करत होता. करावा का खर्च? वासना जिंकली. दुसर्‍या मजल्यावर दरवाजा ढकलून आत गेला.थंडावा. सुगंध. आणि समोर स्पागेटी टॉपमध्ये एक मुलगी. एक वयस्कर दांडगा मिड-डे वाचत होता.आओ. ओळख पटली होती. आज क्या? डार्क रूम . ?येस. वॉटर बेड? येस,अंदर जाव.वॉश लेना. कपडा रख्खा है .पहन लेना. मोबाईल इधर. पाच जमा करो. बादमे हिसाब. बरचं ऐकलं होतं पण पैसे जमतच नव्हते.आज किकबॅक मिळाला होता. आजच.कपडे बस्दलून तो उभा होता. स्पागेटी आत आली. चलो. हात धरून धरून ती त्याला रूमच्या दरवाजापर्यंत घेऊन गेली. दरवाजा स्टूडीओच्या दरवाज्यासारखा जाडजूड होता. आत मोठा बेड . भिंती काळ्या. दरवाजा बंद. आत बाहेरचा आवाज पण येत नव्हता. हिस्स करून दरवाजा बंद झाला आणि काळोखात रूम बुडून गेली. एसी वाढला. भिंतीवर छतावर चांदण्या चमकायला लागल्या. तो बेडवर आडवा झाला. एक भिती वाटत होती. पण एका ओळखीचा सुगंध आला. सोबत ती आल्याचं कळलं. मै हू स्वीटहार्ट. हात हातात आला. त्याचे कपडे कधी दूर झाले ते त्याला कळलं नाही. दोघामधलं अंतर दूर झालं.पुढची पंधरा मिनीटं अवयवांचा चाळा.
आता तो लीडर झाला. संकोच संपला. हे त्याचं हक्काचं ठिकाण होतं. इथे तोच राजा होता. ही दासी त्याच्या मर्जीची. उष्ण ओले हूंकार. अधीर होउन त्याच्या घशातून विचीत्र आवाज यायला लागले होते. वॉटरबेड वर होडीत बसल्याचा भास होत होता. लाटांची गती वाढत होती.
म्युजीक? हां ..
ना जाने कोई .. कैसी ये जिंदगानी..
हमारी अधूरी कहानी..
आंखोमे कैसी नमी है .. आ आ हा
भिगी राते .. भिगी भिगी बाते कैसी मुलाकाते...आ आ..आ
नंतर श्वापदांच्या चित्कारानी चारी बाजू कसकसल्या.
लाईट ..हां
बेडच्या तळाशी एलीडी लँप .मून लाईट.
पुन्हा एक धसमुसळी खेळी .ती स्फुंदायला लागली. आ .. आ..हा..
मूनलाईट मध्ये तिच्या अंगाचे वळण वळण चमकत होते. अंगाला चमकी लावली होती. कुठे कुठे जांभळा रंग..दूर बेल वाजली.. तो मोकळा झाला . फिर एक बार .. ती थांबायला तयार नव्हती.मैने सिर्फ...ओठावर बोट .. मै दूंगी परत नवी खेळी तो परत जिंकला. या खेळाचा तो राजा होता . ती एक दासी
अब बस. हां...डार्लींग अब लाईट...
एका क्षणात तीनी त्याला आणि त्यानी तिला ओळखलं.तू...उसळून त्यानी हात गालावर चालवला..अंगठी लागली असावी, ओठ फाटला.. चोर साली.. दुसरी झापड .तिनी पायाला घट्ट मिठी मारली ...परत हात उगारला.. डाव्या स्तनावर रक्ताचा ओघळ.. ये मैने क्या किया.. सॉरी...लेकीन तू चोर है...
हा चोर हू.. फिरसे मारो एक तमाचा जोरसे.. मारो ना तो भानावर आला...
त्याच राज्य संपलं होतं...मैने क्या किया ये..
कुछ नही मारो ना एक जोरसे तिनी हात धरून परत विनवलं ...ओके..
हा खेळ त्याला आवडला...एक वार परत ओठातून परत रक्त...
अब ले लो मुझे... अंधार ..आता रंगत आली ..
निघताना त्यानी तीला वचन दिलं तो रोज येणार..
चोरीची शिक्षा द्यायला.. रोज येणार ..रोज रोज ....रोज
--------------------------------------------------------------------------------------------------

कथा

प्रतिक्रिया

रामदास's picture

2 Jul 2008 - 2:45 am | रामदास

माझ्या तांत्रीक अज्ञानामुळे पूर्ण केलेला लेख मी हरवला आहे. श्री . नीलकांत यांची मदत मागीतली आहे.या भागात थोड्याफार त्रुटी असण्याची शक्यता आहे. दिलगीर आहे.

विद्याधर३१'s picture

2 Jul 2008 - 7:06 am | विद्याधर३१

मधला भाग हरवला आहे कि काय?
वाचताना लिंक तुटल्यासारखी वाटली.
बहूधा सवडीने पुन्हा वाचावा लागणार हा भाग.

विद्याधर

विसोबा खेचर's picture

2 Jul 2008 - 4:16 pm | विसोबा खेचर

रामदासभाऊ,

नीलकांत आज ऑनलाईन येऊ शकणार नाहीये, तो कामात आहे. आपण कृपया http://www.misalpav.com/tracker/185/185 या पत्त्यावर तपासून पाहा. आपले सर्व प्रकशित, अप्रकाशित लेखन आपल्याला येथे यादीरुपात पाहायला मिळेल.

अजून काही मदत लागली तर अवश्य सांगा...

आपलाच,
तात्या.

अरुण मनोहर's picture

2 Jul 2008 - 4:09 am | अरुण मनोहर

खूप छान. उत्कंठा वाढतच आहे.

अनिल हटेला's picture

2 Jul 2008 - 8:57 am | अनिल हटेला

मेवन्ती!!!!!!!!!!!!!!!

आय मीन नो प्रॉब्लेम....

थोडीशी लिन्क तुटलिये खरी...

पण चालतये राव ....

आणी पुढील भाग कधी??

प्रतिक्षेत......

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

भडकमकर मास्तर's picture

2 Jul 2008 - 9:15 am | भडकमकर मास्तर

विवेक जाळण्याची ताकद मत्सरात असते....
आणि जोशी प्रधानालाच ऑफर करतो हे एकदम झकास...
..
सगळं लवकर वाचायची उत्सुकता आहे...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Jul 2008 - 9:59 am | llपुण्याचे पेशवेll

आयला हा जोशा तर लईच हुशार दिसतो. मस्त चालली आहे कथा.
पुण्याचे पेशवे

कपिलमुनी's picture

21 Aug 2013 - 12:07 pm | कपिलमुनी

पुढचा भाग कोठे आहे ? लिंक आहे का कूणाकडे?

रामदासकाकांना अनेक मालिका पूर्ण करायला लावण्याची चळवळ मिपावर सुरु होत असल्यास माझेही नाव सदस्यनोंदणीत नोंदवून घ्या.

चळवळ मिपावर सुरु होत असल्यास माझेही नाव सदस्यनोंदणीत नोंदवून घ्या.>> +१

सिद्धार्थ ४'s picture

22 Sep 2017 - 5:29 pm | सिद्धार्थ ४

पुढील लिंक आहे का कोणा कडे?

आमोद's picture

27 Aug 2018 - 8:41 pm | आमोद

पुढचा भाग कुठे आहे?