भन्नाट
भन्नाट २
भन्नाट ३
भन्नाट ४
"बॅरिस्टर दीक्षित, मला ह्या केसमध्ये एकही लूप होलं नकोय ! मंदार माझा भाचा असला तरी तो गुन्हेगार आहे आणि त्याला शिक्षा झालीच पाहिजे. पोलिस खात्याची इज्जत वेशीला टांगली गेलीये" कमिशनर साहेब गरजले.
"चार तारखांत संपवतो मी हि केस. सगळे पुरावे हजर आहेत, ब्रम्हदेव जरी खाली आला तरी आरोपी सुटणे शक्यच नाहीत !"
"मला ब्रम्हदेवाची काळजी नाहीये दीक्षित... ह्या तिघांची केस बॅरिस्टर अमर विश्वासने घेतली आहे."
कमिशनर साहेबांचे वाक्य पूर्णं झाले आणि छातीत आलेली कळ दाबत दाबत दीक्षित ऑफिस बाहेर पळाले.
=====================================
"ऑर्डर ऑर्डर.. हा दंगा आणि कॅमेर्यांचा लखलखाट थांबला नाही तर मला नाईलाजाने सर्वांना बाहेर काढून फक्त आरोपी आणि केसशी संबंधीत लोकांच्या उपस्थितीतच खटला चालवावा लागेल." जज केसर गरजले.
टक टक टक टक... घड्याळाची टीक टीक आणि फॅनचा आवाज सोडला तर क्षणार्धात शांतता पसरली होती. जज केसरांच्या धमकीचा चांगलाच परिणाम झाला होता. बेअब्रू होण्यापेक्षा आपल्या लाडक्या हिरोला कोर्टात लढताना पाहणे हुकायला नको म्हणूनच अनेकांनी जिभेला लगाम घातला होता.
सुटका झाल्याच्या आविर्भावात उभे राहून बॅ. दीक्षितांनी पुन्हा एकदा कोर्टाला अभिवादन केले आणि बोलायला सुरुवात केली. "युवर ऑनर, आज आपल्या समोर एक अतिशय सरळ केस आलेली आहे. सरळ खरेतर ही न्यायदानाच्या दृष्टीने असली तरी ह्या केसमध्ये घडलेले सर्व गुन्हे हे अत्यंत घृणास्पद आणि माणुसकीला काळिमा फासणारे आहेत."
" खून, अमानुष मारहाण, बलात्काराचे प्रयत्न, फसवणूक करून गावातल्या मुलींना शहरात विकणे, ड्रग्जचा व्यापार अशा एकसे बढकर एक गुन्ह्यांनी ज्यांचे हात बरबटलेले आहेत अशा तीन नराधमांना आज ह्या कोर्टात हजर करण्यात आले आहे." आपले वाक्य संपवून दीक्षितांनी जाणीवपूर्वक एक पॉज घेत अमरकडे पाहिले. दीक्षितांनी वाचलेल्या गुन्ह्याच्या पाढ्यांनी अमरदेखील चकित झाला. अमरचा चेहरा पाहून हुरळून गेलेले दीक्षित पुढे बोलायला लागले. "युवर ऑनर फसवणूक, खून ह्या सारख्या गंभीर गुन्ह्यांखाली अटक होऊन अनेकदा आपल्या समोर हजर झालेल्या ह्या फिरोज इराणीला आपण ओळखत असालच. आता त्याच्या जोडीला चक्क चक्क कमिशनर साहेबांचे भाचे मिस्टर मंदार पटवर्धन आणि राजस्थान पोलिसांचा सो कॉल्ड पोलिस मित्र दारा बुलंद ह्यांची भर पडली आहे. ह्या तिघांनी मुंबईच्या कायदा व्यवस्थेलाच आव्हान निर्माण केले आहे. ह्या केसमध्ये असा एकही गुन्हा नसेल जो ह्यांनी केला नसेल. ह्या नराधमांनी गेलेले गुन्हे ऐकाल तर तुमच्या अंगावर शहारे येतील, माणुसकीला कलंक असणारे हे गुन्हेगार कुठल्या थरापर्यंत गेले होते हे आता मी सविस्तर सांगतो त्यांतूनच ही केस उलगडली जाईल." आपल्या बोलण्याचा ऑडियन्सवर परिणाम जाणवेपर्यंत दीक्षित उगाच कोटाशी चाळा करत थांबले. बॅ. दीक्षितांच्या शेवटच्या वाक्याने कोर्टात केस ऐकायला हजर असलेल्या प्रत्येक माणसाप्रमाणेच अमर देखील सरसावून बसला. ही पहिलीच केस होती ज्यात त्याला केस विषयी आणि पोलिसांच्या हातात असलेल्या कार्डसविषयी काहीच माहिती नव्हती. अमरची सगळी भिस्त त्याचे नशीब आणि दीक्षितांचा वेंधळेपणा ह्यावरच होती.
जज केसरांनी संमतीची मान हालवताच दीक्षित सरसावले. मधल्या काळात उगाच वेळ घालवण्यासाठी पाणी प्यायचे निमित्त करून त्यांनी कोर्टातला ताण मोठ्या हुशारीने वाढवला होताच. आज कधी नव्हे ते कोर्टात अमर उपस्थित असताना देखील त्यांना येवढे महत्त्व प्राप्त झाले होते. त्याचा मोठ्या खुबीने ते वापर करणार होते.
"युवर ऑनर स्मगलिंग सारख्या गुन्ह्यापासून सुरू झालेली ही केस आज मोठ्या हत्याकांडाच्या वळणापर्यंत येऊन पोचलेली आहे. आरोपी क्रमांक एक दारा बुलंद हा साम गावचा क्रुप्रसिद्ध गुंड, ह्याची स्वतःची एक टोळीच अस्तित्वात आहे. वाळवंटातल्या व्यापार्यांना लुबाडणे, सुरक्षेच्या नावाखाली आजूबाजूच्या भागातून खंडणी वसूल करणे, पोलिसांचे मित्र असल्याचे भासवत आपल्या प्रतिस्पर्धी टोळीला कंठस्नान घालणे आणि कायद्याचा रक्षक असल्याच आव आणणे हे ह्यांचे धंदे. ह्याच उद्योगात एक दिवशी दारा बुंलंदची गाठ मिर काझीशी पडली. हा काझी बॉर्डरवर शस्त्रांची चोरटी आयात करणारा माणूस. ह्यानेच दाराला एक नवे क्षेत्र उघडे करून दिले, आणि ते म्हणजे मुंबईतील वेश्याव्यवसायाला मुली पुरवण्याचे." एक दीर्घ पॉज घेऊन दीक्षितांनी मॉबवर नजर फिरवली, आपल्या बोलण्याचा परिणाम होऊन हळूहळू दारा बुलंद हे पात्र लोकांच्या मनात काळे होत आहे ह्याचा अंदाज आल्यावर ते मोठ्या खुशीने पुढे सरकले.
"मुंबईची फक्त चित्रपटात बघून माहिती असलेला दारा बुलंद आधी विचारात पडला, पण सहज आणि मोठ्या प्रमाणावर मिळणारा पैसा भुरळ घालत होताच, आणि मुख्य म्हणजे साम आणि आजूबाजूच्या प्रदेशावर जबरदस्त हुकुमत असलेल्या दाराला मुली मिळवणे किंवा पळवणे फारसे अवघड नव्हतेच. पण जात्याच हुशार असलेला दारा फक्त मिर काझीच्या शब्दावर विश्वास ठेवणार्यातला नव्हता. त्याला मुंबईत हा व्यापार सांभाळण्यासाठी स्वतःच्या विश्वासातला माणूस हवा होता. आणि तो त्याला मिळाला फिरोज इराणीच्या रूपात. फिरोज इराणी हा कुठल्याही टोकाचा गुन्हा करताना न घाबरणारा आणि शब्दाला पक्का माणूस. दाराला मनपसंत असा माणूस मिळाला आणी साम ते मुंबई असा निरागस मुलींचा पुरवठा ह्या क्रुरकर्मांनी सुरू केला. पैशासाठी माणूस माणसाला विकायला लागला. युवर ऑनर ह्या निर्लज्ज आणि गुन्हेगारी क्षेत्रात बरबटलेल्यांनी हा मार्ग पत्करला ह्याचे एकवेळ आश्चर्य वाटू नये असे आश्चर्य पुढे आहे आणि ते म्हणजे कमिशनर साहेबांचे भाचे मंदार पटवर्धन. एका जबाबदार पोलिस अधिकार्याचा हा सुसंस्कृत, सुशिक्षित भाचा देखील ह्यांना सामील झाला आणि ह्या धंद्याला कायद्याचा वरदहस्त लाभला. छोटी, मोठी प्रकरणे,किरकोळ गुन्हे हे मंदार पटवर्धन आपले वजन वापरून परस्पर दाबू लागला. कुठलीशी चौकशी न होता ह्या मुली थेट सामवरुन मुंबईच्या वेश्यावस्तीत येऊन पडू लागल्या. ह्यातल्या एखाद्या मुलीची सुटका झालीच किंवा पोलिसांपर्यंत बातमी गेलीच तर निस्तरायला मंदार होताच.
अनेक महिने हा व्यापार बिनबोभाट चालू होता. दारा, मंदार आणि फिरोज ह्यांनी अक्षरशः खोर्यानी पैसा जमा केला. पण त्यांना अजूनही खंत एकच होती की आजही त्यांना मिर काझीलाच मध्यस्थ घालून हा व्यवसाय करायला लागत होता. जर मिर काझीलाच उडवले तर मिळणार्या पैशातला एक मोठा वाटाच कमी होईल असे ह्या तिघांपैकी कोणा एकाच्या डोक्यात आले आणि ह्या केसची पाळे मुळे रुजायला सुरुवात झाली. पण सुदैवाने मिर काझीला ह्याची कुणकुण लागली आणि त्याने दाराला ह्या व्यवसायातून बाद करण्याचे ठरवले. ह्यावेळी मिर काझी स्वतःच चार मुली घेऊन मुंबईला रवाना झाला. हि खबर मिळताच संतापलेला दारा'आर या पार' करायचे ठरवून मुंबईत हजर झाला. फिरोज आणि मंदार मुंबईतच होते. बहुदा ह्या दोघांना बाहेरुन कव्हर देण्यासाठी मंदारने दिल्लीला जायचे नाटक करायचे आणि ह्यांनी इकडे मिर काझी आणि त्याच्या माणसांना उडवायचे असा काहीसा प्लॅन ठरला असावा. पण ह्या तिघांच्या दुर्दैवाने मंदारची मैत्रीण रमी हिला ह्या प्लॅनची खबर लागली. गुन्हेगारीचा तिटकारा असणारी रमी पोलिसांना कळवणार हे ओळखून ह्या तिघांनी आधी तिला गायब केली. तिला पळवायचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला आणि ह्या केसमध्ये पोलिसांना प्रवेश झाला. आता थांबण्यात अर्थ नाही हे ओळखून मंदार तातडीने मुंबईत पोचला. युवर ऑनर, त्या दिवशी एका रात्रीत ह्या तिघांनी पाच खून आणि दोन बलात्कार करून अख्ख्या मुंबई पोलिस डिपार्टमेंटला हादरवून सोडले. ह्या केसशी संबंधित माहिती आणि इतर डिटेल्स मी साक्षी मध्ये पुढे आणीनच. युवर ऑनर अत्यंत थंड डोक्याने इतक्या खालच्या पातळीचे गुन्हे करून फरारी झालेल्या ह्या आरोपींना शोधण्यात.."
"ऑब्जेक्शन युवर ऑनर !" अमर गरजला.
केस मधले पहिलेच ऑब्जेक्शन आणि तेही दीक्षित प्रास्ताविक मांडत असतानाच.. अब आयेगा मजा.
(क्रमशः)
प्रतिक्रिया
13 Jul 2011 - 2:20 pm | ज्ञानोबाचे पैजार
धन्यवाद मालक
13 Jul 2011 - 2:25 pm | स्पा
परत सगळे भाग वाचून काढावे लागतील.. काही लिंक लागत नाहीये
पण परा लिहिता झाला हे बघून आनंद झाला :)
13 Jul 2011 - 5:24 pm | कच्ची कैरी
>>परत सगळे भाग वाचून काढावे लागतील.. काही लिंक लागत नाही>><<
मलाही असच वाटतय !
13 Jul 2011 - 11:22 pm | शुचि
असच वाटतं आहे. सगळे भाग वाचून परत वाचते मग लिंक लागेल. पण हा भाग देखील वेगवान आहेच. मजा आली वाचताना.
टेक युअर ओन टाईम बट मेन्टेन द सेम क्वालीटी परा.
13 Jul 2011 - 2:27 pm | मनराव
झक्कास............. !!!!
परा साहेबांनी लगेच कार्यवाही करून मागणीनुसार नविन भाग टाकलेला आहे...
13 Jul 2011 - 2:41 pm | किसन शिंदे
बरयाच दिवसापासुन प्रतिक्षेत होतोच....पण छोटासाच भाग टाकल्यामुळे अपेक्षाभंग झाला.;)
असो, तो टकल्या दिक्षीत पुन्हा एकदा केस हरणार हे नक्की.
13 Jul 2011 - 2:51 pm | गवि
अरे वा.. इतक्या लवकर मागणी पूर्ण.
मस्त..
लिहा पुढचे बिगीबिगी.. :)
13 Jul 2011 - 5:15 pm | सोत्रि
मनावर घेउन समस्त सुशिप्रेमी मिपाकरांची मागणी पुर्ण केल्याबद्दल पराचे मिपाकरांतर्फे आभार. :)
13 Jul 2011 - 5:20 pm | गणेशा
हा भाग ही छान झाला आहे.
लिहित रहा... वाचत आहे...
13 Jul 2011 - 5:34 pm | प्यारे१
आयला. परा राखी सावंतचा एवढा मोट्ठा फॅन आहे हे ठाऊक नव्हतं आपल्याला.
संदर्भ : http://www.misalpav.com/node/18498#comment-322377
13 Jul 2011 - 5:45 pm | स्वाती दिनेश
परत पहिल्या भागापासून सगळे वाचून काढले, फ्लो मस्तच.. आता मात्र ब्रेक नको लावू रे परा... लवकर पुढचा भाग लिही..
स्वाती
13 Jul 2011 - 6:06 pm | प्रास
पैजारबुवांच्या सकाळ सकाळ लिंक देण्यामुळे आधीचे चार भाग वाचून झाले आणि दुपारच्यालाच पाचवा भाग वाचायला मिळावा हा अगदी मणिकांचन म्हणावासाच योग वाटतोय.....
पराशेट, येऊंद्या पुढले भागही.....
पुलेप्र
13 Jul 2011 - 6:19 pm | सोत्रि
पराशेठ,
ह्या आधिचा प्रतिसाद, हा भाग न वाचताच दिला होता. आत्ताच हा भाग वाचून झाला.
शब्द सुचत नाहीयेत प्रतिसादासाठी, आता फक्त आल्या-आल्या तुला गाठून, घसा ओला केल्यावरच शब्द सुचतील.
वेळ राखून ठेव, येतोच आहे रविवारी परत :)
चियर्स :beer:
- (सुशिप्रेमी) सोकाजी
13 Jul 2011 - 6:25 pm | शाहिर
चालु राहु दे !!
13 Jul 2011 - 7:05 pm | प्रभो
लवकर लिही बे पुढचा भाग!!
13 Jul 2011 - 7:12 pm | राजेश घासकडवी
स्पीड लय भारी मेंटेन केलाय. पुढच्या भागांत आणि ते टाकण्यातही असाच जोर मारावा.
13 Jul 2011 - 8:20 pm | इंटरनेटस्नेही
नेहमीप्रमाणे जागतिक दर्जाचे लेखन. सुंदर.
13 Jul 2011 - 8:49 pm | प्रीत-मोहर
परा पुढचे भाग टाकण्यात एवढा वेळ खाउ नकोस झाल....
13 Jul 2011 - 9:48 pm | श्रावण मोडक
वेळच्या वेळी टाकत जा ना. च्यायला, आता पाच भाग वाचण्यासाठी वेळ काढावा लागणार. एकत्र वाचलं तर टोटल लागणार. नाही तर बोंब.
पालथे धंदे जरा कमी करा. ;)
14 Jul 2011 - 9:32 am | प्रचेतस
लेखनशैली मस्तच जमलीय. आता टकलावर खारका मारणारे आणि सॉर्बिट्रेटची गोळी गिळणारे बे. सी. पी. दिक्षित बघायला मजा येईल.
पुढचे भाग येउ दे लवकर.
14 Jul 2011 - 12:09 pm | प्राजक्ता पवार
पुढील भाग लवकर लिही .
14 Jul 2011 - 6:31 pm | वपाडाव
राप्चिक......
14 Jul 2011 - 7:21 pm | विजुभाऊ
बोळा निघाला म्हणायचा.........
बरे झाले आता लिखाणाचा फ्लो सुरू होईल
15 Jul 2011 - 4:00 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
अब आयेगा मजा.
असं म्हनून क्रमशः???
ओ पराशेठ कशापायी जीवाला घोर लावताय?
म्होरं लिवा की बिगीबिगी....
15 Jul 2011 - 5:01 pm | चिगो
अरे किती दिवस लावलेस रे भाऊ !? आता बिगी बिगी लिवता र्हा म्हण्जे झालं..
जबरदस्त जमतंय राव.. बॅ. दिक्षितांचं लांबलचक प्रास्ताविक आणि त्यावर अमरचा पर्फेक्ट टायमिंगचा "ऑब्जेक्शन"..
लगे रहो..
16 Jul 2011 - 12:04 am | आंबोळी
पर्या फोद&च्या,
अशि उत्कंठा ताणून क्रमशः टाकणे हे माणूसकीला धरून नाही. सबब पुढचे भाग लवकरात लवकर टाक.
18 Jul 2011 - 4:28 pm | चिमी
पर्या ,
लवकर टाक पुढचा भाग अन म्हने स्पीड लय भारी मेंटेन केलाय. किती बोअर होतय ओफिसमधे
:-(
19 Jul 2011 - 10:17 am | मृत्युन्जय
परा तुझ्या कथेच्या दोन भागांमध्ये अटलबिहारी वाजपेयींच्या भाषणातल्या पॉज पेक्षा सुद्धा जास्त वेळ जातो रे. अश्याने कथा पुर्ण होइपर्यंत मिपावरच्या बर्याच जणांची स्वर्गात रंभा उर्वशी बरोबर डान्स करण्याची वेळ येइल, दारा बुलंद आरोपीच्या पिंजर्यातच जीव तोडेल, फोर्झ इराणीचे केस पांढरे होतील, मंदारचा अण्णु गोगटे होइल आणि अमर तारीख पे तारीख , तारीख पे तारीख म्हणत म्हणत आत्महत्या करेल.
असो. (नेहेमीसारखेच) चांगलेच लिहिले आहे हे वेगळे सांगत नाही.