प्रिय मिपा कर,
मी एक नवीन मिपा कर आहे. सध्या व्हर्जिनिया टेक या अमेरिकन विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. हे विद्यापीठ वॉशिंगटन डीसी पासून ३०० मैलावर ब्लॅकस्बर्ग या छोट्याश्या गावात आहे. विद्यापीठाचा परिसर खूपच सुंदर आहे. नुकतेच मी काही फोटो घेतलेत. ते इथे सादर करत आहे. आशा करतो कि मिपा कर चांगला प्रतिसाद देतील. फोटोंवर प्रतिक्रिया दिल्यास अति उत्तम.
From " alt="" />
From Time for rebellion act" alt="" />
From Time for rebellion act" alt="" />
From Time for rebellion act" alt="" />
From Time for rebellion act" alt="" />
From Time for rebellion act" alt="" />
From Time for rebellion act" alt="" />
From Time for rebellion act" alt="" />
From Time for rebellion act" alt="" />
From Time for rebellion act" alt="ekant" />
From Time for rebellion act" alt="" />
From Time for rebellion act" alt="" />
From Time for rebellion act" alt="" />
From Time for rebellion act" alt="" />
From Time for rebellion act" alt="" />
धन्यवाद !!
आपला
मंदार
विज्ञानशाखेच्या पदवीत्तर पदवीचा विद्यार्थी (उद्योग आणि प्रणाली अभियांत्रिकी)
व्हर्जिनिया टेक, ब्लॅकस्बर्ग, व्हर्जिनिया
अमेरिकन संयुक्त राज्य
प्रतिक्रिया
21 Apr 2011 - 7:48 am | स्पंदना
मना पासुन बोलु? कोल्हाप्रुरीन बोलतेय..
आयल्ला! मिपा ला खजीना गवसलाय या घाटीच्या रुपान. कुठलाही शब्द फिका पडावा अश्या छाया चित्रणाला फकत
साष्टांग!!
अजुन कुणी विचार करा अन ती साष्टांग घालणारी स्मायली तयार करा.
शेवटच्या फोटोत ढगात एक विमानाची आकृती दिसते, पहिला फोटो जीव घेतो, खल्लास . वेगळा अँगल, वेगळी प्रतिभा, शब्द अपुरे आहेत इथे. किती बोलु अन किती नको इतके सुन्दर फोटोज. कीप इट अप !!
21 Apr 2011 - 10:54 am | परदेश् वासी तरि...
एकदम झ्याक कॉमेंट दिलीत कि राव तुम्ही. क्वोल्हापुरी ऐटीत. दिल खुश झाला. नवीन फोटो टाकीन लवकरच !!
21 Apr 2011 - 9:10 am | स्पा
मिपावर स्वागत....
अफाट फोटू मित्रा..
पाण्याच्या थेंबांचा तर क्लासच ....
जमल्यास फोटोंवर वाटर मार्क टाकत जा
21 Apr 2011 - 10:56 am | परदेश् वासी तरि...
धन्यवाद मित्रा
21 Apr 2011 - 9:33 am | शिल्पा ब
फोटो चांगले आहेत. ते पांचाळ यांच्या नावाने काय आहे तिथे?
21 Apr 2011 - 11:02 am | परदेश् वासी तरि...
शिल्पा, तुम्हास कदाचित माहिती असेल कि काही वर्षांपूर्वी माझ्या विद्यापीठात एका माथेफिरुनी ३२ लोकांची गोळ्या घालून हत्या केली होती. त्यामध्ये हि मुंबईची मुलगी पण होती. विद्यापीठात ह्या ३२ लोकांची नावे कोरून ठेवली आहेत ,आठवण म्हणून. अधिक माहिती साठी हे वाचा. फार संवेदनशील विषय आहे तो विद्यापीठामध्ये.
http://en.wikipedia.org/wiki/Virginia_Tech_massacre
21 Apr 2011 - 9:34 am | ५० फक्त
मंदार,
मिपावर स्वागत, आणि फोटोबद्दल बोलायची माझी हिम्मत नाही. एकापेक्षा एक सुंदर फोटो आहेत. वर अपर्णा म्हणते आहे तसंच साष्टांग तुला.
आणि हो तुझ्या अभ्यासात तुला यश मिळो या शुभेच्छा.
21 Apr 2011 - 11:04 am | परदेश् वासी तरि...
धन्यवाद. पण साष्टांग वगैरे घालण्या इतका मोठा छायाचित्रकार मी नक्कीच नव्हे. शिकतो आहे मी हि कला अजून.
21 Apr 2011 - 10:02 am | किसन शिंदे
मंदार, काय फोटू काढलेत राव...:)
खतरनाकच...!!
१ ला आणि ९ व फोटू कातरवेळी काढलेला आहे काय?
अवांतर: मंदार नाव पाहिल्याबरोबर आपल्याला पराच्या भन्नाट कथेतला मंदार पटवर्धन आठवला.;)
पुढचा भाग कधी टाकतोयस रे परा.:)
21 Apr 2011 - 11:06 am | परदेश् वासी तरि...
हो मित्रा अगदी बरोबर ओळखलस. सायंकाळी काढलेत ते फोटो मी.
21 Apr 2011 - 10:13 am | टारझन
काही फोटु ठिक आहेत , पण काही फोटु हुकलेले वाटतात . नको तो भाग ब्लर झालाय तर नको तो भाग फोकस झालाय .
अर्थात हे सगळे ऑटोमोड मुळे झाले असावे असा एक तर्क .
बाकी , आपण व्हर्जिनिया मधे आहात , पीजी करत आहात आणि वॉशिंग्टण डीसी पासुन ३०० मैलावर आहात , हे तिन फोटो भयंकर आवडले . :)
- कैलास वासी तरीही कृष्णवर्णी
21 Apr 2011 - 1:29 pm | परिकथेतील राजकुमार
टारबाशी सहमत आहे.
फोटोग्राफीतली शून्य अक्कल असुनही असे सांगावेसे वाटते की बर्याच फोटोंचे अँगल पाहून चार पेग पिल्यासारखे वाटले. एका फोटोत अर्धा खांब का आणल्या गेल्या आहे ते कळले नाही.
बाकी जाणकारांनी कौतुक केले असल्याने आम्ही फोटो समजुन घेण्यात कदाचित कमी पडत असू.
21 Apr 2011 - 1:41 pm | टारझन
अगदी, ,, वरनं तिसरा आणि पाचवा फोटु पाहुन मला ही नशा चढली .. खुपंच नशीले फोटु आहेत ;)
21 Apr 2011 - 11:16 am | अन्या दातार
अनेक फोटो खूपच चांगले आहेत. बाकी झेंड्याच्या फोटोबाबतीत टार्याशी सहमत!
इतर फोटोच्या बाबतीत अपर्णाताईंशी सहमत :)
खडगपूरवासी तरी कोल्हापुरी
21 Apr 2011 - 11:20 am | परदेश् वासी तरि...
सगळ्यांनी भर भरून प्रतिसाद दिल्याने माझा उत्साह अजून वाढला आहे. लवकरच नवीन फोटो टाकावे म्हणतो. माझ्या सगळ्या फोटोंना एका शब्दाचे नाव देत असतो मी. ह्या फोटोंची नावे अशी :
१. निरोप समारंभ
२. सावली
३. प्रतिबिंब
४. त्रिशूल
५. रक्तवाहिनी
६. उंची
७. आठवण
८. गरज
९. कातर
१०. कृष्ण धवल
११. वृद्ध
१२. कंस
१३. समांतर
१४. गुरुत्वाकर्षण
१५. स्तंभ
१६. गारठा
१७. एकसंध
21 Apr 2011 - 11:33 am | मराठमोळा
छान...
21 Apr 2011 - 11:45 am | यशोधरा
काही फोटोंमध्ये अॅपरचरचा केलेला वापर खूप आवडला.
21 Apr 2011 - 11:55 am | पप्पू
BT आणि गोल बाण
फोटो नंबर ५ ( पाच )
म्हणजे कशाची खूण आहे
अज्ञानी माणसाला ज्ञानी करा
21 Apr 2011 - 12:06 pm | मृत्युन्जय
फोटो चांगले आहेत. खासकरुन पहिली, नववा आणि शेवटचा.
काही फोटो मात्र गंडले आहेत. किंवा मला फोटो ग्राफी नीट येत नाही म्हणुन तसे वाटत असेल. पण चौथ्या फोतोत फोकस चुकला असे वाटते आहे. शिवाय पहिले फोटो थोडा साइझ मध्ये पण गंडला आहे.
एरवी आमची फोटोग्राफी भयाण असल्यामुळे काही जास्त बोलत नाहीत. बाकी फोटो खासच.
बादवे मिपावर स्वागत.
21 Apr 2011 - 12:30 pm | सूर्य
अत्यंत उत्तम फोटो. पहिला फोटो बघुनच अपेक्षा वाढल्या (आणि नंतर त्या पुर्ण झाल्या )
जसे अपर्णाताई म्हणतात तसे "काय बोलु आणि काय नको" असे झालेय.
पुढील फोटोंची वाट बघत आहे ;)
- सूर्य
21 Apr 2011 - 12:50 pm | गणपा
मला तर भौ त्या पडत्या मोत्याचा फटु खुप आव्ड्ला. :)
बाकी जाणकारारांशी सहमत.
21 Apr 2011 - 1:28 pm | सूर्य
मलासुद्धा खुप आवडला.
कसा काढला ते सुद्धा सांगावे अशी 'परदेश् वासी तरि' यांना विनंती.
- सूर्य.
21 Apr 2011 - 1:23 pm | गणेशा
अप्रतिम .. निशब्द ./..
फोटो पहातच बसावे असे वाटते आहे..
आणि अश्या सुंदर गावी तुम्ही असलेले पण आवडले ..
येवुद्या आनखिन
आणि हा मिपावर मनपुर्वक स्वागत
21 Apr 2011 - 5:12 pm | प्रास
मंदारभौ,
मिपावर स्वागत!
फोटो छान आहेत. आवडले.... :-)
अवांतर -
फार पूर्वी (सब टीव्ही यायच्या आधी) दूरदर्शनवर मार्कण्ड अधिकारी, आपल्या अधिकारी ब्रदर्सच्या सिरियल्स (बन्दिनी, परमवीर वगैरे वगैरे) मध्ये "वैशिष्ठ्यपूर्ण" छायाचित्रण करायचे. एखाद्या व्यक्तिरेखेच्या शरीराचा अर्धा नेहमीप्रमाणे आणि अर्धा भाग कंगोरेदार ग्लास मधून दिसेल किंवा समोर बोलणारी व्यक्ती ज्या दुसर्या व्यक्तीशी बोलतेय त्या व्यक्तीच्या चेहर्यावरील भाव त्याच वेळी बोलणार्या व्यक्तीच्या शेजारील आरशातून दिसतील अशा आणि अशा प्रकारच्या अतर्क्य फ्रेम्स मधून ते शूट करायचे.
तुमच्या ३, ४, ५, १०, १२, १३ आणि १४ क्रमांकांच्या फोटोज वरून अधिकारी ब्रदर्स यांची प्रचंड आठवण झाली.
;-) ह. घ्या.
21 Apr 2011 - 5:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मंदार, मिपावर स्वागत आहे. फोटो छान आहेत. कोणते आवडले असे विचाराल तर लंबर एकचा आणि शेवटचा फोटो मला आवडला. बाकी, तुमच्या ब्लॅकस्बर्ग गावाचे काही वैशिष्टे वगैरे असे काही माहितीपूर्ण लेखनही येऊ दे.........!
बाकी, अभ्यासाला शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
22 Apr 2011 - 7:53 am | सहज
मंदार, मिपावर स्वागत आहे.
बाकी सरांशी सहमत.
22 Apr 2011 - 11:12 am | निनाद
हेच,
मंदार, मिपावर स्वागत आहे.
बाकी सहज आणि सरांशी सहमत.
21 Apr 2011 - 5:52 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
तुफान फटू राव!! क्यॅमेरा कन्चा म्हनाचा?
22 Apr 2011 - 8:12 am | परदेश् वासी तरि...
कॅमेरा "कॅनन रेबेल टी १ आय" आहे. लेन्स १८-५५ मी. मी. फोकल लेन्थ
22 Apr 2011 - 10:29 am | क्राईममास्तर गोगो
उत्तम फोटोग्राफी ... कॅमेरा कुठलाय?
21 Jul 2011 - 6:02 pm | परदेश् वासी तरि...
कॅमेरा "कॅनन रेबेल टी १ आय" आहे. लेन्स १८-५५ मी. मी. फोकल लेन्थ
22 Apr 2011 - 12:29 pm | नरेशकुमार
सगळ्यांनी अगदी तोंड भरुन कौतुक केलेले असल्याने मी आता वेगळे काय करत नाय.
WELCOME !
24 Apr 2011 - 6:40 pm | अनामिक
काही फोटो खरंच चांगले आले आहेत. तर बर्याच फोटोंचा अँगल चुकल्या सारखे वाटले, तर काहींमधे काही भाग उगाच ब्लर झालाय.
पुफोशु!
25 Apr 2011 - 10:12 am | पिंगू
मिपावर स्वागत.. फोटो बघून डोळ्यांना आनंद जाहला.
- पिंगू
25 Apr 2011 - 3:12 pm | RUPALI POYEKAR
देखणे फोटो,
21 Jul 2011 - 6:13 pm | मदनबाण
सुंदर फोटु... :)
असेच क्षण टिपत रहा आणि इथे ते पोस्टत रहा... ;)
21 Jul 2011 - 6:43 pm | विलासराव
आहेत फोटो.
21 Jul 2011 - 9:20 pm | इरसाल
सहीच....
मिपावर स्वागत मित्रा.
तुझी कला अशीच उत्तरोत्तर वाढत जो आणि ज्ञानार्जानात उदंड यश लाभो.
21 Jul 2011 - 10:23 pm | रेवती
दोन तीन फोटो सोडले तर बाकीचे भारीयेत.
तुम्हाला सावल्यांचे फोटू काढायला आवडतात असे दिसते.
22 Jul 2011 - 12:45 am | बिपिन कार्यकर्ते
छानच!