शेतकरी गीत: शेतात आंतरपीक आपण करू

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
19 Apr 2011 - 2:31 am

शेतकरी गीत: शेतात आंतरपीक आपण करू

अगं ए पारू; होवूया आपण आता सुरू
हाती येईल आपल्या पैका
चल शेतात आंतरपीक आपण करू ||धृ||

पावरबाज मंतार आंतरपिकाचा
अनुभव आहे मोठ्या लोकांचा
तोंडं बोलती त्यांची वाचा
काय सांगू, कसं सांगू
मी आता कसा ग धिर धरू
चल शेतात आंतरपीक आपण करू ||१||

आसं नको बघू लई खाली वाकून
पिक नको उघडं करू, ठेव झाकून
पक्षी अन किडे, वारं-वावधान
पिक ठेव त्यापासून राखून
नायतर म्हनायची टोळधाड कशी मी आवरू?
चल शेतात आंतरपीक आपण करू ||२||

लावू उस मका केळी अन ज्वारी
झालंच तर आहे द्राक्षे गहू बाजरी
फळाफुलासोबत करू आपण लावणी
आगं मुख्य पिकासोबत
सार्‍या दाळी अन कडधान्य दाळी पेरू
चल शेतात आंतरपीक आपण करू ||३||

पिकाचं पिढीजात वैरी हाय हे तण
जा म्हटलं तरी जात नाही हे बेणं
आंतरपिकानं जमीन जाती झाकून
सुर्यप्रकाश तणाला मिळत नाही त्यानं
अशानं बंदोबस्त होतो तणाचा
आन तण लागतं मरू
चल शेतात आंतरपीक आपण करू ||४||

पालापाचोळा त्या तिथंच खाली पडं
जमीनीत खत होवून तो मग मुरं
उत्पन्नात वाढ भरघोस होईल ग सुरू
चल शेतात आंतरपीक आपण करू ||५||

आता मी राजा ग शेताचा गुणी
नटशील कशी तू आक्षी राणीवाणी
घालीन दहा तोळ्याची माळ तुझ्या गळी
आखाजीला रास धान्याची तू ओवाळी
लाजू नको बुजू नको तू
नको तू आता बावरू
चल शेतात आंतरपीक आपण करू ||६||

- पिकांची लावणी करणारा प्रगतीशील शेतकरी - पाषाणभेद (दगडफोड्या)
१९/०४/२०११

शांतरसप्रेमकाव्यकवितातंत्रविज्ञान

प्रतिक्रिया

निनाव's picture

19 Apr 2011 - 3:08 am | निनाव

पाभे - शत-शत कोटी प्रणाम तुम्हांस! इतुके सुंदर गीत रचले आहे. मस्तच. खुपच सुंदर. किती छान आणिक लयदार आहे ही रचना. वाचता वाचताच लय लागली. शेत दिसू लागले.. पीकं दिसू लागली.. व्वाह सुंदर वर्णन. विशेषतः शेतकरी ला किती जबरदस्त मेस्सेज दिला गेला आहे ह्यातून.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

19 Apr 2011 - 10:52 am | मिसळलेला काव्यप्रेमी

आसं नको बघू लई खाली वाकून
पिक नको उघडं करू, ठेव झाकून
पक्षी अन किडे, वारं-वावधान
पिक ठेव त्यापासून राखून
नायतर म्हनायची टोळधाड कशी मी आवरू?
चल शेतात आंतरपीक आपण करू

मस्त मस्त!!

एक शंका:
आखाजीला रास धान्याची तू ओवाळी

आखाजी म्हणजे काय हो?

शंका विचारल्याबद्दल धन्यवाद, मिका.

आखाजी म्हणजे - अक्षय तृतीया

गणेशा's picture

19 Apr 2011 - 8:18 pm | गणेशा

मस्तच