मी आहे एक सामना

मुक्तसुनीत's picture
मुक्तसुनीत in जे न देखे रवी...
30 Mar 2011 - 1:24 am

मी आहे

मी आहे एक सट्टा
पाच हजार कोटींचा
(सगळे खेळाडू नि बुकी मिळून)

मी आहे एक कमांडो स्क्वाड
काही डझनांचा
(पोलीस बिलिस चिल्लर सोडून )

मी आहे एक खेळ
बावीस जणांचा
(बदनाम झालो युद्ध युद्ध म्हणून)

मी आहे एक झिंग
मी आहे शिव्यांचा पाऊस
मी आहे टाळ्यांचा कडकडाट
मी आहे एक ईर्षा
मी आहे चढलेला त्वेष
मी आहे दडपलेला द्वेष
मी आहे एक भोळसट प्रार्थना
मी आहे एक करोडोंची संधी
मी आहे एक जिंकल्यावर मारलेली आरोळी
मी आहे एक हरल्यावर केलेली आत्महत्या
मी आहे एक दिवस
काल आणि आजसारखाच.

मी आहे एक सामना.
एकशे चाळीस कोटी लोकांनी पाहिलेला
(कामधाम बाजूला ठेवून )

भयानकहास्यबिभत्सकरुणवीररसअद्भुतरसरौद्ररसकविता

प्रतिक्रिया

धनंजय's picture

30 Mar 2011 - 1:28 am | धनंजय

जीवन आहे क्रिकेट राजा.

सहमत.
हुकला तो संपला.:)
कविता आवडली.

हा हा हा ... मुसु सेट णे भी सिच्युएशन कॅश कियेली है .. :)
बाकी ते पाच हजार कोटी चा सट्टा कोण म्हणे? एक चॅनल ६ हजार कोटी म्हणे तर दुसरे ६० हजार कोटी :) काय मोजमाप आहे का ? :)

अवांतर : कधीतरी हाती पडलेली "मी आहे एक सामान" ही कविता आठवली.

- (सट्टासुट्टीत) मॅचसुनित

निलेश कठ्चा's picture

30 Mar 2011 - 1:31 am | निलेश कठ्चा

मी आहे एक दिवस
काल आणि आजसारखाच.
(कधी जिंकलेला तर कधी हर(व)लेला)

इतका बदल सुचवून पाहतो.

(अवांतरः कीतीही आवाहन केले तरी हे युद्ध म्हणनुच खेळले जाणार अन बघितले जाणार. वाट फक्त कुणाचे पानीपत कसे होते हे पाहण्याची.)

गणपा's picture

30 Mar 2011 - 1:43 am | गणपा

मी आहे एक सामना.
एकशे चाळीस कोटी लोकांनी पाहिलेला
(कामधाम बाजूला ठेवून )

मिडियाने भरवलेला बाजार पाहुन उद्याची मॅच पहावी की नाही असा विचार करतोय.
एवढा हाईप करुन ठेवला आहे... जर चुकुन माकुन मनाविरुद्ध निकाल लागला तर मिडियावाले कोमात जातिल.

(ऑफिस मधुन सुट्टी मिळण अंमळ अशक्य आहे हे ही एक मुख्य कारण आहेच).

प्यारे१'s picture

30 Mar 2011 - 1:18 pm | प्यारे१

>>>>एवढा हाईप करुन ठेवला आहे... जर चुकुन माकुन मनाविरुद्ध निकाल लागला तर मिडियावाले कोमात जातिल.

असहमत.

ते आपल्याला ( पक्षी: सामान्य जनतेला-संसदीय शब्द वापरलेला बरा) कोमात घालवतील.

मनाविरुद्ध वगैरे काही नसते त्यांच्या. भारतीय संघ जिंकला तर धत्तड धत्तड आणि हरला तर बॉ बॉ बॉ बॉ एवढाच फरक असेल.

- कौन है मॅच के गुनहगार, आखिर किसने खुपसा पीठ में खंजर करत नुकताच आवाज फुटलेले अथवा चिरक्या आवाजाचे वार्ताहार टिप्पण्या करायला तयार.

न्यूज चॅनल्स पेक्षा आणखी काय वैताग असू शकतो हे कुणी सांगू शकेल काय?

कौन है मॅच के गुनहगार, आखिर किसने खुपसा पीठ में खंजर करत नुकताच आवाज फुटलेले अथवा चिरक्या आवाजाचे वार्ताहार टिप्पण्या करायला तयार.

=))
'इंडिया टिव्ही ', 'आज तक' चैनेल्स हमखास अशीच काहितरी टिपण्या देत करतात .. इमोशनल अत्याचार.

प्राजु's picture

30 Mar 2011 - 1:47 am | प्राजु

खरं तेच आहे..भारत्-पाक मॅच नेहमीच युद्धासारखी असते..! इनफॅक्ट नेहमीच्या खेळासारखाच हा खेळ व्हायला हवा.

असो.. उद्या भारतच जिंकणार. :)

राजेश घासकडवी's picture

30 Mar 2011 - 2:29 am | राजेश घासकडवी

सामान्यांच्या मनामनाला स्पर्श करणाऱ्या सामन्याचं चित्रण आवडलं. अभिनिवेषहीन, गुणमूल्यात्मनाशिवायचं, जसं आहे तसं.

भडकमकर मास्तर's picture

30 Mar 2011 - 2:29 am | भडकमकर मास्तर

वर्जेश सोळंकी झिन्दाबाद

सन्जोप राव's picture

30 Mar 2011 - 5:44 am | सन्जोप राव

मी आहे एक सामना.
एकशे चाळीस कोटी लोकांनी पाहिलेला
(कामधाम बाजूला ठेवून )

हम्म. हेच एखद्या बास्केटबॉलच्या, बेसबॉलच्या, गेलाबाजार फूटबॉलच्या म्याचबाबत म्हणता येईल का याचा विचार करतो आहे.

मुक्तसुनीत's picture

30 Mar 2011 - 6:01 am | मुक्तसुनीत

हेच एखद्या बास्केटबॉलच्या, बेसबॉलच्या, गेलाबाजार फूटबॉलच्या म्याचबाबत म्हणता येईल का याचा विचार करतो आहे.

होय. पण ते हॅम्बर्गर डॉट कॉम सायटीवरच्या "व्हॉट द सन डजंट सी, सीज द पोएट" या सेक्शनमधे म्हणता येईल असे वाटते :)

वन नोज् द स्टेट ऑफ अफेअर्स इन हेवन , हाऊएव्हर
द थॉट इज नाईस, ओह गा़लिब, टू कीप द हार्ट अम्युज्ड ! ;-)

विजुभाऊ's picture

30 Mar 2011 - 11:33 am | विजुभाऊ

अरे व्वा या प्रतिसादाची वाट पहातच होतो.
एकशे चाळीस कोटी लोकांनी पाहिलेला
(कामधाम बाजूला ठेवून )

या बाबतीत एवढेच म्हणेन

ये आवारगी....है दिल हमारा
मन को समझाना ये दस्तूर हमारा
गर जन्नत हो नसीब मेरे
जश्न मनाते हो हम और
मौत आजाये ये जजबा हो हमारा

वाहीदा's picture

30 Mar 2011 - 12:15 pm | वाहीदा

हेच एखद्या बास्केटबॉलच्या, बेसबॉलच्या, गेलाबाजार फूटबॉलच्या म्याचबाबत म्हणता येईल का याचा विचार करतो आहे

क्रिकेट रक्तात भिनले आहे. अन त्यात ते मिडियावाले म्हणजे क-ह-र

काहीही असले तरी ,
North or South.. East or West ,INDIA is THE BEST !!

जुनुन तो है ही है,
क्यूं की वोह अदा$$एं उफ्फ युं म्मा !

(क्रिकेट पेक्षा क्रिकेटरवर नजर खिळवून ठेवणारी ;-) ) वाहीदा

विकास's picture

30 Mar 2011 - 6:48 am | विकास

एकदम आवडली...

मी आहे एक सामना.
एकशे चाळीस कोटी लोकांनी पाहिलेला
(कामधाम बाजूला ठेवून )

सहमत!

चित्रा's picture

30 Mar 2011 - 7:47 am | चित्रा

कविता फारच 'रसाळ' आहे! :)

मी आहे एक सामना.
एकशे चाळीस कोटी लोकांनी पाहिलेला
(कामधाम बाजूला ठेवून )

शेवटी हेच खरे :)

*
नॉम चॉम्स्कीची आठवण येते.

स्पंदना's picture

30 Mar 2011 - 10:11 am | स्पंदना

अग्दी अगदी !

मला तर आत्ता पासुन गणपती वगैरे पाण्यात बुडवु काय अस वाटायला लागलय ब्वा!! पण नक्कि काय कराय्च असत पाण्यात बुडवुन ठेवायचा म्हणजे ते माहित नसल्याने मी स्वतः पाण्यात बसाव की काय असा विचार सुरु आहे.

पण एक मात्र खर भारत जिंकणारच!!

सहज's picture

30 Mar 2011 - 10:34 am | सहज

>स्वतः पाण्यात बसाव की काय असा विचार

शक्य आहे.

चित्र- जालावरुन (hotelchatter.com)

टारझन's picture

30 Mar 2011 - 10:57 am | टारझन

चित्र आवडले ... जर कंपनी असेल तर प्रत्येक शॉटचा .. प्रत्येक विकेटचा .. प्रत्येक रनाचा आणि प्रत्येक बॉलचा आनंद घेता येईल असे वाटते . थोडक्यात क्रिकेट ऍट इट्स बेस्ट .. अँड एक्साईटमेंट अबव्ह स्काय का काय ते ..

- (कंपनी प्रेमी) पिंचोबा हिटर

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Mar 2011 - 12:27 pm | llपुण्याचे पेशवेll

टार्‍या तुला सामन्याचा आनंद लुटण्याची भलतीच उर्मी आलेली दिसते आहे.

होय , तुला नाहीये काय उर्मी ? सामना पहायची !

-( पुरुषप्रधान मॅच प्रेक्षक) सय्यद बंडा किर्माणी

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Mar 2011 - 12:41 pm | llपुण्याचे पेशवेll

आहे पण आम्ही हपिसात बसून फ५ कळ दाबत दाबत म्याच बघणार. सहज म्हणतात तशी नाही.

फ५ ( वरुन पाचवी खोली आठवली ) दाबता दाबता लोलत लोलत जाऊ णकोस म्हणजे मिळवली ... तुमच्या कंपणीचा णिषेध का नाही करत ?
ईएसपीएन च्या साईटवर लाईव्ह ब्रॉडकास्ट आहे .. ब्लॉक नसेल ते घे मजा करुन .. गेला बाजार कँटीनात टिव्ही असेल ना तुमच्या ? :)

-( पर्यायी) ढेक्कुणलाडू
तुझा दर्जा किती , तु लिहीतोयस किती !
तुझा माज किती , तु उड्या मारतोयस किती !

पैसा's picture

30 Mar 2011 - 10:51 am | पैसा

पण हा फक्त खेळ आहे हे बरेच जण विसरलेले आहेत, आणि भारत पाकिस्तान म्हटलं की ते तसंच होणार! बाकी ते हजार कोटी म्हणजे किती शून्य हो?

रमताराम's picture

30 Mar 2011 - 12:18 pm | रमताराम

बाकी ते हजार कोटी म्हणजे किती शून्य हो?
असेच विचारतो. नाही म्हणजे एवढ्या पैशात त्या बुकीच्या किती पिढ्या बसून खाऊ शकतील हो?
(ही जित्याची खोड, पुणेरी ना आम्ही. आमची संपन्नतेची फूटपट्टीच ही की 'किती पिढ्या बसून खाऊ शकतील' इतका पैसा आहे अमक्याकडे असो मोजमाप करायचे.)

अमोल केळकर's picture

30 Mar 2011 - 10:57 am | अमोल केळकर

सुंदर :)

अमोल केळकर

विसोबा खेचर's picture

30 Mar 2011 - 11:14 am | विसोबा खेचर

छोटेखानी काव्य मस्तच..:)

तात्या.

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Mar 2011 - 12:27 pm | llपुण्याचे पेशवेll

काव्यातल्या भावनांशी सहमत आहे.

मृगनयनी's picture

30 Mar 2011 - 12:59 pm | मृगनयनी

आवडलं! मु.सु.'जी... तुमचं "मुक्तक" आवडलं! :)

सामना - म्हटलं तर व्हर्च्युअल रूपक .किन्वा ... म्हटलं तर खूप सार्‍या लोकांनी एका विशिष्ट कारणासाठी / उद्दिष्टासाठी एकत्र येऊन केलेल्या जल्लोषाचं प्रतीक! ...

आजच्या पार्श्वभूमीवर मस्तच!!!! :)

खूप छान!

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Mar 2011 - 2:30 pm | बिपिन कार्यकर्ते

हम्म!!!

वाहीदा's picture

30 Mar 2011 - 2:35 pm | वाहीदा

~ एम एस धोनी
~ मिरपूर ...India Beat Bangladesh
~ एम चिन्नास्वामी स्टेडियम ... India beat Ireland
~ एम ए चिदंबरम स्टेडियम ...India beat West Indies
~ मोटेरा ...India Beat Australia

पुढचा टप्पा मोहाली अन शेवटचा टप्पा मुंबई !!

विकास's picture

31 Mar 2011 - 1:32 am | विकास

स्तच! :-)

गणपा's picture

31 Mar 2011 - 1:52 am | गणपा

+१ आपा. :)

नरेशकुमार's picture

1 Apr 2011 - 1:19 pm | नरेशकुमार

मी आहे नरेशकुमार !
एक प्रतिसाद देउन बाजुला होनारा.