मुंब्रा देवी आणि परिसर

मदनबाण's picture
मदनबाण in कलादालन
26 Feb 2011 - 12:58 pm


मुंब्रा देवी मंदिर

पायर्‍या चढताना डोंगरावर मर्कट लिला चाललेल्या दिसल्या, या नमुन्याला पटकन टिपला. ;)

मुंब्रा स्टेशन बाहेरच असलेली ही मशिद.

स्टेशन पासुन चढण चढल्यावर हा मार्ग लागतो, रस्ता ओलांडुन परत पायर्‍या चढल्यावर हे दॄष्य दिसते.

मुंब्रा परिसर १

दिवा स्टेशनहुन निघालेली गाडी मुंब्रा खाडीवरील लोखंडी पुलावरुन येत आहे. उजवीकडे दिसणारा जलद गती मार्ग आहे.

गाडी हा पुल पार करुन मुंब्रा स्थानकात प्रवेश करते.

डावीकडे आहे मुंब्रा रेल्वे स्थानक, नंतर उजवीकडे मुंब्रा खाडी आणि दिव्याकडे जाणारा रेल्वे मार्ग.

कॅमेरा :--- निकॉन प-१००
फोटो काढताना या परिसरात प्रचंड धुरके होते, त्यामुळे फोटो स्पष्ट आलेले नाहीत. :(

जाहीर आभार प्रदर्शन :--- आमचे प्रेरणा स्थान स्पावड्या उर्फ स्पा. ;)
लहानपणा पासुन रेल्वेने प्रवास करताना हे डोंगारा वरील देवीचे स्थान मी पहात होतो,त्याचे आकर्षण मनात घर करुन राहिले होते... स्पामुळे टाळक्यात किडा वळवळला आणि इतके वर्ष मनात असलेली इच्छा पूर्ण झाली. मुंब्रा देवी आणि नवदुर्गा यांचे फोटो काढण्यास मनाई असल्याने त्यांचे फोटो काढता आले नाहीत.

(हौशी फोटु ग्राफर)
मदनबाण.....

संस्कृतीप्रवासछायाचित्रणस्थिरचित्र

प्रतिक्रिया

सचिन राव's picture

26 Feb 2011 - 3:37 pm | सचिन राव

सुंदर फोटो! मस्त!!

पप्पू's picture

26 Feb 2011 - 3:53 pm | पप्पू

छान आहे माहिती

प्रास's picture

26 Feb 2011 - 4:00 pm | प्रास

गेली हजारो वर्षे रेल्वेने प्रवास करताना हा प्रदेश बघतोय पण कधी तिथे जाणं झालं नव्हतं.

मदनबाण, तुमच्यामुळे आज ही एक इच्छाही पूर्ण जाहलीये.

धन्यवाद!

अवांतर - फोटूग्राफर हौशी असूनही त्यानं हौसेने काढलेले फोटू ब्येस आलेत.

अतिअवांतर - आजकाल धुरक्याविना सकाळ झालेली स्मरतेय का?

सहज's picture

26 Feb 2011 - 4:06 pm | सहज

>जाहीर आभार प्रदर्शन :--- आमचे प्रेरणा स्थान स्पावड्या उर्फ स्पा

तरीच फोटो बघताना 'देजॉ वू' झाले :-)

अगदी स्पा सारखेच फोटु आले आहेत , दोघांचे क्यामेरे सारखेच होते काय ? :)

गुंडोपंत's picture

26 Feb 2011 - 4:13 pm | गुंडोपंत

बाणा छान काम केलेस!
मुंब्र्या विषयी अजून काही ऐतिहासिक, सामाजिक माहितीही वाचायला मिळाली असती तर अजून बरे वाटते असते

अमोल केळकर's picture

26 Feb 2011 - 4:33 pm | अमोल केळकर

छान फोटो

अमोल

स्पा's picture

26 Feb 2011 - 4:38 pm | स्पा

बाणा लय भारी फोटू
धुक्यामुळे लोच्या होतो , नीट फोटू येत नाहीत

अवलिया's picture

26 Feb 2011 - 6:13 pm | अवलिया

बाणा ! लई भारी रे... !!
कसा वेळ मिळतो लोकांना कामं सोडून भटकायला !!

कच्ची कैरी's picture

26 Feb 2011 - 7:12 pm | कच्ची कैरी

फोटो अजुन छान आले असते तर मजा आली असती अजुन पहायला पण तुमची अडचण कळली आणि त्या अडचणीच्या मानाने फोटो छानच आहेत.

स्पा's picture

26 Feb 2011 - 7:45 pm | स्पा

इथे अजून काही फोटू बघायला मिळतील

http://www.misalpav.com/node/16310

धागे हायजॅक करणं आणि जाहिरात करणं कुणी यांच्याकडून शिका. :D

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Feb 2011 - 12:55 pm | निनाद मुक्काम प...

@जाहीर आभार प्रदर्शन :--- आमचे प्रेरणा स्थान स्पावड्या उर्फ स्पा. Wink
लहानपणा पासुन रेल्वेने प्रवास करताना हे डोंगारा वरील देवीचे स्थान मी पहात होतो,त्याचे आकर्षण मनात घर करुन राहिले होते... स्पामुळे टाळक्यात किडा वळवळला आणि इतके वर्ष मनात असलेली इच्छा पूर्ण झाली. मुंब्रा देवी आणि नवदुर्गा यांचे फोटो काढण्यास मनाई असल्याने त्यांचे फोटो काढता आले नाहीत.

अगदी अगदी

डोंबिवली वेस्ट येथे एवरेस्ट च्या इमारतीवरील टाक्यांवरून पतंग उडवताना कितीतरी वेळा ह्या डोंगर माथ्याचे दर्शन व्हायचे .
रेल्वेतून जातांना तर नेहमीच हि डोंगरांची मालीका घालायची .
पूर्वी ह्या मंदिरात जायला कच्चा रस्ता होता .तरीही भक्तगण जिद्दीने जायचे .
आता मुंब्रा/ कळवा येथील डोंगरांमध्ये झोपडपट्या झायाल्या आहेत ,त्यामुळे डोंगरांना शेवटची घरघर लागली आहे .
मागे मुंबईतून डोंबिवलीत कार ने येतांना मुब्र्यातून येणे झाले .तेथे अनधिकृत बांधकाम व त्याने रस्त्यांची कोंडी ,व डोंबिवलीला लाजवतील असे खड्डेयुक्त रस्ते ह्यामुळे प्रवास त्रासदायक झाला .

(म्हणून राज ठाकर्यांनी बहुदा डोंबिवली येथील एका कार्यक्रमात जातांना रेल्वेचा वापर केला .)
अनेक देशविरोधी शक्ती येथे वस्तीला असतात असे वाचून आहेत .भारताच्या पहिल्या विजयाविरुद्ध बहुदा तेथे आपला देश हरल्या प्रीत्यर्थ दुखवटा साजरा केला असेल .
तर हे झाले मुंब्रा पुराण.
असेच लहान पणापासून लोकल प्रवासात डोंबिवली ते ठाणे ह्या दरम्यान मुंब्राच्या देवी सारखी काही स्थळे नेहमीच्या पाहण्यात असतात. ती पहायची खूप इच्छा आहे
.
१) दिवा स्टेशनाच्या बाहेर दादू हाल्या पाटील अश्या ठळक अक्षरात एक आगरी खानावळ आहे .
२) दिवा ते मुंब्रा दरम्यान उजव्या बाजूला एका माळरानावर एक सुबक असे मंदिर आहे .( शिव मंदिर )
३) मुंब्रा ते कळवा दरम्यान कळव्यातील डोंगरावर बोगद्यात शिरताना डोंगरावर एक सुंदर बंगला दिसतो .(तो नूतनचा बंगला म्हणून प्रसिध्द आहे .)
''पाहूया कधी योग समजून येतो ते ?

डोंबिवली वेस्ट येथे एवरेस्ट च्या इमारतीवरील टाक्यांवरून पतंग उडवताना कितीतरी वेळा ह्या डोंगर माथ्याचे दर्शन व्हायचे .
अरे वा... तू पण डोंबिवलीकर आहेस तर आणि ते देखील पश्चिम भाग.
ती दादू हाल्या पाटीलची पाटी वाचताना मला नेहमीच गंमत वाटते, आधी डोंबिवली मधे डोक्यावर मोळी घेउन जाणार्‍या (सरपणासाठी) आदिवासी स्त्रिया धावताना दिसायच्या, त्या आता माझ्या पाहण्यात आल्या नाहीत रे... ती त्यांची शिस्त बद्ध रांग, त्यांची लय बद्ध चाल आणि घरी पोहचण्याची लगबग अजुन देखील डोळ्यात साठवलेली आहे. पतंग उडवताना हा डोंगर दिसायचाच.
डोंबिवली ते दादर असा प्रवास करताना कायम हे ठिकाण (मुंब्रा देवीचे) नजरेत यायच...
आता मुंब्रा भागात खारफुटीचे जंगल बुजवुन तिथे मातीचे भराव टाकण्याचे उद्योग चालतात, असं काही वर्तमानपत्रात वाचले होते... बाकी या बद्धल अजुन पुढेही वाचायला मिळेल याची खात्री आहे. ;)
(आधीचा डोंबिवलीकर आणि आत्ताचा ठाणेकर)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

1 Mar 2011 - 9:51 pm | निनाद मुक्काम प...

शाळा कोणती तुमची ?
आमची राणाप्रताप (स्वामी )
आमच्या मासाहेब डोंबिवलीकर जन्माने
त्यामुळे जुनी डोंबिवली अजून आठवते
इच्या भना लगेच आठवले

५ वी नन्तर शाळा तीच ठेवून पूर्वेला एवी बिपी चे कार्यालय आहे त्या इमारतीत नेहरू मैदानाजवळ मुक्काम हलला ,पण शाळेमुळे व घैसास ह्यांच्या पाळणाघर वेस्ट ला असल्याने तेथील संबंध अजून टिकून आहे
माझ्या २ मावश्या एक मामा /आईच्या दोन मामा व एक मावशी व वडिलांची मावशी व काका डोंबिवलीत राहतात .
त्याच्यात त्यांच्या अनेक मावस. चुलत बहिणी पण आल्या .
डोंबिवलीच्या प्रत्येक भागात एक नातेवाईक

माझे अनेक बाल व शाळकरी मित्र आत६ ठाणेकर (तोवर वासी झाले आहेत )
त्यामुळे फडके पेक्षा राममारुती
व मून मून पेक्षा मामलेदार असे आमचे भटकंतीचे अड्डे झाले आहेत .
मून मून च्या आजी ह्या मामलेदार च्या मालकांच्या बहिण आहेत वाटत .
कारण त्यांचा स्टाफ नेहमी डोंबिवली व ठाणे ह्यात फिरत असतो .

नरेशकुमार's picture

27 Feb 2011 - 5:58 pm | नरेशकुमार

छान आहेत फटू.

मी ही काही फटु काढले आहेत.
पण त्यात प्रत्येक फटुमदी मी आहे.
त्या कारणाने अपलोड नाही केली.
पुढील वेळी या गोष्टीचा विचार करुन फटु काढेन.
पावसाळ्यात ही जागा अजुनच अपर्तीम दिस्त्ये.

मुलूखावेगळी's picture

1 Mar 2011 - 9:25 pm | मुलूखावेगळी

ओ वडा, टाका कि त्यात काय हाकानाका

पण फोटो तुम्ही मशीन चोरीला जाण्यापुर्वीचे आहेत का नंतरचे. ;)

पाषाणभेद's picture

1 Mar 2011 - 6:23 pm | पाषाणभेद

फोटो छान आहेत अन नविन माहिती मिळाली.