फायनान्सची तोंडओळख (भाग २): Annuity

क्लिंटन's picture
क्लिंटन in काथ्याकूट
19 Feb 2011 - 12:10 am
गाभा: 

या भागाची काठिण्यपातळी: मध्यम

यापूर्वीचे लेखन:

फायनान्सची तोंडओळख (भाग ०): जादूगार राम कुमार आणि जादुच्या छड्या

फायनान्सची तोंडओळख (भाग १): व्याजाचे दर आणि टाईम व्हॅल्यू ऑफ मनी

मागील भागात आपण एकदा एकरकमी पैसे घेऊन त्यावर अनंतकाळ व्याज देत राहणे (Perpetuity) ची आजची किंमत (Present Value) कशी काढावी हे बघितले.पण अर्थातच Perpetuity हा आपल्या दैनंदिन जीवनात फारसा उपयोगी प्रकार नाही.बहुतांश बॉंड हे Perpetual bonds नसतात. तसेच आपण घरासाठी बॅंकेचे कर्ज घेतले तर बॅंक आज पैसे घ्या पण अनंतकाळ व्याज देत राहा असे म्हणत नाही.त्याचप्रमाणे बॅंकेच्या कर्जाचे मूळ मुद्दलही १५ किंवा २० वर्षांत परत करावे लागते.तेव्हा आपण या भागात दैनंदिन जीवनात उपयोगाचा आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा प्रकार—Annuity बघू. Annuity मध्ये दर वर्षी (किंवा प्रत्येक ठराविक कालावधीनंतर) पण कधीतरी संपणारे सारख्या रकमेचे कॅश फ्लो असतात. उदाहरण घेऊनच Annuity म्हणजे नक्की काय आणि त्याची Present Value कशी काढावी हे बघता येईल.

आपण मागील भागात Present Value आणि Future Value ची खालील सूत्रे बघितली.

आता परत वळू या Annuity कडे. एक साधे उदाहरण म्हणजे समजा व्याजाचे दर दसादशे १०% आहेत आणि मी या वर्षाच्या शेवटापासून (किंवा पुढील वर्षाच्या सुरवातीपासून) आणखी ५ वर्षे दरवर्षी १००० रूपये बॅंकेत टाकणार आहे. तर माझ्याकडे ५ वर्षांच्या शेवटी किती रूपये होतील? या उदाहरणावरून Annuity च्या संकल्पनेची उपयुक्तता पटेल.अशा उदाहरणात छोटीशी आकृती काढली तर ते सोपे पडेल.त्या आकृतीवरून कळेल की या वर्षाची शेवट म्हणजेच पुढच्या वर्षाची सुरवात असे म्हणता येईल.दोन्ही approach सारखेच आहेत आणि त्यामुळे उत्तरही सारखेच येते.

हे उदाहरण पुढील दोन Perpetuity मध्ये विभागता येईल—पहिली Perpetuity पहिल्या वर्षाच्या शेवटीपासून (किंवा दुसऱ्या वर्षाच्या सुरवातीपासून) सुरू होऊन अनंतकाळ दरवर्षी १००० रूपये भरायची तर दुसरी Perpetuity सहाव्या वर्षाच्या शेवटपासून (किंवा सातव्या वर्षाच्या सुरवातीपासून) सुरू होऊन अनंतकाळ दरवर्षी -१००० रूपये भरायची (म्हणजे सहाव्या वर्षाच्या शेवटीपासून म्हणजेच सातव्या वर्षाच्या सुरवातीपासून) दरवर्षी हजार रूपये काढून घ्यायची)!! हे पुढील आकृतीत दाखवता येईल.

या दोन Perpetuity चा परिणाम म्हणजे आपल्याला पाहिजे असलेली Annuity.

जागेअभावी इथे केवळ पहिलेच वर्ष दाखविले आहे.त्यानंतरची वर्षे त्या संदर्भातून समजतीलच.आपल्याला पाहिजे असलेली Annuity या दोन Perpetuity चा एकत्रित परिणाम आहे कारण सहाव्या वर्षाच्या शेवटपासून +१००० आणि -१००० असे कॅश फ्लो या दोन Perpetuity मध्ये आहेत त्यामुळे सहाव्या वर्षाच्या शेवटपासून त्या दोन Perpetuity चा परिणाम शून्य असेल.
आपण मागच्या भागात बघितले की Perpetuity ची Present Value असेल

इथे P म्हणजे दरवर्षीचा कॅश फ्लो (या उदाहरणात १००० रूपये) आणि R म्हणजे व्याजाचा दर (या उदाहरणात १०%)
तेव्हा पहिल्या Perpetuity ची Present Value असेल १००० भागिले १०% (किंवा ०.१) बरोबर १० हजार रूपये. याचाच अर्थ व्याजाचे दर जर १०% असतील तर या वर्षाच्या शेवटपासून (किंवा पुढच्या वर्षाच्या सुरवातीपासून) दरवर्षी १००० रूपये अनंतकाळ मिळत राहणे आणि आज (म्हणजे पहिल्या वर्षाच्या सुरवातीला) एकरकमी १० हजार रूपये मिळणे हे सारखेच आहे.
दुसऱ्या Perpetuity ची Present Value पण असेल -१००० भागिले १०% (किंवा ०.१) बरोबर -१० हजार रूपये.पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आणि ती म्हणजे दुसरी Perpetuity सहाव्या वर्षाच्या शेवटपासून सुरू होणार आहे.तेव्हा त्या Perpetuity ची पाचव्या वर्षाच्या शेवटी Present Value असेल -१० हजार रूपये. म्हणजेच आपल्याकडे आता पुढीलप्रमाणे effective cash flow झाले:

याचाच अर्थ आपण दोन Perpetuity ना केवळ दोन एका वेळच्या equivalent कॅश फ्लो च्या स्वरूपात आणले.
आपण दरवर्षी १००० रूपये बॅंकेत टाकत असू आणि व्याजाचे दर १०% असतील तर आपल्याकडे पाचव्या वर्षाच्या शेवटी किती पैसे जमतील याचे उत्तर आपल्याला काढायचे आहे.म्हणजेच आपल्याला दोन्ही कॅश फ्लो पाचव्या वर्षाच्या शेवटपर्यंत न्यायचे आहेत.त्यातील एक कॅश फ्लो आधीच पाचव्या वर्षाच्या शेवटी आहे.तेव्हा पहिल्या वर्षाच्या सुरवातीचा (म्हणजे आजचा) कॅश फ्लो पाचव्या वर्षाच्या शेवटी न्यायचा आहे. म्हणजेच पहिल्या वर्षाच्या सुरवातीला (म्हणजे आज) १० हजार रूपये कॅश फ्लो आहे त्याची पाच वर्षांनंतरची किंमत (Future Value) किती हे काढायचे आहे.त्यासाठी परत एकदा वर दिलेले Future Value चे सूत्र उपयोगात आणू:

"

म्हणजेच आपल्याकडे पाचव्या वर्षी दोन कॅश फ्लो झाले: एक १६१०५ रूपये १० पैशाचा आणि दुसरा -१० हजार रूपयांचा. म्हणजेच आपल्याला पाहिजे असलेले उत्तर आहे: १६ हजार १०५ रूपये १० पैसे वजा १० हजार बरोबर ६ हजार १०५ रूपये १० पैसे.

तेव्हा आपण व्याजाचे दर माहित असतील तर कॅश फ्लोचा कोणत्याही वर्षातून कोणत्याही वर्षाचा equivalent cash flow काढू शकतो.तसेच कॅश फ्लो ची बेरीज वजाबाकी करता येते पण काळजी घ्यायची की ते कॅश फ्लो एकाच काळातील हवेत.म्हणजे एक कॅश फ्लो पाचव्या वर्षाच्या शेवटीचा आणि दुसरा कॅश फ्लो पहिल्या वर्षाच्या सुरवातीचा (म्हणजे आजचा) अशा परिस्थितीत त्यांची डायरेक्ट बेरीज वजाबाकी करता येणार नाही.त्यासाठी वर दाखविल्याप्रमाणे कॅश फ्लो एकाच वर्षात रूपांतरीत करणे गरजेचे आहे.

हे सगळे सांगितले कारण त्या मागचे तत्व माहित असावे.प्रत्यक्षात आपल्याला MS Excel मध्ये एका मिनिटात उत्तर कळू शकेल.ते कसे ते पुढे दाखविले आहे.

MS Excel मध्ये FV हे एक Built-in function आहे.ते कसे वापरायचे हे वर दाखवले आहे.इथे १००० रूपये कॅश फ्लो ला Cashflow नावाने, ५ वर्षे कालावधीला Years नावाने तर १०% व्याजदराला Rate नावाने variables घेतली आहेत आणि ती लाल अक्षरात दाखविल्याप्रमाणे FV च्या function मध्ये वापरली आहेत.अशी variables वापरायची नसतील तर संबंधित सेलचा address FV या function ला द्यावा. इथे काळजी घ्यायची म्हणजे FV हे function अशा पध्दतीने आहे की त्यात कॅश फ्लो धन असेल तर Future Value ऋण असते. Future Value पण धन यावी म्हणून –FV असे म्हटले आहे.

आता आपल्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचे एक उदाहरण घेऊन हा भाग संपवतो.समजा आपण घर घेण्यासाठी बॅंकेकडून ५० लाखाचे कर्ज २५ वर्षांसाठी घेतले आहे आणि व्याजाचा दर १०.७५% आहे.तर आपला कर्जाचा वार्षिक हप्ता किती पडेल?इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की बॅंकेने आता ५० लाख रूपये कर्ज दिले आहे आणि आपण ते पुढील २५ वर्षे हप्त्यातून फेडायचे आहे.म्हणजेच बॅंकेच्या दृष्टीने आपल्याला दिलेल्या कर्जाची Present Value -५० लाख आहे.पुढील २५ वर्षे आपण ते हप्ते फेडायचे आहेत.बॅंक कर्जाचे हप्ते अशा पध्दतीने ठेवेल की पुढील २५ वर्षे आपण बॅंकेला जो कॅश फ्लो दरवर्षी देऊ त्याची आजची किंमत (Present Value) ५० लाख रूपये असेल.म्हणजेच बॅंकेने दिलेले कर्ज फिटेल. त्यासाठी MS Excel मध्ये PMT हे एक Built-in function आहे.त्याचा वापर पुढील आकृतीत करून दाखवला आहे. इथे ५० लाख रूपये या कर्जाच्या रकमेसाठी PV नावाचे एक variable घेतले आहे.

म्हणजेच ५० लाख रूपये कर्जावर आपल्याला दरवर्षी ५ लाख ८२ हजार ८९३ रूपये ७५ पैसे इतका हप्ता बसेल. अशाप्रकारे आपल्याला कर्जाच्या विविध रकमा, व्याजाचे विविध दर आणि विविध कालावधी घेऊन नक्की किती हप्ता भरावा लागेल हे काढता येईल.

या भागात आपण Annuity ही महत्वाची संकल्पना बघितली.या संकल्पनेतून Time Value of Money ही संकल्पना अधिक चांगल्या पध्दतीने समजली असेल.व्याजाचे दर माहित असतील तर एका कालावधीतील कॅश फ्लो चा दुसऱ्या कोणत्याही कालावधीतील equivalent cash flow काढता येऊ शकतो.आणि त्यातूनच कर्जाचे हप्ते किती, दरवर्षी अमुक इतके पैसे साठवले तर १० वर्षांनंतर किती पैसे जमतील अशा पध्दतीच्या दैनंदिन जीवनातील उदाहरणे सोडवायला त्याचा उपयोग होतो.

या भागातील प्रश्न: आपण पहिल्या उदाहरणात बघितले की मी समजा पहिल्या वर्षाच्या शेवटपासून दरवर्षी १००० रूपये बॅंकेत ठेवले आणि मला त्यावर १०% व्याज मिळणार असेल तर माझ्याकडे पाचव्या वर्षाच्या शेवटी ६१०५ रूपये १० पैसे जमतील.समजा मी पहिल्या वर्षाच्या सुरवातीपासूनच (म्हणजे लगेच आजच) दरवर्षी १००० रूपये बॅंकेत ठेवायला सुरवात केली आणि असे पाच कॅश फ्लो केले (म्हणजेच आपण वर उदाहरणात बघितलेला कॅश फ्लो चा पॅटर्न बारा महिने अलीकडे सरकला) तर ६१०५ रूपये १० पैसे हा आकडा बदलेल का? आणि कितीने? अर्थात मी प्रत्येक भागात प्रश्न विचारणार नाही घाबरू नका :) पण अनेकदा प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न केल्यास संकल्पना अधिक चांगल्या कळतात म्हणून हा प्रश्न.

प्रतिक्रिया

निवेदिता-ताई's picture

19 Feb 2011 - 10:54 am | निवेदिता-ताई

जरा निवांतीन वाचीन ह..

आनंद's picture

19 Feb 2011 - 11:14 am | आनंद

वाचतोय...

स्वाती२'s picture

19 Feb 2011 - 5:28 pm | स्वाती२

उद्या सवडीने वाचेन.

तिमा's picture

19 Feb 2011 - 8:50 pm | तिमा

क्लिंटन साहेब,

वाचतो आहे व समजावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. सर्व लेखमाला पूर्ण झाल्यावर त्याचे पुस्तक करावे ही विनंति.

पहिला छडिचा प्रसाद काही पचला नाही पण हे प्रकरण सोप्पं वाटतंय, अतिशय धन्यवाद.

धनंजय's picture

20 Feb 2011 - 9:29 am | धनंजय

सचित्र लेखपुष्प आवडले

शाहरुख's picture

22 Feb 2011 - 10:32 pm | शाहरुख

आजपासूनचा कॅश-फ्लो
PV=1000/0.1 = 10000
चार वर्षांनी, FV = 10000(1+0.1) ^ 4 = 14641

चार वर्षांनंतरचा कॅश-फ्लो
PV = - 1000 / 0.1 = -10000

आकडा १४६४१ - १०००० = ४६४१ होईल असे वाटतंय.

चार-चौघात जाहीरपणे गणित सोडवणं म्हणजे अब्रुचे धिंडवडे काढल्यासारखे आहे ;-)

क्लिंटन's picture

24 Feb 2011 - 2:39 pm | क्लिंटन

नमस्कार मंडळी,

आता वळू या या भागात विचारलेल्या प्रश्नाकडे.या प्रश्नाचे उत्तर द्यायचा शाहरूख यांनी प्रयत्न केला. असे प्रश्न सोडवायला साधारणपणे पुढील approach असतो.

कॅश फ्लो हे पहिल्या वर्षाच्या सुरवातीपासून सुरू होणार आहेत.पूर्वी ते पहिल्या वर्षाच्या शेवटापासून (किंवा दुसऱ्या वर्षाच्या सुरवातीपासून) सुरू होणार होते.म्हणजेच याचा अर्थ कॅश फ्लो १२ महिने अलिकडे सरकले आहेत.आपण वर त्या कालावधीच्या शेवटी (म्हणजे पाचव्या वर्षाच्या शेवटी) Future Value कशी काढायची हे बघितलेच आहे.ती Future Value ६१०५ रूपये १० पैसे आहे. तेव्हा सगळे कॅश फ्लो १२ महिने अलिकडे सरकले असतील तर पाचव्या वर्षाच्या शेवटापूर्वी १२ महिने म्हणजे गेल्या चौथ्या वर्षाच्या शेवटी या सगळ्या कॅश फ्लो ची Future Value पण तेवढीच म्हणजे ६१०५ रूपये १० पैसे असणार आहे.हा मुद्दा लक्षात न आल्यास वर दिलेल्या आकृत्या कागदावर काढून बघितल्यास ते नक्कीच कळेल.ते समजले नाही तर मी पण ते आकृती काढून समजावून देऊ शकेन.

आपण मूळ लेखात बघितलेच आहे की आपल्याला व्याजाचे दर माहित असतील तर कुठल्याही वर्षातील कॅश फ्लो आपण इतर कोणत्याही वर्षात रूपांतरीत करू शकतो.आता चौथ्या वर्षाच्या शेवटी Future Value होती ६१०५ रूपये १० पैसे.म्हणजेच त्याची पाचव्या वर्षाच्या शेवटी Future Value असेल ६१०५ रूपये १० पैसे गुणिले (1+R) म्हणजेच ६१०५ रूपये १० पैसे गुणिले १.१ बरोबर ६७१५ रूपये ६१ पैसे.

आपण वर MS Excel मधील FV हे function बघितले.वर दिलेल्या सूत्रात थोडा फरक करून आपल्याला हे उत्तरही मिळू शकेल.त्यासाठी आपल्याला " -FV(Rate,Years,Payment,,1) " असे सूत्र लिहावे लागेल. यापूर्वी आपण ते "-FV(Rate,Years,Payment) असे लिहिले होते. FV या function विषयी MS Excel च्या हेल्पमधून आपल्याला हा जास्तीचा १ कशाकरता लिहिला हे समजू शकेल.

तेव्हा थोडक्यात जेव्हा कॅश फ्लो या वर्षाच्या शेवटी (किंवा पुढच्या वर्षाच्या सुरवातीला) सुरू न होता या वर्षाच्याच सुरवातीला सुरू होतात तेव्हा त्या कॅश फ्लो ची आजची Present Value किंवा भविष्यातील कोणत्याही काळाची Future Value ही असे कॅश फ्लो या वर्षाच्या शेवटी सुरू होत असतील त्या परिस्थितीतील उत्तराला (1+R) ने गुणून मिळेल.

उत्तम
वाचतोय.....(परत एकदा शाळेतल्या बाकावर बसल्याचा भास होतोय.)