डोक्यात तिडीक आणणारे मिपाकर - भाग ५

अवलिया's picture
अवलिया in जनातलं, मनातलं
15 Feb 2011 - 6:54 pm

मागील भाग - http://misalpav.com/node/16785

***

उन्हाळातल्या लाहा लाहा होणार्‍या दिवसांत अचानक कुठुन तरी चुळुक चुळुक आवाज येतो. घूंगरांचा तो परिचित आवाज येताच मनाला जवळच रसवंती असेल असे समजते आणि कोरड्या झालेल्या घशाला अन तापलेल्या डोक्याला थंड करण्यासाठी पाय आपोआप त्या आवाजाच्या दिशेने चालू लागतात. कधी जोरजोरात आवाज करणारा टेपच जवळच्या रसवंतीची सूचना देत असतो. गेल्याबरोबर हाफ नाही तर फुल्ल ची ऑर्डर देत आपण हाश्श हुश्श करत बसतो. समोर रस येताच पटकन ते अमृत घेत, तृप्त होत परत आपल्या मार्गाने निघुन जातो. किती वेळा आपण त्या रसवंतीत कामाला असलेल्या लोकांचा विचार करतो ? बहुधा नाहीच. पण एखादा बसल्याबसल्या रसवंती, तिथला अविरत फिरणारा चरकाचा चक्राकार प्रवास पहात एखादी छोटे खानी जीवाला चटका लावणारी कथा सांगून जातो.

त्याला आठवले .. हो तीच ती ... किती बदलली होती. कुठे ढगळ ढगळ पंजाबी ड्रेस मधल, पाठीवरची बॅग समोर धरुन चालणारी, चापुन चोपुन बसवलेल्या लांब केसांची ती .. अन कुठे आताची. पाठीच्या खालचा बराचसा गुबगुबीत भाग दाखणारी ती जिन्स, बारबालेला शोभावा असा चमचमीत पट्टा .. अन तो टिशर्ट पाहुन तर रघ्याच ओशाळला .. थरथरत्या हाताने त्याने रसवंतीचा खटका ओढला. त्याच्या कानात घुमणारी खळ्ळ-खळ्ळ-खळ्ळ थांबली. त्याने मागे वळुन पाहिले, तिच्या कंबरेच्या पट्ट्याच्या आरश्यावरुन उन चमकले .. लख्ख्कन त्याच्या डोळ्यात. क्षणभर त्याच्या डोळ्यासमोर अंधारी पसरली. डोळे गच्च मिटुन त्याने चाचपडतच खिशात हात घातला. बंडलातुन एक बिडी काढुन तिचा चपटा भाग जिभेवर ठेवला आणी तित जराशे दात रुतवुन त्याने काडी ओढली. दोन झुरके घेउन त्याने परत मागे वळुन पाहिले. ती बहुदा रिक्षेची वाट पहात असावी.

मागच्या खिशात पाकिट काढायला हात घातला तो कंगवा खिशातल्या छिद्रात अडकलेला. त्याने कचकच्चुन शिवी घातली अन पाकिट जवळपास ओढुनच काढले. मागच्या वर्षीच्या क्यालेंडरखाली बोटे सारुन त्याने घडी घातलेला कागद काढला. एकवार चापपला. त्यावर ते लिहले त्याकाळी उडवलेली चमकी आता राहिली नव्हती, घड्या दबुन तो फाटायला आला होता. वर्षानुवर्षे दाबलेली इच्छा अचानक उफाळुन आली. त्याला छातीत हलकीशी थरथर जाणवली, डोळ्याखाली जडपणा जाणवला. ते पत्र द्यावे म्हणुन तो पुढे झाला तो तीच वळुन पट्ट्कन म्हणाली .. "जरा एक रस देरे .. बिनाबर्फाचा."

अधिक वाचा - http://misalpav.com/node/10795

***

लहान पणच्या आठवणी कुणाला प्रिय नसतात. जुन्या गोष्टींना उजाळा देणे हे अनेकांचा फावल्या वेळचा छंदच असतो. त्यातच जर त्या खेड्यातील निरागस जीवनाशी संबंधित असतील तर मन कधी गुंगुन जाते तेच कळत नाही. अजुन अजुन लिहिले असते तर मजा आली असती असेच असे लेख वाचून वाटत असते.

अंगणाच्या शेवटी छतावर जायला जिना होता, त्याच्या पायर्‍या उंच उंच असल्याने मला चढता येत नसत. मग मी, आजोबा आज्जी आणी मावश्या तीन वर छतावर जात असु. वर गेल्या गेल्या मी आज्जीच्या कडेवरुन सुटका करुन घेण्यासाठी धडपडत असे. कारण बाजुचे मोठ्ठे लिंबाचे झाड आणी त्याच्या फांद्या अगदी माझ्या उंचीला आलेल्या दिसत. गच्चीवर लिंबाचा पाला पाचोळा असे, त्यावरुन धावतांना वाळलेली पाने पायानी चुरतांना मोठी मौज येई. माझी मजा संपते न संपते तोच मावशी खराटा घेउन गच्ची झाडायला लागे. एक मावशी बादलीभर पाणी आणुन हलकासा सडा शिंपडे, दुसरी मावशी चटई अंथरे. चुरमुर्‍यांना तिखट मीठ तेल लावुन आणलेले असे. गच्चीवरुन औरंगबादेतले प्रसिद्ध सलिम अली सरोवर दिसे. उन्हाळ्याच्या दिवसात संध्याकाळच्या त्या गार हवेने मन प्रफुल्लीत होई. मीही खेळुन खेळुन थकायला येई. आम्ही सगळे खाली घरात यायचो. सातच्या मराठी बातम्या लागायच्या.

जेवणात माझी आवडती शेवयांची खीर असे. मी झोपायला आलो की आज्जी मला अंगाई गाउन झोपवी, काही ओळी मला अजुन ऐकु येतात,

अधिक वाचा - http://misalpav.com/node/10745

***

मंडळी वरती जे दोन परिच्छेद दिले आहेत ते सदर लेखकाची क्षमता दाखवुन देण्यास पुरेसे असले तरी तो केवळ एवढेच लिहु शकतो असे नाही. त्याचे अधिक लेखन http://misalpav.com/newtracker/172 इथे वाचता येईल.

बरोबर आहे मंडळी, हा लेखक आहे आनंदयात्री. :)

अनेक सुंदर सुंदर कविता, मनाला भिडणारे ललित लेखन करणारा आनंदयात्री आमचा या आठवड्याचा "डोक्यात तिडीक आणणारा मिपाकर" आहे. कारण सरळ आहे हल्ली बरेच दिवसांत त्याने आम्हाला त्याच्या लेखांमधुन एका हळव्या भावविश्वात नेलेले नाही. हरकत नाही. आम्ही त्याला एक मस्त गॉगल भेट देत आहोत. त्याच बरोबर फुल आणि ब्लेजर देत आहोत. त्याचा त्याने स्विकार करावा आणि लवकरात लवकर एखादा मस्त लेख लिहावा की तो वाचून रसिक जन उद्गारतील " वा ! लेख असावा तर असा !" बाकी तो ठरवेल ते मान्य. कसे?

पुष्प

ब्लेझर

गॉगल

दुकानांचे पत्ते

पुष्प - http://www.orkutpapa.com/scraps/yellow-rose.jpg
ब्लेझर - http://product-image.tradeindia.com/00224107/b/0/Men-s-Blazer.jpg
गॉगल - http://www.eyeweartalk.com/wp-content/uploads/2008/12/ray-ban-aviator-su...

क्रमशः

(पुढील मिपाकर पूढल्या आठवड्यात - ज्यांना सत्कार नको असेल त्यांनी खरड व्यनीतुन सुचना देणे म्हणजे यादीतुन नाव कटाप करता येईल. यादी लै मोठी आहे)

औषधोपचारशुभेच्छा

प्रतिक्रिया

चौथा भाग झाल्यावर आता नेक्ष्ट भाग आनंदयात्रीवर यावा असे वाटत होतेच. ती अपेक्षा पूर्ण झाली.
मी त्यांच्या लेखनाची पंखी आहे. आनंदयात्रींना लिहिते करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल नानांचे आभार.

टारझन's picture

15 Feb 2011 - 8:52 pm | टारझन

सहमत आहे ... हा आंद्या भाड्या हल्ली लिहीत नाही म्हणुन मी पण भयंकर णाराज आहे कधीपासुनंच !!
आणंदयात्री मिपाचे "हळवा नं १ " आहेत .. हळवायात्री परत यावा हीच आणंदयात्री चरणी प्रार्थणा ...

आंद्या देवा , दर्शन देवा :)

बाकी देवाक काळजी

मस्त कलंदर's picture

15 Feb 2011 - 7:13 pm | मस्त कलंदर

आनंदयात्री यांनी लिहिते व्हावे या मागणीशी सहमत...

नंदन, नी, बेला, आनंदयात्री या सगळ्या सिद्धहस्तांच्या मालिकेत माझाच नंबर का आधी लावलास रे नाना?

अवलिया's picture

15 Feb 2011 - 7:29 pm | अवलिया

पहिला दुसरा नंबर असा काही नाही.
एका मडक्यात नावांच्या चिठ्ठ्या टाकल्या आहेत, ज्याचे नाव निघेल त्याच्यावर धागा टाकतो. :)

स्वाती दिनेश's picture

15 Feb 2011 - 7:37 pm | स्वाती दिनेश

यात्रीने लिहिते व्हावेच.. खूप तरल लिहितो तो पण खूप कमी लिहितो.. ही तक्रार आहेच.
स्वाती

यशोधरा's picture

15 Feb 2011 - 7:41 pm | यशोधरा

असेच म्हणते.

आनंदयात्री यांचे लेखन मला आवडते. "अजोबा आज्जी....मावशा तीन" माझा आवडता लेख आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

15 Feb 2011 - 7:45 pm | प्रकाश घाटपांडे

आंद्या, वक्त को रोखने को जी चाहता है|
आंद्या तसा समजायला अवघडच

शुचि's picture

15 Feb 2011 - 7:48 pm | शुचि

क्या बात है!!!

राजेश घासकडवी's picture

15 Feb 2011 - 8:54 pm | राजेश घासकडवी

मिपावर समर्थ लेखन करणाऱ्या पण आता फारसं लिहीत नसलेल्या अनेकांची ओळख करून देणारी ही लेखमालिका मनापासून आवडली. अजून येऊ द्यात.

स्वाती२'s picture

15 Feb 2011 - 8:58 pm | स्वाती२

+१
असेच म्हणते!

छोटा डॉन's picture

16 Feb 2011 - 8:51 am | छोटा डॉन

घासकडवी गुर्जींशी सहमत ...
लेखमाला उत्तम आहे, चालु रहावी आणि असेच निद्रिस्त लेखकांना त्यांच्या सुप्त शक्तींची आठवण करुन द्यावी असे सांगतो.
नानाचेही आभार :)

अवांतर :
आंद्या, लिही ना कायबाय नवे

- छोटा डॉन

निद्रिस्त लेखकांना त्यांच्या सुप्त शक्तींची आठवण करुन द्यावी असे सांगतो.

लुक हूज टॉकिंग... ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ

गोगोल's picture

15 Feb 2011 - 9:37 pm | गोगोल

लिखाण फार आवडत. परत लिहिते व्हा.

नविन असणार्या आम्हाला अश्या जुण्या अभासदांच्या लिखानाची ओळख होणे खुप छान वाटत आहे.

लग्न झाल्यापासून आम्द्याला मिपावर लिहायला वेळ मिळत नसावा.

सुनील's picture

15 Feb 2011 - 10:00 pm | सुनील

आनंदयात्रींनी केवळ वाचनमात्र वा प्रतिसादमात्र राहू नये. पुन्हा लिहिते व्हावे!

बेसनलाडू's picture

15 Feb 2011 - 10:55 pm | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

अरे ह्याचं पण नुकतच लग्न झालय न रे?
काय डँबरट लोकं आहेत. हनिमुन काळात पण त्रास देत रहातात. ;)

अवांतर : आंद्याशेट आपण तुपल्या बाजुने हाय रे. पण जरा या लोकांची तोंड बंद करायला एक छानसा हळवा लेख होउन जाउदे. :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Feb 2011 - 11:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आंद्याचं छोटेखानी लेखन नेहेमीच खूप आवडतं ... अनेकदा आवडलं तरी ते सांगायला शब्दही सुचत नाहीत. साधे शब्द, छोटीशी वाक्य वापरून हा माणूस हळूच बालपणात नेतो, खेडेगावात नेतो, न भेटलेल्या नातेवाईकांची ओळख करून देतो.

बाकी आंद्याला ब्लेझर दिला म्हणून तो रुसून बसेल, त्यापेक्षा त्याला एक झक्कासपैकी फेटा द्या.

मिपावर समर्थ लेखन करणाऱ्या पण आता फारसं लिहीत नसलेल्या अनेकांची ओळख करून देणारी ही लेखमालिका मनापासून आवडली. अजून येऊ द्यात.

गुर्जींशी सहमत. उत्तम कल्पना.

बाकी आंद्याला ब्लेझर दिला म्हणून तो रुसून बसेल, त्यापेक्षा त्याला एक झक्कासपैकी फेटा द्या.

दुर्बिटणेबाईंशी सुद्धा सहमत. आंद्याला सोन्याचं कडं, गदा आणि फेटा हे द्यायला हवे.

(काडीपैलवान.)

निखिल देशपांडे's picture

16 Feb 2011 - 9:35 am | निखिल देशपांडे

आंद्या लिही रे बाबा आता काहीबाही... हरवलेल्या सुखाची आठवण फक्त तुच करुन देउ शकतोस..

sneharani's picture

16 Feb 2011 - 10:07 am | sneharani

पुढचा भाग आला पण!
चला नवीन लेखांची वाट बघतेय!

llपुण्याचे पेशवेll's picture

16 Feb 2011 - 10:16 am | llपुण्याचे पेशवेll

आंद्या तुझी आठवण येते. अंबळ हळवे करून जातात रे तुझे लेख.

सविता's picture

16 Feb 2011 - 10:38 am | सविता

अवलियांचे धन्यवाद.... आनंदयात्री यांच्या पुर्वीच्या लिखाणाचे दुवे दिल्याबद्दल....

सुहास..'s picture

16 Feb 2011 - 10:45 am | सुहास..

धन्स रे नाना !!

आंद्याला रिमांईडर/मेमो बसेल अशी आशा आहे

आनंदयात्री's picture

17 Feb 2011 - 10:50 am | आनंदयात्री

धन्यवाद नाना :)
फुल सुवासिक आहे, ब्लेझर पण बसला अन गॉगल तर काय झांटामाटीक !! ठँक्यु :)

खरेच इतक्या पब्लिकला माझे लिखाण (!!?) आठवतेय हे पाहुन आनंदमिश्रीत आश्चर्य वाटले ;)
वेळ मिळाला की लिहिनच, सध्या पोटापाण्याच्या उद्योगात मग्न आहे, असाच लोभ राहु द्या म्हणजे झाले.

-
आनंदित यात्री