प्रतिक्रीया.. की अवांतर??

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जे न देखे रवी...
11 Feb 2011 - 2:33 pm

आमची प्रेरणा.

माझा हा मिपा वरील नेहमीचा प्रयत्न ...सर्वांची मते,सूचना ऐकवण्याची आवश्यकता नाही..
तुम्हा टूकार लोकांकडून मार्गदर्शन मिळावे अशी तर अज्जीबात ईच्छा नाही.

रतिबी धागे जेंव्हा डोक्यात जातात,
आणि पाठ खाजवणारे आजूबाजूला पिंगा घालू लागतात,
कस सांगू तुला तेव्हा डायरीची आठवण अनावर असते...

जुनीच दारू जेव्हा नव्या बाटलीत अवतरते,
जुनेच स्कोर आठवून जेव्हा सेटल करत बसते,
कस सांगू तुला तेव्हा कंपुबाजांची आठवण अनावर असते...

लेखनकंडु जेंव्हा जागे होतात,
एकोळी धाग्यातही ज्ञानेश्वरीचा दावा करतात,
कस सांगू तुला तेव्हा अवांतराची आठवण अनावर असते...

आता मीही शिकणार आहे साध्या प्रतिक्रीयेला अवांतर बनवायचं,
दोन आयडी काढून निभावुन जायचं,
पण कस सांगू तुला ,
तेव्हा पण मालकांची खरड हजर असते..

एकच सांग नि एकदाच सांग,
तुला आशी मालकांची खरड कधी येतच नाही का रे??

हास्यअद्भुतरसकविताविडंबन

प्रतिक्रिया

स्पा's picture

11 Feb 2011 - 2:35 pm | स्पा

हॅ हॅ हॅ

लय भारी मालक :d

टारझन's picture

11 Feb 2011 - 2:38 pm | टारझन

=)) =)) =)) =)) =))
पर्‍या भाड्या ... तुझ्यात चांगलं लिहीण्याची ताकद दिसली रे =))

:)

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Feb 2011 - 3:00 pm | llपुण्याचे पेशवेll

तुझ्या कवितेत आणि टार्‍याच्या प्रतिसादात चांगलं लिहीण्याची ताकद दिसली. तशीच ताकद मला इथेही दिसली होती.

परिकथेतील राजकुमार's picture

11 Feb 2011 - 3:05 pm | परिकथेतील राजकुमार

तुझ्या कवितेत आणि टार्‍याच्या प्रतिसादात चांगलं लिहीण्याची ताकद दिसली.

हम्म!

पुप्या, अजून तुझा मूळचा भिकारचोट स्वभाव गेला नाही म्हणायचा! :)

चर्चा अपेक्षेप्रमाणे योग्य मार्गावर असल्याचे पाहून मंडळाचे झेंडे अटकेपार लागले असतील....

नरेशकुमार's picture

11 Feb 2011 - 2:50 pm | नरेशकुमार

यमक, उकार, आकार, राग, मात्रा, मीटर सोडून बाकी सगळे ठिक आहे.
माननीय परा,
प्रयत्न करने सोडु णका. वाळुचे कण रगडत रहा, तेल णक्की गळेल.
(एखादी कविता भिकार झाली म्हणुन काय झाले. अजुन एक ट्राय मार. हे ह.घे)

एकच सांग नि एकदाच सांग,
तुला आशी मालकांची खरड कधी येतच नाही का रे??

कसे सांगु, लाज,षरम, भीती एकाच वेळि वाटायला लागतात.

गणपा's picture

11 Feb 2011 - 2:49 pm | गणपा

:)

पियुशा's picture

11 Feb 2011 - 2:49 pm | पियुशा

शाब्बास लेका
:)

हरिप्रिया_'s picture

11 Feb 2011 - 2:57 pm | हरिप्रिया_

लगेच मस्त विडंबन पण केली की आपण....
सही.. ...

कच्ची कैरी's picture

11 Feb 2011 - 3:15 pm | कच्ची कैरी

काय पण विडंबन मांडलय !लगे रहो !

मुलूखावेगळी's picture

11 Feb 2011 - 3:16 pm | मुलूखावेगळी

छान मस्त

तुला आशी मालकांची खरड कधी येतच नाही का रे??

सह्ही

>>>तुला आशी मालकांची खरड कधी येतच नाही का रे??

रोज मरे त्याला कोण रडे !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Feb 2011 - 3:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

चालू द्यात तुमचे @#$%^&* धंदे! ;-)

विडंबन आवडलं रे. आता लिखाळला फोन कर, आणि त्याला त्याची शब्दांची वही घेऊन विडंबनाचं रसग्रहण लिहायला सांग.

विडंबन आवडलं रे. आता लिखाळला फोन कर, आणि त्याला त्याची शब्दांची वही घेऊन विडंबनाचं रसग्रहण लिहायला सांग.

नानाला पुढच सावज गावलं. ;)

स्वाती दिनेश's picture

11 Feb 2011 - 5:27 pm | स्वाती दिनेश

नानाला पुढच सावज गावलं.
गणपासारखेच म्हणते,पण तो लिखाळ हल्ली कुठंच दिसत नाही..
परा, विडंबन झकास..
स्वाती

नंदन's picture

11 Feb 2011 - 4:06 pm | नंदन

वा, वा, आपल्या कवितेत उद्याच्या शरदिनीतै दिसल्या :). बाकी कवितेला 'अवांतरापुरती प्रतिक्रिया' हे शीर्षक चालेल का?(...भिन्नटायटलमधून)

'अवांतरापुरती प्रतिक्रिया' >>>

नंदोपंत , चुकुन ' अत: पुरातील प्रतिकिया ' असे वाचले आणि मिपागृहातील अत:पुरात कोणा-कोणाला वाहवुन न्यायच सामर्थ्य आहे हे आठवल ..असो

@परा ..भन्नाट !!

सारा आलम's picture

11 Feb 2011 - 4:33 pm | सारा आलम

विडंबन एकदम आवडलं

प्राजक्ता पवार's picture

11 Feb 2011 - 5:04 pm | प्राजक्ता पवार

सह्ही :)

प्राजु's picture

11 Feb 2011 - 8:38 pm | प्राजु

......................... :|

स्पंदना's picture

12 Feb 2011 - 12:59 pm | स्पंदना

व्वाह! परा भाउ सह्ही जमलय. चला आहे कुणीतरी विडंबनाची धुरा वहायला.

पिवळा डांबिस's picture

12 Feb 2011 - 2:15 pm | पिवळा डांबिस

रतिबी धागे जेंव्हा डोक्यात जातात,
आणि पाठ खाजवणारे आजूबाजूला पिंगा घालू लागतात,
कस सांगू तुला तेव्हा डायरीची आठवण अनावर असते...

लेखनकंडु जेंव्हा जागे होतात,
एकोळी धाग्यातही ज्ञानेश्वरीचा दावा करतात,
कस सांगू तुला तेव्हा अवांतराची आठवण अनावर असते...

क्या बात है!!
परा, परा, लेका ठणठणपाळ का नाही रे झालास?
:)

मस्त कलंदर's picture

12 Feb 2011 - 2:23 pm | मस्त कलंदर

चान चान.. कोलितीची भट्टी मस्त जमली आहे....

विजुभाऊ's picture

12 Feb 2011 - 6:59 pm | विजुभाऊ

अवांतराची त्याना कधी तमा नसते.
स्वतः धाग्याचा ख फ केला त्याची जिम्मा नसते
कोण्या अ कंपुबाजानी काही लिहिले तर त्याला क्षमा नसते.
मी लिहितो/ते तेंव्हा ते साधेच असते
दुसए कोणी लिहीते तेंव्हा ते मात्र गैर असते.
एका बेसावध क्षणी कोणाची काय मर्जी होते.
बिचारा अ कंपुबाजाची क्षणात हत्या होते

तिमा's picture

12 Feb 2011 - 7:32 pm | तिमा

चांगले विरजण लावलेत हो!