मंडळी नमस्कार.
राधेची व्यक्तीरेखा मला नेहमीच भुरळ घालत आलेली आहे. जरी काव्य समजल तरी या व्यक्तीरेखेला त्या काव्यातही कुठेच पुर्णत्व वा 'न्याय' म्हणता येइल तो नाही मिळालेला अस मला मनापासुन वाटत. इतक जीव ओवाळुन टाकुन , सर्वस्वाला विसरुन केलेल्या प्रेमाला, पुढे कृष्णाच्या वाढत्या सामाजिक,राजकिय महत्वात अगदी नामोनिशाणी न राखता अनुल्लेखात विलीन व्हाव लागण हे एक दुर्दैवच नाही का?
नुकताच प्राजुचा 'वनराणी....' वाचला.
या शबरीच्या भोळ्या भक्तीवर भाळुन तिला पुढील जन्मी पुन्हा भेटण्याच आश्वासन श्रीरामानी दिले, तीच ही राधा! या वचनावर आधारित ही कविता.
'आवर्तन'
आठवणींचा वारु फिरतो, मनी मानसी चौफेर
गत जन्माच्या सहवासाचा गंध अंत:र बाहेर.
जरी न स्विकारी ; जनी मानसी , अंतःकरण तु ओळखले
कुणी न जाइ कुर्वंडुनी उगा, तु तुझ्या मनी ओळखले
कदंब,यमुना, जरी भवताली , रान बोरीचे घमघमले
त्यागुनी जर्रार्जर शबरीला त्या, तन माझे मी शृंगारीले
जरी म्हणती जन 'वेडी राधा', विश्वास मनी त्या भिल्लीणीचा
जन्मो जन्मी , पुन्हा फिरोनी, कृष्ण व्हायचा दास तिचा.
राज वैभवी अडसर फिरुनी, जरी या जगाने उभारले
सार्थक होवो वा ना होवो, परी तुवा वचन तिज दिधले.
__/\__
अपर्णा
प्रतिक्रिया
18 Jan 2011 - 2:24 pm | प्रकाश१११
छान कविता आणि छान लय. आवडली !!
18 Jan 2011 - 3:24 pm | गणेशा
कविता खुपच छान..
काही माहिती मला नविन कळाली ..
राधा ही पुर्वजन्मी शबरी होती हे मला नविनच आहे.. मला तर वाटत होते की लक्ष्मीचाच एखादा अवतार असेन राधा...
अजुन एक माहिती विचारायची होती राधा बद्दल पण व्यनी वर विचारतो तुम्ही हो म्हणाल्यास, येथे विचारल्यास खुप फाटे फुटतील असे वाटते..
18 Jan 2011 - 3:53 pm | ज्ञानराम
सूरेख आहे...
18 Jan 2011 - 3:55 pm | परिकथेतील राजकुमार
मस्त कविता.
आवडली एकदम.
18 Jan 2011 - 5:48 pm | पाषाणभेद
छान भावकविता आहे. दोन्ही जन्माचा उल्लेख आलेला आहेत त्यात.
18 Jan 2011 - 8:10 pm | शुचि
सुंदर ग अपर्णा! :)
18 Jan 2011 - 8:15 pm | प्राजु
सुरेख कविता!
19 Jan 2011 - 1:37 pm | स्पंदना
तुम्हा सर्वांना धन्यवाद!