जगावेगळे विश्व कवीचे -

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
25 Dec 2010 - 12:25 pm

जगावेगळे विश्व कवीचे
अक्षरांसवे खोड्या करता -
चिमटे काढी वा गुदगुल्या
सराईतपण हाती येता !

जे ना दिसते कधी रवीला -
म्हणे नेमके कवीस दिसते
पाताळातुन थेट अंबरी -
कवी - भरारी चालू असते !

बालपणी वा जरठपणी ,
खरडावी लेखणी वाटते !
परी लेखणी हाती असता
कवीमनीं का खंत दाटते !

जुळवू कैसे यमकाला मी !
व्याकरणाला मनात भीता ,
गण - वृत्ता मी कसे ओळखू -
काव्य - प्रचूती वाढवि चिंता !

अ - रसिका पहिले वंदावे -
कवितेचे ते बोट धरावे ,
टीकाकारा मुळी न भ्यावे
स्वानंदास्तव मस्त लिहावे !!

कवितामुक्तक

प्रतिक्रिया

कच्ची कैरी's picture

25 Dec 2010 - 1:54 pm | कच्ची कैरी

वा!! आवडली बुवा आपल्याला तर.

प्राजु's picture

25 Dec 2010 - 11:30 pm | प्राजु

हम्म! चांगली आहे कविता.