वा रे वा फक्त नवरा बायकोंच्याच सवयी त्रासदायक नसतात. मिपा करांच्या देखील काही त्रासदायक सवयी असतात. त्यापैकी टॉप १० (तुम्हाला मराठी काळात नसल तर इंग्लीश मधून मुख्य १०).
१. चांगले चांगले लेख क्रमश: मध्येच दाबून ठेवणे. ज्यामुळे मिपा आलतु फालतू लेखांच्या भडिमारामुळे वाचनास निरुपयोगी होऊन बसते.
२. आपले लेख किंवा प्रतिसाद अंगाशी यायला लागल्यावर (त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभ न राहता) उडवून लावणे. या भयंकर अॅनॉयींग सवयीबद्दल जितकं बोलाल तितकं कमीच आहे. पण आवरतं घेतो.
३. एकोळी धागे - निदान तुमच्या मताची तरी गरज असते. फक्त लिंक देऊन चालत नाही.
४. ऊठ्सूठ खफ, व्यनी लिहीणे आणि त्यातल्या झिरो यूज़फूल कॉंटेंट ने डोके उठविणे.
५. "कंपुगीरी" या गोंडस नावाखाली देवाला सोडलेल्या वळूगत नवीन सदस्यांच्या लेखावर अवांतर युद्ध खेळणे.
६. लेख प्रकाशित केल्यावर दर ५ मिनिटांनी रेफ्रेश करून किती प्रतिसाद आले आहेत ते पहाणे आणि एवढा तीर मारून काय करणे तर आलेल्या प्रत्येक प्रतिसादाचे आभार मानून लेख वरती आणणे.
७. एखादा सामान्य भावना भड्कावू लेख लिहून, लेखापेक्षा लांबलचक प्रतिक्रिया मिळवून, प्रतिसादांमध्ये मध्ये मिपा डोक्यावर घेऊन, शेवटी संपादकांसाठी काम वाढवून ठेवणे.
८. प्रतिक्रिया आवडल्यास फ्रेम च्या बाहेर पर्यंत जातील इतके +१, असेच म्हणतो ई प्रतिसाद देणे पण स्वत:ची ओरिजिनल प्रतिक्रिया न लिहीणे.
९. आपल्या राखीव कुराणातील लेख असल्यास जगबुडी का होइना पण मीपाला चिकटून बसणे आणि "मागे या विषयावर इथे लिहिले आहे" असे म्हणून आपला टी आर पी वाढविणे.
१०. आपल्या हातचा लेख म्हणजे लय भारी आणि आपण दररोज एकतरी लेख लिहील्याशिवाय मिपा बंद पडेल असा अंधविश्वास बाळगणे.
या यादीमध्ये सर्व सदस्यांनी आपल्या परीने भर घालावी ही विनंती.
प्रतिक्रिया
25 Dec 2010 - 6:42 am | नगरीनिरंजन
भरः उगाच लेखातील चुका काढणे आणि त्या टंकनभूली आहेत हे माहिती असूनही त्याबद्दल विचारणे किंवा त्यावर खोचक टिप्पणी करणे.
उदा. राखीव कुराण? कुराण पण राखीव असते हे माहिती नव्हते ब्वॉ.
25 Dec 2010 - 7:09 am | गोगोल
आभारी आहे :)
25 Dec 2010 - 8:36 am | चिंतामणी
६. लेख प्रकाशित केल्यावर दर ५ मिनिटांनी रेफ्रेश करून किती प्रतिसाद आले आहेत ते पहाणे आणि एवढा तीर मारून काय करणे तर आलेल्या प्रत्येक प्रतिसादाचे आभार मानून लेख वरती आणणे.
:D
;)
25 Dec 2010 - 4:21 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
चान चान!
:)
25 Dec 2010 - 7:07 am | नरेशकुमार
गोगोल सान,
भर घालतो,
१) सुद्धलेखनाचे धडे देने
२) कोन्तिहि शक्यता न नाकारने.
३) हिन्सेला प्रोत्साहान देने
४) काहिहि बोलुन वर परत हलकं घ्यायला सान्गने
अजुन नन्तर
25 Dec 2010 - 7:21 am | निनाद मुक्काम प...
अमेरिकन मिपा मंडळींवर हिरव्या टीकेचे आसूड ओढणे .
25 Dec 2010 - 7:24 am | अरुण मनोहर
* मिपा विषयावर दळण दळून पीठाचा भुगा हवेत उडवणे. ह्यातून होणार्या प्रदुषणामुळे स्वतःची टीआर्पी वाढण्याची शक्यता न नाकारणे.
* प्रतिसाद उडवले जाण्याच्या आधी कीती जण ते वाचतात ह्या वर गेम खेळणे.
* तकीया कलामांचे वेड पसरवणे- पुर्वीचे काही, आता विषेश न दिसणारे तकीया कलाम
- फाट्यावर मारणे,
- सुद्दलेकनाची ऐशी तैशी
- चपला घालून चालू लागा
सध्याचे- शक्यता नाकारता येत नाही, तेच म्हणतो, +१....
आणखी सांगा...
25 Dec 2010 - 8:10 am | स्पा
या यादीमध्ये सर्व सदस्यांनी आपल्या परीने भर घालावी ही विनंती
या यादीमध्ये आपल्या पराने भर घालावी ही विनंती...
कृपया असे वाचावे
25 Dec 2010 - 8:31 am | चिंतामणी
+ २
26 Dec 2010 - 11:59 am | निनाद मुक्काम प...
+ १
+३ लिहिले असते
मग कंपू गिरीचा आरोप आप असता .माझ्यावर
25 Dec 2010 - 7:25 am | शुचि
भीषण चिकीत्सा करून धाग्याचं सूत न सूत काढणे ........ देवा धागा काढला की मला निद्रानाश, दु:स्वप्न अशा व्याधी सुरु होतात. काही विशिष्ठ आय डी माझ्या भोवती फेर धरून "आदिवासी नृत्य" करू लागतात :P
25 Dec 2010 - 7:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१. चांगले चांगले लेख क्रमश: मध्येच दाबून ठेवणे. ज्यामुळे मिपा आलतु फालतू लेखांच्या भडिमारामुळे वाचनास निरुपयोगी होऊन बसते.
करेक्ट.
"कंपुगीरी" या गोंडस नावाखाली देवाला सोडलेल्या वळूगत नवीन सदस्यांच्या लेखावर अवांतर युद्ध खेळणे.
करेक्ट.
एखादा सामान्य भावना भड्कावू लेख लिहून, लेखापेक्षा लांबलचक प्रतिक्रिया मिळवून, प्रतिसादांमध्ये मध्ये मिपा डोक्यावर घेऊन, शेवटी संपादकांसाठी काम वाढवून ठेवणे.
करेक्ट
आपल्या हातचा लेख म्हणजे लय भारी आणि आपण दररोज एकतरी लेख लिहील्याशिवाय मिपा बंद पडेल असा अंधविश्वास बाळगणे.
हा हा हा. हेही करेक्टच.
खरं म्हणजे, फालतूपणासाठीच काही लोक* मिपाचा वापर करत आहेत. [कोणताही विदा नाही. पण माझा असा समज होत आहे] उत्तम लेखनाबद्दल कधी काही बोलणार नाहीत. उत्तम लेखन करणार नाहीत. तशा लेखनांना प्रोत्साहान देणार नाहीत. पण आमचा फाल्तूपणा चालू ठेवू . साली ही संस्था मिपावर लै.... आहे.
*[काही लोक म्हणजे कोण हे जाणून घ्यायचे असेल तर मला खरड करा. उत्तर मिळणार नाही.]
-दिलीप बिरुटे
25 Dec 2010 - 8:53 am | टारझन
बिरुटेमामांशी सहमत आहे. ह्या फाल्तु संस्थांना पोकळ बांबुचे फटके देण्यासाठी माझे हात नेहमीच शिवशीवतील .
साला , उत्तम लेखणावर कसं बोलावं , उत्तम लेखण कसं करावं , त्या लेखकांना प्रोत्साहन कसं द्यावं हे जरा शिका आमच्या बिरुटेमामांकडून ,.. शिका लोकहो :)
- वां.ग्या.भरित करुदे
25 Dec 2010 - 9:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)
मनातल्या मनात : मला जरा वेळ मिळू दे. स्वाक्ष-या आणि काही प्रतिसाद संपादनाचे एकमेव कार्य हाती घेईन.
-दिलीप बिरुटे
[रजेवर असलेला संपादक]
25 Dec 2010 - 9:04 am | अवलिया
सहमत आहे. दंबुक साफ करुन घ्या आधी आणि बोटांचे ठसे पुसुन ठेवा.
-गल्लीत खेळुदे
25 Dec 2010 - 9:10 am | टारझन
हॅहॅहॅ .... फक्त टारझन साठी एक संपादक डेडिकेट करावा लागावा ह्या पेक्षा टारझनचा सन्मान तो काय ?
किती महत्व ते टार्याला ? =))
अवांतर : त्यांच्या बोटांना ठसे आहेत ?
- धप्कन पडुदे
25 Dec 2010 - 9:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>हॅहॅहॅ .... फक्त टारझन साठी एक संपादक डेडिकेट करावा लागावा ह्या पेक्षा टारझनचा सन्मान तो काय ?
किती महत्व ते टार्याला ? =))
संस्थळावर एकेकाचे काय आणि कित्ती गोड समज असतात त्याचं उत्तम उदाहरण.
-दिलीप बिरुटे
25 Dec 2010 - 9:22 am | टारझन
हॅहॅहॅ .. बघा ना , आम्ही आमचे काय न कित्ती गोड समज मामांच्या मनी उतरवतो =))
अवांतर : बाकी पक्षपाती पणा न करता , थंड डोक्याने संपादन करणे कोणालाही जमतेच असं नाही म्हणा ;)
-यॉ माय माईंड ब्लोईंग टार्या
25 Dec 2010 - 9:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>बाकी पक्षपाती पणा न करता , थंड डोक्याने संपादन करणे कोणालाही जमतेच असं नाही म्हणा
काका, आपण बरोबर बोलत आहात. काही, सदस्यांच्या बाबतीत थंड डोकं ठेवणे खूप कठीन काम आहे.
-दिलीप बिरुटे
25 Dec 2010 - 9:32 am | टारझन
आणि ज्यांना हे जमत नाही , त्यांनी हे कामंच करु नये असा माझा निरागस विचार आहे ;)
हे असंच जनरल बोलतोय बरंका , आप दिल पे ना ले :) तुम्ही फार योग्य संपादक आहात असा माझा कयास आहे :)
25 Dec 2010 - 9:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>आणि ज्यांना हे जमत नाही , त्यांनी हे कामंच करु नये असा माझा निरागस विचार आहे
खूपच निरागस विचार आहे.
>>>तुम्ही फार योग्य संपादक आहात असा माझा कयास आहेत.
कयासाबद्दल आभारी.
>>>हे असंच जनरल बोलतोय बरंका , आप दिल पे ना ले
नै नै, मै भी जनरलच बोलतोय. वैसा भी मै किसकाच कुछ मन पे नै लेता. :)
-दिलीप बिरुटे
.
25 Dec 2010 - 9:47 am | टारझन
म्हणा .. म्हणा .. "ऐसे तो कै आये और गये " ;)
आम्हाला आमच्यासारखा कोणी दिसला णाय बॉ :)
25 Dec 2010 - 9:30 am | राजेश घासकडवी
मग काय, संपादकांच्या त्रासदायक सवयी असा नवीन धागा येईल का?
शक्यता नाकारता येत नाहि, हे माहिती आहे. :)
25 Dec 2010 - 9:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असा धागा आलाच तर योग्य निर्णय घेण्यात येईल. :)
-दिलीप बिरुटे
25 Dec 2010 - 9:36 am | टारझन
शक्यता नाकारता येत नाहि.
25 Dec 2010 - 2:12 pm | परिकथेतील राजकुमार
माननिय संपादक श्री . प्रा. डॉ. ह्यांनी वर जे 'करेक्ट' असे लिहिले आहे त्याबद्दल अधिक माहिती हवी आहे.
जेंव्हा एक संपादक मिपावर कंपुबाजी आहे ह्या विधानाला करेक्ट म्हणतो तेंव्हा त्या संपादकास कंपु म्हणजे काय आणि त्यात कोण कोण आहे हे देखील माहित असणारच. तरी माननिय श्री. प्रा. डॉ. ह्यांनी लवकरात लवकर अशा कंपुबाजांची नावे जाहिर करावीत म्हणजे इतर सदस्य त्यांच्यापासून लांब राहतील. तसेच माननिय संपादक श्री. बिरुटे ह्यांचे विधान इतर सर्व संपादकांना मान्य आहे असे गृहित धरावे काय ?
माननिय संपादकांनी त्वरित अशी नावे जाहिर करावित अन्यथा मिपाची बदनामी करणे टाळावे.
25 Dec 2010 - 2:52 pm | अवलिया
सहमत आहे. संपादकाच्या प्रतिसादातुन अशा प्रकारची खेदजनक प्रतिक्रिया अपेक्षित नाही. विशेषतः बिरुटे सरांसारखा वृद्ध ज्ञानी अशा प्रकारे कंपुबाजीबद्दल लिहितो तेव्हा त्याला वेगळाच अर्थ प्राप्त होतो. या प्रतिक्रियेतुन बिरुटे सरांनी केवळ आपल्या सहकार्यांची वाहवा मिळवली आहे पण सर्वसामान्य सदस्यांची दिशाभुल करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. अशा प्रकारच्या प्रतिसादांची बिरुटे सरांकडून अजिबात अपेक्षा नाही. त्यांनी त्वरीत आपले विधान मागे घ्यावे अन्यथा त्यांच्याविरुद्ध जन आंदोलन उभारण्यात येईल.
आणि जर अशा विधानाला ते चिकटुन रहाणार असतील तर अशी कंपूबाजी करणारे सदस्य कोण आहेत, त्यांच्यावर मिपा प्रशासनाने काय कारवाई केली ते जाहिर करावे. केवळ व्यक्तिगत हेवेदावे उकरुन काढुन मिपाला वेठीस धरणे संपादकांनी थांबवावे हीच विनंती.
25 Dec 2010 - 8:34 am | चिंतामणी
पण १, ५, आणि ६ सगळ्यात भारी आहेत.
25 Dec 2010 - 9:48 am | सूड
बाल की खाल काढणे !!
(मी पण त्यातलाच
:D)