सौमित्रा, कितीक युगे येतील अन् कितीक युगे जातील,
काळाच्या प्रवाहात आदर्शवादाचे मानदंड बदलत राहतील
परन्तू मर्यादा पुरुषोत्तम म्हणूनच मला दुनिया ओळखेल
...तरीही सीतेला एकटीला वनात सोडांवं लागणारच आहे
थोडंसं तूही समजून घे, सल वेदनेचा माझ्या उमजून घे
नुकताच श्वास मी घेतला होता या स्वार्थी मतलबी दुनियेमध्ये
कळण्याआधीच काही, आईने सोडले मला वाहत्या पाण्यामध्ये
कसाही अन् कुणीही असो मी, ही दुनिया दानशूर म्हणते मला
...तरीही नाही येता येणार मला आता पांडव भावांच्या बाजूला
थोडंसं तूही समजून घे, सल वेदनेचा माझ्या जरासा उमजून घे
असंख्य धडका मारल्या असतील बाळा या अवाढव्य सह्याद्रीला
कित्येक वेळा नमवलं आम्ही त्या औरंगजेबासारख्या क्रुतान्ताला
आई भवानीच्या कृपेंनं या मराठी मातीला आम्ही श्वास दीला
...तरीही सावत्रपणाच्या आगीतून तुला वाचवणे मात्र नाही जमले
थोडंसं तूही समजून घे, सल वेदनेचा माझ्या जरासा उमजून घे
मान मिळवून दीला आम्ही या मराठी मातीला आणि जनतेला
रक्ताचं पाणी करून आम्ही तेव्हा मंत्रालयावर भगवा फडकवला
घराणेशाहीच्या विरोधात हा वाघ इथे नेहमीच गरजत राहीला
...तरीही वेळ येताच राजा, मनाने रक्ताच्या नात्याला कौल दिला
थोडंसं तूही समजून घे, सल वेदनेचा माझ्या जरासा उमजून घे
तथाकथित सभ्यपणातून मुक्त केले जालावरच्या मराठी साहित्याला
विषयाचे, शब्दांचे बंधन ना ठेवले आम्ही प्रतिभेच्या निष्पाप हुंकाराला
येणा~या पाहुण्याच्या स्वागताला हा देवगडकर नेहमीच सज्ज राहीला
...तरीही नाही आवरू शकलो स्वताला, जेव्हा 'तो' चिखल उडवू लागला
थोडंसं तूही समजून घे, सल वेदनेचा माझ्या जरासा तूही उमजून घे
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
प्रतिक्रिया
31 May 2008 - 11:39 pm | विसोबा खेचर
---
तात्या.
अवांतर - गावडेसाहेबांच्या भावनेला सलाम, परंतु रामभाऊ, कर्ण, इत्यादींच्या यादीत बसल्यामुळे भाईकाकांच्या भाषेत नाकाखाली उगीच दोन पारंब्या लोंबायला लागल्या आहेत असं वाटलं! :)
आपला,
(अभ्यंकरांच्या ४२ पिढ्या ज्यांच्या पायाशी वाहाव्यात त्या थोरल्या आबासहेबांचा निस्सीम भक्त!) तात्या अभ्यंकर.
1 Jun 2008 - 12:44 am | मयुरयेलपले
वाचायला मस्तच पण काय कळलि नाहि....
आपला मयुर
1 Jun 2008 - 10:47 am | विसोबा खेचर
वाचायला मस्तच पण काय कळलि नाहि....
बाबारे, चार संस्थळं हिंडल्याशिवाय समज येत नाही बरं! खूप टक्केटोमणे, बोलणी खावी लागतात बरं! :)
आपला,
(काटेरी मुकुट घातलेला!) तात्या. :)
1 Jun 2008 - 10:40 am | प्रभाकर पेठकर
शेवटच्या कडव्याच्या 'इफेक्ट' साठी आधीच्या कडव्यांमध्ये बरीच 'जान' ओतली आहे.
1 Jun 2008 - 12:25 pm | राजे (not verified)
जबरा !!!!!
काव्य प्रतिभा काय चीज असते ते वाचल्यावर कळाले !!!!!!
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !