पुणे हे माझ्यासारख्या खाणा-यांचे शहर म्हणून प्रसिद्द आहेच, या मालिकेत मी काही माझ्या आवडत्या होटल्स बद्दल लिहिणार आहे. मानून मालिकेचे नाव आहे जगणे म्हणजे खाणे - मु. पुणे. - ०१
काही व्याखा - खर्च - हां नेहमी दोन व्यक्तींसाठीच असेल आणि तो सुद्धा पोटभर म्हणजे खुर्चीतून उठायला अंमल जड़ होइल एवढे ( डायेट मात्रा गुणिले 3 (किमान))
नाश्ता- न्याहारी व चहा / कोफी
तर मंडळी आजचं होटल आहे - सदर्न स्पाइसेस -
पत्ता - होटल आनंद कर्वे रोड च्या लेन मध्ये - शारदा सेंटर कड़े जाताना डावीकडे.
प्रकार - प्युअर व्हेज. --- वेळ - सकाळी ७ ते रात्रि ११ पर्यन्त.
खाण्याचे प्रकार - नाश्ता व जेवण दोन्ही. --- मालक - श्री प्रसाद (माझ्या माहिती प्रमाणे)
खर्च - नाश्ता - रु ६० व जेवण रु १३०.
तर या तांत्रिक माहिती नंतर मुख्य विषयाकडे येवू,
ही जागा होटल पेक्षा ही मेस जास्त आहे. मुख्य मेनू राईस प्लेट आणि ती सुद्धा फक्त राईस प्लेटच, उगाच ग्राहकांची मागणी म्हणून १/२ एमएम पेक्षा पातळ दोन चपाती वगेरे नाटक नाहित. आतल्या काउंटर वर पेसे देऊन कूपन घेतली की मोकळ्या टेबल मागच्या खुर्चीवर जाउन बसले की ५-६ कप्पे असलेली ताटं समोर येतात. त्यांत चटणी,भाजी, दाळ, दही वाटी व बोब्बी, म्हणजे फिंगर्स वाढले जातात. तो पर्यन्त आपण आजुबाजुला पाहतो, इतर गिर्हाईक बहुतेक आंध्रचे आणि बहुतेक टेक महिंद्रा वाले. (मला पहिल्यांदा हे त्यांचेच केंटिन वाटले होते.) तेवढ्यात वाढपी एका मोठ्या टोपल्यातुन घेउन छोट्या टोपल्याने भात वाढतो आणि त्यानंतर दूसरा त्यावर सांबार किंवा रस्सम. हवे असेल तर हे दोन्ही वाटीत पण मिळेल पण भाताच्या मानाने त्या खुपच छोट्या आहेत, अगदी आनंद / सुयोग वगेरे कार्यालयात श्रीखंड किंवा बासुन्दिला देतात ना तेवढ्याच. असो एखादा पक्का पुणेरी श्री.कोवेगे ना सांगुन मला पुण्याबाहेर काढायचा( आणि माझ्या कंपनीला माझी फार गरज आहे हो, दया करा तिच्यावर). आता चमचा वगेरे विसरा व हाताने तो भात कालवा आणि सुरु करा, चव अगदी सेम तू सेम आंध्रा जेवणाची. सांबाराचे कोतुक करे पर्यंतच भात संपला तर पुन्हा घ्या आणि यावेळी रस्सम घ्या. याची ही चव भन्नाट आहे. जोडीला हिरव्या टोमिटोची लाल काळी चटणी, वांगे किंवा कोबीची भाजी व दही. पण दही आत्ताच न खाता शेवटी मद्राशी पद्धतीने पुन्हा भात घेउन त्यात दही व वरून थोड़े पाणी घालून ताक भात खाऊन बघा, त्यात थोड़ी पुड चटणी घाला एका अतिशय सुन्दर जेवणाची तेवढीच सुन्दर सांगता.
पुढच्या भागांत इथल्या नाष्ट्या विषयी...
हर्षद.
प्रतिक्रिया
6 Dec 2010 - 12:22 am | कानडाऊ योगेशु
पुण्यासारख्या मराठमोळ्या शहरात पण आंध्रा मेसची लागण सुरु झाली का काय?
इकडे बेंगलोरमध्ये दर दोन हॉटेल/मेस आड एक आंध्रा मेस असते.
आयटी क्षेत्रात बेंगलोरमध्ये कन्नडिगा/तमिळींपेक्षा तेलगु मंडळी जास्त आहेत.
उद्या पुण्यामध्येही जागोजागी अश्या आंध्रा मेस दिसु लागल्या तर आश्चर्य वाटणार नाही.
बायद्वे..मराठी थाळी खाण्यासाठी म्हणुन बेंगलोरमध्येच जयनगर मध्ये असलेल्या राजवर्धन हॉटेलमध्ये गेलो होतो.एका भाकरीची किंमत २० रू. ऐकुन परत त्या हॉटेलच्या वाट्याला कधी गेलो नाही.
कधी भाकरी खायची इच्छा झालीच तर सरळ कामत मध्ये जातो.१२० रू. अनलिमिटेड.
6 Dec 2010 - 12:29 am | मी-सौरभ
पुण्यातल्या खवय्याने खवय्येगिरी ची सुरवात आंध्रा मेस पासून करावी?
शिव शिव शिव!!!!
बेडेकरा, जोश्या, मानकरा तुमचे कसे होणार :(
6 Dec 2010 - 12:47 am | शिल्पा ब
+१
6 Dec 2010 - 1:38 am | ५० फक्त
एक एक करुन सर्वांची हजेरी घेणार आहे, थोडं थांबा. जोशीवडेवालॅ बद्दल म्हणाल तर आम्हां सोलापुरकरांना नवी पेठेतला, (सोलापुरच्या) भाग्यश्री वडा, हाच एकुलता एक वडा आहे असे वाटते, त्यामुळे जोशी जे आलु टिक्की बेसनात घोळ्वुन व तळुन देतात त्याला वडे म्हणणे पाप वाटते.
बाकी, बेडेकरांपेक्षा कधि कधि वारजेचा गावडे चांगली मिसळ बनवतो. बाकी पुण्यातलेच म्हणाल तर रामनाथ, काटाकिर्र, पिरंगुट्चा श्रिपाद व खारावड्याचा प्रसाद यांची मिसळ खुप चांगली असते. या सर्वांवर कडी म्हणजे भिगवण्ची ज्योतीची मिसळ.
या सर्वांबद्दल पण सवडीने लिहिनंच.
आणि हो आपणां सर्वांना प्रतिसादाबद्दल अतिशय धन्यवाद आणि वाचन्मात्रांना पण फक्त धन्यवाद.
हर्षद.
6 Dec 2010 - 5:16 pm | स्पंदना
मला पण नाहित आवडत ' जोशी वडे ' अन ते विकणारे जोशी पण. अर्थात आम्हाला हाय वे वरच हॉटेल माहित आहे. मुंबई हुन घरी जाताना एव्हढी जाहिरात बघुन ट्राय केला होता.
आंध्र ? म्हणजे फार तिखट असत ना हो?
6 Dec 2010 - 10:40 pm | ५० फक्त
नाही, आंध्रा असलं तरी मी सांगितलेल्या ठिकाणी लाल तिखटापेक्षा आलं आणि लसुण यांचा जास्त वापर करतात, तिखट पणा
येण्यासाठी.
मी जोशी वडेवालेंची थेट नोकिया, मारुती सुझुकी बरोबर तुलना करतो. मार्केटिंग मॅनेजमेंट मध्ये मिल्किंग द ब्रँड असा एक कन्सेप्ट असतो, ही सग़ळी मंडळी त्यांच्या तयार झालेली ब्रँड व्हॅल्यु वापरुन ब-याच दुय्यम दर्जाच्या गोष्टी ग्राहकांच्या गळ्यांत मारतात, आणि ग्राहक पण ते मारुन घेतात.
हर्षद.
7 Dec 2010 - 8:49 am | शैलेन्द्र
मुंबै हायवेवरचा जोशी तर तद्दन फालतु आहे.. एकंदरच जोशी एवढा फेमस का झाला ते मला नाही कळल. परवाच "पुरेपुर कोल्हापुर" नळ स्टॉप्वरची मिसळ खाल्ली , नाही आवडली.
रामनाथ ट्राय करायचाय....
7 Dec 2010 - 12:11 am | कानडाऊ योगेशु
भाग्यश्रीवाला वडा फार महाग विकतो पण.
बाकी पार्क चौपाटीवरची डिस्को भजी द बेस्ट.
7 Dec 2010 - 8:27 am | शिल्पा ब
डिस्को भजी काय असतं?
9 Dec 2010 - 12:12 pm | ५० फक्त
नका हो उगाच सोलापुरातल्या आठवणी काढु,
तर घ्या,
डिस्को भजी हा प्रकार फक्त सोलापुरात मिळतो. पार्कवर मिळणारी डिस्को भजी ही डब्बल तळलेली हिरव्या मिरचीची भजी असतात. तर भवानी पेठेतील देदाच्या दुकानापाशी मिळणारी डिस्को भजी ही अशीच डब्बल तळलेली असतात, पण भजी मात्र मिरचीच्या एवजी मसाला वांग्याची असतात, या सारखा दुसरा चकणा आलम दुनियेत सापडणार नाही.
इथे डिस्को भजी, पिणा-यांसाठी वेगळी व नुसती खाणा-यांसाठी वेगळी वेगळी असतांत.
साखर पेठ सुत मार्केट, गंगा विहीर अण्णा भजी , चाटी गल्ली कचोरी, गवेश इडली, पुनम इडली, काका हलवाई पुरी भाजी व कुंदा, नामदेव चिवडेवाल्याचा कुंदा, चव्हाणांची कचोरी , सुप्रिया पावभाजी व गुलाब केटि (हा चहाचा प्रकार आहे) या सगळ्या बद्दल लिहितोच आता.
सोलापुरात दिवसभरांत मी तुम्हाला कमीत कमी १२ वेगवेगळ्या प्रकारचे चहा पाजु शकतो, आणि ते सुद्धा अतिशय उत्क्रुष्ट. कोणताही दुस-याची नक्कल नसलेला.
थांबा आता गा आणि खा -मु. सोलापुर सुरुच करतो.
हर्षद.
9 Dec 2010 - 12:46 pm | चिंतामणी
इथे डिस्को भजी, पिणा-यांसाठी वेगळी व नुसती खाणा-यांसाठी वेगळी वेगळी असतांत.
च्या मारी. एकदा काय प्रकार आहे तो चाखलाच पाहीजे. म्हण्जे दोन्ही प्रकार डिस्को भज्याचे.
7 Dec 2010 - 12:05 pm | अमोल केळकर
सहमत जोशीवडा फारसा नाही आवडला'
बाकी पुढील लेखनाची वाट बघतो आहे
अमोल केळकर
9 Dec 2010 - 1:02 pm | मैत्र
काटाकिर्र मस्तच आहे. एक नंबर.
पण मूळ जागी सदाशिव पेठेत गाडगीळ स्ट्रीटच्या टोकाला (प्रधानांच्या घरापाशी) श्री उपाहार गृहाची मिसळही उत्तम आहे. बेडेकरांच्या सारखी गोडसर नाही...
6 Dec 2010 - 9:13 pm | उल्हास
अजुन येवु देत
6 Dec 2010 - 10:43 pm | ५० फक्त
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद. निश्चितच ह्या मालिकेत अजुन बरेच भाग येतील.
हर्षद.
7 Dec 2010 - 1:22 am | कुंदन
फारच महाग आहे बुवा.
7 Dec 2010 - 1:42 am | वाटाड्या...
१३० रु. जेवण म्हणजे फारच झाली आहे पुण्यात महागाई...
(४०-५० रु राईस प्लेटवाला...) - वाट्या..ड्या....
7 Dec 2010 - 5:45 am | गांधीवादी
४०-५० रु राईस प्लेट म्हणजे फारच झाली आहे पुण्यात महागाई............
बापट पावभाजी, बाजीराव रोड, २६ रुपये राईस प्लेट. (ते सुद्धा खूप जास्त वाटतात.)
7 Dec 2010 - 9:16 am | चिंतामणी
पुणे हे अत्यंत महागडे शहर झाले आहे. Food आणि Transport ह्या मुलभुत गोष्टी अत्यंत महाग आहेत.
(जागेच्या भावाबद्दल आणि इतर गोष्टींबद्दल पुन्हा कधीतरी सवडीने लिहीले जाईल.)
7 Dec 2010 - 12:02 pm | अब् क
कोल्हापुर चा वडा खाल्ला तर परत फिरकनार नाहि त्या जोशडे!!!!!!!!!!
सेम फोर मिसळ!!!!!
9 Dec 2010 - 11:53 am | ५० फक्त
अहो वर लिहिले आहे ना व्याखेत - हा खर्च दोन माणसांचा आहे. काय आहे मी कधीच एकटा होटेल मध्ये जात नाही,बिल भरावं लागेल आणि खाण्याचा आस्वाद घेता येत नाही मग लिहिता ही येत नाही.
रु. १३० ला राईस प्लेट मिळणारं हॉटेल मध्ये मी तरी आज पर्यंत गेलेलो नाही. मी १ वर्षापुर्वी सांगोल्यात रु.२५ ला अमर्यादित राईस प्लेट खाल्लेली आहे. तसेच व्हीएफएम म्हणाल तर पुण्यात लोकसेवा किचन चे जेवण पण खुप छान असते.
पुढचा भाग - आज रात्री टाकतोय.
9 Dec 2010 - 12:58 pm | चिंतामणी
पत्ता - होटल आनंद कर्वे रोड च्या लेन मध्ये -
म्हणजे अजूबाच्या समोर ना?
होटल आनंद म्हणल्यावर पटकन लक्षात येणार नाही. "अजूबा" म्हणल्यावर लगेचच समजेल सगळ्यांना.