एका मनमोकळ्या, दिलदार व्यक्तिशी म्हंजे तुमच्या अण्णांशी ओळख झाली ह्यातुन.
र या मित्राच्या अगदी गळ्यात गळा घालून आजी, आई, बाबा, काका, आत्या, मावशी, इतर भावंड आणि बाकीच सगळ जग माझ्यावर कित्ती कित्ती अन्याय करतय हे सांगायला एकदम बर वाटायच. आणि मुख्य म्हणजे त्यांना ते पटायचही. न पटण्यासारख होतच काय म्हणा?
ह्यातली निरागसता
आणि
कसलाही आव न आणता, अगदी नकळत, भलेपणाचे संस्कार दिले. फ़ार साधी, सरळ अशी शिकवण होती त्यांची. साध्या साध्या गोष्टी सांगत. कोणाचे मिंधे राहू नका, खोट बोलू नका, कधी खर मत मांडताना, आणि स्पष्ट बोलतानाही समोरच्याला होता होईतो दुखवू नका.... साधीच, पण आजवरच्या आयुष्यात सतत उपयोगी पडलेली शिकवण.
दुर्दैवाने मला आजोबा कधी पहायलाच नाही मिळाले माझे दोन्ही आजोबा खूप लवकर गेले...तुझ्या आठवणी पाहून वाटलं असेच असते का ते? किती मनमोकळं लिहिलयस्...खरच नशिबवान आहेस की असे आजोबा तुझ्याबरोबर आहेत नेहेमी...
अतिशय सुरेख, ओघवता लेख!
मस्त लिहिले आहेस ग॑,
मला मात्र आजोबा हे दोन्ही कडचे नव्हते त्यामुळे मी लहानपणी थोडी नाराज होत असे जेव्हा माझ्या मैत्रीणी॑॑चे आजोबा त्या॑चे लाड करत तेव्हा मलाही वाटे आपल्याला ही आजोबा हवे होते.
आज परत तु ती जाणीव करून दिलीस.
पण तु नशिबवान आहेस.
मन, लेख आवडल्याचं सांगितल्याबद्दल धन्यवाद. हो, आमचे अण्णा, लाखात एक असे देवमाणूस होते अगदी.
वरदा, नातवंड आणि आजी - आजोबा यांच्यातलं नातं काही वेगळंच असतं हे खरच आहे गं... सगळेच आजी आजोबा त्यांच्या त्यांच्या नातवंडांना प्रिय असतातच, पण माझं नशिब की मला खरच खूप ग्रेट आजी आजोबा - दोन्ही बाजूंकडून मिळाले, वेगळ्याच पिळाची माणसं होती गं ती... त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं बघ, जे कुठल्याच पुस्तकात, शाळेत, कॉलेजात मिळणार नाही!! तीच आमची दौलत! भरपूर पुरुनही उरतेच आहे. :)
शीतल, धन्यवाद. खरच म्हणतेस तू, मी नशिबवान आहे अशी वडिलधारी माणसं माझ्या आजूबाजूला होती...
वडीलांचे वडील हयात नव्हते पण आईचे वडील बरीच वर्षे 'आजोबा' म्हणून लाभले. प्रेमळ आणि संतापी असे विचित्र मिश्रण होते त्यांच्या स्वभावात. संवादप्रचुर आणि गोष्टीवेल्हाळ त्यामुळे मला आवडायचे. त्यांच्या म्हातारपणी, संध्या़काळच्या वेळी मित्रांमध्ये खेळावयास न जाता, त्यांचा हात धरून त्यांना फिरायला न्यायला मला आवडायचे. मी त्यांचा लाडका नातू होतो. असो.
तुमच्या अजोबांच्या व्यक्तिचित्रणामुळे माझे बालपण आणि माझे आजोबा आठवले ह्यातच तुमच्या लेखाचे यश आहे. अभिनंदन.
आमचे आजोबाहि असेच प्रेमळ होते...
गंमत अशी की आमचे वडील एकदम रागीट व कडक!
पण जेंव्हा त्यांना नातू झाला (माझा मुलगा) तेंव्हा त्याचाशी ते अगदी जमिनीवर लोळण घेऊन वगैरे खेळायचे! आणि तो त्यांच्या पोटावर बसायचा!!
मी त्यांना विचारलं सुद्धा,
"बाबा, तुम्ही एव्हढे कडक होतात तुमच्या तरूणपणी, आता कसं हो हे सगळं चालतं तुम्हाला?"
त्यावर त्यांनी माझ्याकडे रोखून बघितलं आणि म्हणाले,
"ते तू आजोबा झालास ना की तुला कळेल!"
आजोबा होण्याची वाट पहात दिवस ढकलत असलेला,
पिवळा डांबिसकाका
यशोधरा तू खूप बोलके व्यक्तीचित्र उभे केले आहे. अण्णांनी तुझ्या वाङमयीन जाणीवांना खतपाणी दिले. अण्णांसारखा माळी तुला लाभला. तू फार भाग्यवान आहेस. आणखी वाचायला आवडेल.
यशोधरा तू 30 May 2008 - 11:50 am | राजे (not verified)
यशोधरा तू खूप बोलके व्यक्तीचित्र उभे केले आहे. अण्णांनी तुझ्या वाङमयीन जाणीवांना खतपाणी दिले. अण्णांसारखा माळी तुला लाभला. तू फार भाग्यवान आहेस. आणखी वाचायला आवडेल.
हेच म्हणतो !
१००५ सहमत, छान लेखन !
राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
छान झालाय लेख.
भाग्यवान आहेस असे आजोबा तुला लाभले.
>> यावरच अण्णांच उत्तर मात्र मला अजून ही आठवत. ते म्हणाले होते, आत्ता तिला काही समजाव अशी अपेक्षाच नाही आमची, पण नकळत घडलेल हेच वाचन तिच्या जाणीवा प्रगल्भ करेल, तिला एक नजर देईल. कळत नकळत तिच शिक्षण होतय, त्याच्या आड येण्याच पाप मी कस करेन?
अगदी प्रत्येकाला आपापले आजोबा आठवावेत असे लेखन .. ऑस्सम ... शेक्सपिअरची आठवण तर सही .. त्यांच्या जाणिवा किती प्रगल्भ होत्या हे दाखवणारी .. आपल्या मिपाला एक उत्तम ललित लेखिका मिळाली :) .. असेच उत्तमोत्तम लेखन येउ दे :)
>> दूधापेक्षा 'साय' अधिक महत्त्वाची. मुद्दलापेक्षा 'व्याज' जास्त प्रिय
पेठकरकाका, माझी आज्जी असच म्हणायची :)
तात्या, धनंजय, सहज, मदनबाण, आन्या, चित्रा, अरुण मनोहर, राजे, ईश्वरी, आनंदयात्री आणि मास्तर तुम्हां सार्यांचे लेखाला दिलेल्या अभिप्रायांबद्दल खूप खूप आभार. अण्णा तुम्हां सर्वांना आवडले, ह्यातच मला खूप समाधान आहे. थँक यू सगळ्यांना :)
हृद्य ओळख दिलीस तुझ्या अण्णाची!
योगायोग म्हणजे माझ्याही आजोबांना (बाबांच्या वडिलांना) आम्ही आण्णाच म्हणत असू. ते मला बराच काळ लाभले.
माझी काही मोठी चूक झाली की आई-बाबा रागवायचे क्वचित मारही मिळायचा. त्यावेळी आण्णांच्या पाठीमागे लपायला मिळाले म्हणजे हायसे वाटे.
ते त्यांच्या खास कोकणातल्या बोलीत आई-बाबांना म्हणत "अगों, शिक्षा गों कसली करता पोरांना? अजून लहान आहे तो. सोडून देस बघू त्याला, जरा सबुरीनं घे!"
मी बारावीत असताना ते गेले. त्यावेळी मनात झालेली पोकळी पुढे बरीच वर्षे तशीच होती, अजूनही कधीतरी हळव्या क्षणी जाणवते.
मी आता माझ्या मुलाला रागवायला लागलो की माझे बाबा मला दटावतात त्यावेळी त्यांच्या डोळ्यात मला आण्णाच दिसतात!
(स्वगत - हे असं पहिल्या पिढीचं नातं दुसर्या पिढीशी घट्ट होण्यासाठी दरवेळी तिसर्या पिढीला कवेत घेऊनच का जातं? :? )
चतुरंग
मस्त !!! 31 May 2008 - 10:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिक्रिया
29 May 2008 - 7:17 pm | मन
एका मनमोकळ्या, दिलदार व्यक्तिशी म्हंजे तुमच्या अण्णांशी ओळख झाली ह्यातुन.
र या मित्राच्या अगदी गळ्यात गळा घालून आजी, आई, बाबा, काका, आत्या, मावशी, इतर भावंड आणि बाकीच सगळ जग माझ्यावर कित्ती कित्ती अन्याय करतय हे सांगायला एकदम बर वाटायच. आणि मुख्य म्हणजे त्यांना ते पटायचही. न पटण्यासारख होतच काय म्हणा?
ह्यातली निरागसता
आणि
कसलाही आव न आणता, अगदी नकळत, भलेपणाचे संस्कार दिले. फ़ार साधी, सरळ अशी शिकवण होती त्यांची. साध्या साध्या गोष्टी सांगत. कोणाचे मिंधे राहू नका, खोट बोलू नका, कधी खर मत मांडताना, आणि स्पष्ट बोलतानाही समोरच्याला होता होईतो दुखवू नका.... साधीच, पण आजवरच्या आयुष्यात सतत उपयोगी पडलेली शिकवण.
आनी ह्यातला साधेपणा,पण मनाल भिडणारा आशय आवडला.
आपलाच,
मनोबा
29 May 2008 - 7:29 pm | वरदा
दुर्दैवाने मला आजोबा कधी पहायलाच नाही मिळाले माझे दोन्ही आजोबा खूप लवकर गेले...तुझ्या आठवणी पाहून वाटलं असेच असते का ते? किती मनमोकळं लिहिलयस्...खरच नशिबवान आहेस की असे आजोबा तुझ्याबरोबर आहेत नेहेमी...
अतिशय सुरेख, ओघवता लेख!
30 May 2008 - 2:07 am | बेसनलाडू
(नातू)बेसनलाडू
29 May 2008 - 7:35 pm | शितल
मस्त लिहिले आहेस ग॑,
मला मात्र आजोबा हे दोन्ही कडचे नव्हते त्यामुळे मी लहानपणी थोडी नाराज होत असे जेव्हा माझ्या मैत्रीणी॑॑चे आजोबा त्या॑चे लाड करत तेव्हा मलाही वाटे आपल्याला ही आजोबा हवे होते.
आज परत तु ती जाणीव करून दिलीस.
पण तु नशिबवान आहेस.
29 May 2008 - 10:14 pm | यशोधरा
मन, लेख आवडल्याचं सांगितल्याबद्दल धन्यवाद. हो, आमचे अण्णा, लाखात एक असे देवमाणूस होते अगदी.
वरदा, नातवंड आणि आजी - आजोबा यांच्यातलं नातं काही वेगळंच असतं हे खरच आहे गं... सगळेच आजी आजोबा त्यांच्या त्यांच्या नातवंडांना प्रिय असतातच, पण माझं नशिब की मला खरच खूप ग्रेट आजी आजोबा - दोन्ही बाजूंकडून मिळाले, वेगळ्याच पिळाची माणसं होती गं ती... त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं बघ, जे कुठल्याच पुस्तकात, शाळेत, कॉलेजात मिळणार नाही!! तीच आमची दौलत! भरपूर पुरुनही उरतेच आहे. :)
शीतल, धन्यवाद. खरच म्हणतेस तू, मी नशिबवान आहे अशी वडिलधारी माणसं माझ्या आजूबाजूला होती...
29 May 2008 - 11:53 pm | प्रभाकर पेठकर
वडीलांचे वडील हयात नव्हते पण आईचे वडील बरीच वर्षे 'आजोबा' म्हणून लाभले. प्रेमळ आणि संतापी असे विचित्र मिश्रण होते त्यांच्या स्वभावात. संवादप्रचुर आणि गोष्टीवेल्हाळ त्यामुळे मला आवडायचे. त्यांच्या म्हातारपणी, संध्या़काळच्या वेळी मित्रांमध्ये खेळावयास न जाता, त्यांचा हात धरून त्यांना फिरायला न्यायला मला आवडायचे. मी त्यांचा लाडका नातू होतो. असो.
तुमच्या अजोबांच्या व्यक्तिचित्रणामुळे माझे बालपण आणि माझे आजोबा आठवले ह्यातच तुमच्या लेखाचे यश आहे. अभिनंदन.
30 May 2008 - 12:20 am | विसोबा खेचर
यशोधरा,
तुझा अण्णा खूप आवडला! सुंदर लिहिलं आहेस.
तात्या.
30 May 2008 - 2:50 am | धनंजय
मोठ्या मनाचा माणूस.
30 May 2008 - 6:52 am | सहज
लेख आवडला.
30 May 2008 - 8:40 am | मदनबाण
मलाही आजी अजोबांच प्रेम तस कमीच मिळाल....
त्यांच्या प्रेमाची छाया ही बहुमोलच असते.....
मदनबाण.....
30 May 2008 - 9:04 am | अनिल हटेला
वाह!!!
लहान पणीच्या आठवनी ताज्या केल्यास !!!
सुन्दर लिखाण!!!!!
30 May 2008 - 9:04 am | चित्रा
मनापासून लिहीलेले आवडले.
त्या हृदयीचे या हृदयी केव्हाच घातले आहे - " हे खासच.
30 May 2008 - 9:14 am | अनिल हटेला
वाह!!!
लहान पणीच्या आठवनी ताज्या केल्यास !!!
सुन्दर लिखाण!!!!!
30 May 2008 - 9:32 am | पिवळा डांबिस
यशोधराजी,
एकदम मस्त लेख!
आमचे आजोबाहि असेच प्रेमळ होते...
गंमत अशी की आमचे वडील एकदम रागीट व कडक!
पण जेंव्हा त्यांना नातू झाला (माझा मुलगा) तेंव्हा त्याचाशी ते अगदी जमिनीवर लोळण घेऊन वगैरे खेळायचे! आणि तो त्यांच्या पोटावर बसायचा!!
मी त्यांना विचारलं सुद्धा,
"बाबा, तुम्ही एव्हढे कडक होतात तुमच्या तरूणपणी, आता कसं हो हे सगळं चालतं तुम्हाला?"
त्यावर त्यांनी माझ्याकडे रोखून बघितलं आणि म्हणाले,
"ते तू आजोबा झालास ना की तुला कळेल!"
आजोबा होण्याची वाट पहात दिवस ढकलत असलेला,
पिवळा डांबिसकाका
30 May 2008 - 11:48 am | प्रभाकर पेठकर
दूधापेक्षा 'साय' अधिक महत्त्वाची. मुद्दलापेक्षा 'व्याज' जास्त प्रिय.
30 May 2008 - 9:48 am | अरुण मनोहर
यशोधरा तू खूप बोलके व्यक्तीचित्र उभे केले आहे. अण्णांनी तुझ्या वाङमयीन जाणीवांना खतपाणी दिले. अण्णांसारखा माळी तुला लाभला. तू फार भाग्यवान आहेस. आणखी वाचायला आवडेल.
30 May 2008 - 11:50 am | राजे (not verified)
यशोधरा तू खूप बोलके व्यक्तीचित्र उभे केले आहे. अण्णांनी तुझ्या वाङमयीन जाणीवांना खतपाणी दिले. अण्णांसारखा माळी तुला लाभला. तू फार भाग्यवान आहेस. आणखी वाचायला आवडेल.
हेच म्हणतो !
१००५ सहमत, छान लेखन !
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
30 May 2008 - 12:27 pm | ईश्वरी
छान झालाय लेख.
भाग्यवान आहेस असे आजोबा तुला लाभले.
>> यावरच अण्णांच उत्तर मात्र मला अजून ही आठवत. ते म्हणाले होते, आत्ता तिला काही समजाव अशी अपेक्षाच नाही आमची, पण नकळत घडलेल हेच वाचन तिच्या जाणीवा प्रगल्भ करेल, तिला एक नजर देईल. कळत नकळत तिच शिक्षण होतय, त्याच्या आड येण्याच पाप मी कस करेन?
हे तर खासच. आवडलं.
ईश्वरी
30 May 2008 - 3:00 pm | भडकमकर मास्तर
मनापासून लिहिलेला लेख आवडला...
माझ्या पुस्तकवेड्या आजोबांची आठवण झाली...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
30 May 2008 - 4:29 pm | आनंदयात्री
अगदी प्रत्येकाला आपापले आजोबा आठवावेत असे लेखन .. ऑस्सम ... शेक्सपिअरची आठवण तर सही .. त्यांच्या जाणिवा किती प्रगल्भ होत्या हे दाखवणारी .. आपल्या मिपाला एक उत्तम ललित लेखिका मिळाली :) .. असेच उत्तमोत्तम लेखन येउ दे :)
30 May 2008 - 8:24 pm | यशोधरा
>> दूधापेक्षा 'साय' अधिक महत्त्वाची. मुद्दलापेक्षा 'व्याज' जास्त प्रिय
पेठकरकाका, माझी आज्जी असच म्हणायची :)
तात्या, धनंजय, सहज, मदनबाण, आन्या, चित्रा, अरुण मनोहर, राजे, ईश्वरी, आनंदयात्री आणि मास्तर तुम्हां सार्यांचे लेखाला दिलेल्या अभिप्रायांबद्दल खूप खूप आभार. अण्णा तुम्हां सर्वांना आवडले, ह्यातच मला खूप समाधान आहे. थँक यू सगळ्यांना :)
31 May 2008 - 3:01 am | चतुरंग
हृद्य ओळख दिलीस तुझ्या अण्णाची!
योगायोग म्हणजे माझ्याही आजोबांना (बाबांच्या वडिलांना) आम्ही आण्णाच म्हणत असू. ते मला बराच काळ लाभले.
माझी काही मोठी चूक झाली की आई-बाबा रागवायचे क्वचित मारही मिळायचा. त्यावेळी आण्णांच्या पाठीमागे लपायला मिळाले म्हणजे हायसे वाटे.
ते त्यांच्या खास कोकणातल्या बोलीत आई-बाबांना म्हणत "अगों, शिक्षा गों कसली करता पोरांना? अजून लहान आहे तो. सोडून देस बघू त्याला, जरा सबुरीनं घे!"
मी बारावीत असताना ते गेले. त्यावेळी मनात झालेली पोकळी पुढे बरीच वर्षे तशीच होती, अजूनही कधीतरी हळव्या क्षणी जाणवते.
मी आता माझ्या मुलाला रागवायला लागलो की माझे बाबा मला दटावतात त्यावेळी त्यांच्या डोळ्यात मला आण्णाच दिसतात!
(स्वगत - हे असं पहिल्या पिढीचं नातं दुसर्या पिढीशी घट्ट होण्यासाठी दरवेळी तिसर्या पिढीला कवेत घेऊनच का जातं? :? )
चतुरंग
31 May 2008 - 10:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपले अण्णा आवडले.