वडाप..
सेन्ट्रल लाईनवरच शेवटच स्टेशन... कसारा.... लोकल मधुन ऊतरलेली गर्दी, उताराकडे वाहणारया पाण्यासारखी एकाच दिशेने वाहते आणि ऊभ्या आड्व्या लावलेल्या बस आणि जीप वर आदळत तिथेच जिरते. घाट माथ्यावर असलेल्या या गावाच हेच प्रयोजन आहे.. या गावात उतरलेली सगळी गर्दी पोटात घेवून महामन्ड्ळाचे लाल डबे आणि खाजगी जीप्स फुर्फुरत घाट चढायला लागतात.. नाशिकच्या दिशेने..
तिथेच तो ऊभा असयचा, कचरू , कचरूच नाव होत त्याच बहुदा.. बहुतेक सगळ्या गाड्या नाशिककडे जायच्या. पण हा मात्र दुसरीकडेच जाणारा, माझ्या आजोळि, सह्याद्रीच्या उतरत्या ऊजव्या खान्द्यावर, कलसूबाई आणि भन्डारदर्याच्या पुढे, राजुरला..
मला पाहिल कि आपसूक त्याचा हात वर जायचा, तेवढी ओळख होति आमची. पुढच, ड्रायव्हर शेजारच, "शेफ शिट" माझ्यासाठी राखुन ठेवल जायच. पाठिमागच्या ऊभ्या आड्व्या हाऊद्यात सोळा पाशिन्जेर बसुन, पुढच चाक वर ऊचलल जाइल अशी परिश्थीति आली कि तो पुढच्या सीट वर मि धरून चार जनाना बसवून बॅलेन्स करायचा. मग तो बसयचा.. म्हणजे टेकायचा. त्याचा उजवा हात आणि उजव्या पायाच्या वरचा भाग, जीप्च्या बाहेर राहुन मागच्या पुढच्या वाहनान्शी कम्युनिकेट करायचा. व्यवस्थीत बसुनहि चालवायला कठीन अशा रस्त्यावर, त्याची अशी अर्ध्या बुडावरची रथयात्रा सुरु व्हायची...
(पुढे लवकरच, पहिलाच प्रयत्न, टक लेखनास वेळ लागतोय)
प्रतिक्रिया
22 May 2008 - 2:42 pm | आनंदयात्री
छान लिहित आहात, भाग मोठे लिहा. शिर्षकाचा अर्थ नाही समजला.
22 May 2008 - 2:47 pm | कुंदन
खाजगी जीप्स ला वडाप म्हणत असावेत से वाटते , जस्से ६ आसनी ला डुक्कर रिक्षा ऐकल्याचे स्मरते ...
22 May 2008 - 2:48 pm | आनंदयात्री
>>जस्से ६ आसनी ला डुक्कर रिक्षा ऐकल्याचे स्मरते ...
=)) हा हा ... आमी बी डुक्करच म्हणायचो त्यास्नी ..
22 May 2008 - 2:52 pm | भडकमकर मास्तर
( भरपूर प्रवासी कोंबून) शेअर पद्धतीने चालवल्या जाणार्या वाहनाला ( जीप / रिक्षा ) वडाप असे म्हणतात...
हा शब्द मी कोल्हापूर सांगली भागात जास्त वापरला जाताना पाहिला आहे... बाकीकडे ही असेल...
__________________-
लेख सुरुवात छान आहे...पण प्लीज टाकायची घाई नका बुवा करू... निवांत लिहा.... लेख पूर्ण करा ,मग वाट्टेल तेवढ्या भागात टाका...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
22 May 2008 - 3:14 pm | मनस्वी
सहमत.
22 May 2008 - 2:52 pm | मनस्वी
चांगले लिहिलेय.
वडाप म्हणजे काय.
कसारा लोकलने मी पण प्रवास करते.. मामाकडे जाताना.. वाशिंद / खर्डी / नाशिक :)
भाग जरा मोठे लिहि शैलेंद्र.
22 May 2008 - 2:56 pm | धमाल मुलगा
येऊद्या अजुन,
छान लिहिता आहात की :)
असं मुळीच वाटत नाहीय्ये.
सोप्पं आहे.
http://www.misalpav.com/node/1312
हे एका खिडकीत उघडून ठेवा...फटाफट काम होईल. :)
पु.ले.शु.
थोरले आनंदराव,
वडाप म्हणजे 'भाड्याची गाडी' (इथं शिवी नाहीय्ये..नीट वाचावे.) जश्या चेंबूरहून / वाशी-नाक्यावरुन पुण्याला जायला सुमो, तवेरा, स्कॉर्पिओ इ.इ. गाड्या असतात, त्या वडाप (जरा दिसायला बिसायला लैच भारी असतात नै नावापेक्षा?)
हा शब्द सांगली-मिरज-कोल्हापूरकडे जास्त ऐकायला मिळतो :) तिथे ६ आसनी रिक्षांनाही वडाप म्हणतात.
22 May 2008 - 3:00 pm | शैलेन्द्र
मोठच लिहायच होत, पण अजुन कि बोर्ड वर हात नहि बसलेला..
वडाप म्हणजे खाजगी , ट्प्प्याचि वाहतुक करणारि वाहन..
22 May 2008 - 4:18 pm | तात्या विंचू
थोडक्यात वडाप म्हणजे....
कितिपण बसवा आणि वडा (ओढा)...
रिक्षा टॅक्सी इ. वाहनाना प्रवासी बसवून घ्यायची मर्यादा असते.....
वडापला ती मर्यादा नसते.......
अतिशय स्वस्तात आपण जाउ शकतो.......
-(वडाप प्रेमी)
तो मी नव्हेच
22 May 2008 - 8:02 pm | सुमीत
सुरूवात अप्रतिम, छान लिहित आहात. पुढचा भाग येऊ दे लवकर
22 May 2008 - 8:29 pm | झकासराव
हा शब्द कोल्हापुर सांगली बाजुलाच वापरला जातो.
वडापचा अर्थ बेकायदेशीर पणे केलेली टप्पा वाहतुक.
कोल्हापुर जोतिबा, कोल्हापुर मलकापुर/ बांबवडे ह्या रूट वर वडाप जोरात सुरु असते.
एका जीप मध्ये भरपुर प्रवासी कोंबुन वाहतुक असते.
त्यातली सगळ्यात मोठी गम्मत म्हणजे पुढे ड्रायव्हर कोठे बसला आहे हे नीरखुन पहावे लागते कारण पुढे बसवलेली माणसं.
सुरवात तर छान झाली आहे. पुढचे भाग पटापट येवुदेत. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
23 May 2008 - 9:00 am | विसोबा खेचर
ष्टोरी अंमळ इंटरेस्टिंग वाटते आहे..
फुडला पर्ट येऊ द्या सत्वर झणी!
तात्या.