अक्षता.....भाग २

निरंजन's picture
निरंजन in जनातलं, मनातलं
20 Oct 2010 - 7:02 pm

नाना मला घरी बोलावून बोलावून थकला. मी कधीच त्याच्या घरी गेलो नव्हतो. आता इतक्या रात्री त्याच्या घरी जायच का ? नाना तर कधीच झोपला असेल. गेलो त्याच्या घरी तर तो मला ओळखेल का ? अक्षता इथे असेल का लग्न होऊन कुठे सासरी गेली असेल ?

हा विचार करतो न करतो तर समोरुन रस्त्यावरुन कोणीतरी येताना दिसल. खर तर या रात्री कोणीही झपाझप पावल टाकत येईल पण मला उगाचच समोरुन येणार्‍या आकृतीला बघुन या व्यक्तीला काही घाई नाही अस वाटल.

जवळ आल्यावर लक्षात आल की ती एक बाई आहे. आणखीन जवळ आल्यावर पाहिल की, रंग गोरा होता. या अंधारात सुद्धा चांदण्याच्या प्रकाशात तीचा रंग गोरा आहे हे कळत होत. डोक्यावरुन घेतलेल्या पदरानी तीच तोंड झाकलेल होत. तरीसुद्धा ती एक १७-१८ वर्षांची युवती आहे अस वाटत होत अथवा जाणवत होत.

जशी ती युवती जवळ येत होती तसा एक कोणत्या तरी फ़ुलाचा वास यायला लागला. कोणत्या बर फ़ुलाचा हा वास ? लक्षातच येत नाही. हा वास मी लहानपणी खुप अनुभवला आहे.

खरी तर जिवंत बाईच समोर होती पण तरी माझ्या मनाचा थरकाप उडाला. अंधाराचा आपल्या मनावर कसा परिणाम होतो पहा. आजवर पाहिलेले हॉरर मुव्ही, वाचलेली भुताटकीची पुस्तकं सर्व आठवल. आपण आपल्या सुरक्षित घरात अथवा अनेक लोकांबरोबर थिएअटरमधे बसुन असे सिनेमा बघण व भुताटकीची पुस्तक वाचुन त्याच्या थ्रिलचा अनुभव घेण वेगळ आणि अशा एकट ठिकाणी असे विचार मनात येण वेगळ.

त्याबाईला पाहिल्यावर काय काय गोष्टी मनात येऊन गेल्या. आपसुक नजर खाली गेली. खरच भुताचे पाय उलटे असतात का? का ही पण एक कल्पना आहे, काय माहिती. त्या अंधारात मला तीचे पाय दिसलेच नाहीत.

एक थंड लहर मनाचा वेध घेत गेली. आंग शहारल. आता माझ हृदय इतक जोरात धडधडत होत की, माझी धडधड कदाचित त्या बाईला ऎकायला गेली असेल. लांब कुठेतरी एक कुत्र रडलं. या कुत्रांना पण समजत नाही कधी रडायच ते. त्या थंडीतसुद्धा मला धरधरुन घाम फ़ुटला. पहील इंट्युशन पळुन जा. पण मी साधारणपणे इंट्युशनकडे लक्ष देत नाही. मी एक सायन्सचा ग्रॅज्युएट, मला भुताखेतावर विश्वास नसला पाहिजे. या भंपक कल्पना आहेत सगळ्या.

कुठे जात असेल ही मुलगी ? कोणाची असेल ही आणि या वेळी या आडबाजुला एकटीच काय करते ? का माझ्यासारखी ही पण संधीप्रकाशात बाहेर फ़िरायला निघाली होती ? का कोणी इथेच जवळपास नवीन राहायला आलेली आहे ?

मी विचार केला आता या युवतीला विचारायचच. मी जवळ गेलो. मला तीचा तोडावरचा पदर मागे करायचा मोह झाला.

माझ दूसर मन मला मागे खेचत होत. हे माझ दूसर मन आहे हे फ़ार वाईट आहे. मी काहीही करायला लागलो तर लगेच मला मागे खेचत. अर्थात बहुतेक वेळा त्याचच बरोबर असत.

यावेळी मात्र मला मोह अनावर झाला. मी दोन्ही हात वर नेले पदराच्या दिशेनी. पण मनावर असलेले संस्कार आड आले. मन सारख नकोच म्हणत होत. मी हात खाली घेतले.

मला उगाचच वाटल की त्या युवतीला खुप राग आलाय. मला परत परत तोच मोह होत होता. खर तर मी अतिशय सुसंस्कारीत , नीतीमान व देवाधर्माच करणारा आहे. असे विचारसुद्धा माझ्या मनात यायला नकोत. मी त्या मुलीला विचारल तू कुठे राहातेस ? तीनी नानाच्या घराकडे बोट दाखवल.

"नानाच्या घरी ? "

तीनी होकारार्थी मान हालवली. असेल नानाची कोणी नातलग. मी विचारल

"नाना आहे का घरी ?"

तीनी नकारार्थी मान हालवली.

"आणि अक्षता ?"

मला तीनी कोणतच उत्तर दिल नाही.

"या माझ्याबरोबर"

पहिल्यांदाच ती बोलली. आवाज चांगलाच होता. कुठे तरी ऎकलेला होता. पण फ़ार लांबुन आलेला वाटला. कुठे बर हा आवाज ऎकलाय ? आठवत नव्हत.

परत माझ दूसर मन म्हणाल जाऊ नको तीच्या मागे पळुन जा.

पण मी यावेळी ठरवल नाही ऎकायच या दूसर्‍या मनाच. मी पुढे सरसावलो.........

........ क्रमश:

कथाअनुभव

प्रतिक्रिया

गणेशा's picture

20 Oct 2010 - 7:09 pm | गणेशा

लिहित रहा ... वाचत आहे

वर्णन सुरेख ...

रेवती's picture

20 Oct 2010 - 7:22 pm | रेवती

वाचतिये.

असुर's picture

20 Oct 2010 - 8:03 pm | असुर

वाचतोय!

--असुर

निरंजन's picture

20 Oct 2010 - 9:27 pm | निरंजन

मला नवीन पोस्टला "अक्षता...१" व "अक्षता...२" या पोस्टच्या लिन्क द्यायच्या आहेत कशा देऊ ? मी insert link हा ओपशन वापरुन "अक्षता...२" या पोस्टवर "अक्षता...१" पोस्टची लिन्क दिलेली होती ती आलेली नाही.

कोणी मला मदत करु शकेल का ?

गणेशा's picture

20 Oct 2010 - 10:31 pm | गणेशा

पहिला भाग ओपन करा. url मधील लिंक copy करा.
आणि नविन पोस्ट च्या वेळेस पेस्ट करा.

स्वप्निल..'s picture

21 Oct 2010 - 2:29 am | स्वप्निल..

वाचतोय :)

समई's picture

21 Oct 2010 - 5:54 am | समई

मस्त आहे...वाचत आहे...गावचे वातावरण समोर उभे राहिले...सागुति...वाह्...खुप दिवसांनि श्ब्द आला..नाहितर गोट करि,चेट्टिनाड चिकन्,पेपर चिकन,मुघलाई चिकन खाता खाता हे बाजुलाच पड्ले आहे :(

स्पंदना's picture

21 Oct 2010 - 10:01 am | स्पंदना

एव्हढे सगळे वाचले? का य कसल्या संकटात होते?

ठीक आहे मी पण वाचतेय्...वाचवा वाचवा..

@ निरन्जन मस्त! जरा क्जरा घाम फुटायला लागलाय.