(गावात प्लेग)

Primary tabs

अर्धवट's picture
अर्धवट in जे न देखे रवी...
13 Oct 2010 - 10:57 pm

सार्‍या उदास वाटा, कापीत चाललो मी
होउन मूषक काळा, शापीत चाललो मी

नाले गटारे अनेक, सुगंधी या पथाने,
ओल्या ओघळांत काही, हुंगीत चाललो मी

वस्ती उठून गेली, ओसाड ती कवाडे,
तो घास नासलेला, शोधीत चाललो मी,

काखेत एक गाठ, आक्रोश आणि टाहो,
मृत्यो तुझ्या तमाच्या धुंदीत चाललो मी.

पसरला प्लेगपाश, दूषीत आसमंत,
प्रतिशोध मानवाचा भेदीत चाललो मी.

( खूप दिवसांनी एकाच कवितेवर विडंबने पडताना पाहिली आणी रहावलं नाही..
खुप दिवस काहीच लिहायला वेळ मिळाला नाही म्हणुन जरा हात आणी कळफलक साफ करून घेतोय..

)

बिभत्सकरुणविडंबन

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Oct 2010 - 11:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आई गं .... काय पण विषय निवडलाय!!

श्रावण मोडक's picture

14 Oct 2010 - 1:59 pm | श्रावण मोडक

अगदी हीच प्रतिक्रिया उमटली.

गणेशा's picture

14 Oct 2010 - 5:15 pm | गणेशा

हीच प्रतिक्रिया उमटली.

गणेशा's picture

14 Oct 2010 - 5:16 pm | गणेशा

हीच प्रतिक्रिया उमटली.

गणेशा's picture

14 Oct 2010 - 5:16 pm | गणेशा

हीच प्रतिक्रिया उमटली.

तुमच्या सगळ्याच प्रतिक्रिया तीन वेळा उमटतात का? ;)

रिप्लाय केला तरी रिप्लाय प्रकाशीत होत नव्हता.
२ दा पुन्हा कील केले तरी तीच बोंब शेवटी सोडुन दिले तर सगळ्या क्लिक ला रिप्लाय पडले होते इकडे .

बरे झाले रिप्लाय प्रकाशीत होइ पर्यंत क्लिक केले नाही. नाहीतर हिंदी मालीकांचे असंख्य भाग आले असते येथे असे वाटले असते

नगरीनिरंजन's picture

14 Oct 2010 - 7:45 pm | नगरीनिरंजन

तुम्ही हिंदी मालिका फार पाहता का? तीनदा प्रतिक्रिया उमटली म्हणून विचारलं.

मेघवेडा's picture

13 Oct 2010 - 11:10 pm | मेघवेडा

नगरीनिरंजन's picture

14 Oct 2010 - 7:27 am | नगरीनिरंजन

हे सुद्धा छान! 'गाठ'दार विडंबन आहे.

चेतन's picture

14 Oct 2010 - 2:27 pm | चेतन

विडंबन ठीक (पहिल्या कडव्यात अडखळायला होतयं असं वाटलं)

धमाल मुलगा's picture

14 Oct 2010 - 8:07 pm | धमाल मुलगा

उत्तम आहे..

तुम्ही उत घाला म्हणजे आम्हाला मात घालायला वाव मिळेल.

-धमाल रँड.

विसोबा खेचर's picture

14 Oct 2010 - 8:26 pm | विसोबा खेचर

शी...! :)

तात्या.

--
तात्या-धर्मेन्द्र भेट हा लेख मिपावर लौकरच! :)