(गावात प्लेग)
लेखनविषय:
सार्या उदास वाटा, कापीत चाललो मी
होउन मूषक काळा, शापीत चाललो मी
नाले गटारे अनेक, सुगंधी या पथाने,
ओल्या ओघळांत काही, हुंगीत चाललो मी
वस्ती उठून गेली, ओसाड ती कवाडे,
तो घास नासलेला, शोधीत चाललो मी,
काखेत एक गाठ, आक्रोश आणि टाहो,
मृत्यो तुझ्या तमाच्या धुंदीत चाललो मी.
पसरला प्लेगपाश, दूषीत आसमंत,
प्रतिशोध मानवाचा भेदीत चाललो मी.
( खूप दिवसांनी एकाच कवितेवर विडंबने पडताना पाहिली आणी रहावलं नाही..
खुप दिवस काहीच लिहायला वेळ मिळाला नाही म्हणुन जरा हात आणी कळफलक साफ करून घेतोय..
)
वाचने
3355
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
आई गं .... काय पण विषय
In reply to आई गं .... काय पण विषय by ३_१४ विक्षिप्त अदिती
अगदी
In reply to अगदी by श्रावण मोडक
हीच प्रतिक्रिया उमटली.
In reply to अगदी by श्रावण मोडक
हीच प्रतिक्रिया उमटली.
In reply to अगदी by श्रावण मोडक
हीच प्रतिक्रिया उमटली.
In reply to हीच प्रतिक्रिया उमटली. by गणेशा
तुमच्या सगळ्याच प्रतिक्रिया
In reply to तुमच्या सगळ्याच प्रतिक्रिया by मेघवेडा
रिप्लाय केला तरी रिप्लाय
In reply to हीच प्रतिक्रिया उमटली. by गणेशा
तुम्ही हिंदी मालिका फार पाहता
सॉल्लिड!
हे सुद्धा छान! 'गाठ'दार
आहाहा काय कवीकल्पना !!
ठीक
व्वा!
शी...!