आज ठाण्याच्या टेंभी नाक्याला असणार्या देवीच्या दर्शनाला जाउन आलो, आणि देवीची प्रसन्न आणि मोहक मुद्रा टिपुन आलो... :)
विशेष :--- हा धागा गणपा शेठला समर्पित केला आहे, कारण मी त्याला सांगितले होते की जेव्हा केव्हा मला शक्य होईल तेव्हा मी या देवीचे फोटो जरुर काढीन...आज तो योग आला. :)
नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः ।
नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्म ताम् ।
या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः |
या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः |
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
कॅमेरा :--- निकॉन पी-१००
(देवीचा दास)
मदनबाण.....
प्रतिक्रिया
9 Oct 2010 - 5:02 pm | गणपा
धन्स रे बाणा.
देवीची मुर्ती खरच खुप सुरेख आहे.
नवरात्रीच्या समस्त मिपाकरांना शुभेच्छा !!!!
9 Oct 2010 - 5:07 pm | प्रदीप
फोटोज. धन्यवाद, मदनबाण.
9 Oct 2010 - 5:12 pm | परिकथेतील राजकुमार
जगदंब जगदंब __/\__
धन्स रे बाणा. देवी करो आणि ह्यावर्षी तुझा बार उडो ;)
9 Oct 2010 - 5:13 pm | विकास
एकदम सुरेख! धन्यवाद!
9 Oct 2010 - 5:52 pm | अवलिया
मस्तच रे बाणा !
साला भाग्यवान माणुस आहे आमचा बाण ! देवी प्रसन्न होईल रे तुझ्यावर !!
9 Oct 2010 - 6:53 pm | मदनबाण
गणपा सेठ,प्रदीप,परिकथेतील राजकुमार, विकास आणि अवलिया सर्वांना धन्स... :)
देवीची मूर्ती जर नीट पाहिलीत तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे देवीच्या हातात तीची आयुधे अजुन बसवली गेली नाहीत ? असे का ते मला कळले नाही... बहुधा एकाधा विधी केल्यावर देवीला शस्त्र सज्ज केले जात असावे.अजुन एक विशेष गोष्ट या देवीच्या मूर्तीची,तिच्या पोटावर नाभी स्थानी एक यंत्र बसवले गेले आहे,बहुधा ते श्री यंत्र असावे असे वाटते जे खालील प्रमाणे दिसते.
(फोटो जालावरुन घेण्यात आलेला आहे.)
ही देवी नवसाला पावणारी आहे अशी अनेक भाविकांची श्रद्धा असुन्,या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या ठिकाणाहुन लोक देवीचे दर्शन घेण्यास येतात...
9 Oct 2010 - 10:49 pm | पुष्करिणी
फारच सुंदर, अगदी प्रसन्न वाटलं.
धन्यवाद.
9 Oct 2010 - 11:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शेवटून वन आणि टू फोटो लै आवडले. :)
-दिलीप बिरुटे
10 Oct 2010 - 12:28 am | शिल्पा ब
देवीचे फोटो खुपच छान...चेहेर्यावर शांत भाव आहेत.
10 Oct 2010 - 4:29 am | चित्रा
ही कोणती देवी? दुर्गा दिसते आहे.
आयुधांचा प्रश्न मलाही पडला. हातात फुले मात्र दिली आहेत.
10 Oct 2010 - 7:29 am | मदनबाण
ही कोणती देवी? दुर्गा दिसते आहे.
काल एका मराठी वाहिनीमुळे मिळालेल्या माहिती नुसार...देवीची मूर्ती घडवण्याच्या आधी एक विशेष मुहुर्त धरला जातो,, तसेच देवी बनवण्यासाठी कुठल्याही साच्याचा वापर केला जात नसुन ती संपूर्ण हाताने बनवली जाते. तसेच देवीचे पुजारी देवीच्या काही विशिष्ठ नावांची निवड करुन मुहुर्तावर एक नाव निवडुन मूर्तीकाराच्या कानात सांगतात...व त्याच नावाचा जप करत करत ही मूर्ती घडवली जाते. स्व.शिवसेना नेता आनंद दिघे यांनी या देवीच्या उत्सवाची सुरुवात केली असे म्हंटले जाते (अंदाजे गेल्या ३६ वर्षा पासुन),व त्यांचे या कामी (देवी घडवण्या पासुन सर्व बाबतीत ) विशेष लक्ष असायचे.
11 Oct 2010 - 12:40 pm | ज्ञानराम
माहिती बद्दल ध्न्यवाद...मुर्ति अप्रतिम आहे,,,,,,
11 Oct 2010 - 12:41 pm | ज्ञानराम
माहिती बद्दल ध्न्यवाद...मुर्ति अप्रतिम आहे,,,,,,
11 Oct 2010 - 12:51 pm | ब्रिटिश टिंग्या
मस्त छायाचित्रे!
11 Oct 2010 - 1:59 pm | जागु
वा, एकदम प्रसन्न वाटल.