वजनदार ! - ३

मोहन's picture
मोहन in जनातलं, मनातलं
28 Sep 2010 - 2:06 pm

वजनदार -१
वजनदार -२

जीम मधला व्यायाम , दर दोन तासांचे छोटे छोटे मीलस् वगैरे उपायांचा उलटाच परिणाम झाला महिन्यात एक किलो वजन वाढले ..... आता पुढे..

" हट बे. व्यायामानी कोणाच वजन वाढत नाही. तू जीम मधे व्यायाम सोडून भलत्या गोष्टीत लक्ष घालत असणार." विकासनी अविश्वासाचा ठराव आणला. तो लगेच आवाजी मतदानाने संम्मत झाला.
" आणि, तुला ते पुस्तक वाचून स्वतः वर प्रयोग करायची काय गरज पडली ? "
" पुस्तक तुझ्याच मैत्रीणीने आणले, मी नाही" मी 'गिरा तो भी पीठ उप्पर' वाला आहे.
" मी सांगितलेले केले का? भात बंद, साखर कमी वगैरे वगैरे " इती विकास." माझ्या कडे बघ "
"तुला तसाच भात बित आवडत नाही. आणी तू माझ्या पेक्षा ५ वर्षानी लहान आहेस. तुझ्या वयात माझेही वजन काही इतके वाढलेले नव्हते." मी पण आता पेटलो होतो. " आणि काय रे तू काय आहार तज्ञ आहेस का? भात माझा वीक पॉईंट आहे. तो सोडणे मला जमणार नाही."
"विकास, बाहेर तुझे बरेच पेशंट खोळंबले आहेत. मी बघते आता काय ते." तिने प्रसंगाचे गांभीर्य ओळखून मला बाहेर काढले.
"आपण एखाद्या आहार तज्ञा कडेच का जावू नये?" रिक्षात बसता बसता तिने प्रस्ताव मांडला. " तुझ्या म्हणण्यात तथ्य आहे. पण जीम मात्र बंद करायला नको" म्हणजे काय की पुन्हा येरे माझ्या मागल्या.
" अग पण तुला माहित आहे. मी सकाळी उठायचा गजर लावला तर रात्रभरात तीन - चार वेळा उठून घड्याळ पाहातो. कदाचित झोप नीट न झाल्याने पण वजन वाढत असेल तर ! "
" व्हेरी स्मार्ट , बेटर लक नेक्स्ट टाइम "
दुसर्या दिवशी सकाळी पेपर वाचता वाचता माझे लक्ष एका स्लिमींग सेंटरच्या जाहिरातीतल्या तरूणीने वेधून घेतले . ती चित्ताकर्षक तरूणी अत्यंत सोप्या पध्दतीने वजन कमी होण्याची खात्री देत होती. त्यातच त्यांच्या नव्या शाखेत नोंदणी केल्यास २०% भरगोस सूट ही होती. मी लगेच फोन फिरवला. जाहिरातीतल्या तरूणीचाच असावा अशा अत्यंत लाघवी आवाजात माझी सर्व विचारपूस करुन मला संध्याकाळची वेळ खास माझ्याच करता राखून ठेवल्याचे सांगितले.
" काय रे आज तुझी दांडी यात्रा काय ?" मी आनंदात असलेलो तिला बघवतच नाही. " त्या जाहिरातीतल्या पोरी पाहून तू जाणार असलास तर ब्युटीशीयन = शहनाझ हुसेन हे समीकरण त्रिकालाबाधीत आहे हे लक्षात ठेव"
" अग शुभ शुभ बोल ग बये. मी ऑफीसातून परस्परच जावून येईन "
" आता ते ओघाने आलेच"
त्या लाघवी आवाजाने दुपारी स्मरण ध्वनी केल्याने , ऑफीसातून तासभर लवकर निघून मी ठरल्या वेळेच्या १० - १५ मि. आधीच पोहोचलो. चकाचक दरवाजा वरच्या गुरख्याने कडक सलाम करत दार उघडून धरले. सवयीने मी मागे वळून पाहत सलाम माझ्या करताच असल्याची खात्री करुनच आत शिरलो. गारेगार वातावरण्, सुंदर रंगसंगती असलेली अंर्तगत सजावट, मंद संगीत. एकूण फाईव्ह स्टार मामला दिसत होता. माझा एक प्रॉब्लेमच आहे. कळकट वातावरणात मी खूप अ‍ॅट ईझ असतो. पॉशपणा दिसला की मला घाम फुटायला लागतो. अत्यंत अवघडलेल्या स्थितीत मी सोफ्यावर भित भितच टेकलो. भसकन सहा - आठ ईंच आत घुसलो. आता हा आपल्या वाढल्या वजनाचाच परिणाम असावा असे वाटून मी सोफा नीट राहू दे अशी प्रार्थना करु लागलो. आता वहुदा गेट वरचा गुरखा " खाया पीया कुछ नही गीलास तोडा ५ रुपीया " छाप आरोळी ठोकतो की काय याची वाट पाहू लागलो.
तेव्हढ्यात टॉक टॉक आवाज करत स्वागतीका बाई आल्या. " मी. मोहन, अवर डॉक्टर्स आर बीझी अ‍ॅट द मूमेंट यू विल हॅव टू वेट. प्लीज बी कंफरटेबल" " तो पर्यंत हा फॉर्म भरून ठेवा"
आता ह्या फॉर्म मधला काही भाग इन्कम टॅक्स वाल्यांनी डिझाईन केला होता काय कोण जाणे. मी रिटर्न फाइल करतांना सुध्दा मिळ्कतीचे एवढे तपशील देत नाही.
एवढ्यात माझा नंबर आला. आहार तज्ञ बाई सुहास्य वदन होत्या. त्यांच्या मदतनिसानी माझी जुजबी वजन माप मोजणी करून बाईंच्या पुढे कागद ठेवले. " आम्ही तुम्हाला स्पेसिफीक डायट प्लान देवू नैसर्गीक वनस्पतींचे एक्सट्रॅक्ट्स देवू आणि भरभर चालण्याचा व्यायाम."
" म्हणजे जीम वगैरेची गरज नाही !" बाईंच बोलण माझ्या कानांना संगीत वाटत होत.
" अजिबात नाही"
"मग तुमचे चार्जेस किती पडतील ?" मी जवळ जवळ खिशात हात घालून पाकीट काढलेच होते.
"ते तूम्हाला आमच्या मॅनेजर सांगतील " आता माझी रवानगी मॅनेजर बाईंच्या कडे झाली.
" कसा वाटला आमचा प्लान " या बाई पट्टीच्या कसाई वाटत होत्या.
" मी अजून अनुभवलेला नाही तेंव्हा कसे सांगणार ?" मी पण चिवट बकरा होतो.
" डॉ. नी नीट समजावून सांगीतलाच असेल न ! "
" हो. पण चार्जेस तुम्ही सांगणार म्हणाल्या "
" तुम्हाला किती किलो कमी करायचे आहे ? आमचे चार्जेस त्या प्र्माणे आहेत." मला आपली किंमत किलोच्या भावात होते आहे हे ऐकून हसावे की रडावे कळत नव्हते.
" तुम्ही अस करा आमचा ९ आठवड्यांचा प्लान घ्या. ८-१० कि. पर्यंत वजन कमी होउ शकेल. "
" चार्जेस?"
" तुमच्या करता फक्त आजच्या दिवसा करता ऑफर आहे. १७,००० रु. फक्त. टॅक्सेस वेगळे."
" ते जाहितातीत २०% सूट लिहीले होते."
"ते धरूनच सांगीतले. तुम्ही आत्ता पेमेंट करत असाल तर दोन आठवडे एक्स्ट्रा देऊ. उद्द्या पासून २१००० रू. होतील "
" तुम्ही हे आठवडे देता म्हणजे काय करता ?" " भरभर मी चालीन , डायटींग मलाच करायचे , तुम्ही फार तर इसब गोलच्या बाटल्या देणार असाल. ह्या करता १७००० रू. ?!" मी इतरांना सहसा माझ्या खिशात हात घालू देत नाही
" दर आठवड्याला आमच्या आहार तज्ञ तुम्हाला मार्गदर्शन करतील त्याचेच हे चार्जेस."
मला सुहास्य वदन आठवल्या आणि १७,००० फारसे वाटेनासे झाले.
" मला एक फोन करावा लागेल . नंतर सांगतो." मॅनेजर बाईंच्या चेहेर्या वर गळाला लागलेला मासा सूटतो की काय ह्या काळजीचे भाव दिसले.
" ठीक आहे"
मी बाहेर आलो. " विकास , अरे मी इथे स्लिमींग सेंटरला आहे. हे तीन महिन्याचे १७,००० रू. सांगताहेत काय करू.?"
" आत्ता तू कुठे आहेस बाहेर की आत ?"
" बाहेर"
" छान.! आता समोर बघ. रिक्षा उभा असेल . लगेच पकड आणि घरी जा. २५रू. पडतील. " विकासला दिव्य दृष्टी वगैरे आहे की काय ?
मी २५ रू चा सल्ला तातडीने घेतला.
क्रमशः

कथाजीवनमानमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

मोहन's picture

28 Sep 2010 - 2:10 pm | मोहन

चुकुन शिर्षक वजनदार -३ करायचे राहीले.
संपादकांनी कृपया ते करावे
क्षमस्व

मोहन

प्रचेतस's picture

28 Sep 2010 - 2:20 pm | प्रचेतस

तळवरकर्स किंवा इतर जीम लाउन वजन कमी होते हा आमचा व्यक्तीगत अनुभव आहे. मी ५ महिन्यात १७ कि. वजन कमी केले होते. कार्डीओ व्यायामप्रकारांवरच आमचा जास्त भर होता. डाएटींग करून फायदा होतो असे मात्र आम्हास (स्वानुभवाने) वाटत नाही. नंतर खा-खा :) जास्त सुटते. तेव्हा कार्डीओवर भर हवाच.

अब् क's picture

28 Sep 2010 - 2:22 pm | अब् क

हा भाग खुपच मस्त!!!!

तुमचे लिखान खुप सहज सुंदर असते.
सोप्यात भसकन गेलो .. तसेच किति किलो कमी कराय्चे आहे वजन त्याप्रमाणे चार्जेस हे वाचताना हसु आवरत नव्हते.

लिहित रहा -- वाचत आहे

स्वैर परी's picture

28 Sep 2010 - 6:40 pm | स्वैर परी

खुपच मस्त लिहिले आहे आपण! जोर जोरात हसल्याने ऑफीस्मधील सगळि मन्ड्ली येउन मी हसता हसता पडले तर नाहि ना याची खात्री करावयास आले होते!

भारी लिहिताय :)
बाकी वल्लीशी बाडिस ! जिम लावून कमी झालेले वजन लवकर वाढत नाही.

अनिल हटेला's picture

28 Sep 2010 - 8:11 pm | अनिल हटेला

हा भागही उत्तम जमलाये !!

वाक्यागणीक हसू आवरत नाहीये... :-)

रेवती's picture

28 Sep 2010 - 8:11 pm | रेवती

अरे वा! १७००० रू. वाचले म्हणायचे!;)
मग पुढे?

संजयशिवाजीरावगडगे's picture

28 Sep 2010 - 8:49 pm | संजयशिवाजीरावगडगे

गळाला लागलेला मासा सूटला !

नेत्रेश's picture

29 Sep 2010 - 1:10 am | नेत्रेश

> छान.! आता समोर बघ. रिक्षा उभा असेल . लगेच पकड आणि घरी जा. २५रू. पडतील.

जबराट ...

स्पा's picture

29 Sep 2010 - 10:16 am | स्पा

आयला........
वजन घटवण्यासाठी........ किती काथ्याकुट........????

:(

माझं किती प्रयत्न करून...... १०० ग्रॅम ने सुद्धा वाढत नाहीये............

:(

:(

तुम्ही नियमित व्यायाम करता का ?

मोहन's picture

30 Sep 2010 - 7:10 am | मोहन

हो. व्यायाम सूरू आहे.

Pain's picture

1 Oct 2010 - 7:28 am | Pain

माफ करा, माझा प्रतिसाद स्पा यांना उद्देशून होता, आपल्याला नाही. त्यांची समस्या तुमच्या विरुद्ध आहे.
रक्तदानासारखे वजनही गरजूंना देता यायला हवे होते!

स्पा's picture

1 Oct 2010 - 9:13 am | स्पा

हो न किती बरं झालं असतं.....

माझ्या कडे तर line लागली असती.... वजन "दान" करणाऱ्यांची.......

चिगो's picture

29 Sep 2010 - 11:37 am | चिगो

ब्युटीशीयन = शहनाझ हुसेन हे समीकरण त्रिकालाबाधीत आहे हे लक्षात ठेव. ;-)
मानलं.. काय एकेक सिक्सर मारताय, राव.. मज्जा.

सूड's picture

29 Sep 2010 - 4:24 pm | सूड

हाही भाग छान जमलाय !!

गणेशा's picture

29 Sep 2010 - 5:43 pm | गणेशा

पुढचा भाग येवुद्या हो लवकर

प्रतिक्षेत

मोहन's picture

29 Sep 2010 - 9:49 pm | मोहन

सर्व प्रतिसाद कर्त्यांचे व वाचकांचे दिलेल्या प्रोत्साहना बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

बेसनलाडू's picture

29 Sep 2010 - 11:48 pm | बेसनलाडू

पुढे वाचण्यास उत्सुक!
(वाचनोत्सुक)बेसनलाडू