कवितेचा एक प्रयोग

रामदास's picture
रामदास in जे न देखे रवी...
14 May 2008 - 7:00 pm

सर्जनशीलता वाढावी म्हणून काही प्रयोग शिकण्यासाठी दोन दिवस गेलो होतो.
रँडम वर्ड- सहा शब्द -घेउन , त्यांचा ओळीच्या सुरुवातीस उपयोग करायचा आणि कविता लिहायची असा एक प्रयोग होता.
माझ्या वाट्याला आलेले शब्द असे होते.श्रावण,उन,रावण,वाळू,पापणी,चार,ज्यांचे.
तीन शब्द वापरून मी तीन ओळी लिहिल्या.
उरलेल्या शब्दांचा उपयोग राहून गेला.
कविंनो बघा काही जमतंय का.

श्रावण ,
सरण्यापूवी,
एकदा भिजून घेतो.
उन,
तापण्यापूर्वी,
मोगरा फुलून घेतो
पापण्या
झडण्यापूर्वी,
मनमुक्त रडून घेतो.

ही कविता पूर्ण न करता वेगळी लिहू शकाल का?

कविताप्रकटन

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

14 May 2008 - 7:05 pm | लिखाळ

लंकेस जाण्या आधी जरा 'उरकून' घेतो
आटप रावणा आता पिंडी मी वाळूत ठेवतो
--(गोकर्ण महाबळेश्वरचा) लिखाळ.

पिवळा डांबिस's picture

14 May 2008 - 7:48 pm | पिवळा डांबिस

लिखाळजी,
मूळ कवितेपेक्षाही तुमच्या दोन ओळी आवडल्या!!:))
जबरदस्त आणि आशयगर्भ!!!

:-)) ;-))

आपलाच,
मनोबा
(जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!'
)

प्राजु's picture

15 May 2008 - 5:13 pm | प्राजु

आहे बुवा तुमची विचार करण्याची क्षमता... :)) :))
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

गणपा's picture

14 May 2008 - 7:09 pm | गणपा

लंकेस जाण्या आधी जरा 'उरकून' घेतो
आटप रावणा आता पिंडी मी वाळूत ठेवतो

जबरा =)) =)) =))
फुटलोना मी.

चतुरंग's picture

14 May 2008 - 7:28 pm | चतुरंग

ऊन तापवी मातीला
श्रावण जगवी धरतीला
'रावण' तुमच्या मनातला
वाळूत गाडा तरि त्याला
चार दिसांच्या नात्याला
पापणी जपे ओलाव्याला

चतुरंग

प्राजु's picture

15 May 2008 - 5:14 pm | प्राजु

मी विचारच करत होते की, तुम्ही नक्की काहीतरी लिहिलं असेल...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

देवदत्त's picture

14 May 2008 - 7:32 pm | देवदत्त

छान प्रयोग आहे.
पण कवितेच्या प्रांतात अस्मादिकांची भटकंती कमीच आहे त्यामुळे इथे बहुधा काही नाही :(

शितल's picture

14 May 2008 - 7:44 pm | शितल

श्रावणात हा खेळ असे
ऊन आणि पाऊस दोन्ही पडे
चार दिसा॑ हा खेळ पाहुनी
पापणी ही फडफडे
वाळुची ही घरे बा॑धुनी
रावण त्यात झोपी असे

फक्त संदीप's picture

14 May 2008 - 8:12 pm | फक्त संदीप

मी संदीप,एक वाचक

श्रावण सरला,
ऊन तापले होते,
तापलेल्या वाळु मध्ये
रावण ऊभा
स्वप्न सीतेचे
पापण्यात होते.

एक डिझाईनर :SS :SS :SS

अरुण मनोहर's picture

15 May 2008 - 6:49 am | अरुण मनोहर

उन उन श्रावण घेवड्याची भाजी
चार मिरच्या जास्तच घातलेला रावणभात
खाऊन ज्यांचे डोळ्यात पाणी आलेले दिसत नाही,
त्यांनी पापणी मिटलेलीच असणार!

विसोबा खेचर's picture

15 May 2008 - 8:12 am | विसोबा खेचर

मस्त आहे प्रयोग! सगळ्यांच्या कविता आवडल्या...! :)

लिखाळराव आणि रंगाने छान लिहिले आहे...

रामदासराव, तुम्ही नका कवितांच्या फंदात पडू! तो तुमचा प्रान्त दिसत नाही!

(हा असाच आपला मोफत सल्ला बरं का! त्याचं विशेष काही मनावर घेऊ नका!) :)

आपला,
(किंचितकवी) तात्या.

ऋचा's picture

15 May 2008 - 10:10 am | ऋचा

श्रावण ऊन खात झोपला
अचानक पाऊस पडू लागला
पापणी पावसात भिजली
आणि वाळूची घरे वाहून गेली
रावणाच्या दहा मधली चार गेली
ज्यांचे मनाज रावण त्यांना मिळाली..

:? (अगदी बाळबोध..)

आंबोळी's picture

15 May 2008 - 12:20 pm | आंबोळी

श्रावण आला बरसत
सृष्टीने रुप ल्याले नवे |
उन पावसाचा खेळ चालतो
सामील धरती नवपालवी सवे ||

रावण बैसला खाली
अडकवून कानास जानवे |
वाळूत ठेवूनी लिंग
गणपती खोड त्याची जिरवे ||

पापणी मिटोन म्हणतात
विजुभाउ मलेशियास जावे |
चार घटका करमणूक करण्या
घर सखीचे धुंडावे ||

ज्यांचे बरे त्याच्या म्हणे आंबोळी
निंदकाचे घर शेजारी असावे ||

श्रावणात खुलुन येई
उन पावसाचा खेळ
पापणीत मिटलेल्या
चार घटिकांचा मेळ...

शिवलिंग स्पर्शाने वाळू
हळूवार पतित झाली
रावणाची मस्ती अशी
गणेशाने उतरविली

रामदासे दिले हे
काही शब्द वेगळे
ज्यांचे काव्य बनले
मिसळगृही आगळे...

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

ॐकार's picture

16 May 2008 - 1:55 am | ॐकार

श्रावण,उन,रावण,वाळू,पापणी,चार,ज्यांचे.

रावण जाळू नका
श्रावण पाळू नका
वाळू खाते ऊन तेथे घाम गाळू नका
चार खांद्यांची मागणी
जिथे मिटली पापणी
ज्यांचे त्यांचे देणे-घेणे असे टाळू नका

चतुरंग's picture

16 May 2008 - 2:25 am | चतुरंग

फारच सुंदर!

चतुरंग

मदनबाण's picture

16 May 2008 - 4:23 am | मदनबाण

अगदी हेच म्हणतो.....

मदनबाण.....

रामदास's picture

17 May 2008 - 9:20 am | रामदास

सर्जनशीलता वाढवण्यासाठी केलेल्या कार्यशाळेत सुद्धा अशीच मजा आली.
एकूण साठ प्रयोग होते.परंतू आम्ही केवळ पंधरा -विस पूर्ण करू शकलो.
कवितेचा प्रयोग कठीणच होता.आम्ही फक्त सहाच करू शकलो.
मिपावर मात्र ज्या वेगाने कविता आल्या त्या वाचून एक गोष्ट लक्षात आली ,की मिपावर सर्जन विपुल आहे.
वाचन करणार्‍यांचे, कविंचे , मनापासून आभार.

रघु सावंत's picture

8 Jul 2012 - 12:11 pm | रघु सावंत

फारच छान आहे कवीता सर
इथेही तुमची वाटचाल छान झालेली दिसते.
फुढेही लिहित रहा म्हणजे बरं वाटेल.
रघू

चार श्रावण
ऊन रावण
वाळू झरे
पापणी फिरे
ज्यांचे चार
त्यांचे फार.

.... दुर्बोधता हे नवकाव्याचे व्यवच्छेदक लक्षण होय, असे खुद्द गंगाधर गाडगिळानी सांगून ठेऊन आमच्यासारख्यांची चांगली सोय करून ठेवलेली आहे....