दबंगला शुभेच्छा

अविनाश पालकर's picture
अविनाश पालकर in जनातलं, मनातलं
15 Sep 2010 - 11:23 am

मतदान न करता राजकारन्याना नावे टेवने आणि पिच्चर न पाहता त्याची स्तुती करणे गैर.

मी दबंग पाहिला नाही.प्रोमोज पाहिले .प्रोमोज सुसह्य आहेत.थ्री इडियट्च्या उत्पन्नाचे उच्चांक मोडले.

आनंद झाला. खूप जणांनी दबंग ला शिव्या पण दिल्या. आमीरची स्तुती केली.दोन पिच्चरची तुलना केली.

एक जण दबंग ला म्हणतो 'लोक आजकाल कचरा पण विकत घेतात... '

काही जण म्हनतात आमीरच्या पिच्चरमधे समाजिक सन्देश असतो.दबंग मधे ते नाही .

बस्स , बस्स , बस्स !!!!!!!!!

फना , गजनी मधे समाजिक सन्देश होता का ?

थ्री इडियट्स आमीर खानचा होता का राजु हिराणी चा?

थ्री इडियट्स मधला आमीर खान खरेच ३५० कोटी कमावन्याएवडा अप्रतिम होता ?

तारे जमीन पर आमीर खानचा होता का अमोल गुप्ते चा?

रंग दे बसंती काय ५० कोटीच कमावन्याएवडा जेमतेम होता?

गझनी त असे काय होते जे दबंग मधे नसेल?

आमीर चा स्क्रीन प्रेजेन्स सलमान इतका रांगडा आणि कॅजुअल आहे का?

सलमान ला अ‍ॅक्टिंग येत नाहि का?

कीती स्टार हीरोंना अ‍ॅक्टिंग येते?

समाजिक सन्देश वाले सिनेमे आवड्तात तर मग वेन्सडे (नासीर असुन) , ब्लॅक फ्रायडे हाउस फुल्ल का होत नहित?

या प्रश्नांच्या उत्तरातच दबंग च्या उत्तूंग यशाचे कारण असावे.

दबंगला शुभेच्छा.

चित्रपटप्रकटनशुभेच्छामतसमीक्षाविरंगुळा

प्रतिक्रिया

चिगो's picture

15 Sep 2010 - 11:43 am | चिगो

मी आमीरचा पंखा आहे. पण उगाच सल्लूला कशाला शिव्या द्या ? कमाव रे बाबा भरपूर..

गणेशा's picture

15 Sep 2010 - 1:00 pm | गणेशा

कुठल्याही कलाकृतीची / कलाकाराची तुलना करणे मला अजीबात आवडत नाहि.
त्यामुळे नो कमेंट.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

15 Sep 2010 - 1:09 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>सलमान ला अ‍ॅक्टिंग येत नाहि का?
येते असे तुम्हाला म्हणायचे आहे का? निम्म्या प्रसंगात तर ४ दिवस डब्बा न टाकल्यासारखा चेहरा करून बोलतो. त्याने रडायचा प्रयत्न केला तर आपल्याला हसू येते. गंभीर प्रसंगात संवादफेक जमत नाही. विनोदी प्रसंगात ठीक असतो, पण २० वर्षे तिथे राहिल्यावर तितके आलेच पाहिजे (अर्नोल्ड पण शेवटी शेवटी करायचा अभिनय)

बाकी आमीर बद्दल बोलाल तर त्याने हात लावलेल्या प्रत्येक चित्रपटाचे तो सोने करतो. चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे हे मान्य, पण अनेक दिग्दर्शक आमीर बरोबर जास्त खुलले. गुलाम नंतर विक्रम भटचा कुठला चित्रपट तितका चांगला होता? सरफरोश नंतर JMM चे काय झाले? रंग दे बसंती इतका दिल्ली ६ का चांगला नव्हता?

सलमान चे यश यात आहे कि त्याला आपल्या मर्यादा माहित आहेत. तो उगाच फार अभिनय करावा लागेल असे चित्रपट करत नाही. तेच बरे. उगाच त्याला अभिनेत्याचा बिल्ला आपण लावण्यात अर्थ नाही.

परिकथेतील राजकुमार's picture

15 Sep 2010 - 1:12 pm | परिकथेतील राजकुमार

वर उल्लेख झालेल्यांपैकी एकही शिणेमा आपण पाहिलेला नाही. त्यामुळे नो कॉमेंटस.

मात्र.

All My Sons and Jesus of Montreal (रंग दे बसंती)

Memento (गझनी)

Asphalt Zahov (तारे जमीन पर)

फाईव्ह पॉईंट समवन हे पुस्तक (थ्री इडियटस)

Eye Of The Needle हे पुस्तक (फना)

हे सगळे वाचले अथवा बघितले आहे ;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

16 Sep 2010 - 1:02 am | विश्वनाथ मेहेंदळे

गझनी हा मेमेंटो चा रीमेक नाही. ज्याचे तसे मत असेल त्याने परत एकदा दोन्ही चित्रपट पहावेत.

Asphalt Zahov नाही पाहिला, पण हे पाहिले (http://en.wikipedia.org/wiki/Yellow_Asphalt) आणि त्यात आणि तारे जमीन पर मध्ये काय साधर्म्य आहे ते एक देव जाणे आणि दुसरे तुम्ही. मी चुकीचा दुवा पाहिला असेल तर योग्य द्यावा हि विनंती.

Jesus of Montreal चे विकिपीडिया पान पाहिले. त्यातिल आणि रंग दे बसंती मधील साम्य हे मेमेंटो आणि गझनी इतकेच वाटले. चित्रपट पाहिला नसल्याने फार अधिकारवाणीने बोलू शकत नाही (ते धारिष्ट्य इतरांनी करावे, आम्हाला नाही जमत).

फेकाफेक किती करावी याला मर्यादा असतात..

पण परीकथेत सगळं माफ.....

:)

:)

परिकथेतील राजकुमार's picture

15 Sep 2010 - 2:08 pm | परिकथेतील राजकुमार

अरे, तुम्ही आहात होय अजुन ?

चान चान.. मला वाटले... हॅ हॅ हॅ.

असो.. तुमच्या अतिशय फालतु आणि शाहानिशा न करता दिलेल्या प्रतिसादावर त्याहुनही फालतु कॉमेंट मारायचा विचार होता माझा, पण उगा ते वाचुन गळ्यात दोरी अडकवुन घ्याल आणि माझ्या डोक्याला त्रास द्याल.

मराठमोळा's picture

15 Sep 2010 - 2:09 pm | मराठमोळा

दबंग म्हणजे काय?

ईंग्लीश सिनेमे नाही का?? ट्रेन, कोनान बार्बेरियन असत...
तस हे खरतर द बँग अस होत.. पण भोजपुरीत जाउन त्याच द बैंग झाल, व नंतर हळुहळु दबंग झाल.

(अवांतर : लै दिवसांनी आलो .. )

अरे, तुम्ही आहात होय अजुन ?

चान चान.. मला वाटले... हॅ हॅ हॅ.

हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ

अमोल केळकर's picture

15 Sep 2010 - 3:01 pm | अमोल केळकर

दबंग म्हणजे काय ?

परिकथेतील राजकुमार's picture

15 Sep 2010 - 3:11 pm | परिकथेतील राजकुमार

दबंग म्हणजे शुर / धाडसी / कुठल्याही संकटाला न घाबरणारा.

दिपक's picture

15 Sep 2010 - 3:12 pm | दिपक

मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए... हे गाणे ताराबानो फैजाबदी च्या एका भारी गाण्याची नक्कल आहे. ;-)

परिकथेतील राजकुमार's picture

15 Sep 2010 - 3:26 pm | परिकथेतील राजकुमार

हा हा हा हे गाणे ऐकलय का ?

लेखातलं शुद्धलेखन शोधण्यातच लक्ष होतं, त्यामुळे त्यातला गर्भितार्थ मला पामराला कळला नाही.

मी-सौरभ's picture

15 Sep 2010 - 11:21 pm | मी-सौरभ

>>पिच्चर न पाहता त्याची स्तुती करणे गैर.

असं लिहून वर स्तुती करायची हे चूक नाही का? :)
प्रोमोज वरून मला पण तो चित्रपट चान चान वाटला होता पण......जाउ द्या तुमी बगा मग कळेल...

आणि हो ह्या वादात आमिर खान ला आणायची काहीही गरज नाही

अनामिक's picture

15 Sep 2010 - 11:47 pm | अनामिक

आमच्या घरा शेजारी बंग अडनावाचं कुटूंब राहतं. बंग काकांचा मटक्याचा धंदा आहे (म्हणे)... म्हणून या विशेष बंग काकांना आम्ही "द"बंग म्हणून संबोधतो. पिच्चरचं नाव ऐकून ह्या काकांवरच पिच्चर काढला की काय असे वाटले! काकांना आणि पिच्चर ला शुभेच्छा!

अमोल केळकर's picture

16 Sep 2010 - 11:26 am | अमोल केळकर

:)

संजयशिवाजीरावगडगे's picture

16 Sep 2010 - 9:41 am | संजयशिवाजीरावगडगे

अहो ! त्या पाकड्यांनी हिंदुस्तानी चित्रपट प्रदर्शित करण्यास बंदी घातली होती. ! पण सलमान खानने २६/११च्या हल्ल्यासंबंधी केलेल्या वक्तव्यामुळे पाकला हायसे वाटले !
या पार्श्वभूमीवर दबंग पाकिस्तानात प्रदर्शित झाला.
स्टंट !! दुसरे काय??

सुधीर काळे's picture

16 Sep 2010 - 7:26 pm | सुधीर काळे

इतर प्रतिसादांपेक्षा हा जरासा वेगळा प्रतिसाद आहे. बर्‍याच लोकांना पटेल अशी आशा आहे. प्रत्येकाने या बाबतीत 'खारीचा वाटा' उचलावा ही विनंती!
सलमान खान निषिद्ध हरिणांची शिकार केल्याबद्दल राजस्थानात गुन्हेगार ठरविला गेला होता व त्यासाठी त्याला तुरुंगातही टाकला होता. वाजत-गाजत कत्रीना कैफ त्याला तुरुंगात भेटूनही आली व आपल्या निर्लज्ज मीडियाने जणू एकादी State visit cover करावी तशी कत्रीना भेट cover केली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. यांना असा जामीन मिळतोच कसा व तोही कित्येक वर्षे? धन्य आहे.
शिवाय फूटपाथवर झोपलेल्या चौघांना दारूच्या धुंदीत गाडी चालवून ठार मारल्याचा आरोपही आहेच.
मधे-मधे 'भाई'बरोबर झालेल्या त्याच्या संभाषणाची ध्वनीफीत पोलिसांकडे आहे असेही छापून आले होते. त्याचे पुढे काय झाले कळले नाहीं.
अशा माणसाचे सिनेमे मी स्वतः तर पहात नाहींच व कुणीही पाहू नयेत अशा मताचा मी आहे. "लोक सारे कांहीं विसरून जातात" हीच मस्ती या लोकांना सगळ्यात जास्त असते. म्हणून त्याच्या चित्रपटांना कुणीही देशभक्ताने जाऊ नये. हीच शिक्षा सगळ्यात कडक ठरेल.