गूढ कथा: कालग्रहांचे भविष्यआरसे (भाग ४)

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
14 Sep 2010 - 6:15 pm

सातमन (सातनाम) साधूने डोळे उघडण्या आधी जे पाहीले ते आश्चर्यकारक होते.

तो मनाद्वारे ज्या सूर्यमंडलात पोहोचला होता तो आजच्या काळाच्या बराच पुढचा काळ होता. पण तो आजच घडत होता.

काळ बदललेल्या ग्रहांचे ते भविष्य दर्शवणारे आरसे होते.

कालग्रहांचे भविष्य आरसे.

हे सर्व होते दूरवर कोठेतरी या अमर्यादीत आकाशात. जेथे कुणालाच व्यक्तीशः पोहोचणे केवळ अशक्य होते. त्याच्या शिष्याला - वाचनाम याला त्याने सर्व वर्णन करुन सांगितले होते. आणि डोळे बंद असतांना सगळे काळ बघता बघता चिन्हांच्या स्वरूपात लिहून ठेवले होते.

मग त्याला २०२२ सालच्या सौर रचनेत कोणते बदल दिसले?

तो सूर्यमंडलात शिरला. नेहेमी प्रमाणे त्याला ग्रह दिसू लागले.
सुर्याभोवती फिरणारे ग्रह.
कोणते ग्रह होते ते?
कशी रचना होती?

पहिला ग्रह दिसला शनी. नेहेमीचाच. भोवताली कडे असलेला. निळाशार. गर्द गूढ वातावरण असलेला. अगदी तसाच जो सध्या सुरु असलेल्या कालचक्रा मध्ये आहे.
थोडे पुढे गेल्यावर त्याला दिसले की पुन्हा आणखी एक शनी ग्रह तेथे आहे. पुन्हा आणखी एक.
एकून चार शनी ग्रह.

पुढे गेल्यावर होता मंगळ. त्याच्या वातवरणात लालजर्द ज्वाळा. तांबूस भडक वातावरण.
पुन्हा एक मंगळ.
पुन्हा एक मंगळ.

एकूण तीन शनी आणि सहा मंगळ अशा ग्रहांनी बनलेले ते सौरमंडल होते ते.
पृथ्वीचा उपग्रह चंद्रही होता. गुरु, बुध, शुक्र वगैरे नव्हते.

असे सौरमंडल ज्यात पृथ्वी वर प्रभाव होता फक्त चंद्र, शनी आणि मंगळ या ग्रहांचा.

२०२२ नंतर त्याने डोळे न उघडता पुढे जाऊन बघीतले असते तर आणखी काही काळानंतर, विधात्याची या रचनेबद्दलचा जगासोबतचा काही वर्षे खेळ खेळून झाल्यावर आणखी कोणती रचना असणार होती?

नऊ ग्रहांच्या मिळून विधात्याला आलटून पालटून अनेक रचना करता येतील. मग त्याला सगळे प्रयोग करून बघायचेत का?

नऊच का बरे?

आपल्याला ज्ञात असलेल्या ग्रहांपेक्षाही वेगळे गुणधर्म असलेले ग्रह नऊ मध्ये मिळवून तो नवी रचना बनवू शकतो.

साधूने जो काळ बघितला तो होता हाच. २०२२. जेव्हा पृथ्वीवरच्या प्राणिमात्रांवर फक्त प्रभाव होता मंगळ आणि शनी या ग्रहांचा.

म्हणजे माणसांमधली कला संपली होती.

माणसांमधली सहनशीलता संपली होती.

स्त्री-पुरुषांना एकमेकांविषयी वाटणारे आकर्षण संपले होते.

उरले होते फक्त मंगळाचे धडाडी चे लढाऊ गुण आनी शनी चे वैराग्य, शंतपणा, प्रत्येक गोष्टीला वेळ लावण्याची वृत्ती....
आणि???

ज्याच्यावर ज्या ग्रहाचा प्रभाव जास्त तो त्याप्रमाणे वागणार.

आणि अशी रचना झाल्यानंतर जन्मलेले सगळे नवे बालक? त्यांच्या तर बालपणापासूनच शनी किंवा मंगळ याचेच फक्त गुणधर्म असणार.

त्यांची शरीर रचना सुद्धा बदलेल का?

***

२०२२....
अवकाश संशोधनाचा अहवाल ही यालाच पुष्टी देत होता. सॅटेलाईट द्वारे चित्र मिळाले होते. डॅनियलने हे राहुलला सांगितले.
शास्त्रज्ञ आश्चर्यचकीत होत होते.

राहुलच्या लॅपटॉपवर ते चित्र मोठे होत होते. त्यात साधू च्या शिष्याने मंदिरांच्या भींतीवर कोरलेल्या त्या दोन, एकमेकांच्या आरशातल्या प्रतिकृती वाटणार्‍या त्या घड्याळात काय होते?

प्रत्येक आकड्याच्या ठीकाणी एकेक ग्रह. १२ च्या जागी आपली पृथ्वी.

११ च्या जागी चंद्र.

१ च्या जागी सूर्य आणि इतर ठीकाणि फक्त शनी आणि मंगळ.

पण मग आतापर्यंत राहुल आणि डॅनियलवर तसा प्रभाव का पडला नाही.
ते कोण होते?
कोठून आले होते?

टी.व्ही वर प्रसिद्ध संगीतकार के. के. अरमान यांची मुलाखत सुरु होती. त्यांना आलेले अनुभव अविश्वसनिय होते....

(क्रमशः)
-निमिष सोनार, पुणे

कथाविचार

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

14 Sep 2010 - 6:45 pm | धमाल मुलगा

आयला....
श्टुरी जरा गंडली गुर्जी, पण हरकत नाही, एखाद्या भागात चालुन जाईल.
फुडं काय हुणार है?

-(सुभानमंगळचा) शनि धमाल.

गुढ कथा आहे म्हंटल्यावर आजुन गुढ कळले नाही हे मान्य.
पण जरा लिहा ना पटपट .

ग्रहांचे आरसे. भविश्यातील घटना पहाण्यासाठी तशीच श्रूष्टी अस्तित्वात असते .. हे दोन्ही विचार एकदम झकास आहेत ..

अनिल हटेला's picture

14 Sep 2010 - 8:07 pm | अनिल हटेला

हम्म !!

वाचतोये !!

पू भा प्र................ :-)

प्राजु's picture

14 Sep 2010 - 8:17 pm | प्राजु

वाचतेय!!

शुचि's picture

14 Sep 2010 - 8:56 pm | शुचि

वा वा मंगळ माझा आवडता ग्रह! अर्थात ज्याची त्याची जागा निश्चित आहे सौरमंडलात. ३ -३ मंगळ नको ग बाई. :(

वारा's picture

15 Sep 2010 - 3:29 pm | वारा

बोले तो झकास...

एकूण तीन शनी आणि सहा मंगळ अशा ग्रहांनी बनलेले ते सौरमंडल होते ते.
नऊ ग्रहांच्या मिळून विधात्याला आलटून पालटून अनेक रचना करता येतील. मग त्याला सगळे प्रयोग करून बघायचेत का?
नऊच का बरे?
आपल्याला ज्ञात असलेल्या ग्रहांपेक्षाही वेगळे गुणधर्म असलेले ग्रह नऊ मध्ये मिळवून तो नवी रचना बनवू शकतो.
पृथ्वीचा उपग्रह चंद्रही होता. गुरु, बुध, शुक्र वगैरे नव्हते.
असे सौरमंडल ज्यात पृथ्वी वर प्रभाव होता फक्त चंद्र, शनी आणि मंगळ या ग्रहांचा.

तुमचे गणित कच्चे आहे की राव..!!
नऊ ग्रह म्हणता पण तीन शनी, सहा मंगळ आणि पृथ्वी.. एकूण दहा ग्रह झाले..

थोडे पुढे गेल्यावर त्याला दिसले की पुन्हा आणखी एक शनी ग्रह तेथे आहे. पुन्हा आणखी एक.
एकून चार शनी ग्रह.
म्हणजे चार शनी..!!
मोजण्यात पुन्हा चूक!
अगोदर म्हणालात एकून चार शनी ग्रह नंतर म्हणालात एकूण तीन शनी
काय ते नीट सांगा की भाऊ...

निमिष सोनार's picture

17 Sep 2010 - 3:54 pm | निमिष सोनार

पृथ्वी च्या अनुषंगाने कुंडलीत ग्रह मांडतांनाचा संदर्भ येथे घेतला आहे.
म्हणून पृथ्वी मोजली नाही.
आणि कुंडलीत चंद्राचा प्रभाव इतर ग्रहांपुढे नगण्य मानला आहे. म्हणून चंद्र मोजला नाही.
म्हणजे, चंद्र ज्या ग्रहाबरोबर असेल त्या ग्रहाप्रमाणे त्या व्यक्तीचे मन असते असे ज्योतिषशास्त्राप्रमाणे आहे.
म्हणून पृथ्वीवरच्या प्राणिमात्रांवर मंगळ आणि शनी याच प्रमुख ग्रहांचा प्रभाव राहील असे मी मानले.
आणि...
पुन्हा एक शनी, पुन्हा एक शनी असे .. कथेत परिणाम साधण्यासाठी लिहिले आहे....मोजून लिहिले नाही.
बिनचूक मोजून तितके वेळा लिहिले नाही....

चुकभूल द्यावी घ्यावी.

आणि ....
मला या गोष्टीचा आनंद वाटतो की आपण सर्व कथा इतक्या बारकाईने आणि आवडीने वाचत आहात.
धन्यवाद.
यापुढे अधिक बिनचुक लिहिण्याचा प्रयत्न करीन....

कथेत अजून बरीच अनपेक्षीत आणि चकीत करणारी वळणं यायची आहेत.
थोडी वाट पहा..
वेळ मिळाला की पुढचे भाग लिहिणार आहेच.
आपल्या अपेक्षेप्रमाणे मोठे भाग लिहिण्याचा प्रयत्न करेन.
आणि ...
कथा आवडीने वाचून त्यावरच्या प्रतिक्रीया देत आहात, चुका लक्षात आणुन देत आहात त्याबद्दल धन्यवाद.

निमिष सोनार's picture

24 Sep 2010 - 8:20 am | निमिष सोनार