आपणाला दुसर्‍याचा व्यवसाय आवडतो का?

आप्पा's picture
आप्पा in जनातलं, मनातलं
5 Sep 2010 - 10:16 am

नमस्कार मंडळी,
सध्या मिपावर खुप गहन चर्चा चालु आहेत. त्यात थोडी करमणुक म्हणा किंवा बदल म्हणा. एक वेगळा विषय.
बर्‍याच दिवसांनी पुलंचे हसवणूक हे पुस्तक परत एकदा वाचण्यात आले. पहिलीच कथा वाचली व हा विषय सुचला. कथेचे नाव आहे आमचा धंदा एक विलापिका. लेखकांनी काही व्यावसायीकांच्या मुलाखती घेतल्या व ते जो व्यवसाय करतात त्याबाबत त्यांच्याशी झालेल्या चर्चेतुन त्यांनी निष्कर्ष काढला, जो ज्या धंद्यात आहे, तिथे तो काही सुखात नाही, आणी सगळ्यांना शेजार्‍याच्या बायकोसारखा दुसर्‍याचा धंदा अधिक चांगला वाटतो. अर्थात हा पुलंचा लेख आहे. थोडे चिमटे काढत, थोडा विचार करायला लावणारा.
आपणही विचार मांडा. आपण जो काही व्यवसाय करतात त्यात खुष आहात का आपणाला दुसर्‍याचा व्यवसाय आवडतो.

वाङ्मयमतअनुभवआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

5 Sep 2010 - 10:28 am | प्रचेतस

आम्ही व्यवसाय करत नाही, पुर्वी शाळेत असताना मात्र व्यवसाय सोडवायचो-नवनीतचा. आता मात्र नोकरी करतो आणि फार कमावत नसलो तरी सुखात आहोत. अर्थात अधिक पगाराची दुसर्‍याची नोकरी मात्र आवडते.

गांधीवादी's picture

5 Sep 2010 - 10:35 am | गांधीवादी

शेम टु शेम.

सूर्यपुत्र's picture

5 Sep 2010 - 10:56 am | सूर्यपुत्र

नोकरीही करत नाही आणि व्यवसायही करत नाही....

शिल्पा ब's picture

5 Sep 2010 - 10:58 am | शिल्पा ब

म्हणजे नाव अगदी सार्थ आहे म्हणायचं!!

अप्पा जोगळेकर's picture

5 Sep 2010 - 11:18 am | अप्पा जोगळेकर

नोकरीही करत नाही आणि व्यवसायही करत नाही....
हे आमचे आयुष्यातले अंतिम ध्येय होय.
-ध्येयवादी

सूर्यपुत्र's picture

5 Sep 2010 - 11:34 am | सूर्यपुत्र

बरोबर.

(अंतिम ध्येय गाठलेला),
(आणि त्यामुळेच नव्याने झालेला) ध्येयहीन.

आम्ही अलीकडेच पिंका टाकायला सुरुवात केली आहे.
@@ - आमचे राज्य - वयाची शंभरी..

सूर्यपुत्र's picture

5 Sep 2010 - 11:06 am | सूर्यपुत्र

हा उद्योग नाव सार्थ करण्यासाठीच.

तिमा's picture

5 Sep 2010 - 11:13 am | तिमा

आम्हाला 'लेडिज टेलर' चा व्यवसाय खूपच आवडतो.

सूर्यपुत्र's picture

5 Sep 2010 - 11:17 am | सूर्यपुत्र

स्वतः करण्यासाठी की दुसर्‍याने करण्यासाठी??

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Sep 2010 - 11:40 am | llपुण्याचे पेशवेll

आम्हाला जुन्या मालकांचे व्यवसाय खूप आवडतात. :)

आम्हाला 'राजकारण' हा व्यवसाय आवड्तो पन करता कुठे येतो :)