बोंबील आख्यान !!!

संदीप चित्रे's picture
संदीप चित्रे in जनातलं, मनातलं
6 May 2008 - 1:32 am

पुणेरी विनंती:
"मासे तुमचं अन्न असेल" किंवा "मासे खाण्याविषयी वाचायला हरकत नसेल" तरच कृपया हे वाचावे.
-- आज्ञेवरून !!!
---------------------------------------------------------------------
झर्र…झर्र…झर्र…झर्र…

ऑफीसमधे काम करताना खिशातला मोबाईल फोन थरथर करून थांबला. मनात म्हणलं समस (SMS) दिसतोय. फोन पाहिला तर दीपाचा समस होता "I got bombeel !" कामाच्या गडबडीत त्या वाक्याचा अर्थ समजायला १-२ मिनिटे लागली. मग एकदम हजार tube lights पेटल्यासारखा डोक्यात प्रकाश पडला. सगळ्या लिंक्स लागल्या. ठरल्याप्रमाणे साधारण ह्या वेळी आज दीपा चायनीज स्टोअरमधे मासे आणायला जाणार होती नाही का ! आता समस आलाय की अचानक आज तिला ओले बोंबील मिळालेत !!! I wish आत्ता मी न्यू यॉर्कमधे नसतो ! I wish ५ मिनिटांत घरी पोचता आलं असतं !! I hope संध्याकाळ लवकर होईल !!! पाहिलंत, नुसतं "बोंबील" म्हणल्यावर मनात किती विचार डोकावले !

संध्याकाळी घरी पोचलो तर दीपा म्हणाली तुझ्या चेहऱ्यावर "बोंबील" असं लिहिलेलं दिसतंय ! छ्या, बायकोचं आपलं कायच्या काहीच म्हणणं असतं! असं चेहऱ्यावर 'बोंबील' लिहिलेलं असतं का कधी? आणि जर लिहिलेलं वगैरे असलंच तर, "कधी जेवायचं" असं असेल की नाही?

अचानक बोंबील मिळाले पण प्रयोग म्हणून दीपाने फक्त थोडेच घेतले होते. (चांगले निघाले नसते तर पैसे शब्दश: पाण्यात गेले असते !) आता एक प्रॉब्लेम असा होता की चायनीज दुकानातून आल्यामुळे बोंबील आख्खे होते. ते साफ कसे करायचे? (आपल्या वाट्याला फक्त सुख यावं म्हणून अनावश्यक भाग आणि काटे आई परस्पर काढून टाकते ना त्यातलीच ही एक गोष्ट…छोटी पण महत्वाची !) मग काय, आम्ही दोघंही घड्याळावर नजर ठेवून होतो. भारतात सकाळचे सहा वाजले ना वाजले तेवढ्यात लगेच आईला फोन केला. बोंबील मिळालेत ह्याचा आनंद आमच्यापेक्षा तिलाच जास्त झाला ! आईकडून नीट समजावून घेतले आणि लगेच मासे साफ करायला सरसावलो !! आईचं एक आवडतं वाक्य आहे, "डोळे भितात..हात करतात!" बघता बघता बोंबील साफ करून झालेही !

मला तरी असं वाटतं की बोंबील हा एक मासा असा आहे जो वाटीपेक्षा ताटात यावा ! मंद आचेवर तळलेले बोंबील समोर आले की भले भले जीभ सैल सोडतात !! पुराव्यानिशी शाबीत करीन ! पुलंचे हरितात्या म्हणायचे तसं ! दीपा बोंबील तळताना गालात हसत होती असं मला अजूनही वाटतंय ! किचनच्या कट्ट्यावर बसलेला आदित्यही confused होता की बाबा आज इतका खूश का दिसतोय?

(बहुतेक माझ्या येरझाऱ्या पाहून) दीपा म्हणाली जरा चाखून तर बघ ना ! "कशाला उगीच !", "जेवतानाच घेतो गं", "आता तू म्हणतेयस तर.." वगैरे वाक्य निरर्थकपणे म्हणल्यासारखं केलं आणि हळूच एक तुकडी उचलली !! अहाहा…जीभेवर ठेवली आणि अलगद विरघळली !!! जेवायला बसल्यावर मात्र बोलत बसायला, गप्पा करायला वगैरे वेळ नव्हता हां !

गरम गरम चपाती, त्यावर पातळ धारेचं तूप आणि ताजे फडफडीत ओले बोंबील !! किंवा मग गरम आणि छान मऊ-मऊ असा पांढरा भात आणि चवदार बोंबिलांचं कालवण ! पण जेवणानंतर -- 'जाणिजे यज्ञकर्म' पूर्ण करण्यासाठी, नारळाचं दूध आणि आमसुलांचा रंग अशा रंगसंगतीने गुलाबी झालेली, आंबट-गोड सोलकढी ! बस्स…आपली मागणी एवढीच ! स्वर्ग ताटात येतो, दुसरं काय ! देव तरी कुठल्या रूपात भेटेल कधी सांगता येतं का? पुलं म्हणाले तसं "परमेश्वराचा प्रथमावतार आपल्या ताटात येतो !" (पुलंचे असंख्य उपकार मानायचे की त्यांनी काळ-वेळ किंवा इतर संदर्भांच्या पलीकडली वाक्यं लिहून ठेवली आहेत! ते बागा फुलवून गेले; आपण पाहिजे तेव्हढी फुलं वेचायची !) तुम्हाला सांगतो, खूप कमी प्रकारचे पदार्थ असे आहेत की जे पोटात उतरताना शरीरातील सगळे senses जागे करत जातात ! त्या यादीत बोंबील खूपच वर !

तसं पाहिलं तर ’मासे खाणं’ हा प्रकार आयुष्यभर काहीनकाही शिकवत असतो ! बोंबील तर अगदी लहानपणापासून साथ देतो. नमुन्यादाखल बघा हं…
१) रंग: आपण रंगबिंग शिकायला लागतो तेव्हा हिरवी पानं, निळं आकाश वगैरे छान वाटतं पण golden brown रंगासाठी योग्य reference म्हणजे तळलेला बोंबील !
२) वचन: एकवचन, अनेकवचन वगैरे शिकलो की नाही? ते गाणं आठवतंय? "चंदा एक, सूरज एक, तारे अनेक !" तसं मासा आणि त्यातले काटे लक्षात ठेवायचे. "बोंबील एक, पापलेट एक, करली - अनेक !" शिवाय मासे असल्याने, लक्षात ठेवायले सोपे !
३) लिंग: तो बोंबील, तो रावस, ती कोलंबी, ती सुरमई !
४) सामान्य-विज्ञान: पदार्थ ताजा नसेल तर तो गरम केला की लगेच कोरडा होतो. ओले बोंबील ताजे नसतील तर तळल्यावर लगेच कोरडे पडतात !
५) आकार आणि दर्जा: मोठा आकार म्हणजेच उत्तम दर्जा हे प्रत्येक वेळी खरं असेलच असं नाही. Sometimes best things come in small packages. छोट्या तिसऱ्या (शिंपले) जास्त रूचकर असतात !
६) Economics: Optimum utilization of available resources! म्हणजे बघा हं ….
- एक दिवस पुरेल इतक्या खापरी पापलेटच्या किंमतीत दोन दिवस पुरतील इतके बोंबील मिळतात ! (अमेरिकेत हे समीकरण बरोबर उलटे आहे !)
- कोलंबी, बोंबील ताजे तर छान लागतातच पण ते सुकवून अनुक्रमे सोडे, काड्या ह्या नावाने येतात तेव्हाही टेस्टीच असतात! पावसाळ्याच्या दिवसांत जेव्हा मासे पकडले जात नाहीत तेव्हा मग सोड्याची चटणी / खिचडी / कालवण किंवा सुट्टीच्या दिवशी breakfast म्हणजे मस्तपैकी सोडे घालून गरमागरम पोहे !!!
७) संयम आणि एकाग्रता: खेकडे (चिंबोर्‍या) खाल्लेत ना? संयम आणि एकाग्रता म्हणजे असं काय वेगळं असते हो?
८) प्रगती: टप्या-टप्याने झालेली प्रगती वेगळंच समाधान देते.
-- लहान मूल कोळंबी आवडीनं खातं कारण कोलंबीत काटेच नसतात. त्यामुळे play school मधे खेळल्यासारखं वाटतं.
-- बोंबलात काटे असतात पण ते कसे 'जीभेची चाचपणी' करायला असल्यासारखे. मधे एक मोठा काटा असतो आणि बाकी मग बारीक काटे. चुकून मोठा काटा पोटात गेलाच तरी तो जीभ, घसा इथे फक्त जाणवत जातो. घशात अडकून जीव घाबरा करत नाही ! ही झाली Primary शाळा !
-- त्यानंतर पापलेट, हलवा, सुरमई वगैरे काटेवाले मासे म्हणजे High school म्हणाना !
-- एकदा आपण बारीक, बोचरे आणि असंख्य असे काटे व्यवस्थित काढत करली खायला शिकलो आणि फारसं काही वाया न जाऊ देता खेकडे खायला शिकलो की Graduation झालं समजायचं !
-- ह्या पुढची पायरी Post Graduation किंवा परदेशात येऊन M.S. करणं म्हणजे Salmon, Tilapia, raw Oyster वगैरे प्रकार आवडीनं खायचे !!!

तर मंडळी, असं हे आपलं 'बोंबील आख्यान'. पुन्हा कधी असेच अचानक बोंबील मिळाले तर भरपूर घेऊन ठेऊ. "पुढच्या वेळी आमच्याकडे नक्की जेवायला यायचं हं !"
वाक्य पुणेरी आहे पण आग्रह नागपुरी आहे !!!
--------------------------------------------

विनोदलेख

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

6 May 2008 - 1:37 am | बिपिन कार्यकर्ते

छान आहे लेख. आवडला (मासे खात नाही तरीही...).

शितल's picture

6 May 2008 - 2:11 am | शितल

देवाच्या प्रथम अवतारावर छान लेखन आहे,
मी शाकाहारी आहे, मी दोन वेळा पॉपलेट आणि बा॑गडा फ्राय केला आहे पण बो॑बील मला बघुन माहित आहे.

भाग्यश्री's picture

6 May 2008 - 2:16 am | भाग्यश्री

मस्तच लिहीलय संदीप.. मासे खूप आवडतात , पण इतके प्रकार कधी ट्राय नव्हते केले.. बोंबील तर आत्तच खावंस वाटतय... :)

मानस's picture

6 May 2008 - 2:25 am | मानस

बोंबला आता .....

कुठून आणायचे बोंबील, तरी मागच्या महिन्यात भारत्-भेटीत तब्बल ४ वर्षांनंतर बोंबील खायला मिळाले.

लेख उत्तम.....

येतोच तुमच्याकडे बोंबील खायला

संदीप चित्रे's picture

6 May 2008 - 2:32 am | संदीप चित्रे

बिपिन, शितल, भाग्यश्री, मानस :
धन्स :)
---
भाग्यश्री..
बोंबील सहज मिळत असतील तर लगेच खा ... वेळ घालवू नको :)
------
मानसः
कधीही या ... स्वागतच आहे !

गणपा's picture

6 May 2008 - 3:06 am | गणपा

संदिप,
जबरा बोंबील आख्यान.......
"मासे तुमचं अन्न असेल" ....
मित्रा मासे म्हणजे आपला जीव प्राण, बोंबील आणि मांदेली तर एनी टाइम फेव्हरेट. =P~
काय तो घमघमाट आ हा हा.......
माझ्या शेजारीच एक जोडप रहात होत. एकादा त्याने सुकं बनवल होत. आक्खी इमारत त्या सुवासाने पावन झाली होती. अरे मी तर त्या दिवशी नुसत्या वासावर चार घास जास्त जेवलो. वरच्या मजल्यावर एक शुद्ध शाकाहरी कुटुंब रहात होत. झालं या वासने त्याला लागल मळमळायला. :& त्याची बायको (बिचारी)सगळ्यांची दार ठोठावुन पाहात होती, कि नक्की कुठल्या घरातुन हा गंध येतोय. चेहेर्‍यावर एकदम हवालदील भाव होते. आधिच 'त्या ' वासने तिला पण मळमळत होत आणि त्यात तिच्या नवर्‍याने ओकुन ओकुन ताप वाढवला होता. म्हणुन 'त्या'चा उगम शोधत होती.
आयला तेव्हा पासुन नियम केला की बोंबील / सुकं करताना घरात चार अगरबत्या जास्त लावयच्या. उगाच आपल्या सुखासाठी दुसर्‍याच्या पोटात का दु़खवा.
--(बोंबीलवेडा) गणपा.

ईश्वरी's picture

6 May 2008 - 7:03 am | ईश्वरी

आजच भाग्यश्री चे बटर चिकन आणि व्हेज बिर्याणी चे फोटो पाहीले आणि आता हे बोंबील आख्यान ! तोन्ड जाम खवळलय .
आता कधी एकदा हे पदार्थ खातीय असं झालयं.
बाकी हे बोंबील आख्यान एकदम मस्त जमलय. जमल्यास रेसिपी ही पाठवा.

: आधिच 'त्या ' वासाने तिला पण मळमळत होत आणि त्यात तिच्या नवर्‍याने ओकुन ओकुन ताप वाढवला होता. म्हणुन 'त्या'चा उगम शोधत होती.
:)) :)) :))
ईश्वरी

प्रभाकर पेठकर's picture

6 May 2008 - 8:06 am | प्रभाकर पेठकर

: आधिच 'त्या ' वासाने तिला पण मळमळत होत आणि त्यात तिच्या नवर्‍याने ओकुन ओकुन ताप वाढवला होता. म्हणुन 'त्या'चा उगम शोधत होती.
:)) :)) :))

जे कोणी मासे किंवा नॉन-व्हेज खात नाहीत त्यांना साहजिकच अशा गोष्टींच्या वासाने त्रास होतो. शाकाहारी व्यक्तींनी 'खाणार्‍यांची' हेटाळणी करू नये हे जितके खरे आहे तितकेच 'खाणार्‍यांनी' शाकाहारी व्यक्तींच्या भावना, त्यांची जीवनपद्धती, त्यांची शाकाहारी खाद्यसंस्कृती ह्यांचा आदर करावा. इतके खदाखदा हसू नये.

देवांग's picture

9 Jan 2014 - 10:53 am | देवांग

इतके खदाखदा हसू नये. ---- पेठकर काका पेटले

संदीप चित्रे's picture

6 May 2008 - 7:35 am | संदीप चित्रे

>> मित्रा मासे म्हणजे आपला जीव प्राण, बोंबील आणि मांदेली तर एनी टाइम फेव्हरेट
कसं बरोब्बर बोललात :)

प्रभाकर पेठकर's picture

6 May 2008 - 8:07 am | प्रभाकर पेठकर

बोंबील तर अगदी लहानपणापासून साथ देतो. नमुन्यादाखल बघा हं…

लेखातील वरील वाक्या नंतर जे ८ नमुने दिले आहेत ते लेखात ओढून ताणून आणलेले वाटतात आणि किंचित रसभंग करतात. बाकी लेख उत्तम आहे. उचंबळून आलेल्या भावना व्यवस्थित शब्दांकित केल्या आहेत.

मला तरी असं वाटतं की बोंबील हा एक मासा असा आहे जो वाटीपेक्षा ताटात यावा !

आवड प्रत्येकाची, असेच म्हणावे लागेल. मला दोन्ही प्रकार आवडतात. माझ्या CKP मित्राच्या आईच्या हातच्या खाल्लेल्या बोंबिल कालवणाची चव आजही तोंडात ताजी आहे. पण खूप जणांना कालवणा पेक्षा बोंबिल तळूनच अधीक आवडतो असे मलाही जाणवले आहे.

मासे भरपेट खाऊन, सोलकडी ढोसून झाल्यावर धुतल्या हाताचा वास घेत पुन:प्रत्ययाचा आनंद उपभोगत सोफ्यावर बसून राहणे हा मत्स्य आहाराचाच एक भाग आहे असे मी मानतो.

चांगल्या लेखा बद्दल मनःपूर्वक अभिनंदन.

धमाल मुलगा's picture

6 May 2008 - 12:04 pm | धमाल मुलगा

संध्याकाळी घरी पोचलो तर दीपा म्हणाली तुझ्या चेहऱ्यावर "बोंबील" असं लिहिलेलं दिसतंय !

:)

आणि जर लिहिलेलं वगैरे असलंच तर, "कधी जेवायचं" असं असेल की नाही?

अगदी बरोब्बर !!!!

एकुणातच मासे खाणं हा काही माझा प्रांत नाही...आम्ही रमतो कोंबडीच्या तंगडीत :)
पण हे वाचून च्यामारी, संदीपराव, मासे खायचा मूड व्हायला लागलाय...

मस्त लिहिलय!

पेठकर काकांसारखंच म्हणतो "छान लेखाबद्दल मनःपुर्वक अभिनंदन" !!!

नंदन's picture

6 May 2008 - 12:50 pm | नंदन

मु. पो. बोंबिलवाडी आवडली :). बाकी तळलेल्या बोंबलाबरोबरच वाटून केलेल्या हिरव्या सुक्या कालवणालाही तोड नाही.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

अन्जलि's picture

6 May 2008 - 1:48 pm | अन्जलि

शुध शाकाहारि असलयामुले चव महित नहि पन लिखान छन जम्ले अहे

अभिज्ञ's picture

6 May 2008 - 2:13 pm | अभिज्ञ

"शुध्द शाकाहार "
ही काय भानगड असते बुवा?

गणपा's picture

6 May 2008 - 2:29 pm | गणपा

अंडी खाणारे अशुध्द शाकाहारी ;) (आयला अंडी तर आवडतात मग अंड शाकाहारी असतं म्हणत पळवाटा शोधतात.)
आधी अंड की आधी कोंबडी या सरखा, अंड व्हेज की नॉनव्हेज ह्यावर पण स्वतंत्र काथ्याकूट होउ शकतो.

---(आधी अंड की आधी कोंबडी ? - जे आधी ऑरर्डर देऊ ते ....असे मानणारा) गणपा

llपुण्याचे पेशवेll's picture

6 May 2008 - 11:47 pm | llपुण्याचे पेशवेll

अंडी खाणारे अशुध्द शाकाहारी (आयला अंडी तर आवडतात मग अंड शाकाहारी असतं म्हणत पळवाटा शोधतात.)
आधी अंड की आधी कोंबडी या सरखा, अंड व्हेज की नॉनव्हेज ह्यावर पण स्वतंत्र काथ्याकूट होउ शकतो.

---(आधी अंड की आधी कोंबडी ? - जे आधी ऑरर्डर देऊ ते ....असे मानणारा) गणपा

गणपतराव, हसून हसून फुटलो बघ... =))

पुण्याचे पेशवे

प्रियाली's picture

6 May 2008 - 3:18 pm | प्रियाली

बोंबील हा माझा सर्वात आवडता मासा आहे. केवळ त्यासाठी भारत वारी करावी लागली तरी करेन इतका. तुम्हा भाग्यवान की तुम्हाला अमेरिकेत बोंबील मिळतात. आम्हाला मिळत नाहीत हे दुर्दैव. चायनीज दुकाने तपासून पाहायला हवीत. भारतात त्यांना बाँबे ड्क्स म्हणतात, चायनीज दुकानात कोणते नाव दिलेले असते?

विसोबा खेचर's picture

6 May 2008 - 3:33 pm | विसोबा खेचर

गरम गरम चपाती, त्यावर पातळ धारेचं तूप आणि ताजे फडफडीत ओले बोंबील !! किंवा मग गरम आणि छान मऊ-मऊ असा पांढरा भात आणि चवदार बोंबिलांचं कालवण ! पण जेवणानंतर -- 'जाणिजे यज्ञकर्म' पूर्ण करण्यासाठी, नारळाचं दूध आणि आमसुलांचा रंग अशा रंगसंगतीने गुलाबी झालेली, आंबट-गोड सोलकढी ! बस्स…आपली मागणी एवढीच !

तुम्हाला सांगतो, खूप कमी प्रकारचे पदार्थ असे आहेत की जे पोटात उतरताना शरीरातील सगळे senses जागे करत जातात ! त्या यादीत बोंबील खूपच वर !

वा संदिपराव! एका सुंदर आणि चविष्ट लेखाबद्दल अभिनंदन...! अजूनही असेच चवदार लेख येऊ द्या प्लीज..

बोंबलाची महती वर्णावी तेवढी कमीच!

आपला,
(बोंबिलप्रेमी) तात्या.

मन's picture

6 May 2008 - 7:13 pm | मन

मी शुद्ध शाकाहारी आहे.( अंडी आणि दुध सुद्धा सोडुन दिलेला).
पण हे "मत्स्य पुराण"(की मत्स्य पुरण?;-)) लै आवडलं.

येक शंका:-
खार्‍या पाण्यातील मासे खारट असतात का हो?
नदीतील मासे बेचव लागतात का हो?
भरीत अगदि कुठल्यातरी माशासारखेच लागते असे "मत्स्य प्रेमी"ने सांगितले होते.
कुठला बरं तो मासा?

आपण एखाद्याची तब्येत "तोळा-मासा झाली " असे म्झाली""खराब झाली" असे म्हणण्यासाठी.
त्यातील "मासा" शब्दाचा ह्या ख्रर्‍या माशांशी संबंध आहे का हो?

थोडं छोटे-मासे मोठे मासे ह्याबद्दलः-
एखाद्या माशाने त्यच्याहुन छोटा असलेला मासा गिळला,आणि तेवढ्यात त्या मोठ्या माशाला पकडलं कोळ्याने जाळं टकुन,
तर आता जो कुणी तो मोठा मासा घेइल, त्याला तो छोटा मासा अगदि मोफत मिळतो का?
म्हंजे येक के साथ येक फ्री.
का त्याचेही वेगळे पैसे द्यावे लागतात?

मासे अंडी देतात अस ऐकलयं.
मग जसे कोंबडीची अंडी खाल्ली जातात, तशी माशांचीही खाल्ली जातात का?

:-)

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

चतुरंग's picture

6 May 2008 - 7:17 pm | चतुरंग

खार्‍या पाण्यातील मासे खारट असतात का हो?

काळ्या गाईचं दूध काळं आणि पांढर्‍या गाईचं पांढरं असं असतं का? नाही ना? मग तसंच! ;)

नदीतील मासे बेचव लागतात का हो?

नाही रे बाबा!

'तोळा' आणि 'मासा'-- - ही दोन्ही सोने तोलायची वजने होती. त्यातला 'तोळा' अजूनही आपण वापरतो. तोळा = १० ग्रॅम.
त्यामुळे तब्बेत अगदी नाजूक, हलकी होणे म्हणजे तोळा-मासा होणे असा वाक्प्रचार आहे.

चतुरंग

प्रभाकर पेठकर's picture

6 May 2008 - 8:37 pm | प्रभाकर पेठकर

गुंजा..मासा...तोळा ही वजने होती.

८गुंजा = १ मासा
२० मासे = १ तोळा

१ तोळा म्हणजे ११.६४ ग्रॅम्स. ( १० ग्रॅम नाही)

गणपा's picture

6 May 2008 - 8:55 pm | गणपा

आवांतरा बद्दल क्षमस्व..
पेठकर काका,
गुंज म्हणजे ती लाल आणि काळी रंग संगती असलेली 'बी ' का? (३/४ भाग लाल आणि वरचा १/४ भाग काळा असतो.)
लाहान पणी गावाकडे ह्या गुंजा गोळा करायचा छंद होता....

प्रभाकर पेठकर's picture

6 May 2008 - 10:25 pm | प्रभाकर पेठकर

होय त्याच त्या गुंजा.
अशा ८ गुंजा पाण्यात टाकून त्यांचा 'मासा' होतो का, हे पाहण्यात मी तास न् तास घालवले आहेत.

पिवळा डांबिस's picture

7 May 2008 - 6:19 am | पिवळा डांबिस

अशा ८ गुंजा पाण्यात टाकून त्यांचा 'मासा' होतो का, हे पाहण्यात मी तास न् तास घालवले आहेत.
प्रभाकरभाऊ, अहो हे लहानपणी की हल्ली?:))
बाकी हा खेळ आम्हाला आवडला! आता आम्ही रिटायर झालो की हाच खेळ खेळत बसणार.....
झालाच मासा तर जेवणाची सोय होईल, नाही झाला तर वेळ तरी झकास जाईल?:))
रिटायरमेंटला आतुर,
पिवळा डांबिस

चतुरंग's picture

6 May 2008 - 9:04 pm | चतुरंग

तुम्ही म्हणता ते जुने वजन होते पण सध्याचे वजन १ तोळा = १० ग्रॅम असेच घेतात ना?
(चु.भू.दे.घे.)
चतुरंग

प्रभाकर पेठकर's picture

6 May 2008 - 10:34 pm | प्रभाकर पेठकर

अजूनही सोनाराला तुम्ही सांगितलेत की १० ग्रॅम नाही मला एक तोळा सोने हवे आहे, तर तो तुम्हाला १ तोळाच सोने देईल.
१० ग्रॅमला तोळा म्हणणे हे सोयीमुळे सुरू झाले आहे. पण सोनाराने १ तोळा असे बिलात लिहून १० ग्रॅम सोने दिले असेल तर तुम्ही पोलिसात तक्रार करू शकता.

llपुण्याचे पेशवेll's picture

6 May 2008 - 11:50 pm | llपुण्याचे पेशवेll

पण मग तोळा म्हणजे नक्की किती ग्रॅम..
पुण्याचे पेशवे

मन's picture

7 May 2008 - 2:39 am | मन

दोन्हीही "सोने" नावाची अदृश्य वस्तु मोजण्यासाठी वपरतात एवढे कळले.

सोने अदृश्य एवढ्यासाठीच की साला ही चीज दिसते कशी ते अजुन प्रत्यक्षात पाह्यलं नाहिये.
(येक्दा सराफाअच्य दुकानात पण गेलो मुद्दाम पाहण्यासाठी, पण साला त्यानं चेहर्‍यावरचं पैअचानलं
आपल्याला, की ह्ये काही आपलं पोटेंशियल कष्टमर न्हाइ म्हणुन.)
तर असो.
"मासा" ह्या विषयात आपण सर्वांनी दिलेल्या माहिती मुळे 'मना 'चे ज्ञान("तोळा"भर) वाढले.
'मन' आपले आभारी आहे.

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे

प्रभाकर पेठकर's picture

7 May 2008 - 9:12 am | प्रभाकर पेठकर

माझ्या, वरील एका प्रतिसादात दिले आहे.

१ तोळा = ११.६४ ग्रॅम्स.

गणपा's picture

6 May 2008 - 8:20 pm | गणपा

मना एक शंका विचारता विचारता बर्‍याच विचारल्यास की...;)

खार्‍या पाण्यातील मासे खारट असतात का हो?
नदीतील मासे बेचव लागतात का हो?

खारट नसतात रे, पण गोड्या पाण्यातल्या पेक्षा खार्‍या पाण्यातीले मासे जास्त रुचकर आसतात आसा आमचा अनुभव आहे.

भरीत अगदि कुठल्यातरी माशासारखेच लागते असे "मत्स्य प्रेमी"ने सांगितले होते. कुठला बरं तो मासा?

काय कल्पना नाय बॉ...

थोडं छोटे-मासे मोठे मासे ह्याबद्दलः-
एखाद्या माशाने त्यच्याहुन छोटा असलेला.............

हा प्रश्न मालाही लहान असताना पडायचा. कोळीण मासे साफ करुन देताना बर्‍याच वेळा बोंबलाच्या तोंडात कोळंबी वा लहान बोंबील पाहिला होता. माझी स्वारी जाम खुश व्हायची की वाह फुकटात अजुन एक मासा मिळाला, पण ती कोळीण तो मासा फेकुन द्यायची. मी एक दोनदा तिच्याशी वाद पण घातला. पण आईने मलाच गप्प केल :(

मासे अंडी देतात अस ऐकलयं. मग जसे कोंबडीची अंडी खाल्ली जातात, तशी माशांचीही खाल्ली जातात का?

गाबोळी (माशांचीही अंडी) ज्याम झक्कास हा... शक्यतो फ्राय केलेली ब्येष्ट. =P~ कोळणी कडे नुस्त्या उड्या पडतात गाबोळी साठी.
पिंगपाँग च्या आकारहुन थोड्या लाहान आकराची माशांचीही अंडीही पाहिलीत. (कोणता मासा ते माहीत नाही) केशरी रंगाची होती. पण ती कधी खाउन नाही पाहिली.

--(शंका निरसनी) गणपा.

मन's picture

7 May 2008 - 2:44 am | मन

अजुनही येक शंका आहेच.....

खार्‍या पाण्यातील मासे पुन्हा खारवावे का लागतात?
पाण्यातुन नुकतेच काढ्लेले मासे धुण्याची गरज काय?

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

रामदास's picture

6 May 2008 - 9:18 pm | रामदास

नियम क्र.१= मच्छी आणणे हा प्राथमिक प्रयोग .अनुभवी लोक याला बाजार एव्हढंच म्हणतात.
नियम क्र. २= खरा आहारी खारे आणि गोडे असा फरक करत नाही. तो सर्व मत्स्य समभाव पाळतो.
नियम क्र.३=फक्त खराब मासे बेचव लागतात.रोहू कटला काही असो रान्धपी कसा आहे ते महत्वाचे.

आता थोडेसे सामान्यज्ञान. माशाची अंडी अप्रतिम लागतात. त्याला गाबुळी म्हणतात. फिरन्ग लोक कॅव्हिआर म्हणतात.
तोळा मासा आणि गुंज सोन्याच्या वजनाची मापे आहेत.
next....

स्वाती दिनेश's picture

6 May 2008 - 7:22 pm | स्वाती दिनेश

मत्स्य प्रेमी नसूनही हे बोंबिल पुराण आवडले,
स्वाती

संदीप चित्रे's picture

6 May 2008 - 8:03 pm | संदीप चित्रे

मनोबा ..
माशांची अंडी अतिशय महाग 'डेलिकसी' समजली जातात आणि आवडीने खाल्ली ही जातात.

Caviar is the processed, salted roe of certain species of fish, most notably the sturgeon. It is commercially marketed worldwide as a delicacy and is eaten as a garnish or a spread; for example, with hors d'œuvres. (संदर्भ -- विकीपिडीया)

"What is Caviar?" असा प्रश्न गुगल केला तर अधिक माहिती मिळेल.

वेलदोडा's picture

6 May 2008 - 11:38 pm | वेलदोडा

राहवले नाही म्हणुन प्रतिक्रिया देतो आहे,

: आधिच 'त्या ' वासाने तिला पण मळमळत होत आणि त्यात तिच्या नवर्‍याने ओकुन ओकुन ताप वाढवला होता. म्हणुन 'त्या'चा उगम शोधत होती. :))

---जे कोणी मासे किंवा नॉन-व्हेज खात नाहीत त्यांना साहजिकच अशा गोष्टींच्या वासाने त्रास होतो. शाकाहारी व्यक्तींनी 'खाणार्‍यांची' हेटाळणी करू नये हे जितके खरे आहे तितकेच 'खाणार्‍यांनी' शाकाहारी व्यक्तींच्या भावना, त्यांची जीवनपद्धती, त्यांची शाकाहारी खाद्यसंस्कृती ह्यांचा आदर करावा. इतके खदाखदा हसू नये.

प्रभाकर पेठकर यानी शाकाहारीन्ची एवढी बाजू का घ्यावी?
गणपा यानी प्रसन्ग फारच गमतीशीर इश्टाईल ने मान्ड्ला आहे. मलाही जाम हसू आले. पण त्याचा अर्थ असा नाही की खाणारे शाकाहारी व्यक्तींच्या भावना, त्यांची जीवनपद्धती, त्यांची शाकाहारी खाद्यसंस्कृती ह्यांचा आदर करीत नाही. किम्बहुना करतातच.
आम्ही तर कायम उलट अनुभवले आहे बुवा. माझा एक पक्का शाकाहारी मित्र मला म्हणाला होता की US मध्ये रहात असूनही मी अजून बाटलेलो नाही. (त्याच्या मते खाणे व पिणे म्हणजे बाटणे.)
न खाणारे 'खाणारे' म्हणजे महापापी लोक आहेत असे समजतात आणि नाही नाही ते सन्दर्भ देउन तुम्ही कसे चुकीचे वागत आहात असे ठसवत असतात. आणी स्वतः शाकाहारी असल्याचा अभिमान (?) बाळगतात. अभिमान बाळगतात तर बाळ्गा राव पण खाणार्याना कशाला कमी लेखता?
ईथे US मधे आपल्या देशी शाकाहारी लोकान्च्या स्वयम्पाक घरातूनही कसले कसले घाण वास येत असतात हे दारातून आत येणाराच जाणो. थोडक्यात वास सरवच खाद्य पदार्थाना असतात...व्यक्तिपरत्वे चान्गले आणि वाईट ही.. त्यासाठी कोणी कोणाच्या खाण्याला नावे ठेवू नये.
बाकी बोम्बील आख्यान जबरा झाले आहे. जियो सन्दीप.

--(मत्स्य प्रेमी) वेलदोडा

अभिज्ञ's picture

7 May 2008 - 12:13 am | अभिज्ञ

जे कोणी मासे किंवा नॉन-व्हेज खात नाहीत त्यांना साहजिकच अशा गोष्टींच्या वासाने त्रास होतो. शाकाहारी व्यक्तींनी 'खाणार्‍यांची' हेटाळणी करू नये हे जितके खरे आहे तितकेच 'खाणार्‍यांनी' शाकाहारी व्यक्तींच्या भावना, त्यांची जीवनपद्धती, त्यांची शाकाहारी खाद्यसंस्कृती ह्यांचा आदर करावा. इतके खदाखदा हसू नये.

प्रभाकर पेठकर यानी शाकाहारीन्ची एवढी बाजू का घ्यावी? :?

मला वाटते पेठकर काकांनी शाकाहारी वा मांसाहारी अशा कोणाचीच बाजु घेतलेली नाहिये. त्यांनी फक्त दोघांनीहि एकमेकाचि हेटाळणी
करु नये येवढेच म्हंटले आहे. :)

बाकि,
ईथे US मधे आपल्या देशी शाकाहारी लोकान्च्या स्वयम्पाक घरातूनही कसले कसले घाण वास येत असतात हे दारातून आत येणाराच जाणो.
हे काहि झेपले नाही.~X(

अबब.

प्रभाकर पेठकर's picture

7 May 2008 - 9:22 am | प्रभाकर पेठकर

धन्यवाद श्री. अबब..

मला वाटते पेठकर काकांनी शाकाहारी वा मांसाहारी अशा कोणाचीच बाजु घेतलेली नाहिये. त्यांनी फक्त दोघांनीहि एकमेकाचि हेटाळणी करु नये येवढेच म्हंटले आहे.

तुम्हीच माझा प्रतिसाद नीट वाचलेला दिसतो आहे.

पक्या's picture

7 May 2008 - 12:29 am | पक्या

न खाणारे 'खाणारे' म्हणजे महापापी लोक आहेत असे समजतात आणि नाही नाही ते सन्दर्भ देउन तुम्ही कसे चुकीचे वागत आहात असे ठसवत असतात. आणी स्वतः शाकाहारी असल्याचा अभिमान (?) बाळगतात. अभिमान बाळगतात तर बाळ्गा राव पण खाणार्याना कशाला कमी लेखता?

-- पूर्ण सहमती
माझ्या मते 'न' खाणारेच (शाकाहारी) खाणार्याची हेटाळ्णी करतात. स्वानुभव.
खाणार्यानी न खाणार्यान्ची हेटाळ्णी केलेली अजून्तरि पहिलि नाहि की ऐकली नाही.

गणपा's picture

7 May 2008 - 12:45 am | गणपा

माझी आजी केळफुलाची (केळीच्या बोंडाची) भाकरी केळीच्या पानांत थापुन करायची (बोंडाची भाकरी).
तर कधी कधी ती त्यात ओले बोंबील पण घालयची, त्याची चव आजही जीभेवर रेंगाळते.
या भारत भेटीत आजीकडे फर्माईश केली पाहिजे. (पण बोंबील मिळतील का? :W )
--गणपा

नेत्रेश's picture

7 May 2008 - 2:28 am | नेत्रेश

: आधिच 'त्या ' वासाने तिला पण मळमळत होत आणि त्यात तिच्या नवर्‍याने ओकुन ओकुन ताप वाढवला होता. म्हणुन 'त्या'चा उगम शोधत होती.

जे कोणी मासे किंवा नॉन-व्हेज खात नाहीत त्यांना साहजिकच अशा गोष्टींच्या वासाने त्रास होतो. शाकाहारी व्यक्तींनी 'खाणार्‍यांची' हेटाळणी करू नये हे जितके खरे आहे तितकेच 'खाणार्‍यांनी' शाकाहारी व्यक्तींच्या भावना, त्यांची जीवनपद्धती, त्यांची शाकाहारी खाद्यसंस्कृती ह्यांचा आदर करावा. इतके खदाखदा हसू नये.

आम्हि अभियन्त्रिकि महविद्यालयातील वसतीग्रुहात असताना कोकणी मुले सु़खे मासे भाजुन जेवणा बरोबर खायचि. पण गुजराती मुलाना त्या वासाने खुप त्रास व्हायचा. (माझ्या तोण्डात पाणी यायचे). त्यावेळी त्या शाकाहारी जीवान्चे काय हाल होत असतील ते आता माझा शेजारी पोर्क /बीफ भाजु लागला की समजते.

चित्रा's picture

7 May 2008 - 3:57 am | चित्रा

बोंबिलपुराण आवडले. पुढच्या वेळेस छायाचित्र नक्की द्या!

पक्या's picture

7 May 2008 - 4:56 am | पक्या

-- आम्हि अभियन्त्रिकि महविद्यालयातील वसतीग्रुहात असताना कोकणी मुले सु़खे मासे भाजुन जेवणा बरोबर खायचि. पण गुजराती मुलाना त्या वासाने खुप त्रास व्हायचा. (माझ्या तोण्डात पाणी यायचे). त्यावेळी त्या शाकाहारी जीवान्चे काय हाल होत असतील ते आता माझा शेजारी पोर्क /बीफ भाजु लागला की समजते.

अहो शाकाहार काय नी मान्साहार काय - कोणत्याही उग्र वासाने त्रास होऊ शकतो. कान्दा, कोबी, लसूण, मूळा ह्यान्चा वास न आवड्णारे आणि सहन न होणारे कितीतरी आहेत.
एका मित्राची बायको फ्लावर चा वास येतो म्हणून ती भाजीच करीत नाही.

-- ईथे US मधे आपल्या देशी शाकाहारी लोकान्च्या स्वयम्पाक घरातूनही कसले कसले घाण वास येत असतात हे दारातून आत येणाराच जाणो. --- हे काहि झेपले नाही
US मधील घरात किचन मधे खिडकी नसावी -- खेळती हवा नसावी. त्यामुळे पदार्थाचे वास तसेच घरात रहात असावेत. घरात रहाणार्याला ते कळत नसावे पण बाहेरून आत येणारयाला त्या उग्र वासाचा एकदम भपकारा येत असावा. बरोबर की नाही वेलदोडा जी?
अहो अबब , थोडा तर्क केला असता तर आपल्यालाही हे समजले असते.

सन्दीप चित्रे यान्चे लिखाण छान आहे. लिखाणा बरोबर एक चित्र ही चिकटवले असते तर झकास झाले असते.
- पक्या.

धमाल मुलगा's picture

7 May 2008 - 10:29 am | धमाल मुलगा

सन्दीप चित्रे यान्चे लिखाण छान आहे.

सहमत.... वादच नाही!

लिखाणा बरोबर एक चित्र ही चिकटवले असते तर झकास झाले असते.

ह्यॅ: ! गप रे पक्या...च्यायला नुसतं वाचूनच कससं व्हायला लागलं...भरीला आणि चित्र टाकलं असतं तर आमचा टिंग्यासारखा अवतार झाला असता...
हा असा: =P~ =P~ =P~ =P~ =P~ =P~ =P~

अर्थातः लाळ...लाळ...लाळ...लाळ...लाळ...लाळ...लाळ...लाळ...लाळ...

:))

-(हावरट) ध मा ल.

-- ह्यॅ: ! गप रे पक्या...च्यायला नुसतं वाचूनच कससं व्हायला लागलं...भरीला आणि चित्र टाकलं असतं तर आमचा टिंग्यासारखा अवतार झाला असता...
हा असा: =P~ =P~ =P~ =P~ =P~ =P~
अर्थातः लाळ...लाळ...लाळ...लाळ...लाळ...लाळ...लाळ...लाळ...लाळ...

आता सन्दिप काय आपल्याला घरी थोडाच बोलावनार आहे बोम्बील खायला.. (जरी लेखात नागपुरी आमन्त्रण असले तरी)
त्यामुळे पोटाला नाही मिळालं तरी डोळ्याच पारणं तरी फिटेल चित्र नुसतं बघून.
- पक्या

संदीप चित्रे's picture

7 May 2008 - 8:35 pm | संदीप चित्रे

पक्या, धमु , तात्या आणि इतर मिपाकर..
बोंबील खायला येण्याचे उभं आमंत्रण आहे ..कधी येताय?
:)

विजुभाऊ's picture

7 May 2008 - 8:46 pm | विजुभाऊ

उभं आमंत्रण ? तुला बुफे म्हणायचे आहे का?

संदीप चित्रे's picture

7 May 2008 - 8:56 pm | संदीप चित्रे

Standing Invitation :)

धमाल मुलगा's picture

8 May 2008 - 10:22 am | धमाल मुलगा

संदीपराव,
आमंत्रणाबद्दल आभारी आहे..

पण्ण...हतुन थंतं अम्येरिकेत याचं म्हंजी इमानाच्या तिकिटाचा इच्चार केला तर आमी तेव्हढ्या पैक्यात तुमची आठवण काढत इथंच "असावा सुंदर चॉकलेटचा बंगला" च्या धर्तीवर "असावा सुंदर बोंबलाचा महाल" बांधून खाऊ :)
जमलं तर या तुम्हीच...मस्त त्या महालात बसुन भिंतीचे तुकडे हाणू भाकरीबरोबर ;)

आयुर्हित's picture

9 Jan 2014 - 1:26 am | आयुर्हित

प्रथमम नमामिम मत्स्यावताराम|
संदीपॠषी देवताम,स्वयंपाकछन्दम||
गरमागरम,अतीचविष्टम|
मुखप्रक्षालनपश्चात मासेखाणं||

टेस्ट सुंदरम,मत्स्यसुगंधम|
विटामिन E सम्प्रूक्तम,बेस्ट BP वरं||
मिपाकार खुषम,य:पठे भूकलागम!
उत्तमम, विस्तृतम, बोंबील आख्यानम||

आपला लाडका: आयुर्हीत

चित्रे साहेब, असे वर्णन करू नका हो… फार त्रास होतो. असो.

सोडे घालून गरमागरम पोहे !!!

हे पहिल्यांदा ऐकतोय. बघतो करून एकदा पण सोडे कुठे मिळणार.

बादवे, मुलुंड ला सात रस्त्याला संदीप हॉटेल मध्ये तळलेले बोंबील लाजवाब मिळतात.

बाकी लेख मस्त

- एक प्युअर नोंनव्हेजीटेरीयन

चित्रे!!!चित्रे!!! ...... खरे सीकेपी तुम्ही. फार आवडलं :)